स्वयंपाक

स्वयंपाक करण्यासाठी कोणती भांडी वापरणे फायदेशीर आहे, स्टील का लोखंडी?

1 उत्तर
1 answers

स्वयंपाक करण्यासाठी कोणती भांडी वापरणे फायदेशीर आहे, स्टील का लोखंडी?

2
तस पहिला तर स्टील किंवा लोखंड दोन्ही आयुर्वेद प्रमाणे अयोग्य आहे .. कारण यांचा अग्नी शी संपर्क आला कि ते रिऍक्ट होतात आणि अन्न दूषित करण्याचा धोका निर्माण होतो.. असा म्हणू शकतो कि हळू हळू विष बनत जात.. आणि शरीरात विकार निर्माण होऊ लागत..

सर्वात चांगल धांतू आहे तांबं किंवा पितळ. अग्नीशी संपर्क झालं कि यातून निघणारे रसायन आपल्या शरीराकरता उपयुक्त असतात. मोठ्या मोठ्या हॉटेल्स मध्ये आजही पितळी पासून बनवलेल्या भांड्यांमध्येच अन्न तयार केले जाते.. त्याची छावाच वेगळी लागते. आपल्या घरी पण २५-३०वर्ष पूर्वी पितळेच्या भांड्यात मधेच जेवण तयार केल्या जायचं..पण आता आपण स्टील, लोखंड, नॉन स्टिक किंवा जर्मन च्या भांड्यात अन्न शिजवतो.

जर्मन चे भांडे सर्वात खराब आहेत पण सर्वात जास्त हेच वापरत आहे ..स्पेसिअली कॅटरिंग व्यवसायात




आपल्या आरोग्यावर फक्त जेवण बनवण्याची पद्धतच नाहीतर, आपण कोणत्या धातूच्या भांड्यात जेवण बनवतोय त्याचाही परिणाम जाणवतो. जसं आरोग्यासाठी प्लास्टीकच्या भांड्यात जेवण बनवणे आरोग्यासाठी हानीकारक आहे. तसंच जाणून घेऊया की, आरोग्यासाठी लोखंडाची भांडी की स्टीलची भांडी उपयुक्त आहेत ते.

लोखंडाची भांडी

लोखंडाच्या भांड्यात बनवलेलं जेवण खाल्ल्याने आपल्या शरीराची शक्ती वाढते. लोह तत्त्व शरीरातील आवश्यक पोषक तत्त्व वाढवतात. याशिवाय लोह अनेक रोगांचा नाशही करतं. आपल्या शरीराला सूज आणि पिवळेपण येऊ देत नाही, काविळीला दूर ठेवते. पण लोखंडाच्या भांड्यात जेवण जेऊ नये. लोखंडाच्या भांड्यात दूध पिणं चांगलं असतं असं म्हणतात. पण या भांड्यांची देखभाल करणे थोडे जिकीरीचे आणि व्याप वाढवणारे असते. त्यामुळे शक्यतो या भांड्यात जेवण बनवून नंतर दुसऱ्या भांड्यांमध्ये काढून ठेवावं.

स्टीलची भांडी

हा एक असा धातू आहे, जो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात भांड्याच्या रूपात असतोच. आजकाल बाजारात भांड्याच्या नावावर सर्वात अधिक स्टीलची भांडीच मिळतात. पण स्टीलबाबत असं म्हटलं जातं की, त्यात जेवण बनवणं नुकसानदायक असतं. पण हे खरं नाही. स्टीलची भांडी ही नुकसानकारक नसतात. पण या भांड्यांमध्ये जेवण बनवून शरीराला ना कोणता फायदा होत ना कोणतं नुकसान होतं.

त्यामुळे आपल्या शक्य असेल आणि जे आरोग्यदायी असेल अशा भांड्यांमध्ये जेवण बनवा. मनापासून बनवलेलं जेवण मग ते चांदीच्या भांड्यात असो वा लोखंडाच्या भांड्यात असो रूचकर आणि आरोग्यदायीच ठरते.
उत्तर लिहिले · 25/12/2021
कर्म · 121645

Related Questions

स्वयंपाक म्हणजे काय?
ओट्स म्हणजे काय, त्याचे फायदे आणि नुकसान कोणते आहे?
पोहे कशापासून तयार करतात?
आहार व पोषण या शाखेचा अभ्यास केलेली गृहिणी कोणता स्वयं रोजगार करू शकते?
पितळेच्या भांड्यात स्वयंपाक कसा करावा? कढी किंवा टोमॅटो असलेल्या भाज्या केल्याने पितळी भांडी खराब होतात का?
स्वयंपाकातील क्रियांशी संबंधित असणारे मराठीतील काही शब्दप्रयोग कोणते आहे?
तिरफळ म्हणजे काय? याचा वापर स्वयंपाकात कसा होतो?