पाककला भांडी

बासुंदी बनवताना भांडे कोणत्या धातूचे वापरावे?

2 उत्तरे
2 answers

बासुंदी बनवताना भांडे कोणत्या धातूचे वापरावे?

3
लोखंडी कढईतली बासुंदी अतिशय खमंग आणि छान रंगाची होते, पण नवीन शिकताना सवय नसेल तर हमखास दूध खाली लागते. नॉनस्टिक पसरट भांड्यात दूध लागण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळे एकाच वेळी दोन भांड्यांत दूध आटवणे सोपे होते. थोडे- थोडे आटवायलाही वेळ तेवढाच लागतो, पण दोन भांड्यामुळे एकूण दूध निम्म्या वेळात आटवून होते. ही बासुंदी देखील चवदार खमंग लागते.

थोडे थोडे आटवण्याचा फायदा हा की एखाद्या वेळी चुकून दूध खाली जळले तरी तेवढा घाणा काढून टाकता येतो. सर्व दुधाला जळका वास लागत नाही. ( सर्व दूध एकदम आटवताना जर खाली लागले तर बहुतेक वेळा तो वास संपूर्ण दुधाला लागतो. जळकी खरवड काढून टाकली, वरून कितीही केशर घातले तरी तो जळकट वास खाताना डोके वर काढतोच).

मात्र भांड्यांचे नॉनस्टिक आवरण झिजलेले, चरे इ. पडलेले नसावे.  जर रोजच्या वापरातले भांडे असेल तर त्यात आधी केलेल्या उग्र चवीच्या पदार्थाचा वास शिल्लक राहिला नाही ना हे बघावे. दुधात वास सहज शोषले जातात.

लोखंडी कढई वापरायची असेल तर ती पांढरट दिसेपर्यंत घासावी अन्यथा बासुंदी बिघडू शकते.

दूध आटवता आटवता अखेरीस अगदीच कंटाळा आला तर एक लीटरला एक चमचा ह्या प्रमाणात तांदळाची बारीक पिठी गार दुधातून लावावी म्हणजे पटकन दाटपणा येतो.
उत्तर लिहिले · 5/4/2020
कर्म · 55350
0

बासुंदी बनवण्यासाठी जाड बुडाचे भांडे वापरणे आवश्यक आहे, ज्यामुळे दूधExample: तळायला लागत नाही.

steel (स्टील) किंवा aluminium (ॲल्युमिनियम) धातूचे भांडे बासुंदी बनवण्यासाठी उत्तम आहे.

टीप: लोखंडी भांडे वापरणे टाळावे, कारण त्यामुळे दुधाचा रंग बदलू शकतो.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2200

Related Questions

पितळेच्या भांड्यात स्वयंपाक कसा करावा? कढी किंवा टोमॅटो असलेल्या भाज्या केल्याने पितळी भांडी खराब होतात का?
स्वयंपाक करण्यासाठी कोणती भांडी वापरणे फायदेशीर आहे, स्टील की लोखंडी?
बालाथल येथे मोठ्या प्रमाणात कोणत्या भांड्यांचे उत्पादन होते?
अशी कोणती वस्तू आहे जी आपण खाण्यासाठी घेतो पण खात नाही?
नॉनस्टिक भांडी वापरताना काय काळजी घ्यावी?
फिरकीचा पितळी तांब्या विकत कुठे मिळेल?