कुतूहल आरोग्य

पान खाताना त्याचा रस गिळला पाहिजे की थुंकून टाकला पाहिजे?

2 उत्तरे
2 answers

पान खाताना त्याचा रस गिळला पाहिजे की थुंकून टाकला पाहिजे?

2
पान खाताना रस गिळला तर चालतो पण तंबाखू न घालता  
बिना तंबाखू चा पान केव्हाही खाणे योग्य आहे
आणि तंबाखू घातलेला पान असेल तर रस गिळता येणार नाही तो थुंकून च टाकला तंबाखू हा हानीकारक

विड्याच्या पानाचा भारतीय इतिहासाशीआणि परंपरांशी खूप जून नातं आहे .

पानाचा वापर फक्त विडा म्हणून नाही तर अनेक गंभीर आजार दूर करण्यासाठीही केला जातो .

तांबूली किंवा नागवेल नामक वेलीचे हे पान . या पानाला इंग्रजी मध्ये बीटल लीफ ,हिंदी मध्ये पानाचं पान ,तेलगूमध्ये तमालपाकु , तर मराठीत याला तांबूल किंवा खायचे पान ,विड्याचे पान ,नागवेलीचे पान असे म्हटले जाते .

 स्वादानुसार पानाचे चार प्रकार असतात . पानाची चव कडू आंबट तिखट आणि गोड . पानाचा औषधी गुणांचा उल्लेख चरक संहिता पुराण ग्रंथात केलेला आढळतो .

 पानामध्ये बाष्पशील तेलासोबतच अमिनो असिड ,कार्बोहाड्रेड आणि अनेक प्रकारची विटॅमिन्स तसेच विड्याच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आढळतात .

प्रत्येक लग्नसमारंभात, किंवा घरगुती मेजवानीमधील भोजन पार पडले, की त्यानंतर विडा असतोच. विड्याची पाने आणि त्यामध्ये असलेल्या इतर पदार्थांमुळे अन्नाचे पचन नीट होण्यास मदत होते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर विडा खाण्याची परंपरा आपल्याकडे वर्षानुवर्षे चालत आली आहे. पण या शिवाय विड्याच्या पानाचे इतरही अनेक फायदे आहेत.

विड्याच्या पानाचा रस आंघोळीच्या पाण्यामध्ये घालून त्याने आंघोळ केल्यास घामामुळे किंवा अन्य काही कारणाने शरीराला येत असलेली दुर्गंधी निघून जाण्यास मदत होते. तसेच विड्याची पाने पिण्याच्या पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकली जाण्यास मदत होते.

चेहऱ्यासाठी उपयोगी पाने - विड्याच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्याने याच्या वापराने चेहऱ्यावरील मुरुमे पुटकुळ्या दूर होण्यास मदत होते. यासाठी विड्याची काही पाने पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी थंड झाले की याचा वापर चेहरा धुण्यासाठी करावा. तसेच विड्याच्या पानाची पेस्ट थोडी हळद घालून चेहऱ्यावर लावावी आणि पाच मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा. विशेषतः बाहेरून उन्हातून आल्यानंतर या उपायाचा अवलंब करावा. त्याने कांती सुधारण्यास मदत होते.


पान शरीरातील अनेक व्याधींपासून आपलं संरक्षण करू शकतं.

दातांच्या आजारापासून तर सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि थकवा सुद्धा पान खाल्ल्यानं बरा होतो. याशिवाय पानात अनेक आयुर्वेदिक गुण आहेत. पानाचा वापर प्राचीन काळापासूनच औषधांसाठी केला गेलाय.

गुघडेदुखी किंवा पायाचं दुखणं – जर आपल्याला गुडघेदुखीची समस्या असेल किंवा आपल्याला पायाला काही लागलं असेल, तर विड्याच्या पानाला तूप लावून ते तव्यावर गरम करावं. असं गरम-गरम पान त्रास होत असलेल्या ठिकाणी लावावं. त्यानं आपला गुघडा शेकला जातो आणि तिथलं दुखणंही कमी होतं.

तोंड आलं तर विड्याचं पान अवश्य खावं – जर आपलं तोंड आलं असेल तर पान खाल्ल पाहिजे. मात्र पान विडा बनवून नाही तर फक्त त्यावर तूप लावून खावं. त्यावर दुसरं काही लावू नये. आपल्या तोंड्यातील अल्सर यानं बरे होतील.

श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत होणाऱ्या जळजळीवर उपयुक्त - श्वास घेण्यात आपल्याला त्रास होत असेल किंवा छातीत जळजळ होत असेल तर आपण पानावर तूप किंवा तेल लावून तव्यावर पान ठेवून त्यानं छाती शेकावी. असं केल्यानं कफ पण सुटतो आणि जळजळही कमी होते.

थकवा, आळस आणि अनिद्रा – विड्याच्या पानात विलायची, पेपरमिंट, लवंग, गुलकंद किंवा मध टाकून बनवलेला विडा खावा. असा विडा खाल्ल्यानं आपल्या शरीरातील आळस, थकवा दूर होतो आणि निद्रानाशाची समस्या सुद्धा पळून जाते.

 हिरड्यामधुन रक्त येत असल्यास विड्याची पाने पाण्यात उकळून मॅश करुन घ्या. हे हिरड्यांवर लावल्याने रक्त येणे कमी होईल.

 पानाच्या रसात मध मिळवुन प्यायल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊ शकतो.

बध्दकोष्ट झाल्यावर पानाचे सेवन करणे खुप फायदेशीर असेत. रोज पान चावल्याने डायबिटीज नियंत्रित केले जाऊ शकते.

किडनी खराब झाल्यावर पानाचे सेवन करने फायदेशीर असते. यावेळी तिखट मसाले, दारु किंवा मांसाहारी पदार्थांपासुन दूर रहावे.

सूज आलेल्या ठिकाणी किंवा पाय मुरगळला तर, तेथे पान गरम करुन बांधले पाहीजे. यामुळे वेदनेपासुन आराम मिळतो.

काही जण कधी तरी पान खातात, तर काहींची ती सवय आहे. पान खाणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे आयुर्वेदात नमुद आहे. पण त्याचे सेवन प्रमाणात हवे. अतिशयोक्ती, मग ती कशाचीही असो. ती वाईटच.

पानाचे होणारे नुकसान
विड्याच्या पानाला जर्द्याबरोबर (तंबाखू) खाल्ल्यास पानातील गुण नष्ट होतात.

विडा नेहमी जेवण झाल्यानंतरच खायला पाहिजे. रिकाम्या पोटी पान खाणे चांगले नसते.

जास्त पान खाल्ल्यास वा त्याची सवय असल्यास त्रास होतो. तोंड‍ किंवा डोळ्यांसंबंधी रोग होण्याची शक्यता असते.

पानासोबत जास्त कात टाकल्यास श्वसनाचा विकार होण्याची शक्यता असते.

ज्यांना ताप, दातांचे विकार असतील त्यांनी पान खाणे शक्यतो टाळावे.

पान खाणं ही वाईट सवय नसून विड्याचं पान आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. पान खाल्ल्यानं अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते.



उत्तर लिहिले · 20/10/2021
कर्म · 121705
0
थूकला पाहिजे
उत्तर लिहिले · 20/10/2021
कर्म · 0

Related Questions

तोंडाला पाणी का सुटते?
पैसा गल्ल्यांमध्ये लिंबू का ठेवतात?
तृतीयपंथीयांची प्रेतयात्रा रात्री का निघते?
सूर्याचा नक्की रंग कोणता? तो पिवळा का दिसतो?
नोटांवर केवळ गांधीजींचा फोटो का असतो?
जांभळी का येते?
नवीन चपला किंवा जोडे का चावतात?