तंबाखू सवयी आरोग्य

चुना तंबाखूमध्ये घालून का खाल्ला जातो?

2 उत्तरे
2 answers

चुना तंबाखूमध्ये घालून का खाल्ला जातो?

3
लोक मुळात तंबाखू का खातात?

प्रत्येकाला काही ना काही करण्यासाठी उत्तेजक आवश्यक असते याने कामे लवकर होतात. जसे काही लोकांना कॅफिनेटेड कॉफी( कॅफिन) किंवा चहा (टॅनिन) आवडतो.

जसे रासायनिक क्रियेचा वेग वाढविण्यासाठी उत्प्रेरक आवश्यक असते, तसे तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला निकोटिन हे उत्प्रेरक आवश्यक असते.

तसं तंबाखूमध्ये निकोटीन असते, ते एक सौम्य उत्तेजक आहे जे बर्‍याच लोकांना आवडते. तंबाखू चघळणे हे धूम्रपान करण्यापेक्षा बरे आहे आरोग्या संबंधीजोखीम कमी असते.

आता तुमचा प्रश्न चुना तंबाखू मध्ये घालून का खाल्ला जातो?

लोक चुना (कॅल्शियम हायद्राओक्साईड) तंबाखूमध्ये मिसळतात आणि ओठ आणि दात यांच्या दरम्यान ठेवतात. मी ऐकले की चुना ओठांच्या त्वचेला एक्सफोलीएट्स / मऊ करते आणि थेट रक्तवाहिन्यांमध्ये तंबाखूचे पदार्थ शोषण्यास सोपी करते. रक्तवाहिन्यांमध्ये थेट तंबाखूच्या पदार्थांचे शोषण करणे सुलभ करते.

आता तर रेडी मिक्स काँक्रिट सारखी रेडी मिक्स तंबाखू (उदा. मीराज, चैनी खैनी इत्यादी) येतायेत त्यात चुना मिसळायची गरज नाही.

. तंबाखू वेळापत्रक


.

तळटीप :- तंबाखू चघळणे शरीरासाठी धोकादायक आहे. तंबाखू खाल्याने मुखाचा कर्करोग होऊ शकतो.
उत्तर लिहिले · 25/12/2021
कर्म · 121765
0

चुना तंबाखूमध्ये घालून खाण्याचे अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

  • सामु (pH) वाढवणे: चुना हा अल्कधर्मी (alkaline) असतो. तो तंबाखूतील निकोटीन (nicotine) नावाच्या रासायनिक पदार्थाला अधिक प्रभावी बनवतो. यामुळे निकोटीन लवकर रक्तात शोषले जाते आणि जास्त नशा येते.
  • चव वाढवणे: काहींना चुन्यामुळे तंबाखूची चव अधिक चांगली लागते.
  • तोंडातील पीएच (pH) पातळी संतुलित करणे: तंबाखूमुळे तोंडातील पीएच पातळी असंतुलित होते, चुना तो संतुलित करतो, असे काही लोकांचे मत आहे.

तंबाखू आणि चुना एकत्र खाणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. यामुळे तोंडाचा कर्करोग, दातांचे रोग आणि इतर गंभीर समस्या होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1080

Related Questions

लहान मुलाला दात येत असताना त्रास झाल्यास काय करावे?
बी. फार्मसी विषयी माहिती?
हातपाय व पाठ कंबर दुखण्याचे काय कारण असू शकते?
पाण्याशी संबंधित आजारांचे प्रमुख प्रकार स्पष्ट करा?
व्हिटॅमिन डी व कॅल्शियम कोणकोणत्या पदार्थांमधून व आणखी कशामधून मिळू शकते?
माझे वय ३७ वर्ष आहे आणि माझे समोरील खालचे दोन दात हलतात, ते पक्के करण्यासाठी काही उपाय सांगा आणि याचा वजनाशी काही संबंध असू शकतो का?
माझं वय ३७ वर्ष आहे आणि माझे वजन फक्त ४३ किलो आहे, तरी वजन वाढवण्यासाठी काय खावे व काही आयुर्वेदिक उपाय सांगा?