क्रीडा कबड्डी इतिहास

कबड्डी खेळाचा इतिहास काय आहे?

3 उत्तरे
3 answers

कबड्डी खेळाचा इतिहास काय आहे?

2
पूर्वीच्या काळात हा खेळ केवळ मनोरंजनासाठी वापरला जात नसे तर शाररिरीक शक्ती व स्वतःचे सामर्त्य वाढवण्यासाठी तसेच आत्म रक्षन(Self-Defense ) वृत्ती वाढवण्यासाठी खेळला जात असे. ... इसवी सन १९१८ मध्ये कबड्डीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळाला. यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाट होता.

  

 
कबड्डी खेळाचा इतिहस

कबड्डी हा एक अत्यंत लोकप्रिय सांघिक खेळ आहे, ज्यात कौशल्य, ताकत आणि चतुराई या गुणधर्मांची आवश्य आवश्यकता असते. कबड्डी या खेळाची ची ऊत्पत्ती ४००० वर्षांपूर्वी भारतात झाली आहे. हा खेळ प्रामुख्याने भारतात खेळला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. या खेळाचा मुख्य उद्देश स्वतःचे रक्षण करणे हा गुण विकसित करणे होता. कब्बडी या खेळाला विविध नावे आहेत, जसे महाराष्ट्रात – हू-तू-तू, चेन्नईत – चेडूयुडू, पंजाबात – झाबर गंगा / सौची पक्की अशी विविध प्रांतानुसार विविध नावे आहेत. कबड्डी हा खेळ महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात मध्ये खूप प्रसिद्ध आहे.

कबड्डी खेळाचा इतिहास
पूर्वीच्या काळात हा खेळ केवळ मनोरंजनासाठी वापरला जात नसे तर शाररिरीक शक्ती व स्वतःचे सामर्त्य वाढवण्यासाठी तसेच आत्म रक्षन(Self-Defense ) वृत्ती वाढवण्यासाठी खेळला जात असे. मूलतः ह्या खेळाचे अस्तित्व महाभारतातील हिंदु पौराणिक कथांमध्ये आढळून येते.इसवी सन १९१८ मध्ये कबड्डीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळाला. यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाट होता.


 
इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासून हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.

पुरूषांच्या तुलनेत आता महिलांच्या कबड्डीलाही व्यावसायिकदृष्ट्या चांगले दिवस आलेले आहेत. पण तरीही अजूनही महिलांचा खूप जास्त सहभाग कबड्डीमध्ये दिसत नाही. कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. इतर खेळांना जसा सर्व स्तरातून पाठिंबा मिळतो तसा कबड्डीला मिळत नसल्याने चांगला आणि लोकप्रिय खेळ असूनही हा खेळ काहीप्रमाणात मागे पडतो आहे, हे नाकारता येत नाही. अस्सल भारतीय खेळ म्हणून ओळखला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी. भारताच्या गावागावात हा खेळ मोठया जोमाने खेळला जातो. खेळाची लोकप्रियताही मोठी आहे. पण तरीही हा खेळ हवा तसा प्रसिद्धीस आलेला दिसत नाही.

पुरुष, महिलांसाठी वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी., तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी. असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवतांना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे. जोशपूर्ण असणारा हा खेळ, त्याच्या सामन्यांची चुरस बघतांना मजा येते.

कब्बडी खेळाचे हे आहेत नियम:

जो संघ नाणेफेक जिंकतो तो संघ ‘अंगण’ किंवा ‘चढाई’ यापैकी एक निवडतो.
जो व्यक्ती चढाई करतो त्याला ‘कबड्डी ‘ हा शब्द स्पष्टपणे आणि सलग करावा लागतो तसे न आढळलयास पंच त्याला ताकीत देऊन त्यांच्या विरुद्ध संघाला संधी देतो.
चढाई करणारा जेव्हा विरुद्ध संघातील खेळाडूला स्पर्श करून आपल्या क्षेत्रात येईल तेव्हा त्याच्या संघाला १ गुण देण्यात येईल.
रक्षण करणाऱ्या संघने जर चढाई करणाऱ्या खेळाडूस यशस्वीरीत्या पकडून त्याची चढाई व्यर्थ केली तर रक्षण करणाऱ्या संघाला १ गुण देण्यात येतो.
जर चढाई करणारा खेळाडू रक्षण करणाऱ्या संघाच्या पकडीतून यशस्वीरीत्या निसटून मध्य रेषा पार केली तर ज्या ज्या रक्षण करणाऱ्या खेळाडूंनी चढाई करणाऱ्या खेळाडूस पकडण्याचा प्रयत्न केला किंवा स्पर्श केला असेल ते सर्व खेळाडू बाद होतात.
जेव्हा एखाद्या संघातील सर्व खेळाडू बाद होतात तेव्हा त्याच्या विरुद्ध संघाला २ गुण अतिरिक्त देण्यात येतात.
जो खेळाडू चढाई करण्यासाठी जातो त्याची चढाई तेव्हाच वैध मानली जाते जेव्हा तो निदान रेषा ओलांडून किंवा स्पर्श करून येतो. तसे न झाल्यास तो खेळाडू बाद म्हणून घोषित करण्यात येतो व त्याच्या विरुद्ध संघास १ गुण देण्यात येतो.
जर कोणताही खेळाडू खेळाच्या वेळी अंतिम रेषा ओलांडून बाहेर गेला तर त्याला बाद म्हणून घोषित केले जाते.
चढाई करणारा खेळाडू जर विपक्षी खेळाडूंची संख्या ६ किंवा ७ असेल तर बोनस रेषेला स्पर्श करून १ गुण घेऊ शकतो.
किंवा त्यापेक्षा कमी रक्षण करणाऱ्या खेळाडूंनी जर चढाई करणाऱ्या खेळाडूस पकडले तर रक्षण करणाऱ्या संघाला १+१ असे २ गुण देण्यात येतात.
चढाई करणारा खेळाडू जेव्हा विपक्षी खेळाडूला स्पर्श करेल तेव्हाच तो आणि विपक्षी खेळाडू राखीव क्षेत्रामध्ये (लॉबी ) जाऊ शकतात. जर चढाई करणारा खेळाडू विपक्षी खेळाडूला स्पर्श ना करता राखीव क्षेत्रामध्ये जातो तर तो बाद ठरवण्यात येतो.
प्रत्येक संघामध्ये किमान १० आणि कमाल १२ खेळाडू असणे आवश्यक असते. त्यातील फक्त ७ खेळाडू मैदानात खेळतात. बाकीचे ३ किंवा ५ राखीव म्हणून असतात.
कबड्डी या खेळामुळे होणारे फायदे

शरीर निरोगी आणि स्वस्थ राहाते.
सामुहिक खेळ असल्याने सांघीक भावना वृध्दिंगत होते.
परिस्थीतीला धैर्याने सामोरे जाण्याची ताकद वाढते.
निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
अंगात चतुराई आणि सामथ्र्य वाढीस लागते.



 





उत्तर लिहिले · 23/9/2021
कर्म · 121765
0

तुकारामांचा अभंग सांगतोकी कबड्डी आमचा लाडका देव "कृष्ण" खेळला होता. परंतु इतर दंतकथांनुसार कबड्डीचा उगम तमिळनाडूमध्ये ४००० वर्षांपूर्वी झाला. 

याआधी हा खेळ राजकुमारांनी किंवा त्यांच्या नववधूंना त्यांची ताकद दाखवण्यासाठी खेळला होता.

कबड्डी हा महाभारताच्या काळापासून भारतीय संस्कृतीचा एक मोठा भाग आहे. काहींचा असा विश्वास आहे की अभिमन्यूच्या स्मरणात कबड्डीचा शोध लागला. 

हा खेळ विकसित करण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे अनेक गटांच्या हल्ल्यांविरुद्ध व्यक्तींकडून बचावात्मक प्रतिसाद विकसित करणे.

कबड्डीला (Kabaddi Information In Marathi) प्राचीन कुस्ती खेळांपैकी एक म्हणून पाहिले जाते. कबड्डी हा शब्द तमिळ शब्दापासून आला आहे, काई-पिडी, ज्याचा अर्थ आहे "हात पकडणे".

कबड्डी केवळ भारतातच नाही तर बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ देखील आहे. 

भारतातील बहुतेक राज्ये हा खेळ खेळतात, परंतु पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या गावांमध्ये तो जास्त लोकप्रिय आहे.

यातील अनेक राज्ये कबड्डीला 'हू तू तू' असेही म्हणतात.
उत्तर लिहिले · 8/7/2023
कर्म · 1690
0

कबड्डी हा एक प्राचीन खेळ आहे. ह्या खेळाचा इतिहास ५००० वर्षांपेक्षा जुना आहे.

इतिहास:

  • कबड्डीचा उगम प्राचीन भारतात झाला असे मानले जाते.
  • सिंधू संस्कृतीमध्ये ह्या खेळाचे अस्तित्व असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे.
  • पौराणिक कथांमध्ये, भगवान श्रीकृष्णांनी कबड्डी खेळल्याचा उल्लेख आढळतो.
  • भारतात हा खेळ वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो, जसे की 'हु तू तू', 'चेंडू गुड्डू', आणि 'कावडी'.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी:

  • १९३६ मध्ये बर्लिन ऑलिम्पिकमध्ये कबड्डीचे प्रदर्शन करण्यात आले.
  • १९५० मध्ये अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना झाली.
  • १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीचा समावेश करण्यात आला.
  • २००४ मध्ये कबड्डी विश्वचषक सुरू झाला.

आज कबड्डी भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, इराण आणि इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

कबड्डी खेळाचे मूलभूत नियम कोणते आहेत?
कबड्डी खेळाचे कौशल्य कोणते आहे?
कबड्डी या खेळाची नियमावली कशी असते?
कबड्डी खेळातील विविध कौशल्ये कोणती आहेत?
कबड्डीचे दोन कौशल्ये कोणते आहेत?
कबड्डीचे लहान व नवीन स्वरूप कोणते?
कबड्डीतील एका संघात किती खेळाडू असतात?