
कबड्डी
0
Answer link
कबड्डी नियम
- डड्डी च्या ला २० – २० कबच्या दोन डावांमध्ये विभागले जाते. दोन दाऊदांमध्ये ५ शांततेसाठी संघर्ष उभा राहिला.
- महिलांच्या कबड्डीमध्ये २०च्या प्रकटड्ड १५ – १५ गुणांचे दोन डाव असतात.
- नाणेफेक फिरणार संघ अंगण किंवा चढाई यापैकी एकाची निवड करतो. दुसरया डावात अंगण बदलून अगोदर समानेच खेडाळू देखा डावा सुरू करतात. प्रथम ज्या संघाने चढाई नाही तो संघ चढाई करतो.
- कबड्डी खेळाच्या टीममध्ये 12 पक्ष असतात, एका ठिकाणी संघाचे असतात. ठळकपणे विशेष साधे खेळवले जातात.
- चढाई करणार्याने कबड्डी हा उच्चार स्पष्टपणे व केला पाहिजे. तसे न पाहता पंचाने त्याठला ताकीद वि संघाला चढाईची शक्ती दयावी.
- चढाई करणारयाने मध्यलांड दमदाम घालण्यास ओलांडू असे करू शकतील असे पंचांनी विरूध्द संघाला चढाईची शक्तीची दयावी.
- खेळ चालू असताना खेडाळूचा कोणताही भाग अंतिम मर्यादेबाहेर जाऊ नये, तो नंतर ठरविला जाईल.
- झटापट सुरू ठेवीव क्षेत्राचा क्रिडाक्षेत्रात समावेश होतो.
- खेळ चालू असताना खेड्याळू अंतिम रेषेबाहेर गेल्यास त्याला पंचांनी बाहेर काढावे.
- ता विदही कबखेडाळू आपल्या अंगात दमवलास वाड्डी शब्द करत त्याला उच्चार केल्यावर त्याला न देता त्यांची रेड संपली असे बोलून संघाला एक गुण दयावा.
- जेंव्हा कधी पण एक संघाचे संघाचे सर्व आऊट करेल ते संघाला २ अतिरिक्त गुण वापरतात.
- एकदा बदली केलेल्या बदली परत त्या कारणात खेळवता येत नाही.
- २० वर्षांचे दोन पूर्णांक देखील दोन्ही संघांचे गुण सारखेच आहेत तर ५-५ रेड दोन्ही संघांना त्यामध्ये जो संघ जास्त गुण मिळवून विजयी घोषित केले जाते.
0
Answer link
कबड्डी कौशल्यांचा आढावा
कबड्डी हा एक खेळ आहे ज्याचा उगम भारतात झाला आणि प्रत्येकी सात खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जातो. "रेडर" म्हणून ओळखल्या जाणार्या खेळाडूसाठी या खेळाचे उद्दिष्ट हे आहे की ते विरोधी संघाच्या अर्ध्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतील आणि शक्य तितक्या विरोधी खेळाडूंना स्पर्श करतील, त्यांच्याकडून सामना करणे टाळून. गेममध्ये बचावाचे घटक देखील समाविष्ट आहेत, कारण विरोधी संघ रेडरला गुण मिळवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो.
कबड्डी खेळण्यासाठी काही कौशल्ये महत्त्वाची आहेत:
वेग आणि चपळता: विरोधी खेळाडूंना सामोरे जाणे टाळण्यासाठी
सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता: एकाधिक टॅकलर्सचा सामना करण्यासाठी आणि संपूर्ण गेममध्ये ऊर्जा राखण्यासाठी
धोरणात्मक विचार: विरोधकांना मागे टाकण्यासाठी आणि त्यांच्या हालचालींचा अंदाज लावण्यासाठी
श्वासोच्छवासाचे तंत्र: विशेषत: "कॅच अँड होल्ड" रेड हा खेळाचा सर्वात महत्वाचा भाग आहे, एक दीर्घ श्वास घेणे आणि छापा
मारताना आपला श्वास रोखून ठेवणे.
टीमवर्क आणि कम्युनिकेशन: टीममेट्सशी समन्वय साधण्यासाठी आणि प्रभावीपणे नाटके अंमलात आणण्यासाठी.
0
Answer link
कबड्डी या खेळाची नियमावली खालीलप्रमाणे आहे:
मैदान:
- कबड्डीचे मैदान आयताकृती असते.
- पुरुषांसाठी ते 13 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असते.
- महिलांसाठी ते 12 मीटर लांब आणि 8 मीटर रुंद असते.
- मैदानाच्या मध्यभागी एक रेषा असते, जी त्यास दोन भागांमध्ये विभाजित करते.
खेळाडू:
- प्रत्येक संघात 7 खेळाडू असतात.
- सामन्याच्या वेळी, प्रत्येक संघातील 7 खेळाडू मैदानात असतात, तर बाकीचे राखीव खेळाडू असतात.
सामन्याचा कालावधी:
- पुरुषांच्या सामन्यासाठी 40 मिनिटे (20-5-20 मिनिटे)
- महिलांच्या सामन्यासाठी 30 मिनिटे (15-5-15 मिनिटे)
raiding (छापा):
- raiding म्हणजे प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टात जाऊन शक्य तितक्या खेळाडूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे.
- raider (छापा टाकणारा खेळाडू) 'कबड्डी कबड्डी' असा जप करत प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टात जातो.
- जर रेडरने श्वास तोडला, तर तो बाद होतो.
- रेडरने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना स्पर्श करून आपल्या कोर्टात परतणे आवश्यक असते.
- जर रेडरने यशस्वीरित्या स्पर्श केला आणि परतला, तर त्याला स्पर्श केलेले खेळाडू बाद ठरवले जातात.
डिफेन्स (बचाव):
- डिफेंडरचा (बचाव करणारा खेळाडू) उद्देश रेडरला आपल्या कोर्टात स्पर्श करण्यापासून रोखणे असतो.
- डिफेंडर रेडरला पकडण्याचा प्रयत्न करतात.
- जर रेडरला डिफेंडरनी पकडले, तर रेडर बाद होतो.
गुण:
- raid मध्ये स्पर्श केलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी रेडरला गुण मिळतो.
- जर डिफेंडरने रेडरला पकडले, तर डिफेंडरच्या संघाला गुण मिळतो.
- एखाद्या संघातील सर्व खेळाडू बाद झाल्यास, प्रतिस्पर्धी संघाला लोण मिळतो, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त गुण मिळतात.
बाद होणे आणि पुनरुज्जीवन:
- जो खेळाडू बाद होतो, तो काही वेळासाठी मैदानाबाहेर बसतो.
- जर त्याच्या संघाने प्रतिस्पर्धी खेळाडूला बाद केले, तर तो पुन्हा खेळण्यासाठी पात्र ठरतो.
अतिरिक्त नियम:
- सामन्यादरम्यान खेळाडूंनी पंच आणि रेफरीच्या निर्णयांचे पालन करणे आवश्यक आहे.
- खेळाडूंनी आक्रमक किंवा धोकादायक वर्तन टाळणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
Wikipedia - Kabaddi
Sports Authority of India
0
Answer link
आक्रमकाला पाठीमागून पकडण्यासाठी प्रभावीपणे वापरले जाणारे हे बचावात्मक कौशल्यांपैकी सर्वोत्तम मानले जाते . एकदा का ' अँटी ' ने आक्रमकाला असे पकडले की तो तिथल्या तिथे जखडला जाऊन निसटणे अशक्य होते . आक्रमक एका कोपऱ्याकडून दुसऱ्याकडे पाठ दाखवून बेसावध चढाई करतो तेव्हा हे कौशल्य वापरण्याची अनुकूल वेळ असते
• सात खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जातो, खेळाचा उद्देश एकच खेळाडू गुन्ह्यासाठी आ, ज्याला •"रेडर" म्हणून संबोधले जाते, विरुद्ध संघाच्या अर्ध्या कोर्टात धाव घेणे, शक्य तितक्या त्यांच्या बचावकर्त्यांना स्पर्श करणे, आणि त्यांच्या स्वतःच्या कोर्टाच्या अर्ध्या भागात परत या सर्व बचावकर्त्यांद्वारे हाताळल्याशिवाय आणि एका दमात.
•रेडरने टॅग केलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी गुण मिळवले जातात, तर विरोधी संघ रेडरला थांबवल्याबद्दल एक गुण मिळवतो.
•खेळाडूंना स्पर्श केल्यास किंवा टॅकल केल्यास गेममधून बाहेर काढले जाते, परंतु त्यांच्या टीमने टॅग किंवा टॅकलमधून मिळवलेल्या प्रत्येक गुणासाठी त्यांना परत आणले जाते.
1
Answer link
कबड्डीचे लहान व नवीन स्वरूप म्हणजे प्रो कबड्डी. प्रो कबड्डी हा एक लहान फॉर्मेटचा कबड्डी खेळ आहे जो भारतात लोकप्रिय आहे. हा खेळ २०१४ मध्ये सुरू झाला आणि त्याने लवकरच भारतात लोकप्रियता मिळवली. प्रो कबड्डी हा एक वेगवान आणि रोमांचक खेळ आहे जो पाहण्यासाठी खूप मनोरंजक आहे.
प्रो कबड्डीमध्ये प्रत्येक संघात सात खेळाडू असतात. खेळ ४० मिनिटे चालतो आणि दोन हाफमध्ये विभागला जातो. प्रत्येक हाफ २० मिनिटे चालतो. खेळाचा उद्देश प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टात जाणे आणि त्यांच्या खेळाडूंना स्पर्श करणे आहे. जर प्रतिस्पर्ध्याचा खेळाडू स्पर्श झाला तर तो बाहेर होतो. खेळाच्या शेवटी सर्वाधिक गुण मिळवणारा संघ विजयी होतो.
प्रो कबड्डी हा एक वेगवान आणि रोमांचक खेळ आहे जो पाहण्यासाठी खूप मनोरंजक आहे. हा खेळ भारतात खूप लोकप्रिय आहे आणि तो आता जगभरात लोकप्रिय होत आहे.
5
Answer link
कबड्डी हा मुळात दक्षिण आशियातला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक भिडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात.
कबड्डी खेळासाठी लागणारे क्रीडांगणांची ३ गटात वर्गवारी केली जाते.
पुरूष व कुमार गटाच्या मुलांसाठी १३.०० मी. बाय १०.०० मी. ,
महिला व कुमारी गटाच्या मुलींसाठी १२.०० मी. बाय ८.०० मी. तसेच
किशोर व किशोरी गटाच्या मुलामुलींसाठी ११.०० मी. बाय ८.०० मी.
असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे.
क्रिडांगणाविषयी माहिती
अ) पुरुष व कुमार गट मुले यांच्यासाठी 1. क्रिडांगणाची रुंदी 10 मी. व लांबी 13 मी. असते.
2. मध्यरेषा 6.50 मीटरवर असते.
3. राखीव क्षेत्र क्रिडांगणाच्या दोन्ही बाजूस 1 मी. असते.
4. निदानरेषा क्रिडांगणाच्या मध्यरेषेपासून 3.50 मीटर अंतरावर असते.
5. निदान रेषेपासून 1 मी. अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखली जाईल.
6. सिटींग बॉक्स 8 मी X 1 मी. असून तो अंतिम रेषेपासून 2 मीटरवर असते.
ब) महिला व कुमारी मुली यांच्यासाठी
1. क्रिडांगणाची रुंदी 8 मी. व लांबी 12 मी. असते.
2. मध्यरेषा 6 मीटरवर असते.
3. राखीव क्षेत्र क्रिडांगणाच्या दोन्ही बाजूस 1 मी. वर असते.
4. निदान रेषा क्रिडांगणाच्या मध्यरेषेपासून 3 मीटर अंतरावर असते.
5. निदान रेषेपासून 1 मी. अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखली जाईल.
6. सिटींग बॉक्स 6 मी. X 1 मी. असून तो अंतिम रेषेपासून 2 मीटरवर असते.
क) किशोर मुले व किशोरी मुली यांच्यासाठी
1. क्रिडांगणाची रुंदी 8 मी. व लांबी 11 मी. असते.
2. मध्यरेषा 5.50 मीटरवर असते.
3. राखीव क्षेत्र क्रिडांगणाच्या दोन्ही बाजूस 1 मी. वर असते.
4. निदान रेषा क्रिडांगणाच्या मध्यरेषेपासून 2.50 मीटर अंतरावर असते.
5. निदान रेषेपासून 1 मी. अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखली जाईल.
6. सिटींग बॉक्स 4 मी. X 1 मी. असून तो अंतिम रेषेपासून 2 मीटरवर असते.
खेळांचे नियम
नाणेफेक जिंकणारा संघ “अंगण’ किंवा “चढाई’ यापैकी निवड करतो. दुस-या डावात अंगण बदलून अगोदर असतील तेवढेच खेळाडू घेऊन डाव सुरु करतात. त्यावेळी प्रथम ज्या संघाने चढाई संघाने केलेली नसते तो संघ चढाई करतो.
2) चढाई करणा-याने “कबड्डी’ हा उचार स्पष्टपणे आणि सलग केला पाहिजे. तसे न आढळल्यास पंचाने अथवा सरपंचाने त्याला ताकीद देऊन विरुध्द संघाला चढाईची संधी द्यावी. त्यावेळी पाठलाग करता येणार नाही.
3) चढाई करणा-याने मध्यरेषा ओलांडण्यापूर्वी दम घालण्यास सुरुवात करावी तसे न आढळल्यास पंचांनी विरुध्द संघाला चढाईची संधी द्यावी.
4) खेळ चालू असताना खेळाडूचा कोणताही भाग अंतिम मर्यादेबाहेर जाऊ नये तसा गेल्यास तो बाद ठरविला जाईल. पण झटापटीच्या वेळी तसे असल्यास तो खेळाडू बाद नसतो. अशा वेळेस शरीराचा कोणताही भाग आत असला तरी चालतो.
5) झटापट सुरु झाल्यास राखीव क्षेत्राच्या क्रीडाक्षेत्रात समावेश होतो. झटापट संपल्यावर खेळाडूंनी आपापल्या क्षेत्रात परत जाताना राखीव क्षेत्राचा उपयोग करता येतो.
6) खेळ चालू असताना खेळाडू अंतिम रेषेबाहेर गेल्यास त्याला पंचांनी बाहेर काढावे.
7) ताकीद देऊनही खेळाडू आपल्या अंगणात दम घालवल्यास वा “कबड्डी’ शब्द उच्चारण्यास सुरुवात करत नसेल तर त्याला बाद न देता त्याची चढाईची पाळी संपली असे जाहीर करुन विरुध्द संघाला एक गुण द्यावा.
8 ) चढाई करणारा आपल्या अंगणात गेल्यावर अथवा बाद झाल्यानंतर प्रतिपक्षाने पाच सेकंदात आपला खेळाडू चढाईसाठी पाठवावा.
9) चढाई करणारा आक्रमक खेळाडू बचाव करणाऱ्या खेळाडूला स्पर्श करुन आपल्या अंगणात परत जात असताना त्याला पाठलाग करता येईल परंतु चढाई करणारा पकडीतून सुटून जात असेल अशा वेळी मात्र त्याचा पाठलाग करता येणार नाही.
10) चढाई करणा-या खेळाडूच्याविरुध्द अंगणात दम गेल्यास तो बाद ठरविला जाईल.
11) चढाई करणारा बचाव करणा-या एक किंवा अधिक खेळाडूंना केवळ स्पर्श करुन जात असेल तर त्याचा पाठलाग करता येईल.
12) एकावेळी एकापेक्षा जास्त खेळाडूंनी चढाई केल्यास ती ग्राह्य न मानता प्रतिस्पर्धी संघास चढाईची संधी दिली जाते.
13) वारंवार सूचना देऊन एकापेक्षा जास्त खेळाडूंची चढाईस जात असतील तर पंचांनी प्रथम गेलेल्या खेळाडूखंरीज बाकी सर्व खेळाडूंना बाद ठरवावे.
14) हेतूपुरस्पर चढाई करणा-या खेळाडूचा दम घालवणे अथवा कैची अथवा अयोग्य पकड करुन चढाई करणा-यास दुखापत करणे या गोष्टी दिसल्यास पंचांनी चढाई करणा-या खेळाडूस नाबाद ठरवावे.
15) बचाव करणा-या खेळाडूने चढाई करणा-या खेळाडूला अंतिम मर्यादेपर्यंत ढकलू नये अथवा चढाई करणा-या खेळाडूने बचाव करणा-या खेळाडूला बाहेर ओढू नये. तसे बुध्दीपुरस्सर करणा-या खेळाडूस बाद घोषित करावे.
16) चढाई पूर्ण होईपर्यंत म्हणजेच चढाई करणारा आपल्या अंगणात जाईपर्यंत बचाव करणा-या खेळाडूपैकी कुणीही मध्यरेषा ओलांडू नये तसे केल्यास त्या खेळाडूला बाद दिले जाईल.
17) चढाई सुरु करताना बचाव करणा-या खेळाडूने मध्यरेषेला स्पर्श करुन त्या चढाई करणा-यास पकडले अथवा मदत केली तर बचाव करणारा बाद होईल.
18) जो संघ लोण करेल त्या संघास दोन गुण मिळतात. लोण झाल्यावर दहा सेकंदात सर्व संघ परत मैदानात आला नाही तर प्रतिपक्षास एक गुण द्यावा. तसे करुनही जर संघ मैदानात येत नसेल तर तो प्रत्येक पाच सेकंदाला एक याप्रमाणे सामन्याचा वेळ संपेपर्यंत गुण देत राहतील.
19) वारंवार पाळी नसताना एखादा खेळाडू चढाईस जात असेल तर प्रतिस्पर्धी संघास एक गुण द्यावा.
20) चढाई करणा-या खेळाडूस सूचना अथवा जागृत करण्याचा जर प्रयत्न केला गेलातर प्रतिस्पर्धी संघास गुण द्यावा.
21) प्रतिपक्षाचा एक खेळाडू बाद झाल्यास एक खेळाडू आत येतो.
22) पंच किंवा सरपंचाने एखाद्या संघाला वारंवार गुण दिल्यास त्या संघाला फक्त गुण मिळतात. पण त्यांचे बाद असलेले खेळाडू उठू शकत नाहीत.
23) कोणत्याही अडथळ्याने सामना बंद पडला व तो 20 मिनिटांच्या आत सुरु झाल्यास सामना उरलेल्या वेळ तेच खेळाडू व त्याच गुणसंख्येवर खेळवावा. मात्र त्यानंतर सुरु होत असल्यास सामना सुरुवातीपासून खेळवावा. त्यावेळी पूर्वीचेच खेळाडू असावेत असे बंधन नाही.
24) निलंबित वा बडतर्फ खेळाडूसाठी बदली खेळाडू घेता येणार नाही. तसेच निलंबीत वा बडतर्फ करण्याचे कमी झालेल्या खेळाडूंची संख्या असताना बोनस रेषेचा नियम लागू होईल. तसेच लोण झाल्यास कमी असलेल्या खेळाडूच्या संख्येइतके गुण, अधिक दोन गुण दिले जातील.
वयोमर्यादा व वजन वयोमर्यादा व वजन
पुरुष - 80 किलो वजन व वयोमर्यादा नाही
महिला गट - 70 किलो वजन व वयोमर्यादा नाही
कुमारी गट मुली – 60 किलो वजन व वय 20 वर्षे
कुमार गट मुले – 65 किलो वजन व वय 20 वर्षे
किशोरी गट मुली – 50 किलो वजन व वय 16 वर्षे
किशोर गट मुले – 50 किलो वजन व वय 16 वर्षे
कबड्डी हा मुळात दक्षिण आशियातला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक भिडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.
महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जायचा. इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.