स्मरणशक्ती मानसशास्त्र स्मृती

स्मरणशक्ती कशाला म्हणतात?

3 उत्तरे
3 answers

स्मरणशक्ती कशाला म्हणतात?

2
मेंदूने साठवून ठेवलेले हवे तेव्हा- हवे ते- हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती. * योग्य वेळी, योग्य त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला जमणं आणि त्या वेळीच आठवाव्यात आणि लक्षात राहाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. शरीराला आणि मनाला त्याची सवय लावावी लागते.


मानवी मेंदूचे विविध भाग म्हणजे कॉर्पस कॅलोझम, सेरेब्रल कॉर्टेक्स, थल्यमस, हायपोथलॅमस, हिप्पोकॅम्पस, सेरेबेलम, ब्रेन-स्टेम. या विविध भागांवर मेंदूची विविध कार्यें अवलंबून असतात. उदा. जागृती, चेतना-उत्पत्ती, जाणीव, देहभान, निर्णय प्रक्रिया, कामाची अंमलबजावणी, भाषा-उत्पत्ती व वाढ, शिक्षण, समज, योजना कार्यान्वित करणे, प्रश्न सोडवणे किंवा उत्तर शोधून काढणे, विचार-प्रक्रिया अशी अनेक कार्ये मेंदूवर अवलंबून असतात. 
मेंदूचे संक्षिप्त स्वरूपांत कार्ये सांयची झाल्यास ही यादी फार मोठी होवू शकते. चेतना उत्पन्न करणे, लक्ष, अवधान जाणीव असणे, निर्णय घेणे, अंमलबजावणी करणे, स्मृती किंवा आठवण, एकमेकाला अनुकूल क्रिया करणे, एखाद्या गोष्टीचे होणारे ज्ञान मिळवणे, योजना तयार करणे, प्रश्नाचा उलगडा करणे, कल्पना, विचार करणे, संस्मरणीय अशी स्मृती अथवा स्मरणशक्ती पूर्णतः मेंदूतील विशिष्ट भागावर अवलंबून असते. स्मरणशक्ती हे मनाचे बुद्धिसामर्थ्य आहे.

ती जणू मनाची बुद्धिशाखा आहे; ज्यायोगे कोणतीही प्राप्त माहिती सांकेतिक भाषेत साठवली जाते व जेव्हा जरूर असेल तेव्हा पूर्वस्थितीत प्राप्त केली जाते. ही एक मेंदूची विशिष्ट धारणा-शक्ती असते. प्रथम मेंदू, अग्रेषित झालेली माहिती स्वतःजवळ ठेवून घेतो व भविष्य काळात जेव्हा गरज असेल तेव्हा योग्य प्रकारे त्याच्या उपयोग करून घेतो. या कार्यप्रणालीला वैद्यकीय भाषेत लिम्बिक सिस्टीम असे म्हणतात. गतकालीन गोष्टी स्मरणात राहिल्या तरच भाषा वृद्धी, आपसातले नातेसंबंध, स्वतःची ओळख किंवा व्यक्तिमत्व प्रकट होणे शक्य असते. सुखकारक आयुष्यासाठी हे महत्वाचे असते.

स्मरणशक्ती म्हणजे काय असते हेही माहिती असायला पाहिजे. बाह्यजगतातील माहिती प्रथम विशिष्ट प्रक्रियेद्वारे प्राप्त केल्यावर मेंदूच्या एका ठराविक भागात संग्रहित केली जाते व जेव्हां आवश्यक असेल तेव्हां पुन्हा प्राप्त केली जाते. अशा रीतीने एक चक्र पूर्ण होते. हे एक चक्र पूर्ण होण्यासाठी मेंदूमध्ये अनेक भौतिक व रासायनिक प्रक्रिया घडतात. वरवर पाहता ही क्रिया जितकी साधी वाटते तितकीच ती गुंतागुंतीची असते. स्मृतिप्रक्रिया साधी, सरळ, स्वयंपूर्ण नसते. तिच्यातही अधून-मधून बिघाड होऊ शकतात. माहितीची प्राप्ती, साठवण व पुनर्प्राप्ती या क्रिया दूषित होऊ शकतात.


उत्तर लिहिले · 28/8/2021
कर्म · 121765
0
उत्तर
उत्तर लिहिले · 28/8/2021
कर्म · 5
0

स्मरणशक्ती म्हणजे माहिती साठवण्याची, ती माहिती जपून ठेवण्याची आणि आवश्यक तेव्हा ती आठवण्याची मेंदूची क्षमता.

स्मरणशक्तीचे मुख्य घटक:

  • अधिग्रहण (Acquisition): नवीन माहिती ग्रहण करणे.
  • धारण (Storage): माहिती साठवून ठेवणे.
  • पुनर्प्राप्ती (Retrieval): साठवलेली माहिती आठवणे.

स्मरणशक्ती कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की वय, आघात, काही विशिष्ट आजार, किंवा औषधे.

स्मरणशक्ती सुधारण्यासाठी काही उपाय:

  • पुरेशी झोप घेणे.
  • नियमित व्यायाम करणे.
  • पौष्टिक आहार घेणे.
  • मानसिक व्यायाम करणे (उदा. कोडी सोडवणे).
  • नवीन गोष्टी शिकणे.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

भावनाशून्य माणसे असू शकतात का?
खरा आनंद म्हणजे काय? तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे आनंद मिळतो?
सामाजिककरण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे?
आपण एखाद्याबद्दल विचार करत आहात असे वाटते तेव्हा ते देखील आपल्याबद्दल विचार करत असतात का?
आपला कोणीतरी फायदा घेतोय हे कसं समजणार?
जेव्हा जुना मित्र परका वाटू लागतो, तेव्हा दोष नात्याचा असतो की वेळेचा?
खरं सुख कुठे आहे – आपल्या गरजांमध्ये की आपल्या समाधानात?