3 उत्तरे
3
answers
आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हणतात?
1
Answer link
मानवी जीवनाची सर्व बाजू समजून घेणे इतिहासाच्या लेखनासाठी महत्त्वाचे आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की व्होल्टेअर हे आधुनिक इतिहासलेखनाचे जनक होते. म्हणता येईल.
६.
(१)
1) एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धान्तांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली.
2) इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसामाणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात.
3) समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी कार्ल मार्क्स याने केली.
(२) आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती?
आधुनिक इतिहासलेखनाच्या पद्धतीची चार प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात : (१) ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते.
(२) हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही.
(३) या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते.
(४) मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो.
(३) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
1) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना.
2) सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहासलेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला.
3) त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशाधेन सुरू झाले.
(४) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
1) लिओपॉल्ड व्हॉन रांके याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले.
2) मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
3) इतिहासलेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला.
0
Answer link
आधुनिक इतिहास लेखनाचा जनक लिओपोल्ड व्होन रांके (Leopold von Ranke) यांना म्हटले जाते.
ते 19 व्या शतकातील एक जर्मन इतिहासकार होते. त्यांनी इतिहास लेखनात वस्तुनिष्ठता आणि कठोर संशोधनावर भर दिला. त्यांनी इतिहासाच्या प्राथमिक स्रोतांचा (primary sources) वापर करण्यावर जोर दिला, त्यामुळे त्यांची पद्धत अधिक विश्वसनीय मानली जाते.
लिओपोल्ड व्होन रांके यांचे कार्य:
- त्यांनी इतिहासाला एक विज्ञान म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न केला.
- पुराभिलेखीय (archival) संशोधनावर त्यांनी विशेष लक्ष दिले.
- 'हिस्टरी ऑफ द लॅटिन अँड ट्युटॉनिक नेशन्स फ्रॉम 1494 टू 1514' (History of the Latin and Teutonic Nations from 1494 to 1514) या त्यांच्या प्रसिद्ध कामामुळे त्यांना खूप मान्यता मिळाली.
या माहितीसाठी आपण खालील लिंकचा वापर करू शकता:
ब्रिटानिका - लिओपोल्ड व्होन रांके (Encyclopædia Britannica - Leopold von Ranke)