नातेसंबंध रक्षा बंधन राखी पौर्णिमा भाऊ बहिण रक्त नाते समाज सण आणि उत्सव

राखी पौर्णिमेला (रक्षा बंधन) बहिण भावाला राखी का बांधते? राखी बांधण्याची कारणे काय आहेत?

3 उत्तरे
3 answers

राखी पौर्णिमेला (रक्षा बंधन) बहिण भावाला राखी का बांधते? राखी बांधण्याची कारणे काय आहेत?

1
*बहिण भावाला राखी का बांधते ,राखी बांधण्याची पाच कारणे

रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. पण कधी आपण विचार केला आहे का या दिवशी बहिण भावाला राखी बांधते, कधी भाऊ बहिणीला राखी का बांधत नाही. तर चला जाणून घ्या 5 पौराणिक कारण ज्यामुळे ही परंपरा सुरु झाली-

1. भाऊ बहिणीच्या रक्षणाचे आश्वासन देतो तर बहिण रक्षा सूत्र बांधून भावाच्या रक्षेची कामना करते. या निमित्ताने भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. असे मानले जाते की राजसूय यज्ञ होत असताना भगवान कृष्णाला द्रौपदीने रक्षा सूत्र रुपात आपल्या वस्त्रातून एक तुकडा बांधला होतो. यांनतरच बहिणीकडून भावाला राखी बांधण्याची परंपरा सुरु झाली.

2. सर्वात आधी इंद्राच्या पत्नी शचिने वृत्तसुरसोबत युद्धात इंद्राच्या रक्षा करण्याच्या हेतूने रक्षा सूत्र बांधलं होतं. म्हणून जेव्हा कोणी युद्धावर निघत असतं तेव्हा त्याच्या मनगटावर मौली किंवा रक्षा सूत्र बांधून पूजा केली जाते. देवी लक्ष्मीने राजा बलिला आपला भाऊ मानत हातात आपल्या पतीच्या रक्षेसाठी बंधन बांधले होते आणि आपल्या बंधक पति श्रीहरि विष्णूंना सोबत घेऊन गेल्या होत्या.

3. रक्षा सूत्र घरात नवीन खरेदी केलेल्या वस्तू जसे वाहन, इतर वस्तूंना देखील बांधली जाते. पाळीव जनावरांना देखील राखी बांधली जाते. वस्तू किंवा पशू सुरक्षित राहावे ही यामागील भावना असते.

4. मौलीमुळे होते रक्षा : राखी किंवा मौलीला मनगटावर बांधल्यावर कलावा किंवा उप मणिबंध करतात. शास्त्रांप्रमाणे मौली बांधल्याने त्रिदेव- ब्रह्मा, विष्णु व महेश आणि तीन देवी- लक्ष्मी, पार्वती व सरस्वती यांची कृपा प्राप्त होते. मौली बांधून शुद्ध आणि शक्तिशाली बंधन असल्याची भावना निर्मित होते.

5. आरोग्यासाठी मौली : प्राचीनकाळापासूनच मनगट, पाय, कंबर आणि गळ्यात देखील मौली अर्थात लाल दोरा बांधण्याची परंपरा असून याचे चिकित्सीय लाभ देखील आहेत. शरीर विज्ञानानुसार याने त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ याचे संतुलन राहतं. वैद्य आणि कुटुंबातील वयस्कर लोक हात, कंबर, गळा आणि पायाच्या अंगठ्यात मौली वापरत होते जे शरीरासाठी उपयोगी ठरतं होतं. ब्लड प्रेशर, हार्टअटॅक, डायबिटीज आणि अर्धांगवायू सारख्या आजारांपासून बचावासाठी मौली बांधणे फायद्याचे सांगितले गेले आहे.*


उत्तर लिहिले · 21/8/2021
कर्म · 121765
1
*👨‍👧 बहिण-भावाला अतूट बंधनात बांधणारी 'राखी पोर्णिमा'*

🗣 बहीण-भावाच्या अतूट नात्याला रेशीम गाठीने बांधून ठेवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. यंदा रक्षाबंधन हा सण 30 ऑगस्ट दिवशी देशभरात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे यावेळी भारतीय स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन एकत्र आल्याने सेलिब्रेशन ही द्विगुणित होणार आहे. या निमित्त सर्व बहीण-भावांना रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा!

🤔 रक्षाबंधनाला राखी पोर्णिमाही म्हंटल जाते. रक्षाबंधनाला बहिणी आपल्या रक्षणासाठी भावाच्या मनगटावर राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. तर यावेळी कोणत्या वेळेत राखी बंधने लाभदायक ठरू शकरे? राखी बांधण्याची शुभ वेळ कोणती? हे जाणून घेणार आहोत. 

*📍 पद्धत*

◼ भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावून त्याचे औक्षण केले जाते. 

◼ उजव्या हाताच्या मनगटावर रेशमी धागा/ राखी बांधली जाते. 

◼ त्यानंतर बहीण भावाला गोडाचा पदार्थ भरवते जाते.

*💁🏻 उद्देश*

💫 रक्षाबंधनाची राखी ही बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतिक मानले जाते. तसेच बहीणीचे रक्षण करणं हे कर्तव्य असल्याची आठवण करून दिली जाते. आता कितीही राखी पौर्णिमेची पद्धत बदली असली तरी त्या मागची भावना व उद्देश आजही लक्षात घेऊन हा सण साजरा केला जातो.
*रक्षाबंधनाची लगबग सुरु…..*

--*_*===@===
प्रत्येकाला एक बहिण असावी .

मोठी लहान,शांत,खोडकर कशीही असावी

पण एक बहिण असावी .

मोठी असेल तर,आई बाबांपासून वाचवणारी ,

लहान असेल

तर आपल्या पाठीमागे लपणारी .

मोठी असल्यास गुपचूप आपल्या पाॅकेट मध्ये पैसे ठेवणारी .

लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी .

लहान असो वा मोठी,छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी .

एक बहिण प्रत्येकाला असावी .

मोठी असल्यास आपलं चुकल्यावर कान ओढणारी .

लहान असल्यास,
तिचं चुकल्यावर "साॅरी दादा "म्हणणारी.

लहान असो वा मोठी आपल्याला एक बहिण असावी.

आपल्या एकाद्या मैत्रिणीला "वहिनी" म्हणून हाक मारणारी
एक बहिण प्रत्येकाला असावी .

मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी ,

लहान असल्यास,प्रत्येक पगारात आपल्या खिशाला चंदन लावणारी .

ओवाळणी काय टाकायची हे स्वतः ठरवत असली तरीही तितक्याच ओढीने राखी पसंत करून आणणारी .

एक बहिण प्रत्येकाला असावी .

कठीण प्रसंगी खंबीर राहील स्त्री शक्तीच ती , स्वतःपेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम करणारी

प्रत्येकाला एक बहिण असावी......!

आणि म्हणूनच *मुलगी वाचवा देश वाचवा ।*
_______________________
भाऊ-बहिणीच्या नात्यातील बंधन अधिक घट्ट करणारा ‘रक्षा बंधन’ हा सण उद्यावर येऊन ठेपल्याने राख्या खरेदीसाठी बहिणींची मोठ्या प्रमाणावर झुंबड उडाली आहे. नेहमीच्या पारंपारिक राख्यांना फाटा देत डायमंड,मोतीअसलेल्या राख्यांसह ब्रेसलेटला महिलांची अधिक पसंती आहे.
श्रावण महिना मुळातच उत्सवांचा महिना म्हटला जातो. त्यातही रक्षाबंधनाची सर्वांनाच विशेष ओढ असते. दुकानदारही मग सुंदर, वेगवेगळ्या प्रकारातील राख्यांची दुकाने थाटतात. आकर्षक पद्धतीने स्टॉलवर ठेवलेल्या राख्यासर्वांचेच लक्ष वेधून घेतात.
यंदा बाजारात डायमंड,मोती असलेल्याआकर्षक राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत;तसेच ब्रेसलेट राख्यांना मोठीमागणी आहे. बाजारात दहा रुपयांपासून पाचशे रुपये किमतीच्या राख्या विक्रीसउपलब्ध झाल्या आहेत. भैया-भाभी,रुद्राक्ष,म्युझिकल राखी आदी प्रकारच्याराख्या विक्रीस आल्या आहेत. पांरपरिक गोंड्यांच्या राख्यांना खूप महत्त्वअसते. यात स्वस्तिक,शंख,मोती,ओम यांसह देवी-देवतांचे छायाचित्र असलेल्याराख्यांचा समावेश आहे. बच्चेकपंनीसाठी छोटा भीम,फेरारी कार,कृष्णा यांसहम्युझिकल व लाइटच्या राख्या उपलब्ध आहेत.
......................

*रक्षाबंधनाचे महत्व आणि माहिती:-*
.........

हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.
रक्षाबंधनचा सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.
इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता. ज्याच्या सामर्थ्याने वज्रानुसार राक्षसाचा पराभव केला. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पध्दत आहे. तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमाँयू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले.
राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वत:ला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.
राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत. राखी पौर्णिमेच्या बऱ्याच अख्यायिका आहेत परंतू त्या माहित करून घेण्यापेक्षा आपण येथे फक्त सणांच्या हेतूला, उद्देशालाच महत्व देणार आहोत.
आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार वं सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष,राग इत्यादींकडे भावाने आपल्या य तिसऱ्या डोळ्याने पहावे य हेतूने बहिण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळयाचा खोल अर्थ आहे.
राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो वं मन प्रफुल्लीत होते.
एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे. हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात.
द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम.
स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो.रक्ताचे नाते असणारे भाऊ बहिण असोत किंवा मानेलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. यात कुठेही फसवणूक नाही. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते.
तूच आमचा त्राता, रक्षणकर्त्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात आणि उपयोगातल्या सगळ्या वस्तूंना देवराख्या बांधण्याची प्रथाही आढळते. आमच्या लहानपणी सकाळी अंघोळ करून आम्ही आमच्या उपाध्यायांपुढे उभे राहायचो अन् ते घरातल्या प्रत्येकाला मंत्र म्हणून हातात राखी बांधायचे. तेव्हा काही कळायचे नाही. पण आता वाटतंय की ते इतर सर्व व्याधींपासून आमचे रक्षण व्हावे या हेतूने हे अभिमंत्रीत सुरक्षाकवच हातात बांधत असावेत (हल्लीतर प्रत्येक तीर्थक्षेत्री हातात बांधायचे दोरे मिळतात.)
असा हा दिवस अगदी लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच जण आनंदाने साजरा करतात. हल्ली तर घरात एकच मुलगा/मुलगी असतांना ह्या राखीच्या निमित्ताने दोन परिवार एकमेकांच्या आणखीनच जवळ येत आहेत हे काय कमी आहे?आजही उत्तर-भारतात नोकर मालकाला राखी बांधतात व गरीब लोक धनवंतांना! यामागेही श्रेष्ठ व ज्येष्ठ लोकांनी व या सारख्या लोकांपासूनही रक्षणाची जबाबदारी आणि आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी तुमच्यावरच आह हे ही सूचित होते.
*रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग …. रक्षाबंधन*
घराच्या गच्चीत रूसून बसलेल्या आपल्या लहान बहिणीची समजूत घालण्यासाठी सर्वांत आधी जात असेल तर तो तिचा भाऊ! शाळेतून आपल्या मोठ्या ताईला आणण्यासाठी जाणार्या लहान भावाचा कोमल हात तिला संरक्षण देतो. अशा या बहिण-भावाचा रक्षाबंधनाचा सण त्यांच्या जीवनात रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देऊन जातो. लहान भावाच्या झालेल्या चुका स्वत:वर ओढवून घेणारी ताई आई-बाबाकडून मिळणारा ‘प्रसाद’ वाचविते. तर आपल्या ताईचे आभार मानण्यासाठी लहान भाऊ तिला आवडणारी वस्तू भेट देतो.
शाळेच्या मुख्याध्यापिका पहिल्या इयत्तेत झोपलेल्या लहानग्याला घेऊन जायला सांगतात तेव्हा त्याची ताई शांत निजलेल्या आपल्या भावाला हळूवार आपल्या वर्गात घेऊन जाते आणि त्याला मांडीवर झोपवून फळ्यावरील लिहिलेले आपल्या वहीत उतरवून घेत असते. लहान श्रुती रडतच आपल्या मोठ्या भावाच्या वर्गात गेली व तिला चिडवणार्या तिच्या वर्गातील मुलांची नावे सांगायला लागली. तिचे डोळे पुसत मधल्या सुटीत त्यांना चांगला मार देऊ सांगताच छोट्या ताईचे रडणे एकदम बंद झाले व ती पुन्हा हसत खेळत आपल्या वर्गात जाऊन बसली. तिच्या मते मोठ्या भावाने दिलेले आश्वासन म्हणजे काम फत्ते असंच ती समजते. शाळेत जाणारी लहान बहिण हसण्या खिदळण्यात केव्हा मोठी होते कळतच नाही. मग तिला आपल्या बाईकवर घेऊन कॉलेजात सोडणारा तिचा भाऊ तिचा ‘बॉडीगार्ड’च बनूनच जातो. तिच्या आवडीनिवडींची काळजी घेतो तर तिला संकटामधून आधार देतो.
ताईचे लग्न होऊन तिला निरोप देण्याचा क्षण येतो, तेव्हा तिचा भाऊ पाहुण्यांच्या सरबराईत मग्न असतो. ताई विरहाने धाय मोकलून रडत असताना भावाला लहानपण आठवते. सरबराईत गुंतलेले हात घेऊन तोही अश्रूभरल्या डोळ्यांनी बहिणीला भेटतो. भाऊ व बहिणीचे नाते रेशमी धाग्यासारखे नाजूक असते. रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते व भाऊ तिला प्रेमाची भेटवस्तू देतो. एवढेच नाही तर तिच्या संरक्षणासाठी खंबीर आहे याची ग्वाहीही देतो.
आपल्या देशात प्रेम, आपुलकी अजुनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आजही कायम आहे.
🎾🕉🔴🌹🌹🔴🕉🎾
*राशीनुसार आपल्या भावाला राखी बांधा...*

रक्षाबंधन हा सण सर्व सणांमध्ये मोठा आणि महत्त्वाचा असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला रक्षासूत्र बांधते. तेव्हा भाऊ आपल्या यथाशक्तीने बहिणीला भेट देऊन तिच्या रक्षेच वचन घेतो.
मग आता पाहूया राखीच्या या सणासाठी तुमचा रक्षा सूत्र कसा हवा.

 ज्योतिषानुसार आपल्या भावाला राशीनुसार जर राखीची निवड केली तर तो सूत्र भावासाठी कल्याणकारी राहील.

◆ मेष किंवा वृश्चिक राशी असल्यास लाल रंग किंवा गुलाबी राखीची निवड करावी.

◆ वृषभ किंवा तुला राशीसाठी चांदीची राखी किंवा सिल्वर कलरच्या राखीची निवड करू शकता.

◆ मिथुन किंवा कन्या राशी असलेले भावांसाठी हिरवा, निळा, गुलाब, सोनेरी रंगाचा निवड योग्य असेल.

◆ कर्क राशीच्या भावांसाठी पांढरा, क्रीम, पिवळा, नारंगी रंगाची निवड शुभ ठरेल.

◆ सिंह राशीच्या भावांसाठी गुलाबी, नारंगी, सोनेरी, निळा-काळ्या रंगांनासोडून बाकी सर्व रंगाच्या राखीची निवड करू शकता.
◆ धनू किंवा मीन राशीच्या लोकांसाठी केशरी, पिवळा, नारंगी, सोनेरी, फिकट लाल रंग शुभ ठरतील.

◆ मकर व कुंभ राशी असणार्‍या भावांसाठी आस्मानी, निळा, फिरोजी, हिरवा रंग शुभ ठरेल.

या प्रकारे रंगांची निवड करून राखीच्या या पवित्र सणाला तुम्ही खास बनवू शकता.

🎾🔴✴🕉🕉✴🔴🎾
*राखी बांधताना महिला गाठी का मारतात?*

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधताना धाग्याच्या तीन गाठी मारणे शुभ मानले जाते.

→ त्याचप्रमाणे राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ स्वत:च्या दीर्घायुष्यासाठी, तिसरी गाठ भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते अशी देखील मान्यता आहे.

या तीन गाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीच्या प्रति असतात अशी धार्मिक मान्यता आहे.
_________
*राखी बांधताना पुर्वेकडे असावे भावांचे तोंड!*

» राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ असते.

→ राखी बांधताना भावाचे तोंड कोणत्या दिशेला आहे याला देखील खूप महत्त्व आहे.

धार्मिक मान्यतेनुसार राखी बांधताना भावाचे पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते.

→ त्यामुळे यंदा राखी बांधताना भावाला पुर्वेकडे तोंड करुन बसवा आणि बहिणीने पश्चिमेकडे तोंड करून बसून भावाला राखी बांधावी आणि त्याचे औक्षण करावे.
___________________________________
🎗🏵🎗 *रक्षाबंधन : राखी बांधताना ताम्हणमध्ये 'या' ५ वस्तू असाव्यात !*
🎗🏵🎗 🎗🏵🎗 🎗🏵🎗
राखी पौर्णिमा. बहीण-भावाचा पवित्र सण रक्षाबंधन. देशात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य आणि सुख लाभो मिळो म्हणून प्रार्थना करते. दि. 30 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. राखी बांधताना ताम्हण किंवा ताटात ७ वस्‍तू आवर्जुन असाव्यात.

*कुंकू :* कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी कुंकू लावणे शुभ मानले जाते. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या दीर्घायू होण्याची कामना करते. 

*अक्षता :* कुंकू लावल्यानंतर कपाळावर तसेच डोक्यावर अक्षता टाकतात. याचा अर्थ भावावर शुभता बनलेली राहो. म्हणून ताटात अक्षता असाव्यात.

*नारळ :* नारळ म्हणजे श्रीफळ. श्री अर्थात देवी लक्ष्मीचे फळ. हे फळ देताना बहिणीने प्रार्थना.

*रक्षा सूत्र, राखी :* रक्षा सूत्र बांधल्याने त्रिदोष शांत होतात. त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ. या दोषांमुळेच शारीरिक आजार उद्भवतात. मनगटावर रक्षा सूत्र बांधल्याने शरीरात यांचे संतुलन राहते.

*गोड पदार्थ :* राखी बांधल्यानंतर भावाला गोड खाऊ घातल्याने नात्यात गोडवा टिकून राहतो.


_________________________
*तमाम देशवासियांना रक्षा-बंधानानिमित्त “रसुल खडकाळे*
मु.पो.बोरगाव(देशमुख)­
ता.अक्कलकोट
जि.सोलापूर
(महाराष्ट्र) व > Gk ♦ जनरल नालेज ♦ -(General Knowledge)---WH ATSAPP..GROUP JOIN.. 919168390345/ 917304873678”च्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
उत्तर लिहिले · 29/8/2023
कर्म · 569225
0

राखी पौर्णिमेला (रक्षा बंधन) बहिण भावाला राखी बांधण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  1. सुरक्षेचे वचन:

    बहिण भावाला राखी बांधते, तेव्हा ती भावाकडून स्वतःच्या संरक्षणाचे वचन घेते. भाऊ आपल्या बहिणीला कोणत्याही परिस्थितीत तिची काळजी घेईल आणि तिचे रक्षण करेल, असा विश्वास देतो.

  2. प्रेम आणि आपुलकी:

    राखी हे बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचे आणि आपुलकीचे प्रतीक आहे. राखी बांधून बहीण भावाप्रती आपले प्रेम व्यक्त करते आणि भाऊ देखील बहिणीला तितकेच प्रेम देतो.

  3. Schutz आणि आशीर्वाद:

    राखी बांधताना बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते. राखीच्या माध्यमातून ती भावाला Schutz आणि आशीर्वाद देते, ज्यामुळे भावाचे कल्याण होते.

  4. नात्याची Bonding:

    रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण-भाऊ एकत्र येतात, ज्यामुळे त्यांच्यातील नाते अधिक दृढ होते. राखी हे नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि एकोप्याचे प्रतीक आहे.

  5. सामाजिक महत्त्व:

    रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीत सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. हा सण कुटुंबांना आणि समाजाला एकत्र आणतो, ज्यामुळे सामाजिक संबंध सुधारतात.

थोडक्यात, राखी पौर्णिमेला बहीण भावाला राखी त्याच्या संरक्षणाचे वचन, प्रेम, आपुलकी, आशीर्वाद आणि नात्यांमधील Bonding अधिक दृढ करण्यासाठी बांधते.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040

Related Questions

पारशी धर्माचे लोक कोणते सण साजरे करतात?
पारशी धर्माचे लोक कोणकोणते सण उत्सव साजरे करतात?
नारळी पौर्णिमा, समुद्राला नारळ का अर्पण करतात?
आपट्याच्या पानांना सोनं का म्हणतात?
मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली?
दिवाळी सण कोणत्या महिन्यात येतो?
तुम्ही अनुभवलेले चैत्र तुमच्या शब्दात वर्णन करा?