भूगोल
वनस्पतीशास्त्र
पर्यावरण
प्राणी आणि वनस्पती
ध्रुवीय प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतींची व प्राण्यांची नावे काय आहेत?
3 उत्तरे
3
answers
ध्रुवीय प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतींची व प्राण्यांची नावे काय आहेत?
1
Answer link
वर्षारण्ये (वर्षावने)
सदाहरित चर्मिलपर्णी (लॉरेल-पर्णी) समुदाय :
दृढपर्णी, काष्ठमय व इतर भूमध्यसामुद्रिक प्रकांरांची वनश्री :
मोसमी जंगले व रूक्षवने (सॅव्हाना) :
तृणसंबात (स्टेप्स) :
पानझडी वने :
शंकुमंत वने (तैगा) :
ध्रुवीय व उच्च पर्वतीय (वनश्रीतील) समुदाय :
समान परिस्थितीत असण्याच्या वस्तुस्थितीचा पाठपुरावा करून वनश्रीच्या भिन्न प्रदेशांची संगती लावण्यास भरपूर लेखी पुरावा उपलब्ध आहे. यांमध्ये जलवायुमानाला प्राथमिक महत्त्व दिले आहे; तापमान व आर्द्रता यांच्या एकत्रित परिणामाचा विचार करून त्यांच्या विविध अनुभवांतून मिळालेल्या सूत्ररूप माहितीच्या सहसंबंध विविध स्वरूपी वनश्रींच्या प्रसाराशी जोडतात. त्यामानाने जमिनीला दुय्यम महत्त्व आहे; त्याशिवाय जैव घटकांचे (इतर वनस्पती व मानवासह संबंधित प्राणी यांचे) परिणाम मर्यादित असल्याचे मानतात. वनश्रींच्या प्रकाराच्या वितरणाची संपूर्ण कल्पना येण्यास नित्य परिस्थितीचे विश्लेषण आवश्यकच असते. शिवाय परिस्थितीतील भिन्न घटक व वनश्रींचे प्रकार यांचे संबंध प्रत्यक्ष व साधे आणि कार्यकारणभाव दर्शविणारे असतातच असे नाही. १९५० सालानंतरचे बरेच संशोधन फक्त पादपजात आणि वनश्री यांपुरतेच नसून त्याचा विशे, भर जीवसंहती (एकाच विशिष्ट परिस्थितीत असलेल्या व तिच्याशी समरस झालेल्या वनस्पती आणि प्राणी यांचा गट) व निवास तंत्रे [परिस्थितिविज्ञान] यांसारख्या एकात्मीकरणाच्या उच्च पातळीवरील विषयांवर आहे; त्यामुळे त्यांची उकल होऊन त्यातून पादपजात, वनश्री व इतर अनेक घटकांसंबंधी अधिक उपयुक्त माहिती उपलब्ध होणे शक्य आहे.
प्रादेशिक आकृतिबंध
सर्व जगातील वनस्पति-समुदायांचे बनलेले भिन्न प्रादेशिक आकृतिबंध त्या त्या प्रदेशाचा इतिहास, प्राकृतिक वर्णन आणि भूवैज्ञानिक मूलभूत (आधारभूत) द्रव्य यांवर अवलंबून असतात. यामध्ये त्या प्रदेशातील निचरा प्राकृतिक माहितीतून कळतो; भूवैज्ञानिक आधारद्रव्याच्या माहितीमुळे, तो समुदाय बनतो तेथील भौतिक रासायनिक संघटन समजून येते; प्रमुख जलवायुमानविषयक बदल आणि मानवाने केलेली कमीअधिक विक्षोभक ढवळाढवळ हे इतिहासावरून दिसून येते. एखाद्या लहान तळ्यात व तळ्याभोवती असलेल्या वनस्पतींचे गट साधारणपणे वर्तुळाकृती समुदायाच्या स्वरूपात मांडल्यासारखे दिसतात; त्यांचे भिन्नत्व त्या लहानशा क्षेत्रातही असलेल्या भिन्न स्थानिक परिस्थितिजन्य असते. तसेच एखाद्या डोंगराच्या भिन्न उंचीवर वाढणाऱ्याव अनेक भिन्न वनस्पति-समुदायांच्या स्वरूपात त्यावर वर्तुळाकृती पट्ट्यांमध्ये आढळतात; त्यांना वनश्रीचे पट्टे (क्षेत्रविभाग) म्हणतात; त्यांची भिन्नताही डोंगराच्या भिन्न उच्चतेतील भिन्न परिस्थितीतून उद्भवलेली असते; प्रत्येक पट्ट्यात एकच किंवा अनेक वनस्पति-समुदाय असू शकतील. यापेक्षा अधिक विस्तृत प्रमाणावर, भौगोलिक पातळीवर, पृथ्वीच्या भिन्न कटिबंधानुरूप वनश्रींचे वितरण कटिबंधस्वरूपात आढळते, कारण वर चर्चा केल्याप्रमाणे वनश्रींचे सर्वसाधारण स्वरूप व संघटना भौगोलिक परिस्थितीशी अनुकूलित असते; तपशीलात मात्र वनश्रीमध्ये जमिनीविषयक फरकांमुळे बनलेले किंवा इतर परिस्थितिक घटकानुकूलित असे लहान मोठे समुदाय असतात. थोडक्यात, वनस्पति-भूगोलात पृथ्वीवरच्या वनश्रींच्या वितरणाचे कटिबंध आणि त्यांची संकलित माहिती अभिप्रेत असते. ह्या संदर्भात अलीकडे सु. वीस वनश्रीविषयक वर्ग केले असून त्यांपैकी प्रत्येक एका विशिष्ट प्रकारच्या वनश्रीविषयक वैशिष्ट्याबाबत प्रातिनिधिक स्वरूपाचा असतो आणि तो विशिष्ट प्रदेशात आढळतो; त्या प्रत्येकाला ‘क्षेत्रीय समावास’ म्हणतात.
स्थूलमानाने प्रमुख प्रकाराच्या वनश्रींच्या वितरणाची माहिती आवश्यक ठरते; याकरिता वर उल्लेख केल्याप्रमाणे ज्यात बहुधा अनेक समुदाय असतात असे नऊ प्रमुख वनश्रीविषयक गट ओळखले जातात; त्यासंबंधीचा तपशील खाली दिला आहे.
वर्षारण्ये (वर्षावने)
सदाहरित चर्मिलपर्णी (लॉरेल-पर्णी) समुदाय
दृढपर्णी, काष्ठमय व इतर भूमध्यसामुद्रिक प्रकांरांची वनश्री
वर्षारण्ये (वर्षावने)
: उष्ण कटिबंधात सर्व ऋतूंत पाऊस, उष्णतामान व आर्द्रता भरपूर असलेल्या ठिकाणी ही आढळतात. यांमध्ये वृक्षांची गर्दी असून त्यांच्या माथ्यांचे सलग छत असते. येथे असंख्य जातींचे मिश्रण असले, तरी कधी कधी एकाच जातीतील अनेक व्यक्ती एकाच स्थानी (शुद्ध समुदाय) आढळतात. त्यांची पाने रूंद व सदाहरित असतात; अपिवनस्पती (दुसऱ्या झाडावर आधारून वाढणाऱ्या वनस्पती) व महालता (मोठ्या वेली) बहुधा विपुल असतात. येथील जमीन निकस असून तिच्यात सदैव त्या झाडांचे मृतभाग मिसळून ते एकरूप होतात. काँगो व ॲमेझॉन या नद्यांच्या खोऱ्यांत आणि म्यानमार, आसाम, बंगाल, मलेशिया इ. भागांत वर्षावनांचे मोठे प्रदेश आहेत.
सदाहरित चर्मिलपर्णी (लॉरेल-पर्णी) समुदाय :
येथे सदैव हिरव्या व काष्ठयुक्त वनस्पती असून त्यांचे उपोष्ण कटिबंधीय वर्षावन बनलेले असते; सतत गरम उष्णतामान, नियमित पर्जन्य व भरपूर आर्द्रता असते. बहुतेक वृक्षांना रूंद व लॉरेलसारखी चिवट पाने असतात; काही शंकुमंत (शंकूच्या आकाराचे प्रजोत्पादक इंद्रिय असलेले; सूचिपर्णी) वृक्ष असतात व अपिवनस्पती फार कमी असतात. भूमध्यसामुद्रिक प्रदेशात स्थानिक स्वरूपाचे लहान समुदाय असतात; परंतु दक्षिण हिमालयात विस्तृत क्षेत्रात आणि चीन, जपान, उत्तर व पूर्व ऑस्ट्रेलिया येथे व्यापक प्रदेशात ते आढळतात; पूर्व व दक्षिण आफ्रिकेत स्थानिक स्वरूपात, अँडीज पर्वताच्या बाजूस, ब्राझीलमध्ये मोठ्या प्रदेशात आणि फ्लॉरिडाच्या वनांतील बराच भाग त्या प्रकारच्या समुदायांचा आहे.
दृढपर्णी, काष्ठमय व इतर भूमध्यसामुद्रिक प्रकांरांची वनश्री :
उन्हाळ्यात शुष्क व उष्ण हवा आणि हिवाळ्यात सौम्य पाऊस यांशी समरस होणारे वनस्पति-समुदाय येथे आढळतात व त्यात सदाहरितांचे प्राबल्य असते (उदा., स्ट्रॉबेरी वृक्ष–आर्बुटस उनेडो; अलेप्पो पाइन−पायनस हॅलेपेन्सिस); वसंत ऋतूत व शरद ऋतूत येथील वनस्पतींना फार अनुकूल परिस्थिती असते. कंदयुक्त व इतर ओषधीय [लहान व नाजूक; ओषधि] वनस्पती येथे सामान्यपणे आढळतात. भूमध्य समुद्राच्या काठाकाठाने ‘मॅकी’ किंवा ‘मॅक्सिया’ प्रकारचे अनेक चर्मिलपर्णी वनस्पतींचे खुरटे समुदाय असून तसेच अनुकूलन असलेले इतरत्र (कॅलिफोर्नियातील ‘चपरल’ व फ्रान्समधील ‘गॅरीग’) आढळतात; दक्षिण आफ्रिकेचा नैर्ऋत्य भाग, दक्षिण ऑस्ट्रेलियाचा काही भाग, चिलीतील एक लहान क्षेत्र इ. ठिकाणीही ही वनश्री आढळते.
मोसमी जंगले व रूक्षवने (सॅव्हाना) :
पावसामुळे व उन्हाळे असे ऋतू स्पष्टपणे जेथे आढळतात अशा उष्ण कटिबंधीय व क्वचित उपोष्ण कटिबंधीय जलवायुमानांत ही वनश्री किंवा हे समुदाय प्रकार आढळतात. येथे वृक्षांनी किंवा लहानमोठ्या झुडपांनी भरलेली जंगले यांपासून ते कोठे कोठे तुरळकपणे विखुरलेली झाडे असलेले गवताळ प्रदेश (उदा., सॅव्हाना, काँपो व लानो) ह्या पल्ल्यात येणारे विविध वनस्पति-समुदाय आढळतात. वनश्रीच्या मानवी व्यवस्थापनात वेळोवेळी आग पेटवून निदान उंच गवते (व काही लहान रोपटी व झुडपे) नाहीशी करतात; त्यामुळे येथील वनश्री विरळ राहून लहान गवते व अग्निकरोधक झाडेच टिकून राहतात. कोरड्या ऋतूत झाडांची पाने गळून पडल्याने ही वनश्री पानझडी ठरते; तिचा आढळ उष्ण कटिबंधीय आफ्रिकेच्या वर्षारण्याच्या पट्ट्याच्या उत्तर व दक्षिण भागांत, मध्य व पूर्व भारतात आणि अँमेझॉनच्या खोर्या च्या प्रदेशातील सदाहरित बनात (मधून मधून) आणि त्याच्या उत्तर व दक्षिण भागांत आहे.
तृणसंबात (स्टेप्स) :
ओषधीय वनस्पतींचे प्राधान्य असलेल्या आणि वृक्ष व झुडपे यांचा अभाव असणाऱ्या ह्या प्रकारच्या वनश्रीत काही प्रदेशांत गवते भरपूर असतात; परंतु इतर कित्येक ठिकाणी थोड्या गवताबरोबर असलेल्या विपुल औषधींना दोन ऋतूंच्या मध्यावकाशात फुले येऊन वातावरण रम्य होते. दक्षिण रशिया, मध्य आशियातील काही भाग व मध्यपूर्व ह्यांत तृणसंघात विशेषेकरून आढळतात. उत्तर अमेरिकेतील प्रशाद्वले (प्रेअरीज) व दक्षिण अमेरिकेतील सदातृणक्षेत्रे (पॅंपास) स्थूलमानाने याच सदरात येतात. दक्षिण ऑस्ट्रेलियातील मरू प्रदेशांभोवती व दक्षिण आफ्रिकेत काहीशी अशीच वनश्री आढळते. [ गवताळ प्रदेश].
मरुभौम वनश्री :
नित्याचे वार्षिक पर्जन्यमान २५ सेंमी. पेक्षा अधिक नसल्याने येथील वनस्पतींना जीवन कठीण जाते. बहुतेक मरू वनस्पती बहुवर्षायू नसून परस्परांपासून त्या दूर व मरुभूमीत विखुरलेल्या असतात; जेथे खोलवर असलेले पाणी (भूजल) पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकते अशा ठिकाणी (मरुवनात) तेथील वनश्री इतर समुदायापेक्षा वेगळी असते. मरुभौम वनश्रीतील जाती रुक्षतारोधक अथवा मांसल (रसाळ) असतात; रुक्षता कमी असलेल्या ठिकाणी पावसानंतर लागलीच काही अल्पायुषी जातींचे जीवन सुरू होते; त्यामध्ये बीज रुजणे, पालवी येणे, फुले व नंतर फळे येणे ह्या सर्व क्रिया काही आठवड्यांत संपतात व वनस्पतींचे जीवन संपते. मरूभूमीचा प्रदेश (मरू प्रदेश) सहारा ते अरबस्तानापर्यंत सलगपणे असून पुढे तुटकपणे मध्य आशियापर्यंत आढळतो; शिवाय मध्य ऑस्ट्रेलिया, कालाहारी, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेकडील एक पट्टी, उत्तर अमेरिकेच्या पश्चिमेकडील काही भाग इ. ठिकाणी मरुभौम किंवा अर्धमरुभौम वनश्री आढळते.
पानझडी वने :
समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत, जेथे थंड हिवाळे, गरम उन्हाळे व वाढीच्या वेळी पुरेसा पाऊस असतो तेथे ह्या प्रकारातील नैसर्गिक वनस्पति-समुदाय आढळतात. त्यांत ओक, बीच, मॅपल, लाइम, चेस्टनट इ. अनेक वृक्ष असून मनुष्याची लुडबूड नसती, तर मध्य यूरोपाचा बहुतेक भाग, पूर्व आशियाचा मध्यभाग आणि उत्तर अमेरिकेचा पूर्व भागही त्यांनी व्यापला असता. ह्या प्रकाराची उन्हाळ्यात हिरवी राहणारी वने इतरत्र (दक्षिण अमेरिकेतही) स्थानिक स्वरूपात आढळतात.
शंकुमंत वने (तैगा) :
उत्तर यूरेशिया व उत्तर अमेरिका येथे विस्तृतपणे वाढलेली सलग वने या प्रकारची असून त्यांत पाइन, स्प्रूस, हेमलॉक, लार्च इ. मऊ लाकडाचे वृक्ष आढळतात. कोठे कोठे एकाच जातीच्या वृक्षाची क्षेत्रे असून ती पाहण्यास कंटाळवाणी वाटतात. ह्या वनांच्या निर्भेळपणामुळे त्यांचा समुपयोग करणे सोपे व फायद्याचे असते. त्यांचा उपयोग इमारती लाकूड व कागदाकरिता लगदा मिळविण्यास होतो. [तैगा].
ध्रुवीय व उच्च पर्वतीय (वनश्रीतील) समुदाय :
उंच पर्वतांच्या शिखराकडे वर जाताना आणि ध्रुव प्रदेशाकडे जाताना विशिष्ट मर्यादेपुढे वृक्षांचे वास्तव्य संपून झुडपांची उंची कमी झालेली आढळते (उदा., जूनिपर, बर्च इ.). उत्तरेच्या परिसीमेवर टंड्रा हा दोन-तीनशे जातींच्या लहान (ओषधीय) वनस्पतींचा एक उत्तर ध्रुवीय सामान्य समुदाय आढळतो. येथे गवते, लव्हाळे भरपूर असून ⇨शेवाळी व दगडफुले [शैवाक] यांचे जाड आवरण जमिनीवर हिरवळीप्रमाणे पसरलेले आढळते. अति-उंच डोंगरावर वरच्याप्रमाणे समुदायांचे पट्टे असून प्रथम उपक्षुपवन (लहान झुडूपवजा वनस्पतीची वाढ) व त्यानंतर पर्वतीय शाद्वले [ नरम व उंच गवतांचे प्रदेश; गवताळ प्रदेश; गवते] व कुरणे (चराऊ राने) असतात. यापुढे अधिक उंच जावे तसे हेच समुदाय अधिकाधिक विरळ होत जाऊन शेवटी फक्त उघड्या खडकांवरची शेवाळी व दगडफुलेच आढळतात. कारण इतक्या उंचीवर बर्फाचे थर कमीअधिक प्रमाणात सतत असतात. दक्षिण ध्रुवावर फक्त दोन फुलझाडे असल्याची नोंद आहे.
उष्ण कटिबंधातील समुद्रकिनाऱ्यांच्या काठाने काही ठिकाणी खारट दलदली असून त्यांतील विशिष्ट वनस्पतींची एक कच्छ वनश्री बनते. [ वनश्री, कच्छ].
प्रस्तुत नोंदीत ज्या देशांचा उल्लेख केला आहे, त्यांवरील स्वतंत्र नोंदीत तेथील वनस्पतींची माहिती दिलेली आहे; तसेच ज्या वनस्पतींचा वर उल्लेख केला आहे त्यांच्या स्वतंत्र नोंदी आहेत त्या पहाव्यात.
0
Answer link
ध्रुवीय प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांची काही नावे खालीलप्रमाणे:
वनस्पती:
- शैवाळ (Algae)
- Moss
- Lichen
- Seagrasses
- Arctic Willow
प्राणी:
- ध्रुवीय अस्वल (Polar bear)
- सील (Seal)
- वालरस (Walrus)
- रेनडियर (Reindeer)
- आर्क्टिक कोल्हा (Arctic fox)
- पेंग्विन (Penguin)
- समुद्री पक्षी (Seabirds)
- लेमिंग (Lemming)
- कस्तुरी बैल (Muskox)
याव्यतिरिक्त, अनेक प्रकारचे मासे आणि किडे देखील ध्रुवीय प्रदेशात आढळतात.