अध्यात्म संत

कोणत्याही चार स्त्री संतांची नावे काय आहेत?

3 उत्तरे
3 answers

कोणत्याही चार स्त्री संतांची नावे काय आहेत?

1
.
मीराबाई (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. वैष्णव भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.



जीवन संपादन करा
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.

बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.


कृष्णाचे भजन गाणारी मीरा
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.

सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हटले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते

==आख्यायिका== :

प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्‍न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय/सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय'
फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ. स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील द्वारका इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.

काव्यरचना संपादन करा
पदावली मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. राजस्थानी आणि ब्रज भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.[

यात संत बहिणाबाई पाठक यांच्या विषयी माहिती दिली आहे

नारायण महाराज, हरिहर
भारतीय इतिहास
संत मुक्ताबा

संत मुक्ताबाई
मुक्ताबाई
मुक्ताबाई
(१२७७ किंवा १२७९–१२९७). ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण आणि मराठी संत कवयित्री. ज्ञानदेवादि चारी भावडांच्या जन्मकाळासंबंधी मतैक्य नाही. मुक्ताबाईचा जन्म एका मतानुसार १२७७, तर दुसऱ्या मतानुसार १२७९ ठरतो. पहिल्या मतानुसार तिला एकूण वीस वर्षांचे आयुष्य लाभले होते व दुसऱ्या मतानुसार मृत्युकाळी ती अठरा वर्षांची होती. या चारी भावंडांच्या जन्मस्थळाविषयीही मतैक्य नाही. कोणी ते आपेगाव मानतात, तर कोणी आळंदी मानतात. सबळ पुरावा असा कोणत्याच बाजूस नाही. या चारी भावंडांचे चरित्र साधारणपणे सारखेच असल्यामुळे मुक्ताबाईच्या चरित्रातील विशेष गोष्टी तेवढ्या सांगणे योग्य होईल.

पैकी एक म्हणजे तिचा चांगदेवाशी आलेला संबंध ज्ञानदेवांच्या भेटीस जाण्यापूर्वी त्यांना कोरे पत्र पाठविणाऱ्या चांगदेवाला अनुलक्षूनच तिने चांगदेव इतकी वर्षे जगून कोरा तो कोराच, असे म्हटले होते; पण तोच चांगदेव पुढे तिचा शिष्य झाला व दोघांतील हा गुरु-शिष्य-संबध दोघांनीही आपापल्या अभंगातून व्यक्त केला आहे.

पण त्यामुळे एक अडचण निर्माण झाली आहे. ती म्हणजे चांगदेवाच्या कवितेत त्याच्या स्वतःच्या आणि मुक्ताबाईच्या रचनेची झालेली गुंतागुंत. उदा., “गुणातीत डहाळी पाळणा लाविला | तेथे सुत पहुडला मुक्ताईचा” हे प्रसिद्ध पाळणागीत कोणाचे-मुक्ताईचे की चांगदेवाचे? अशा प्रकारचे प्रश्न चांगदेवाची गाथा पाहताना अनेक ठिकाणी निर्माण होतात.

मुक्ताईच्या चरित्रातील दुसरी विशेष गोष्ट म्हणजे तिने ज्ञानदेवांच्या भेटीस आलेल्या अहंमन्य नामदेवांचे उघडे केलेले अज्ञान. तिचे त्या प्रसंगी जाणवलेले प्रभावी व्यक्तिमत्त्व पाहूनच नामदेवांनी तिच्याविषयी 'लहानशी मुक्ताबाई जैसी सणकांडी । केले देशोधडी महान संत' असे उद्‌गार काढले. पुढे नामदेव-चांगदेव ह्या दोघांनी तिचा गौरव केला आहे हे खरे; पण तिच्या स्वतःच्या भावंडांनी तिच्या संबंधात कोठे अवाक्षरही काढलेले नाही. असे का व्हावे? ती निवृत्ति-ज्ञानदेवांच्या जीवनाशी इतकी एकरूप झाली होती, की तिचा वेगळा निर्देश करण्याची आवश्यकताच त्यांना वाटली नाही हे त्याचे कारण असावे.

या चार भावंडांत ती वयाने सर्वांत लहान असली, तरी तिने समाधी घेतली ती निवृत्तीनाथांच्या पूर्वी. तिचे समाधिस्थान खानदेशात तापीच्या काठचे मेहुण हे गाव होय असे नामदेवांच्या म्हटल्या जाणाऱ्या काही आत्मचरित्रपर अभंगांवरून मानले जाते. वारकरी पंथ शके १२१९, वैशाख वद्य १२, ही तिची समाधितिथी मानतो.

मुक्ताई निवृत्तीनाथांची अनुग्रहीत असताना चांगदेवासकट सर्व नाथपंथीय ग्रंथकार तिला अनुग्रह गोरखनाथांनी दिला असे का म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर यापूर्वी शिवदिनकेसरीने दोन भिन्न मुक्ताई कल्पून दिले होतेच (ज्ञानदीप, ओ. ९१०). आता त्याला अनुसरून रा. चिं. ढेरेही पुन्हा दोन मुक्ताई असल्याचा विचार मांडीत आहेत. इतकेच, की त्या भिन्न नसून दुसरी पहिलीचा पुनरावतार आहे.

पूर्वजन्मातील मुक्ताबाईला गोरखनाथांचा उपदेश असून ती चक्रधरांना त्यांच्या एकाकी भ्रमंतीत सालबडीच्या डोंगरात (ढेरे यांच्या मते श्री शैल पर्वतावर) एका वृद्ध योगिनीच्या रूपात भेटली होती (लीळा-चरित्र, एकाक ९). ढेरे यांच्या मतानुसार ही मुक्ताबाई चांगदेवाची मूळ गुरू असून पुढे ती दिवंगत झाल्यावर तिचाच नवा अवतार, म्हणजे ज्ञानदेवभगिनी मुक्ताई, हिला त्याने गुरू केले. पण हे सर्व अनुमान आहे. ते मानण्यात गोरखशिष्या मुक्ताई आपल्या दीर्घायुष्यात मुक्त न झाल्यामुळे तिला ज्ञानदेवांची बहीण म्हणून पुनरावतार घ्यावा लागला अशी विचित्र कल्पना करण्याची आपत्ती येते. त्यापेक्षा या दोन मुक्ताबाई सर्वस्वी भिन्न समजणेच योग्य होईल.

गाथेत मुक्ताईच्या नावावर एकूण ४२ अभंग आहेत. त्यात तिने आपला शिष्य चांगदेव याला उद्देशून रचिलेल्या व आता त्याच्या नावावर छापलेल्या सहा अभंगांची भर घालावी लागेल. त्या सहा अभंगात मुद्रिका 'मुक्ताई म्हणे' अशीच आहे. याशिवाय नामदेव गाथेतील 'नामदेव-भक्तिगर्वपरिहार' या मथळ्याखालील अभंगांपैकी (१३३४ ते १३६४) दहापंधरा तरी निश्चितपणे मुक्ताईचे आहेत. तसेच गाथेत न मिळणारे 'ताटीचे अभंग' ही तिचेच होत. म्हणजे तिची एकूण अभंगरचना सु. पाऊणशेच्या घरात जाईल. ती सर्व रचना काव्यगुणांनी समृद्ध आहे. ती मुख्यतः भक्तिपर असले, तरी योगमार्गाच्या खुणांनीही ती युक्त आहे.

मुक्ताईच्या काव्यात तिच्या जीवनाचे व प्रतिभेचे अनेक पैलू उठून दिसतात. अंधपणामुळे वाया जात असलेल्या या मुक्ताईला निवृत्तिराजाने सावध केले व त्यामुळे 'मुक्तपणे मुक्त । मुक्ताई पैं रत । हरिनाम स्मरत । सर्वकाळ ।' अशी आपली अवस्था होऊन गेल्याचे ती सांगते. तिच्या अभंगात योगाच्या खुणा आहेत, अध्यात्माची उंची आहे, साक्षात्काराचे पडसाद आहेत, हे सर्व खरे; पण त्याबरोबरच त्यांत हृदयाचे मार्दव आणि भावनेची हळुवारताही आहे. तसे पाहिल्यास तिचा स्वभाव सोपानदेवाप्रमाणे थोडा परखड दिसतो.

पण ताटीच्या अभंगात तिच्या या स्पष्टवक्तेपणाने थोडे निराळे वळण घेतले आहे. एक दिवस ज्ञानदेवांना पाहून कोणा टवाळाने त्यांना संन्याशाचा पोर म्हणून हिणवले तेव्हा ज्ञानदेव मनात खिन्न होऊन झोपडीत जाऊन बसले व काही केल्या ताटीचे दार उघडीनात. त्या वेळी मुक्ताईने त्यांच्या ज्या विनवण्या केल्या त्या 'ताटीचे अभंग' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांत जसा वडील भावावर रुसलेल्या धाकट्या बहिणीचा लडिवाळपणा आहे, तसाच परिणत प्रौढत्वाला साजेल असा समंजसपणाही आहे. मुंगी उडाली आकाशी । तिने गिळिले सूर्यासी । असे तिचे एक वचन आहे. हे तिला स्वतःलाही लागू पडते


शोधा
बहिणाबाई पाठक (संत)
यात संत बहिणाबाई पाठक यांच्या विषयी माहिती दिली आहे
पहारा

बहिणाबाई (जन्म : इ.स. १६२८ (शके १५५१); मृत्यू : २ ऑक्टोबर १७००). संत तुकारामांच्या समकालीन पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्या. स्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यांसह बहिणाबाईंचे स्थान आहे. त्यांचे माहेरचे आडनाव कुलकर्णी होते . बालपणापासून परमार्थाकडे ओढा असणाऱ्या बहिणाबाईंनी पती व माहेरच्या माणसांसोबत अनेक तीर्थयात्रा केल्या. एकदा वडगावकरांच्या कीर्तनात तुकारामांचे अभंग ऐकून त्या तुकामय झाल्या. स्वप्नात तुकारामांनी त्यांना दृष्टान्त दिला. पुढे प्रत्यक्ष तुकारामांचे त्यांना दर्शन झाल्यावर त्यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. तथापि एका ब्राम्हण स्त्रीने तुकारामांचे शिष्य व्हावे ही गोष्ट सनातन्यांना पटणारी नव्हती. मंबाजीने तर त्यांचा खूप छळ केला पण त्यांनी आपली तुकाभक्ती सोडली नाही. बहिणा आपल्या गुरूंचा उल्लेख पदोपदी आपल्या अभंगात करीत. बहिणा म्हणते 'तुका सद्गुरु सदोहर l भेटतो अपार सुख होव ll तुकारामा भेटला धन्य जिने माझे कृत्यकृत्य झाले सहजाचि '




संत जनाबाई




जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या.

संत जनाबाई
जन्म
अंदाजे इ.स. १२५८
गंगाखेड
मृत्यू
अंदाजे इ.स. १३५०
राष्ट्रीयत्व
भारतीय
नागरिकत्व
भारतीय
वडील
दमा
आई
करुंड
जीवन
जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.

बालपण
परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. तिच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत.

आयुष्य
संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.

‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.[१]

संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ति मिळाली होती.

संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या. (इ.स. १३५०)

जनाबाईंवरील पुस्तके/व्हीडिओ/चित्रपट
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
संदर्भ
शेवटचा बदल ४ महिन्यां पूर्वी सांगकाम्या कडून
RELATED PAGES
संत साहित्य
नामदेव
महाराष्ट्रातील संत

सुहासिनी इर्लेकर

इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.
गुप्तता नीती वापरण्याच्या अटीडेस्कटॉप

इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमब्ध व सूसंगत रितीने मांडणी होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = 'इति+ह+आस' हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते. जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.

प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय टायम बी यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास होय इतिहासामध्ये संस्कृतीचा उदय असतो अभ्यासला जातो असं टाईमबी म्हणतात इतिहास ही स्वतंत्रपणे अभ्यासाची एक शाखा आहे या शाखेमध्ये शास्त्रीय आधारावर इतिहासाचा अभ्यास आणि संशोधन केले जाते मानवी संस्कृतीचा उदय आणि अस्त म्हणजे इतिहास असे टाईमबी म्हणतात इतिहासाचे प्रकार खालीलप्रमाणे :

१) भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे ज्ञान

२) इतिहासाची शास्त्रीय पद्धत

३) इतिहास आणि आपला भूतकाळ

४) भूतकाळ आणि भविष्यकाळ

प्राचीन साहित्यात इतिहास संपादन करा

पुराणकथा या एकेकाळचा इतिहास आहेत.
राजशेखर आपल्या काव्यमीमांसेत लिहितात–‘स च द्विविधा परक्रिया पुराकल्पाभ्याम् |’त्याचा अर्थ असा–परक्रिया व पुराकल्प अशी इतिहासाची द्विविध गती आहे/होय.भारतीय साहित्यामध्ये इतिहासाला वेदाच्या बरोबरीने महत्त्व दिलेले आहे. ऋग्वेदसंहितेत इतिहास सयुक्त मंत्राचा संग्रह आहे. तसेच नारद लिखित छांदोग्योपनिषद या ग्रंथात इतिहास-पुराणाला पंचम वेद म्हटले आहे. संस्कृत वाङ्‌मयामध्ये कथेच्या रूपाने इतिहास आलेला आढळतो. कौटिल्य याने केलेल्या व्याख्येप्रमाणे इतिहासात पुराणे, इतिवृत्त, आख्यायिका, उदाहरण, धर्मशास्त्र व अर्थशास्त्र इतक्या विषयांचा समावेश होतो.

धर्मार्थकाममोक्षाणा उपदेशसमन्वितम्| पुरावृत्त कथायुक्तं इतिहासं प्रचक्षते||{ श्रीधर स्वामी कृत विष्णु पुराण टीका}

अनेक शिलालेख हे महत्त्वाचे असतात

आधुनिक व्याख्या संपादन करा
हॅपाल्ड यांच्या मते 'इतिहास' हा अनुभवांचा नंदादीप होय.' इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास असेही म्हणता येते. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंड असू शकतात. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो.या शिवाय या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांचा अभ्यास याचाही अंतर्भाव इतिहासात होतो. इतिहास या विषयाचे आकलन करून घेताना प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या इतर घटकांची आवश्यक किमान माहिती व संस्कृतीचा सखोल अभ्यास असा दृष्टिकोन असावा लागतो.इतिहासातून माणूस नक्कीच काहीतरी शिकू शकतो असा दावा केला आहे.
उत्तर लिहिले · 14/7/2021
कर्म · 121765
0
येथे चार श्री संतांची नावे दिली आहेत:
  1. संत ज्ञानेश्वर
  2. संत नामदेव
  3. संत तुकाराम
  4. संत एकनाथ
उत्तर लिहिले · 30/11/2021
कर्म · 0
0

महाराष्ट्रामध्ये अनेक थोर स्त्री संत होऊन गेल्या, त्यापैकी काही प्रमुख नावे खालीलप्रमाणे:

  1. संत जनाबाई: त्या नामदेवांच्या दासी होत्या आणि त्यांनी अनेक अभंग लिहिले. विकिपीडिया
  2. संत सोयराबाई: त्या संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या आणि त्यांनीही अभंग রচনা केली.
  3. संत मुक्ताबाई: त्या संत ज्ञानेश्वरांच्या लहान बहीण होत्या आणि त्यांनी 'ताटीचे अभंग' लिहिले. विकिपीडिया
  4. संत बहिणाबाई: त्या एक कवयित्री आणि लेखिका होत्या, ज्यांनी आध्यात्मिक विषयांवर लेखन केले. विकिपीडिया
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5220

Related Questions

सर्व संतांच्या प्रार्थनांमधून करुणा तुमच्या शब्दात लिहा?
अंतिम संस्कार पुढील जीवन आणि परिस्थिती कशी निर्धारित करते?
कर्माचा नियम काय?
जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म?
सतत नामस्मरण करावे का?
योगवासिष्ठानुसार मन संकल्पना?
विविध ग्रंथांतील योगाच्या व्याख्या आणि अर्थ स्पष्ट करा.