कला नाटक नाट्य

क्षोभप्रधान नाट्य आणि प्रहसन नाटकाचे प्रकार सविस्तर कसे स्पष्ट कराल?

3 उत्तरे
3 answers

क्षोभप्रधान नाट्य आणि प्रहसन नाटकाचे प्रकार सविस्तर कसे स्पष्ट कराल?

1

पदन्यासप्रधानेचे प्रकार स्पष्ट करा.

उत्तर लिहिले · 5/7/2022
कर्म · 20
1
मेलोड्रामा क्षोभप्रधान नाटक या नावाने हा प्रकार रूढ झाला.melos म्हणजे 'गाणे' melo drama म्हणजे drama with song नाटकातील सुखदुःख मिश्रित क्षोभ संगीताच्या योजनेमुळे अधिक उत्कट आणि भडक होतो.भावविवश परिणाम घडवून आणणे हे मेलोड्रामाचे लक्ष असते.

मराठीत सगळ्यात जास्त लिहिला गेला तो मेलोड्रामा.त्याचे महत्त्वाचे कारण असे की.शोकात्मिकेचा ताण सहन न होणारा फार मोठा प्रेक्षक असतो.या प्रेक्षकाला करमणूक हवी असे.'मेलोड्रामा'त संगीताची सोय आहे.त्यामुळे संगीत हे करमणुकीला अतिशय सोयीस्कर आहे.

नाटकाचे उपप्रकार व आशयानुरूप वर्गीकरण
नभोनाट्य,संगीतिका,नाटयछटा,एकांकिका,एकपात्री प्रयोग,दीर्घाकं
हे नाटकाचे उपप्रकार मानले जातात.
फार्स (किंवा प्रहसन) हा नाटकाचा एक विशिष्ट प्रकार आहे. भरतमुनींनी आपल्या नाट्यशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे प्रहसन हा दहा रूपकांपैकी(नाट्यप्रकारांपैकी) एक प्रकार आहे. भरताने प्रहसनाचे दोन भेद सांगितले आहेत. शुद्ध आणि संकीर्ण. आणखी एक वैकृत नावाचा संकीर्ण प्रहसनाचा उपप्रकार आहे. प्रहसनात यथोचित 'वीथ्यंगे' उपयोजावीत, त्यात मुख व निर्वहण हे दोन 'संधि' असावेत आणि आवश्यकतेनुसार एक वा दोन अंक असावेत, असे भरताने म्हटले आहे. प्रहसनांत कैशिकी आणि आरभटी वृत्तींना थारा असू नये असे नाट्यशास्त्र व इतर सहग्रंथ म्हणतात.
प्रहसनाचे दोन्ही प्रकार हास्यरसप्रधान असतात. शुद्ध प्रहसनात पात्रे अनेक असली तरी हास्यकारण वागणूक बहुधा एकाचीच असते. संकीर्ण प्रहसनात वेश्य, चेट, विट, धूर्त, हिजडे आणि छिनाल स्त्रिया असू शकतात, तर शुद्ध प्रहसनात तपस्वी, साधू भिक्षू वगैरे.असतात.
शुद्ध प्रहसनाची उदाहरणे : शशि-विलास, सागरकौमुदी, कंदर्पकेलि वगैरे. भगवज्जुका, सैरंधिका आणि लटकमेलक ही संकीर्ण प्रहसनाची भरताने सांगितली उदाहरणे आहेत.
फार्स या इंग्रजी नाट्यप्रकावरून मराठीत आलेला प्रहसन हा आधुनिक प्रकार भरतप्रणीत प्रहसनापेक्षा वेगळा आहे. अतिशयोक्त, असंभवनीय घटना, विदुषकी चाळे, शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांना मनसोक्त हसवणे हा या प्रहसनांचा उद्देश. यांत पात्रांचा गोंधळ आणि धिंगाणा प्रहसनभर चालू असतो. या प्रकारच्या मराठी प्रहसनांची उदाहरणे :
अनरशाचा फार्स
आपलं बुवा असं आहे
करायला दगेलो एक
काका किशाचा
कुर्यात सदा टिंगलम्
खडाष्टक
खोटेबाई परत जा
गुलाब छकडीचा फार्स
घेतलं शिंगावर
झोपी गेलेला जागा झाला
टुरटूर
ढेरपोट्याचा फजिता
तीनचोक तेरा
दिनूच्या सासूबाई राधाबाई
बासुंदीचा मनोरंजक फार्स
लफडासदन
सौजन्याची ऐशीतैशी
वगैरे वगैरे.
उत्तर लिहिले · 5/7/2022
कर्म · 11785
0
मी तुम्हाला क्षोभप्रधान नाट्य (Melodrama) आणि प्रहसन (Farce) या नाटकांच्या प्रकारांमधील फरक सोप्या पद्धतीने समजावून सांगतो:

क्षोभप्रधान नाट्य (Melodrama):

  • भावनेला जास्त महत्त्व: यात भावनांना खूप जास्त महत्त्व दिले जाते. पात्रांच्या भावना तीव्रतेने दाखवल्या जातात, ज्यामुळे प्रेक्षकांना Drama चा अनुभव येतो.
  • सरळ कथा: कथा सरळ असते, ज्यात चांगले आणि वाईट अशा स्पष्ट भूमिका असतात.
  • अतिशयोक्ती: संवाद आणि घटनांमध्ये अतिशयोक्ती असते, म्हणजे गोष्टी वाढवून सांगितल्या जातात.
  • संगीत आणि नाट्यमयता: संगीत आणि नाट्यमय दृश्यांचा वापर भरपूर केला जातो, ज्यामुळे emotional impact वाढतो.

उदाहरण: 'देवमाणूस' या मालिकेत काही प्रसंग melodrama type असू शकतात.


प्रहसन (Farce):

  • हास्य आणि विनोद: यात केवळ हास्य निर्माण करणे हा मुख्य उद्देश असतो. विनोद, मजेदार घटना आणि absurd situations वापरल्या जातात.
  • गोंधळ आणि चुकीची ओळख: पात्रांमध्ये गोंधळ निर्माण होतो, गैरसमज होतात आणि चुकीच्या ओळखीमुळे हास्य निर्माण होते.
  • शारीरिक हावभाव: पात्रांचे हावभाव exaggerated असतात आणि शारीरिक विनोदावर जास्त भर दिला जातो.
  • lighthearted: हे नाटक गंभीर नसतं, केवळ मनोरंजन करणे हेच ध्येय असतं.

उदाहरण: 'सही रे सही' हे नाटक प्रहसन आहे.

मुख्य फरक:

  • क्षोभप्रधान नाट्यात भावना तीव्र असतात, तर প্রহसनात विनोद आणि हास्य महत्त्वाचे असते.
  • क्षोभप्रधान नाट्य serious असू शकते, पण प्रहसन नेहमी lighthearted असते.

Wikipedia link:

Melodrama
Farce
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 3600

Related Questions

काळगंगा हे पुरातन स्थळ कुठे आहे?
फेअरलेस गव्हर्नर हे पुस्तक कोणी लिहिले?
तुम्हाला माहित असलेल्या गुरु शिष्यांच्या जोड्या?
भारतीय राष्ट्रीय गाणे कोणी रचले?
भारतीय राष्ट्रगीत कोणी लिहिले?
अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल माहिती सांगा?
हिरवागार शालू परिधान?