2 उत्तरे
2
answers
विनाशकाले विपरीत बुद्धी या म्हणीचा अर्थ सांगा?
2
Answer link
इंदिरा गांधींनी आणिबाणी जाहीर करून जयप्रकाश नारायणांना अटक केली.तेव्हां त्यांचे इंदिराजींना उद्देशून प्रथमोद्गार होते,विनाशकाले विपरीत बुद्धिः’या संस्कृत वचनाचा आपण नेहमीच वापर करतो.आपले वाईट व्हायचे असेल तर आपली बुद्धीही अयोग्य पद्धतीने काम करायला लागते असा याचा अर्थ!आणि तसे घडले देखील. इंदिराजींचा नंतरच्या निवडणुकीत दारूण पराभव झाला आणि त्या सत्ताभ्रष्ट झाल्या.
मुळात हे वचन रामायणातील आहे. ते ज्यात आहे तो भाग असा-
न भूत पूर्वो, न च केन दृष्टो, हेम्न कुरंगो न कदापि वार्ता।
तथापि तृष्णा रघुनंदनस्य, विनाशकाले विपरीत बुद्धि:॥
म्हणजे न कधि सोनेरी हरीण निर्माण झाले, न कुणि पाहिले , न कधि त्याच्याबद्दल वार्ता आली. तरीही रामाच्या मनात (शंका न येता) सोनेरी हरीण मिळविण्याची लालसा निर्माण झाली. संकटकाळ यायचा असेल तर बुद्धीही नाठी होते. पुढे घडलेले रामायण आपल्याला माहीत आहेच!
लहान मुले झोपेला आली की एका लयीत आणि ठेक्यात म्हणलेली कोणतीही गोष्ट त्यांना गुंगवते आणि त्यातच त्यांना झोप लागते.मी माझ्या नातवाला अशा वेळी [अंगाई गीत येत नसल्याने] श्लोक, सुभाषिते वगैरे म्हणून दाखवीत असे. यथावकाश तो बोलू लागल्यावर एक दिवस त्याला मूड आलेला असतांना तो कांहीतरी परिचित शब्द म्हणतो आहे असे वाटले. नीट ऐकले तेव्हां लक्षात आले की तो,मी त्याला म्हणून दाखवीत असे त्यातील दोनतीन ओळी म्हणतो आहे. तेव्हापासून त्याला म्हण असे न म्हणता सुभाषिते वगैरे ऐकवणे चालू ठेवले. त्यामुळे त्याची सुभाषिते विनासायास पाठ झाली आहेत.यथावकाश त्याला अर्थही समजावून देण्याचा प्रयत्न करीत राहिलो. तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातो त्यामुळे तेथे मराठी अति दुय्यम! एक दिवस एका वाहिनीवर मुलाखत चाललेली होती.मुलाखत घेणारा आणि देणारा सामान्यच होते पण एकमेकांची बटबटीत वाटावी इतकी स्तुति करीत होते. ते ऐकून नातू एकदम उद्गारला, ’अहो रूपं अहो ध्वनि चाललय!’मला फार बरे वाटले. सुभाषित शिकवल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. अलिकडेच एका सज्जनाने मायबोलीवरही ’अहो रूपं अहो ध्वनिच चालते’ असा अभिप्राय व्यक्त केला होता. त्याचे म्हणणे योग्य कि अयोग्य ही गोष्ट बाजूला ठेवू पण अभिप्रायासाठी हे वचन नेमके व सुटसुटीत आहे हे त्याला जाणवले यातच या सुभाषिताचे सामर्थ्य सिद्ध होते. हे संपूर्ण सुभाषित आहे -
उष्ट्राणां च ग्रुहे लग्नं, गर्दभा: मंत्रपाठका: |
परस्परं प्रशंसंति, अहो रुपं अहो ध्वनीं||
अर्थः उंटा घरी लग्न आहे, गाढव मंत्र म्हणते आहे. (गाढवाने मंत्र व्यवस्थित म्हणावेत ही उंटाची इच्छा तर यजमान उंटाने भरगोस दक्षिणा द्यावी ही गाढवाची इच्छा! त्यामुळे उंट कुरुप असला तरी ) गाढव उंटाच्या सौदर्याची स्तुति करते आहे तर (ऐकवणार नाही असा गाढवाचा आवाज असूनही) उंट त्याच्या आवाजाच्या गोडव्याची स्तुति करतो आहे.
[*] प्रवासाला निघालेल्यांना ’हॅपी जर्नी’, ’बॉन व्हॉयेज’ , ’तुमचा प्रवास सुखाचा होवो!’ असे म्हणण्याची पद्धत आहे.
जुन्या काळी ’शिवास्ते सन्तु पन्थानो’ असे याच अर्थी म्हटले जायचे व आजही म्हटले जाते. किंबहुना म्हणायलाही ते सोईचे आहे व आपल्या फ़ार जुन्या परंपरेतून आले आहे त्यामुळे हे संस्कृत वचन वापरण्याची जुनी परंपरा पुनरुज्जिवित करायला काहीच अडचण नाही. मूळ काव्य असे आहे.
शिवास्ते सन्तु पन्थानो मा च ते परिपन्थिनः। आगताश्च तथा पुत्र भवन्त्वद्रोह्चेतसेः।
पातु त्वां वरुणोराजा सलीले सलीलेश्वरः। अन्तरिक्षेs अन्तरिक्षस्थः पवनः सर्वगस्तथा॥
या संस्कृत वचनाचा उपयोग ज्या परिस्थितीत केला गेला आहे तो प्रसंग मात्र मन हेलावणारा आहे. करूण आहे. हा प्रसंग महाभारतातील आहे. कुंति नवजात कर्णाला टोपलीत ठेवून नदीच्या प्रवाहात सोडून देतांना त्याच्या आयुष्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देते आहे. या खडतर आणि अनिश्चिततेच्या आयुष्य-प्रवासाची सुरुवातच जिवावर बेतणारी आहे हे दिसत असूनही जड अंतःकरणाने, अत्यंत नाईलाजाने एक माता तसे करते आहे. तिच्या जिवाच्या घालमेलीची कल्पना आपण सहज करू शकतो. ज्यांच्या पासून त्या नवजात जिवाला धोका आहे असा पाऊस, पाणी, वारा हेच तुझे रक्षण करोत असे ती त्या बालकाला म्हणते आहे.
कर्णाच्या त्या प्रवासाच्या तुलनेत सुरक्षित अशा आजच्या आपल्या प्रवासांमधुनही अनेक धोके संभवतातच! मग काय हरकत आहे म्हणायला , "शिवास्ते सन्तु पन्थानो"! शिवास्ते सन्तु पन्थानो! "
(या श्लोकाचा शब्दशः संपूर्ण अर्थ माझ्याकडे नाही. कोणास माहीत असल्यास द्यावा ही विनंति.)
[हा एक सुभाषितांचा संग्रह आहे. त्यात चुका असू शकतात. चुकभूल द्यावी घ्यावी]
मायबोली....
0
Answer link
विनाशकाले विपरीत बुद्धी या म्हणीचा अर्थ:
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा वाईट काळ येतो किंवा संकट येते, तेव्हा त्याची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो स्वतःच्या विनाशाला कारणीभूत ठरतो.
अर्थ स्पष्टीकरण:
- विनाशकाळ: वाईट वेळ किंवा संकट.
- विपरीत बुद्धी: चुकीची बुद्धी किंवा विचार.
म्हणजे, संकटाच्या वेळी माणसाला चांगले विचार सुचत नाहीत आणि तो चुकीचे निर्णय घेतो, ज्यामुळे त्याचे नुकसान होते.
उदाहरण:
एका माणसाला खूप कर्ज झाले होते. त्यामुळे तो तणावाखाली होता आणि त्याने चुकीचा निर्णय घेऊन आणखी कर्ज घेतले. या त्याच्या 'विनाशकाले विपरीत बुद्धी'मुळे तो अधिक अडचणीत सापडला.
या म्हणीवरून हे शिकायला मिळते की, वाईट काळात शांत राहून विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.