2 उत्तरे
2
answers
म्हणीचे योगदान लक्षणीय आहे कारण काय?
2
Answer link
म्हणीचे योगदान लक्षणीय आहे कारण
कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी, घरोघरी मातीच्याचचुली अशा अनेक म्हणी आपण नेहमी वापरतो. पण तुम्हाला सांगितलं की या म्हणींचइंग्रजीतभाषांतर करा तर? तारांबळच उडेल ना? खरंतर, या म्हणी, वाक्प्रचार हेप्रत्येक भाषेचा अविभाज्य घटक असतात. ते त्या भाषेच्या मातीशी, संस्कृतीशी असे काही जोडले जातात की त्यांचं भाषांतर करणं कठीणच होऊन बसतं. म्हणूनच म्हणी आणिवाक्प्रचार त्या भाषेचं ठळक वैशिष्ट्य ठरतं.उतरवली आहे. आपल्या या अनोख्या उपक्रमाबद्दल ते म्हणतात, प्रत्येक भाषेतल्या म्हणींना त्या त्या गावाचा सांस्कृतिक वारसा असतो. म्हणूनच ते केवळ शब्द नसतात, तर त्या भाषेच्या परंपरांचंप्रतिबिंब त्यात उमटलेलं असतं. उदाहरणच द्यायचं तर पु.ल. देशपांडेनी म्हटलेलं 'हिच्या हातच्या थालीपीठाची चव कश्याकश्याला नाही,' या वाक्याचं भाषांतर कसं करणार? म्हणून मराठीतीतल्या या मजेशीर वाक्यरचनांचा, म्हणींचा संग्रह करण्याचा हासंकल्प आहे.'
पण आज आपण एकाहून अधिक भाषा बोलतो. खरंतर या अनेक भाषांचं मिश्रण असलेली संयुक्त भाषाच आपण वापरतो. त्यामुळे म्हणी आणि वाक्प्रचारांचा आपल्याला विसरच पडला आहे. भाषेचं हे वैभव जपायलाहवं असं तुम्हालाही वाटत असेल तर /
'मराठी भाषेतल्या म्हणींचा संग्रह' एवढीच या
साइटची ओळख करून देणं म्हणजे कौतुकातही
आपल्या या प्रयत्नात सावकार यांनी आजवर तीनशेहून अधिकम्हणींचा संग्रह केला आहे. त्यातल्या अनेक म्हणी तर आपण वापरतच नाही. गावात नाहीझाड म्हणे एरंडाला आला पाड', 'राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला ही त्यातलीचकाही उदाहरणं तसंच यातल्या अनेक म्हणी खास गावाकडल्या भाषेतल्या आहेत. अनेक शहरीमाणसांना त्या पटकन समजणार
आहेत. अनेक शहरीमाणसांना त्या पटकन समजणार नाहीत पण थोडासा प्रयत्न केला तर त्यातली गंमत अनुभवतायेईल.
अत्यंत साधी आणि सोपी रचना असलेल्या या साइटच्या होमपेजवर सावकार यांनी प्रथम आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच आजवर संग्रहित केलेल्या या म्हणींची विभागणी अकारविल्हे केली आहे. त्यासाठी त्यांनी वापरलेलीपाटीची कल्पनाही सूचक आहे. मुळाक्षरावर क्लिक केल्यानंतर त्या आद्याक्षराने सुरूहोणाऱ्या म्हणी पाहता येतात.
या संग्रहात तुम्हाला भर घालायची असेल तर प्रत्येक पानाच्या तळाशी त्यासाठी खास लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करूनमाहीत असलेल्या म्हणी या संग्रहासाठी पाठवू शकता. असं योगदान देणाऱ्यांचं नावहोमपेजवरच्या श्रेयनामावलीत लिहिलं जातं. मराठीतल्या या अमोल ठेव्याच्या जतनासाठीप्रत्येकाने या उपक्रमात सहभागी व्हायला हवं.
0
Answer link
म्हणींचे योगदान लक्षणीय आहे, कारण:
- संस्कृती आणि परंपरा जतन: म्हणी ह्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मौखिक परंपरेचा भाग आहेत. त्या आपल्या संस्कृती, चालीरीती आणि जीवनशैलीचे ज्ञान देतात.
- अनुभव आणि शहाणपण: म्हणी लोकांच्या अनुभवातून तयार होतात. त्यातून जीवनातील सत्य आणि व्यावहारिक ज्ञान मिळते.
- संदेश देण्याचे प्रभावी माध्यम: म्हणी कमी शब्दांत मोठा अर्थ व्यक्त करतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट सोप्या पद्धतीने समजावण्यासाठी म्हणींचा वापर होतो.
- भाषेची शोभा: म्हणी भाषेला सौंदर्य आणि समृद्धता प्रदान करतात. त्या बोलण्यात आणि लेखनात एक प्रकारची रंगत आणतात.
- पिढी दर पिढी ज्ञान संक्रमण: म्हणींच्या माध्यमातून वडीलधाऱ्यांकडून मुलांना आणि तरुणांना मार्गदर्शन मिळते.
म्हणी हे भाषेचे अलंकार आहेत आणि त्या आपल्या सामाजिक जीवनाचा आणि सांस्कृतिक वारसाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत.