
नीतीशास्त्र
3
Answer link
तोंडळाशी भांडू नये । वाचाळाशी तंडो नये । सतसंग खंडु नये। अंतर्यामी ।
वरील ओव्या या संत रामदास स्वामी यांच्या दासबोध
या ग्रंथातील आहेत.
संत रामदास हे भारतातील अतिशय थोर असे संत होते. त्यांनी आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. ते एक थोर कवी होते, विचारवंत होते, लेखक होते आणि आध्यात्मिक गरु देखील होते. त्यांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे खूप मोठे कार्य केले. समाजात वावरत असताना माणसाचे कार्य कसे असावे याचे मार्गदर्शन त्यांनी आपल्या साहित्यातून केले.
तोंडळाशी भांडू नये वाचाळाशी तंडो नये सतसंग खंडु नये। अंतर्यामी।
वरील ओव्या या संत रामदास यांच्या दासबोध या ग्रंथातील आहेत. वरील ओव्यांच्या माध्यमातून संत रामदास समाजात माणसाने कसे वागावे याबद्दल मार्गदर्शन करतात. संत रामदास म्हणतात समाजात प्रत्येक प्रकारचे व्यक्ती असतात जर कोणी भांडखोर असेल तर त्याच्याशी भांडण करून काही फायदा नाही कारण ती त्याची सवय आहे. एखादा नेहमी बडबड करत असेल तर तो आपले म्हणणे कधीही ऐकून घेणार नाही. अशा व्यक्तीं पासून लांब राहिलेलेच नेहमी चांगले. ते म्हणतात आपले आचरण विकसित करण्यासाठी संतांची साथ नेहमी लाभली पाहिजे. कारण संतांच्या सहवासाने आपल्याला आत्मज्ञानाची जाणीव होते व आपले आचरण शुद्ध होते...
**************************************
उत्तमलक्षण या श्री दासबोधातील उपदेशपर रचनेतुन संत रामदासांनी आदर्श व्यक्तिची लक्षणे सांगितली आहेत. यात कोणात्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या नाही याचा खुलासा केला आहे. भांडखोर व्यक्तिशी भांडायला जावू नये. सतत बडबड करतात अशा व्यक्तिशी वाद घालत बसू नये कारण या दोन्ही प्रकारच्या व्यक्ति समोरच्याचे बोलाणे येकू न घेता स्वतःचे खरे करत असतात. त्यांच्याशी बोलणे म्हणजे आपला वेळ वाया घालवणे आहे. त्यामुळे अशांना टाळावे व संतांच्या संगतीत रमावे मनापासून त्यांच्या सहवासाचा लाभ घ्यावा. कारण त्यांच्या संगतीत राहून आपनही सज्जन बनतो. असा संदेश वरील काव्यपंक्तीतुन लेखक व्यक्त करतात.
2
Answer link
अजिबात नाही, त्याने त्याचे कर्म केले आहे त्याचे फळं ही त्यालाच मिळणार मग ते चांगले असो वा वाईट , आपण नाम मात्र कारण असतो त्याच्या कर्माला पूर्णत्वाला नेण्यासाठी ठरलेलो ,
त्यामुळे असा विचार कधीच करू नये, आपल्याला काही त्रास होतं असेल किंवा दैनंदिन जीवन बिघडले असेल तर आपल्या ईष्ट देवावर विश्वास ठेवावा त्यान्ची आराधना करावी , आपला व्यवहार प्रामाणिक व बोलणे सत्य ठेवावे त्यामुळे त्याचे फळं चांगले मिळते , जरी उशीर लागला तरी ही ,
म्हणून कोणी आपले वाईट केले असताना त्याचा बदला नाही तर आपली सत्यता, भक्ती व श्रद्धा वाढ़वावी , जेणेकरून आपल्यावर येणारे संकट माघारी फिरतं ज्याने पाठवलं त्याच्याकडे हा सिद्धांत आहे नियतीचा , पण त्याआधी आपली शहानिशा केली जाते, आपण खरच त्या आलेल्या संकटाचा अधिकारी आहोत का, काही दोष आहेत का, आपलं काही चुकलं आहे का, त्या व्यक्ती बद्दल आपलं कर्म कसे आहे , काही वाईट बोल आहेत का, याचा मोजमाप होतं असताना आपल्याला त्रास होतो पण तो थोड्या काळापुरता असतो,
आपला त्रास हा आपल्या कर्मावर अवलंनबून असतो, दुसऱ्यासाठी चांगलं मागितलं तर आपलं चांगल होतं असं कायम म्हणलं जातं पण पाळलं जातं नाही आणि म्हणून चांगल्या वागणत्या माणसाला ही त्रास होतो कारण नुसते कर्म चांगले असून चालतं नाही तर त्याला जोड विचारांची व कर्तृत्वाची असावी लागते,
तेव्हा किती ही करुद्या कोणी वाईट आपले , आपण मात्र आपले चित्त उत्तम कर्मावर चं पाहिजे व्यापले कारण एक नां एक दिवस प्रचीती येते माणसाला की ते सर्व जण आता संपले
1
Answer link
जेएका गावात महेश नावाचा मुलगा एक मुलगा राहत होता. महेश हा गरीब परिस्थितीतून कष्ट करून आपले शिक्षण पूर्ण करणारा असा एक कष्टाळू व प्रामाणिक मुलगा होता. शाळेचे शिक्षण पूर्ण करीत असतानाच तो जसा वेळ मिळेल तसा आपल्या आईवडिलांना ही कामात मदत करीत असे जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत होण्यास मदत मिळू शकेल.
अभ्यासाची आवड आणि त्याला कष्टाची साथ यामुळे महेश आपल्या वर्गात नेहमीच प्रथम क्रमांक मिळवत असे. त्याची ही अभ्यासाची जिद्द पाहून त्याच्या शिक्षकांनाही त्याचा नेहमी अभिमान वाटत असे.
महेशचे लक्ष नेहमी शाळा आणि त्याचे घर यावरच असायचे. बाकीची मुले दंगा, मस्ती करायची परंतु तो तसे काहीही करत नसे. त्याला त्याच्या घरच्या आर्थिक परिस्थितीची पूर्णपणे कल्पना होती व चांगले शिक्षण घेऊन त्याला त्याच्या कुटूंबाला हातभार लावायचा होता हे तो कधीच विसरत नसे.
एके दिवशी त्याच्या शाळेतील काही वाईट मुलांनी त्याला आपल्याबरोबर आपल्या संगतीत ओढले आणि न कळतपणे महेश त्या वाईट मुलांच्या संगतीत सामील होऊ लागला. महेशच्या वागण्या बोलण्यातील फरक त्याच्या शिक्षकांच्या लगेच लक्षात आला आणि त्यांना या गोष्टीचे फारच वाईट वाटले.
शाळेतील एवढा प्रामाणिक व कष्टाळू मुलगा असा वाईट संगतीला लागून वाया जाऊ नये म्हणून त्याचे शिक्षक एक दिवस एक युक्ती करतात. एके दिवशी वर्गशिक्षक महेशला स्वतः सोबत बाजारात येण्यासाठी सांगतात. आपल्या शिक्षकांना आपल्या मदतीची गरज आहे असे समजून महेश त्यांच्यासोबत बाजारात जातो. शिक्षक एका आंब्याच्या दुकानात जाऊ चांगल्या प्रतीचे आंबे विकत घेतात.
महेश आणि शिक्षक स्वतः चांगले - चांगले आंबे निवडून ते आपल्या टोपलीत घेतात. चांगले आंबे विकत घेतल्यानंतर शिक्षक अजून फक्त एक वेगळा आंबा घेतात जो पूर्णपणे नासलेला असतो. आणि तो आंबा चांगल्या प्रतीच्या आंब्याच्या मध्ये ठेवतात.
महेशला काहीही काळत नाही की शिक्षक नासका आंबा का घेत आहेत. तो जेव्हा त्यांना विचारतो तेव्हा ते त्याला दोन दिवसांनी पुन्हा हे आंबे आपण पुन्हा बघूया. असे म्हणून ती टोपली एका बाजूला ठेवतात.
ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी महेश आणि त्याचे शिक्षक ती आब्यांची टोपली बघतात तेव्हा चांगल्या प्रतीचे सर्व आंबे नासलेले असतात. महेश काहीही कळत नाही की जर एवढे चांगले आंबे आपण घेऊन पण फक्त दोनच दिवसात ते कसे काय नासू शकतात.
त्यावर शिक्षक त्याला समजावतात की एक नासका आंबा इतर चांगल्या प्रतीच्या आंब्यांना ही नासवू शकतो. म्हणजेच वाईट संगत इतर चांगल्या मुलांना ही वाईट बनवू शकते.
महेशला आपली चूक लक्षात येते आणि तो शिक्षकांची माफी मागून पुन्हा वाईट संगतीत जाणार नाही याची त्यांना ग्वाही देतो.
संदेश एका वाईट व्यक्तिमुळे सोबती देखील वाईट - होतात,
दुसरा तात्पर्य असा
एक नासका चांगल्या आंब्यात ठेवल्याने सर्व आंबे नासतात.
1
Answer link
कामापुरता मामा, ताकापुरती आजीबाई. आणखी मराठी व्याकरण व मराठी निबंधासाठी येथे क्लिक करा किंवा भेट द्या www.sopenibandh.com
5
Answer link
ही एक म्हण आहे.
म्हण: ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी
अर्थ: एकाच गावातील लोक एकमेकांना चांगले ओळखतात.
0
Answer link
'कोणाचे उपकार घेऊ नये, घेतले तरी राहू नये' या उक्तीमध्ये खूप मोठे काव्यसौंदर्य दडलेले आहे. हे खालीलप्रमाणे:
- आत्मनिर्भरतेचा संदेश: या उक्तीतून स्वावलंबी जीवन जगण्याचा महत्त्वाचा संदेश मिळतो. आपण आपले काम स्वतःच केले पाहिजे, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये.
- कर्जमुक्त जीवन: उपकार म्हणजेच एक प्रकारचे कर्ज. त्यामुळे कोणाचे उपकार घेणे टाळावे आणि घेतलेच तर ते फेडून टाकावे, म्हणजे आपण कर्जमुक्त राहतो.
- स्वाभिमान: उपकार घेतल्याने आपला स्वाभिमान कमी होतो. त्यामुळे कोणाचे उपकार न घेणे हे आपल्या स्वाभिमानाचे रक्षण करते.
- नैतिकता: दुसऱ्यांकडून मदत घेणे सोपे असले तरी, स्वतःच्या हिमतीने काम करणे अधिक नैतिक आणि योग्य आहे.
- भावार्थ: या उक्तीचा अर्थ असा आहे की, आपण कोणावरही अवलंबून राहू नये. जर कोणाकडून मदत घ्यावी लागली, तर ती मदत लवकरच फेडून टाकावी जेणेकरून आपले मन clear राहील.