नैतिकता नीतीशास्त्र मानसिक स्वास्थ्य

एखाद्या माणसाने आपले वाईट केले असताना त्याचा बदला घेणे बरोबर आहे का?

2 उत्तरे
2 answers

एखाद्या माणसाने आपले वाईट केले असताना त्याचा बदला घेणे बरोबर आहे का?

2
अजिबात नाही, त्याने त्याचे कर्म केले आहे त्याचे फळं ही त्यालाच मिळणार मग ते चांगले असो वा वाईट , आपण नाम मात्र कारण असतो त्याच्या कर्माला पूर्णत्वाला नेण्यासाठी ठरलेलो ,

त्यामुळे असा विचार कधीच करू नये, आपल्याला काही त्रास होतं असेल किंवा दैनंदिन जीवन बिघडले असेल तर आपल्या ईष्ट देवावर विश्वास ठेवावा त्यान्ची आराधना करावी , आपला व्यवहार प्रामाणिक व बोलणे सत्य ठेवावे त्यामुळे त्याचे फळं चांगले मिळते , जरी उशीर लागला तरी ही ,

म्हणून कोणी आपले वाईट केले असताना त्याचा बदला नाही तर आपली सत्यता, भक्ती व श्रद्धा वाढ़वावी , जेणेकरून आपल्यावर येणारे संकट माघारी फिरतं ज्याने पाठवलं त्याच्याकडे हा सिद्धांत आहे नियतीचा , पण त्याआधी आपली शहानिशा केली जाते, आपण खरच त्या आलेल्या संकटाचा अधिकारी आहोत का, काही दोष आहेत का, आपलं काही चुकलं आहे का, त्या व्यक्ती बद्दल आपलं कर्म कसे आहे , काही वाईट बोल आहेत का, याचा मोजमाप होतं असताना आपल्याला त्रास होतो पण तो थोड्या काळापुरता असतो,

आपला त्रास हा आपल्या कर्मावर अवलंनबून असतो, दुसऱ्यासाठी चांगलं मागितलं तर आपलं चांगल होतं असं कायम म्हणलं जातं पण पाळलं जातं नाही आणि म्हणून चांगल्या वागणत्या माणसाला ही त्रास होतो कारण नुसते कर्म चांगले असून चालतं नाही तर त्याला जोड विचारांची व कर्तृत्वाची असावी लागते,

तेव्हा किती ही करुद्या कोणी वाईट आपले , आपण मात्र आपले चित्त उत्तम कर्मावर चं पाहिजे व्यापले कारण एक नां एक दिवस प्रचीती येते माणसाला की ते सर्व जण आता संपले 
उत्तर लिहिले · 13/4/2022
कर्म · 121765
0

एखाद्या माणसाने आपले वाईट केले असताना त्याचा बदला घेणे कितपत योग्य आहे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

बदला घेण्याचे काही पैलू:

  • नैसर्गिक भावना: जेव्हा आपल्यावर अन्याय होतो, तेव्हा राग, दुःख आणि बदला घेण्याची इच्छा निर्माण होणे स्वाभाविक आहे.
  • समाजाचा दृष्टिकोन: बदला घेणे हे सहसा नकारात्मक मानले जाते आणि कायद्याचे उल्लंघन करणारे कृत्य असू शकते.
  • धार्मिक आणि नैतिक विचार: बरेच धर्म आणि नैतिक विचारसरणी बदला घेण्याऐवजी ক্ষমা (forgiveness) आणि समजूतदारपणा शिकवतात.
  • परिणाम: बदला घेतल्याने परिस्थिती अधिक बिघडू शकते आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

बदला घेण्याऐवजी काय करावे:

  • कायदेशीर मार्ग: जर तुमच्यावर अन्याय झाला असेल, तर कायद्याच्या मार्गाने न्याय मागणे अधिक योग्य आहे.
  • संवादाने तोडगा: ज्या व्यक्तीने वाईट केले आहे, त्याच्याशी संवाद साधून समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा.
  • क्षमा करणे: क्षमा करणे कठीण असले तरी, ते आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायद्याचे असते.
  • सकारात्मक दृष्टिकोन: आपल्या जीवनातील सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि नकारात्मक गोष्टींमधून पुढे जाण्याचा प्रयत्न करा.

अखेरीस, बदला घ्यायचा की नाही हे तुमच्या वैयक्तिक परिस्थितीवर आणि मूल्यांवर अवलंबून असते. मात्र, बदला घेण्यापूर्वी त्याचे परिणाम आणि नैतिक विचार करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ कोणता येईल? तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये?
वाईट मित्राची संगत या विषयावर कथालेखन कसे कराल?
कामापुरता मामा या म्हणीचा अर्थ कोणता?
ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी या म्हणीचा अर्थ सांगा?
कोणाचे उपकार घेऊ नये, घेतले तरी राहू नये यातील काव्यसौंदर्य काय आहे?
अति तेथे माती या उक्तीचे तात्पर्य लिहा?
योग्य ची व्याख्या काय आहे?