3 उत्तरे
3
answers
ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी या म्हणीचा अर्थ सांगा?
5
Answer link
ही एक म्हण आहे.
म्हण: ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी
अर्थ: एकाच गावातील लोक एकमेकांना चांगले ओळखतात.
3
Answer link
ज्या गावच्या #बोरी त्या गावच्या #बाभळी – हि एक म्हण आहे, मात्र एक जैवविविधता पूरक संदेश आहे कसा, अनेकांना वाटत असेल कसा, समजून घेऊयात –
आपल्याकडे जुन्या म्हणी आणि त्याचे अर्थ शाळेत मर्यादितच समजावले जातात. आज आपण जरा मोठा अर्थ घेऊन विचार करूयात. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी म्हणजे एकाच अधिवासात येणारी हि दोन काटेरी झाड. दक्षिणी काटेरी वने असलेल्या वनांना, म्हणजेच या म्हणीचा असा एक अर्थ होतोय की, बोरी आणि बाभळी यांनीच हे अधिवास आजपर्यंत मजबूत ठेवले आहेत. आपल्याला जर हि बाभळीची वने वाचवायची असतील तर अधिक
बोरी आणि बाभळी करतात काय नक्की, जैवविविधता वाचविण्यासाठी......म्हणजे काय तर एकाच गावात ठकास महाठक भांडणाराला मिळतोच. जिथं बोर तिथं बाभळी नक्कीच.
बोरी व बाभूळ यांच्याशिवाय गवताळातील जैवविविधता जिवंत राहू शकत नाही, कारण अन्नसाखळी मजबूत ठेवण्यासाठी बोरी व बाभळी सारखी काटेरी झाडे अत्यंत उपयुक्त असतात. भारताच्या दक्षिणी काटेरी वनात अगदी कर्नाटका, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान असा दक्खनच्या पठारावरील भागाला गवताळ काटेरी वने म्हणतात. याला सव्हाना सारखी काटेरी गवताळ वने असेही संबोधतात. यात गवताळ परिसरात काटेरी झाडे झुडपे असतात.
बाभळीचे उपयोग : अगदी छत्रपती संभाजी राजेंनी आपल्या ग्रंथात अनेकदा बाभळीच्या झाडांचे उंबरे प्रत्येक घराला वापरले जातात म्हणून बाभळीला सुद्धा अतिशय महत्व दिलेले आहे. घराचा उंबरा बाभळीचा असला म्हणजे घर अतिशय मजबूत समजले जाते. अलीकडे या झाडाचा वापर मानव जास्त प्रमाणात माणसे जाळण्यासाठी करीत आहे. परिणामी बाभळीची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. शिवाय आजकालच्या नाटकी जगात तर माणसाला बाभूळ नकोशी झाली आहे. कारण तिला काटे असतात, मग काय, शिक्षित मुर्खांनी तिच्या ऐवजी परदेशी झाड लावली गावात, शहरात अगदी शेतीच्या बांधावर, परिणाम आपली स्थानिक जैवविविधता झपाट्याने नष्ट होत आहे. काहीजण तर म्हणतात शेती पडून राहतीय बांधावर झाड असली की, मग काय हो, आता निंब पेंड घालावी लागतेय शेतीला जिवंत ठेवण्यासाठी, खरतर बांधावरील आपली स्थानिक झाड म्हणजे जैवविविधतेचे भांडार आहे. सावली मूळे पिके वाढत नाहीत हे गैरसमज आहे, कारण देशी स्थानिक झाडांच्या सावली मुळे सुद्धा पिके वाढतात. मात्र परदेशी झाड अर्थात गुलमोहर, निलगिरी, उंदिरमारी अशी चुकीची झाडे लावल्या मुळे शेतात काय कडेला सुद्धा काहीच उगविणार नाही, हे 100 टक्के. त्यामुळे आपली बोरी बाभळी ची झाडे जास्तीत जास्त प्रमाणात लावली पाहिजेत. अहो या झाडांना पाणी दिल नाही तरी जोमाने वाढतात शिवाय जैवविविधता वाढवितात, हा काय गुन्हा आहे काय त्यांचा, की अज्ञान आहे आपलं, समजावून घ्या.
सर्व दातावरील उपाययोजना म्हणून आपल्यापेक्षा शेळ्या – मेंढ्या – हरणे बाभळीच्या शेंगा खातात. कारण त्यांना माहिती आहे कि बाभळीच्या शेंगा व फांद्या खाल्या मुळे आपले दात आयुष्यभर कधीही दात किडत नाहीत. हीच गोष्ट शिक्षित मानवाला मात्र अजिबात माहिती नाही हे नवल. मात्र अनेक दंतमंजन करणाऱ्या कंपन्या मात्र मोठ्या प्रमाणात या बाभळीच्या शेंगा गोरगरीब जनतेकडून गोळा करून घेतात, आणि बबुल पेस्ट तयार करतात. खरतर आपण अश्या बाभळीच्या शेंगा उन्हाळ्यात एकत्रित करून , सावलीत १० दिवस वाळवून, मग त्या सोलून त्यातील बिया पुन्हा निसर्गात टाकून द्याव्या, आणि सालीची कुटून पावडर करावी, हि जगातील उत्तम दंतमंजन आहे. हे १०० टक्के सांगतो कि, आपले दात कधीही कीडनार नाहीत शिवाय किडले असतील तरी सुद्धा बरे होतील. कीडनियंत्रण होऊन दात मजबूत होतील, हे नक्कीच.. अनेकजन तर हि शेंगाची पावडर कोमट पाण्यात टाकून पितात, शक्तिवर्धक आहे, त्यामुळे हाडे बळकट होतात. साधी बोर मोठ्या प्रमाणात खाल्ली तर पोटातील आजार कायमचे बरे होतात. आजही भोगी म्हणजे मकरसंक्रांतीच्या सनात बोर घालून खेगाट केले जाते. लोक खूप आवडीने खातात.
गावातील महिला तर बोरी बाभळीचे काटे आपल्या नाकात व कानात घालून , टोचलेले नाक व कानातील बिळ बुजु नये म्हणून आजही वापरतात. काट्यानेच काटा काढावा अशी म्हण सुद्धा प्रचलित आहे. हो साधी बोर आणि साधी बाभळी ची झाड वाचविणे गरजेचे आहे.
वन्यजीवांसाठी या बाभळी व बोरी अतिशय उपयुक्त आहेत, इथ मी लिहियला सुद्धा कमी पडेल इतकी हि दोन झाड किफायतशीर आहेत. निसर्गात अर्थात अन्नसाखळी मध्ये. माळरानात फिरताना रातकिडा किर्रर्र आवाज काढून आपल लक्ष वेधून घेत असतो. आपण जसजस बाभळी व बोरीचा जवळ जाऊ तसा अचानक आवाज बंद होतो, आपल्याला वाटत आपल्याला रातकिडे घाबरले पन विचार संपतोय तोपर्यंत पुन्हा किर्रर्र आवाज सुरूच. आपण अगदी त्या आवाजाच्या जवळ पोचलेलो असतो मात्र रातकिडा काही केल्याने दिसत नाही. अगदी १० लोकांमध्ये एकालाच दर्शन मिळते. खरतर इतक साधर्म्य असते कि बाभूळ त्याला आपल्या कुशीत लपवत असते कि काय. मात्र त्याचा बाह्य रंग व बाभळीची साल याचं रंगरूप जवळपास एकच झालेले दिसून येत. मोळीकिडा तर आपल्याला लहानपणापासून परिचित असतो. काटे एकत्रित करून गोल करतात मात्र हे कस, हे कोड लवकर सुटत नाही, मात्र हा किडा त्याची आळी अवस्था या गोल काटेरी झुंबरात पूर्ण करतात आणि मग हा कीटक आपले पुढील आयुष्य निसर्गात घालवतो. हा मोळीकिडा फक्त या बाभळीच्या काट्यानेच आपले घर तयार करू शकतो. अनेक कोळीकीटक आपल घर याच बाभळीच्या फांद्यावर बांधतात. आपल सार जीवन याच बाभळीवर पूर्ण करतात. बहुतांश माळरानातील कीटकांची दुनियादारी याच बाभळीवर आपला जीवनक्रम सुरु करतात व शेवटही...
बोरी- बाभळीची फौज : हो, हो, फौजफाटा अहो फक्त मानवाला अक्कल आहे अस आपल्याला वाटतय. मात्र निसर्गात अनेक झाड आपली फौज पाळतात. अनेक कीटकांना बदल्यात अनेक गोष्टी झाडांना मोफत द्याव्या सुद्धा लागतात बर का.
आपण बारकाईने हि झाड पहिली तर दिसेल कि, अनेक मुंग्या- मुंगळे अश्या झाडांवर गस्त घालत फिरत असतात. हि गस्त घालताना अगदी बाभळीच्या बुडक्यातून ते शेंड्यापर्यंत गस्त घालावी लागते. गस्त घालताना झाडवर एखाद्या प्राण्याने जर झाडाला घासायला सुरुवात केली तर हि फौज घासणार्या प्राण्यांच्या अंगावर तुटून पडते, तो प्राणी कितीहि मोठा असला तरी त्याला पळ काढण्याशिवाय पर्याय नसतो. कारण अनेक सैनिक चावे घेत असतात. या बदल्यात झाड त्यांना आपल्या शरिरातील गोडसर स्त्राव खाण्यासाठी देत असतात. मग काय फौज २४ तसं सावधान असते, झाडाच्या प्रत्येक फांदीवर, हे विशेष.
अहो जर अशी फौज वाढली तरी, झाड काळजी करीत नाही. कारण या फोजेला खायला सुद्धा सरडा तयार असतोच. इथ सुद्धा प्रत्येक सरड्याची एक बाभूळ असते, अगदी त्याचा मालकी हक्कच म्हणा कि. कारण प्रत्येक नर सरड्याला एक बाभूळ किंवा बोर नसेल तर मग मिलन करणे अवघड असते. कारण प्रत्येक नराला झाडावरून आपला सुंदर चेहरा जमिनीवरील मादीला दाखवायचा असतो. आणि यासाठी त्याला एक मजबूत घर असावे लागते, म्हणून नर आपल्या बाभळीकडे दुसर्या सरड्याला डोकवू सुद्धा देत नाहीत, हे साम्राज्य युद्ध आहे. मग सरडा जास्त झालेली फौज हळूहळू संपवत असतो. म्हणजे अन्नसाखळी मजबूत होताना आपल्याला दिसून येईल. आपण सहजपणे म्हणतो, काय सरड्यासारखा ताठू नकोस, मरशील लेका. अहो असेच सरडे मादीला आकर्षित करताना रोडजवळ येतात, बाभूळ नसेल तर मग हा संघर्ष जमिनीवर सुरु होतो, एकमेकांना धमकी देण्याचा, आणि मग भरधाव वेगाने आपली वाहन अश्या हजारो मिलनासाठी उस्तुक असणार्या सरड्याना वाहनाखाली चिरडतात. म्हणून परिसरात बाभळी बोरी असणे आवश्यक आहे.
सहजीवन ते पण चिंकारा हरीण व बोरी बाभळीचे.. आता आपण विचार करूयात की बोरी व बाभळी मुळे चिंकारा सारखी हरणे जिवंत आहेत, बर्याच लोकांना याबद्दल माहिती सुद्धा नसेल कि, जर बोरी व बाभळी नसतील तर चिंकारा हरणे सुद्धा जिवंत राहणार नाहीत. त्याच अस आहे कि, हि हरणे ७० टक्के झाडांचा पाला ओरबडून खातात. यात बोरी व बाभळीची पाने ओरबडून खातात, शिवाय शेंगा व बोर सुद्धा मोठ्या प्रमाणात खात असतात. आपण जर माळरानात भटकत असाल तर लगेच लक्षात येईल कि, सर्वच माळरानातील बोरी बाभळीची उंची हि चिंकारा हरणांच्या उंची पेक्षा फुटभर सुद्धा जास्त नसते, यालाच तर खुरटी बाभळीची वने म्हणतात. या भागात बोरी व बाभळी उंचीला खुरट्या असतात, कारण चिंकारा जेवढा उंच तेवढीच बाभळ बोर उंच. अहो उन्हाळ्यात तर चिंकारा बोर खूप आवडीने खातात, मग भराभर बोर खातात, न चावताच, नंतर रवंथ करताना पुन्हा पोटातून गिळलेलि बोर काढून त्यातील गर खाल्ला जातो आणि आटोळ्या एकत्रितपणे साठवल्या जातात, अर्थात त्याचे छोटे छोटे ढीग तयार होतात. याचा वापर पुन्हा खाद्य कमी पडू लागले कि खायला करतात. अश्यावेळी त्या आटोळ्यामधील आतला मऊ गर खातात. तसेच यातील काही आटोळ्याना केसाच्या आकाराचा तडा जातो, आणि अश्या आटोळ्या पावसाळ्यात रुजातात, आणि बोरीची झाडे निर्माण होतात. शिवाय बाभळीच्या शेंगा खाऊन त्यांच्या विष्टेतून खाली पडतात, आणि रुजतात. तसेच बाभळीचा पाला व शेंगा खाताना खाली पडतात त्याही रुजतात. अहो यालाच तर सहजीवन म्हणतात, बाकी काय. आणि उन्हाळ्यात चिंकारा पाणी म्हणून माकडशिंगी सारख्या छोट्या निवडुंग कुळातील वनस्पती खातात, आणि आपली तहान भागवितात. दररोज पाणी पिण्याची चिंकाराना गरज नसते. अगदी ४० दिवसापर्यंत सुद्धा.
आदरणीय मारुती चितमपल्ली यांनी तर बाभळी विषयी खूप माहिती जगाला दिली आहे. माझे गुरु असल्यामुळे तर माझा ( डॉ महेश गायकवाड) लेखच पूर्ण होऊ शकत नाही, कारण चितमपल्ली सर म्हणजे ‘’ असामान्य निसर्ग तज्ञ ’’. बाभळ व बोर यांची बारकाईने निरीक्षणे घेतल्यास लक्षात येईल कि, खालील फांद्यांना काटे खूप टोकदार असतात. कारण स्व स्वरक्षण करणेसाठी अत्यंत महत्वाचे. शिवाय खोडाचा रंग काळसर कारण उष्णतेमुळे जास्त बाष्पीभवन होऊ नये. अहो इथ अंगावर काटे आहेत ते संरक्षण करणेसाठी असे आपल्याला वाटत असेल, मात्र अजूनही बरेच काही यात लपले आहे. काटे अर्थात जल नियोजन, अहो पूर्व इतिहास पाहता, काटेरी वनामध्ये अगदी १० वर्षे सुद्धा सातत्याने दुष्काळ या बोरी बाभळीनि अनुभवला आहे. मग पाण्याचे नियोजन करायचे असल्यास हे काटे मदत करतात. काटे आतून पोकळ असतात, हे काटे रात्री – पहाटेच्यावेळी पडणारे दवबिंदू साठवून सर्व फांद्यांना पुरवितात. त्यामुळे कसल्याही दुष्काळाचा सामना सहजपणे बोरी बाभळी करतात. बोरी ला मोहोर येतो त्यावेळी तर तिच्या भोवती उभे राहण्याची हिम्मत होणार नाही, कारण एक उग्र ऍसिड सारखा वास त्या फुलाभोवती हे झाड निर्माण करते, अगदी एक रसायन तयार करून आपला मोहर सांभाळतात. बाभळीची फुले खूप सुंदर दिसतात, यावर अनेक मधमाश्या आपला मोर्चा वळवितात. बोरीच्या मोहरावर सुद्धा अनेक मधमाश्या व छोटे कीटक आपला मोर्चा वळवितात. बोरी बाभळी वर मधमाश्या मोठ्या प्रमाणात पोळी बांधतात. हे अतिशय महत्वाचे आहे. शेतीच्या दृष्टीने शेतीच्या बांधावर बोरी बाभळी असणे नितांत गरजेचे आहे. हि बाब जर वेळीच आपल्या सर्वांच्या लक्षात येणे गरजेचे आहे. अनेकजण बांधावरील बोरी बाभळी तोडून टाकतात आणि परदेशी झाड लावतात, मात्र असे करणे म्हणजे फक्त मूर्खपणाचा कळस, एवढेच मी म्हणेल. कारण गवताळ भागातील जीवसृष्टीच्या सुरुवातीपासून बोर बाभूळ हि झाड अत्यंत महत्वाची आहेत, हे विसरून चालणार नाही. डाळींब पिक करणार्यांनी तर शेतीच्या परिसरात स्वतच्या प्रति १ एकरात बांधावर अगदी १० बोरी व १० बाभळी झाडे लावली तरच डाळींब करावे नाहीतर काहीच उपयोग होणार नाही. आपल्याकडील छोटी मधमाश्यांची पोळी हि नेहमी अश्या काटेरी झाडांवर पोळी करतात. म्हणून नैसर्गिक झाडे ठेवणे आवश्यक आहे.
पक्षी जगासाठी तर हि बोर व बाभूळ झाड म्हणजे बहुगुणीच. अनेक पक्षी घरटी बांधण्यासाठी बोरी बाभळीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. अहो सुगरण पक्षी तर आपला खोपा अश्या झाडांवर बांधायला नेहमीच अग्रेसर असते. तिला बोरी बाभळीची झाडे खूप आवडतात, मात्र माणसाला नाही, बर का. सुगरण सर्वाना आवडते मग बाभळ का नको. आपल्या शेतीच्या कडेने पक्षी थांबे करणे नितांत आवश्यक आहे. अन्यथा कीडनियंत्रणासाठी फक्त विषारी रासायनिक औषध वापरली जातील आणि माणूस ही विषारी होऊन मृत्यू कडे वाटचाल करेल. आपल पर्यावरण प्रेम म्हणजे फक्त नाटक असेल तर आजचा कोरोना आजार तरी कुठ वाईट आहे मग. कारण जगात अधिवास नष्ट झाले कि तिथले जीव नष्ट होतात, आणि जिथ जैवविविधता जास्त असते तिथ रोगराई कमी असते. हे आता आपल्याला शिकायला हवे आहे. आज भूतान सारख्या देश्यात फक्त ५ लोकांना कोरोना झालेला असून, हा आजार तिथ जास्त पसरलेला नाही, कारण निसर्ग अर्थात जैवविविधता सर्व जगात जास्त आहे तिथ.
अहो कोतवाल, खाटिक, पावश्या, सातभाई, सूर्यपक्षी, मुनिया, चिमण्या असे नानविध पक्षी या बोरी बाभळी वर घरटी बांधतात. हि घरटी लांबून पाहताना खूप आंनद वाटतो. आता पावश्या ओरडत होता मी लेख लिहताना, अहो त्याच्या आवाजने मी चकित झालो, मला लक्षात आले कि, त्याचे काटेरी घरटे सुद्धा बाभळीच्या झाडावरच असते. हे यात नमूद करावे असे तर वाटले नसेल ना त्याला.
बाभळीच्या झाडावर खारुताई घरटे करीत असते. शिवाय तिला राह्नेसाठी बाभळी आवश्यक आहेत. शिकारी पक्षाकडून तिला बाभळी मुळे संरक्षण मिळत असते.
अहो कोल्हा व खोकड, बोर आणि बाभूळ झाडाखाली विश्राती घेत असतो. शिवाय बोरही मोठ्या प्रमाणात खात असतो. कोल्हा सुद्धा बोरीची झाड लावायला मदत करीत असतो.
सश्याच रिंगण तर बोरीच्या झाडाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, कारण गवताळ भागात ओढ्यालगत पसरी बोराची झाड असतात. अहो उंची फक्त ३ फुट एवढीच असते. ससा या बोरीच्या कडेने वाढणार्या गवतात आपले रिंगण तयार करतात आणि पिल्लांना जन्म देतात. काहीजण तर आजही म्हणतात भारतीय ससा बिळात राहतो. पण लक्षात घ्या कि, भारतीय ससा बिळात राहत नाही. ती बहुतांश बिळे घोरपडीने केलेली असतात. त्यामुळे गवताळ भागात जलसंधारण होते.
भविष्यात आपली पिढी टिकावी वाटत असेल तर स्थानिक पातळीवर जैवविविधता वाचली पाहिजे म्हणजेच दक्खनच्या पठारावर बोरी बाभळी वाचल्या पाहिजेत, नाहीतर विनाशाकडे वाटचाल सुरूच आहे
0
Answer link
म्हण: ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी
अर्थ: माणसे जेथे राहतात, तेथील परिस्थितीशी जुळवून घेतात. म्हणजेच, ज्या ठिकाणी एखादी व्यक्ती राहते, तेथील चांगले-वाईट गोष्टी स्वीकारून ती आपले जीवन जगते.
उदाहरण: रमेश शहरातून एका लहान गावात राहायला गेला. सुरुवातीला त्याला खूप अडचणी आल्या, पण हळूहळू तो तेथील जीवनशैलीशी जुळवून घेतला. यालाच म्हणतात, 'ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी'.