शरीर आयुर्वेद आरोग्य

शरीरात वात कशामुळे होतो? वात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? शरीरातील वात नाहीसा करण्यासाठी आयुर्वेदिक औषध कोणते आहे? (ॲलोपथीच्या औषधांचे साईड इफेक्ट्स असतात म्हणून आयुर्वेदिक औषध विचारले)

2 उत्तरे
2 answers

शरीरात वात कशामुळे होतो? वात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? शरीरातील वात नाहीसा करण्यासाठी आयुर्वेदिक औषध कोणते आहे? (ॲलोपथीच्या औषधांचे साईड इफेक्ट्स असतात म्हणून आयुर्वेदिक औषध विचारले)

7
वायू म्हणजे वात.. अकारण चिंता करणे, अति काळजी घेणे, जेवणानंतर घटाघटा पाणी पिणे किंवा लगेच चालणे, व्यायाम करणे, शरीराला कितीही पूरक पदार्थ असले तरीही त्यांचे अति सेवन करणे.. या मुळे वायूदोष निर्माण होते.. अर्थात वात होते.. काहींना आनुवंशिक आजार असतात, त्यामुळे ही रोग होतात..
प्रतिमा स्रोत :https://images.app.goo.gl/DYzrfJR24wPMhP3c8 

यावर उपाय बरेच आहेत.. पण ते तात्पुरती आराम देऊ शकतात.. जसे, हलका हलका व्यायाम करणे.. राईच्या तेलाने मालीश करणे, मुळा, गाजर यांसारखे पौष्टिक पदार्थ खावेत पण प्रमाणात.. अतिसेवनाने वायूदोष होतो.. 
आयुर्वेदिक औषध हे आयुर्वेदिक दुकानात मिळत असले तरीही चिकित्सक/तज्ज्ञांच्या मदतीनेच घेणे आवश्यक आहे.. 
उदा. तांबा हा धातू शरीरासाठी उपयुक्त आहे.. पण ते प्रत्येकासाठी उपयुक्त नसते.. याचे खुद्द मीच स्वतः उदाहरण आहे.. म्हणजे, मला तांब्याची अंगठी देखील घातली गेली तर बोटाचा अंगठी घातलेला भाग असह्य वेदना देतो.. मी तांब्यातील भांड्याचे पाणी प्यायल्यावर माझ्या पोटात दुखते.., हे खरे आहे.. मला तांबा उपयुक्त ठरत नाही, उलट दुष्परिणाम दिसून येतात.. 
प्रतिमा स्रोत :https://images.app.goo.gl/XPsFtMsNxpUgetud9

म्हणून आयुर्वेदिक हे नैसर्गिक घटकांनी बनविले असते.. प्रत्येक गोष्ट शरीरावर चांगलेच परिणाम दाखवेल असे नसते.. जे काही औषध घ्याल ते कृपया तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यावेत..

बाह्यदुवे(एकदा बेसिक माहितीसाठी वाचून घ्यावी)https://www.artofliving.org/in-mr/ayurveda/what-is-ayurveda/dosha-imbalance

उत्तर लिहिले · 18/12/2020
कर्म · 458560
0

तुमच्या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे:

शरीरात वात होण्याची कारणे:
  • आहार: वातूळ पदार्थ जास्त खाणे, जसे की वाटाणा, चणा, मसूर, वांगी, कोबी, ফুলकोबी आणि शिळे अन्न.
  • जीवनशैली: अनियमित जेवण, जागरण, चिंता, आणि जास्त ताण घेणे.
  • शारीरिक हालचाल: बैठे काम करणे किंवा शारीरिक हालचाल कमी असणे.
  • हवामान: थंड हवामान आणि कोरडे वातावरण.
  • शरीरातील नैसर्गिक क्रिया: वृद्धत्व आणि काही शारीरिक बदल.
वात होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी:
  • आहार: ताजे आणि गरम अन्न खा. वातूळ पदार्थ टाळा. आहारात आले, लसूण, हिंग यांचा वापर करा.
  • जीवनशैली: नियमित जेवण करा. पुरेशी झोप घ्या. ताण कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा.
  • शारीरिक हालचाल: नियमित व्यायाम करा.
  • हवामान: थंड हवामानात शरीर उबदार ठेवा.
शरीरातील वात नाहीसा करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे:

आयुर्वेदात वात कमी करण्यासाठी अनेक औषधे आहेत, परंतु खाली काही सामान्य औषधे दिली आहेत:

टीप: कोणतीही औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1640

Related Questions

महिला पाळी आल्यावर कशाचा उपयोग करतात?
वजन वाढवण्यासाठी उपाय व वय ३८ वर्ष?
आहाराव्यतिरिक्त प्रथिने मिळवण्यासाठी काही सप्लिमेंट्स आहेत का?
डाएट प्लॅन कसा करायचा?
लहान बाळाला लस टोचल्यावर सूज येते का?
सर्दीसाठी बेस्ट टॅबलेट कोणती आहे?
लघवी आणि योनी एकच असतात का?