2 उत्तरे
2 answers

कोरोना होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी?

2
रोगाचा प्रसार रोखण्यासाठीचे धोरण म्हणुन वारंवार साबणाने व्यवस्थित(कमीतकमी २० सेकंद) हात धुणे, इतरांशी शारीरिक अंतर राखणे (विशेषत: लक्षणे असणार्‍या लोकांकडून), खोकताना किंवा शिंगताना रुमलाचा वापर करणे. अचानक शिंक आली असताना व रुमाल जवळ नसल्यास कोपर्याने हाताची घडी घालुन खाकेच्या दिशेने आतील बाजुस शिंकणे. न धुतलेले हात चेहऱ्या पासून दूर ठेवणे या उपायांचा वापर केल्यास विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होते.

सामाजिक शारीरिक अंतर हा कोरोनाव्हायरस सारख्या अति संक्रामक रोगाचा प्रसार रोखण्याच्या उपायांपैकी सर्वात महत्वाचा विषय आहे. निदान न झालेल्या पण संक्रमित असलेल्या अशा व्यक्तींच्या मार्फत समाजात होणारे संभाव्य संक्रमण रोखण्यासाठी या उपायाचा फार फायदा होतो. शाळा आणि कामाची ठिकाणे बंद करून, प्रवासावर प्रतिबंध घालून आणि सार्वजनिक मेळावे रद्द करून संभाव्य संक्रमित व्यक्तींचा इतरांशी संपर्क कमी करण्यामागचा उद्देश असतो. दोन व्यक्तिं मधील अंतराच्या मार्गदर्शकतत्त्वांप्रमाणे कमीतकमी ६ फूट (१.८ मीटर) अंतर राखणे आवश्यक आहे. बर्‍याच देशांनी शिफारस केली आहे की निरोगी व्यक्तींनी देखील जनतेत जाताना मास्क किंवा स्कार्फचा वापर करावा.

हा विषाणू एखाद्या पृष्ठभागावर काही तासांपासुन काही दिवसांपर्यन्त जिवंत राहु शकतो. विशेषतः कागदी पुठ्यावर एका दिवसासाठी, प्लास्टिक (पॉलीप्रॉपिलिन) तसेच स्टेनलेस स्टील (एआयएसआय ३०४) वर तीन दिवस आणि शुद्ध तांब्याच्या वस्तुंवर चार तासांपर्यंत राहु शकतो परंतु हा काळ आर्द्रता आणि तापमानानुसार बदलतो.

या विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंधित करण्यासाठी ७८ ते ९५ % शुद्ध इथेनॉल, ७० ते १०० % प्रोपेनॉल २ (आयसोप्रोपिल अल्कोहोल), १-प्रोपेनॉल ३० % व २-प्रोपेनॉलचे 45% याचे मिश्रण, ०.२१ % सोडियम हायपोक्लोराइट (ब्लीच), ०.५ % हायड्रोजन पेरोक्साइड, ०.२३ -७.५ % पोविडोन-आयोडीन या विविध रसयनांचा वापर करता येवु शकतो. योग्य प्रकारे वापरल्यास साबण आणि डिटर्जंट देखील प्रभावी आहेत. साबणने व्हायरसच्या फॅटी प्रोटेक्टिव्ह लेयरची विटंबना होते त्यामुळे विषाणू निष्क्रिय होतात. बेंझलकोनिअम क्लोराईड आणि क्लोरहेक्साइडिन ग्लुकोनेट यासारखी सर्जिकल जंतुनाशके ही कमी प्रभावी आहेत.

या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील नियम व संकेतांचे पालन करा

सर्वात महत्वाचे,Prevention is better than cure.अर्थात फिजिकल डिस्टनस पाळा.
तोच सर्वात प्रभावी मार्ग आहे हे आतातरी समजून घ्या.
प्रत्येक वेळी हात sanitiser ने किंवा साबणाने स्वच्छ धुवा.खूप अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा.
बाहेरुन आल्यावर अवश्य आंघोळ करा.
शक्यतो बाहेरचे पदार्थ आणु नका.
भाजीपाला आणला तर तो मिठ टाकुन किमान 2-3 वेळा धुऊन वापरा.
जिल्ह्याच्या सर्व सीमा कडकपणे सील करा.
कुणी त्यात अडथळा आणत असेल तर प्रशासनाला कळवा.प्रशासनाने परवानगी घेऊनही कुणी सिमेच्या आत येत असेल किंवा बाहेर जात असेल तर त्याची सर्वप्रथम कोरोना टेस्ट करुनच पुढे जाऊ द्यावे.त्यासाठी जमल्यास सिमेवरच तपासणी करता येईल का? त्यासाठी प्रयत्न करावेत.
प्रशासन रुग्णांची माहिती देते.त्यामुळे वृत्तपत्रे,वाहिन्या ,त्यांचे प्रतिनिधी वगळता इतरांनी माहिती देऊ नका.त्यामुळे वातावरण अजून तंग होते.
आपल्या घरात ह्या विषयावर अजिबात चर्चा करु नका.अशी संकटे खूप येतात आणि नक्किच जातात अशीच चर्चा ठेवा.
शक्य असेल तर किराणा,गरजेचीऔषधी जास्त प्रमाणात आणुन ठेवा.पेट्रोल एकदाच भरा.
आपले घर आणि परिसरात रोज सफाई करा.कचरा रोज जाळा.
आपल्या नगरात नियमीत फवारणी करण्याचा आग्रह धरा.
प्रशासनाने योग्य नियोजन करुन आणि विक्रेत्यांना सम्पर्क करुन प्रमाणित विक्री प्रतिनिधिमार्फत प्रत्येक नगरात किराणा,भाजीपाला ,औषधी ,बेकरी सामान ,दुध आदी अत्यावश्यक सेवा पैसे घेउन पुरवले तर बाहेरची मोठी गर्दी टळेल.
असंख्य नागरिक सर्व नियम पाळत असताना अनेक हौसे रोडवर हुल्लडबाजी करित आहेत.दोनपेक्षा अधिकजण दुचाकीवर असले की त्वरित कारवाई करा.संध्याकाळ झाली की असंख्य व्यक्ती एकत्र येऊन डिस्टंस न पाळता जमाव करुन गप्पा मारीत आहेत.तसे करु नका.
सर्वात महत्वाचे: आरोग्य विभागाला पूर्ण संरक्षण देऊन आता तरी घरोघर तपासणी करा.
हे खूप गरजेचे आहे.त्यातून रुग्ण सर्वे होइल आणि असल्यास रुग्ण सापडतील.
नियम पाळा आणि संकट टाळा!
कोरोना* रोग लवकर नष्ट होईल असे वाटत नाही ,तथापी आपल्याला काम हे *करावेच* लागणार आहे .
दैनंदिन जीवनामध्ये आपला रोज अनेक लोकांशी संपर्क येतो त्यामुळे यापुढे किमान १ वर्ष खालीलप्रमाणे *काळजी* घेणे अत्यंत आवश्यक झालेले आहे .
जितका वेळ शक्य असेल तितका वेळ सार्वजनिक शौचालये वापरु नयेत.
आपल्याकडे येणाऱ्या सर्व लोकांना त्यांच्या चपला बूट बाहेर काढण्यास सांगावे .
ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सॅनिटायझर ने हात स्वच्छ करण्यास सांगावे .
चलनी नोटा न हाताळता आपल्याला येणे असलेली रक्कम चेकने अथवा ई पेमेंटने स्वीकारावी .
आपले मित्र तसेच नातरवाईक व सहकारी यांचे दरम्यान 4 फूट अंतर कायमस्वरूपी राखावे .
काम संपल्यानंतर लवकरात लवकर आपल्या घरी जावे व हातपाय धुवावे कपडे धुण्यास टाकावे वा स्वत: धुवावेत.
कोणाशीही भेट घेऊ नका व कोणालाही भेटु नका.
अगदी जवळच्या कुटुंबाचीही भेट घेऊ नका.
अगदी बाजूच्या शेजाऱ्याचीही भेट घेऊ नका.
बिल्डिंग च्या कॉमन ग्यालरीत मध्ये सहज देखील जमा होऊ नका.
बिना मास्क कॉमन ग्यालरीत येऊ नका.
बिल्डिंग ची कॉमन मीटिंग आयोजित करू नका.
कागदपत्रे हाताळताना, वाचताना, पान पलटताना थुंकी लावू नये .
अगदी गरजेच्या वेळेस ऑफिसमध्ये अथवा पार्किंग मध्ये उपस्थित राहून भेटावे
अनेक क्लायंट वा मित्र यांना फोन जोडून देऊन या फोनवर बोला असे म्हणायची सवय असते शक्यतो असा प्रकार अजिबात करू नये फक्त *स्वतःचाच* मोबाईल फोन वापरावा .
आपल्याला भेट देणाऱ्या व्यक्तीने *मास्क* घातला नसेल तर त्याच्याशी संभाषण करण्यास *स्पष्ट* नकार द्यावा .
अनेक वेळा गडबडीत आपण थुंकी लावून नोटा मोजतो ते पूर्णपणे टाळावे, रस्त्यावर थुंकु अगर पिंचकारी मारू नका .
अगदी बिल्डिंग मधील ग्यालरी व जिने पाण्याने धुण्यासाठीही एकत्र येऊ नका, ( सध्या बिल्डिंगची ग्यालरी व जिने पाण्याने धुण्याचे फ्याड कित्येकदा जनजागृती करूनही काही बिल्डिंग मध्ये अजूनही पाहायला मिळतंय, आपल्या कुटुंबियांना विशेषतः महिला वर्गाला सतर्क करा की पाण्याने ग्यालरी व जिने धुवून कोरोना जाणार नाही उलट तो तुमच्या घरात तुमच्या ओल्या पायाने, ओल्या हाताने, वापरलेल्या झाडुतून, बिल्डिंग मध्ये जिने धुत असताना जो लोकसंपर्क आला त्यातून तो तुमच्या घरात प्रवेश करतो ) कारण आपला शेजारीच जर उद्या कोरोना पेशंट निघाला तर त्याच्या संपर्कात आल्याने आपण आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव देखील धोक्यात घालत असतो.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ,कापलेली फळे खाणे कायमस्वरूपी टाळावेत. घरातील भाजीपाला,फळे मीठाच्या पाण्यात १/२ तास भिजत ठेवावा
जुनी कागदपत्रे हाताळताना हॅण्डग्लोव्हज वापरा जास्तीत जास्त काळजी घ्यावी.
परगांवा वरून येणाऱ्या लोकांची मित्रांची सहकार्याची नातेवाईक यांची संपूर्ण माहिती फोनवरून घ्यावी व तो आला असेल अंतर ठेवावे .
शासनाकडून गेले २महिना ज्या सूचना सुरू आहेत जसे साबणाने हात धुणे या सूचनांचा अंमल कायमपणे सुरू ठेवावा .
*शेकहॅण्ड* पूर्णपणे टाळावेत व आपली परंपरागत नमस्काराची पद्धत अवलंब करावी
उत्तर लिहिले · 11/10/2020
कर्म · 6750
0

कोरोना (COVID-19) होऊ नये म्हणून आपण खालील गोष्टी करू शकतो:

  • मास्क वापरा: घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावा. (CDC)
  • शारीरिक अंतर: लोकांमध्ये किमान 6 फूट अंतर ठेवा. (CDC)
  • हात धुवा: वारंवार आपले हात साबणाने आणि पाण्याने धुवा. (CDC)
  • सॅनिटायझर वापरा: अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरचा वापर करा.
  • गर्दी टाळा: जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
  • लसीकरण: कोविड-19 ची लस घ्या. (CDC)
  • आजारी असल्यास घरी राहा: जर तुम्हाला ताप, सर्दी, किंवा खोकला असेल, तर घरीच आराम करा.
  • चांगला आहार घ्या: संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.
  • पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.

या उपायांमुळे तुम्ही कोरोनापासून सुरक्षित राहू शकता.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1620

Related Questions

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तुम्ही काय उपाय कराल?
कोरोनावर लॉकडाऊन हाच उपाय आहे?
गरम पाणी न पिता गळ्यातून कोरोना व्हायरस नष्ट होऊन जाईल असा कोणता उपाय आहे? कारण एक दिवसापर्यंत कोरोना गळ्यात राहतो, नंतर छातीत जातो?
कोरोनाबद्दल घ्यायची काळजी?
क्वारंटाईन म्हणजे काय?
आयसोलेशन म्हणजे काय? क्वारंटाईन व विलगीकरण मधील फरक काय आहे?
होमक्वारंटाइन म्हणजे काय?