Topic icon

रोगप्रतिबंधक उपाय

0

करोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी मी खालील उपाय करेन:

  1. मास्कचा वापर:

    सार्वजनिक ठिकाणी असताना नेहमी मास्कचा वापर करणे.
    (CDC Guidelines)

  2. सामाजिक अंतर (Social Distancing):

    किमान 6 फूट (2 मीटर) लोकांमध्ये अंतर ठेवणे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे.

  3. हातांची स्वच्छता:

    नियमितपणे आपले हात साबणाने आणि पाण्याने धुणे किंवा अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरचा वापर करणे.

  4. लसीकरण (Vaccination):

    कोविड-19 (Covid-19) विरुद्ध लस घेणे.
    (WHO Guidelines)

  5. चाचणी आणि अलग ठेवणे (Testing and Isolation):

    जर तुम्हाला करोनाची लक्षणे दिसत असतील, तर त्वरित चाचणी करून घेणे आणि स्वतःला इतरांपासून अलग ठेवणे.

  6. घरातील स्वच्छता:

    सतत स्पर्श होणाऱ्या वस्तू व जागा नियमितपणे जंतुनाशकाने (Disinfectant) पुसून घेणे.

  7. प्रवासावर निर्बंध:

    आवश्यक नसल्यास प्रवास टाळणे.

  8. जागरूकता:

    कोविड-19 (Covid-19) विषयी योग्य माहिती आणि जागरूकता पसरवणे.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1620
0

कोरोनावर लॉकडाऊन हा एकमेव उपाय नाही, पण तो एक महत्त्वाचा उपाय आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रसार कमी होतो, कारण लोक एकमेकांच्या संपर्कात कमी येतात.

लॉकडाऊनचे फायदे:

  • संसर्ग कमी होतो: लॉकडाऊनमुळे लोकांची गर्दी टाळता येते आणि त्यामुळे संसर्ग कमी होतो.
  • आरोग्य सेवांवरचा ताण कमी होतो: रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे आरोग्य सेवांवरचा ताण कमी होतो आणि जास्त गंभीर रुग्णांवर लक्ष केंद्रित करता येते.
  • तयारीसाठी वेळ मिळतो: लॉकडाऊनच्या काळात आरोग्य यंत्रणा आणि सरकारला वैद्यकीय सुविधा वाढवण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी वेळ मिळतो.

इतर उपाय:

  • मास्क वापरणे: मास्क वापरल्याने श्वासाद्वारे होणारा संसर्ग कमी होतो.
  • सामाजिक अंतर (Social Distancing): लोकांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे.
  • लसीकरण: जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे हा कोरोनावर मात करण्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे. कोविन (CoWIN)
  • स्वच्छता: हाथ स्वच्छ ठेवणे आणि वेळोवेळी सॅनिटायझर वापरणे.
  • चाचणी आणि ट्रेसिंग: जास्तीत जास्त लोकांची चाचणी करणे आणि संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे.

त्यामुळे, लॉकडाऊन हा एक प्रभावी उपाय असला तरी, तो एकमेव उपाय नाही. इतर उपायांचा योग्य वापर करणे देखील खूप महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1620
2
रोगाचा प्रसार रोखण्यासाठीचे धोरण म्हणुन वारंवार साबणाने व्यवस्थित(कमीतकमी २० सेकंद) हात धुणे, इतरांशी शारीरिक अंतर राखणे (विशेषत: लक्षणे असणार्‍या लोकांकडून), खोकताना किंवा शिंगताना रुमलाचा वापर करणे. अचानक शिंक आली असताना व रुमाल जवळ नसल्यास कोपर्याने हाताची घडी घालुन खाकेच्या दिशेने आतील बाजुस शिंकणे. न धुतलेले हात चेहऱ्या पासून दूर ठेवणे या उपायांचा वापर केल्यास विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होते.

सामाजिक शारीरिक अंतर हा कोरोनाव्हायरस सारख्या अति संक्रामक रोगाचा प्रसार रोखण्याच्या उपायांपैकी सर्वात महत्वाचा विषय आहे. निदान न झालेल्या पण संक्रमित असलेल्या अशा व्यक्तींच्या मार्फत समाजात होणारे संभाव्य संक्रमण रोखण्यासाठी या उपायाचा फार फायदा होतो. शाळा आणि कामाची ठिकाणे बंद करून, प्रवासावर प्रतिबंध घालून आणि सार्वजनिक मेळावे रद्द करून संभाव्य संक्रमित व्यक्तींचा इतरांशी संपर्क कमी करण्यामागचा उद्देश असतो. दोन व्यक्तिं मधील अंतराच्या मार्गदर्शकतत्त्वांप्रमाणे कमीतकमी ६ फूट (१.८ मीटर) अंतर राखणे आवश्यक आहे. बर्‍याच देशांनी शिफारस केली आहे की निरोगी व्यक्तींनी देखील जनतेत जाताना मास्क किंवा स्कार्फचा वापर करावा.

हा विषाणू एखाद्या पृष्ठभागावर काही तासांपासुन काही दिवसांपर्यन्त जिवंत राहु शकतो. विशेषतः कागदी पुठ्यावर एका दिवसासाठी, प्लास्टिक (पॉलीप्रॉपिलिन) तसेच स्टेनलेस स्टील (एआयएसआय ३०४) वर तीन दिवस आणि शुद्ध तांब्याच्या वस्तुंवर चार तासांपर्यंत राहु शकतो परंतु हा काळ आर्द्रता आणि तापमानानुसार बदलतो.

या विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंधित करण्यासाठी ७८ ते ९५ % शुद्ध इथेनॉल, ७० ते १०० % प्रोपेनॉल २ (आयसोप्रोपिल अल्कोहोल), १-प्रोपेनॉल ३० % व २-प्रोपेनॉलचे 45% याचे मिश्रण, ०.२१ % सोडियम हायपोक्लोराइट (ब्लीच), ०.५ % हायड्रोजन पेरोक्साइड, ०.२३ -७.५ % पोविडोन-आयोडीन या विविध रसयनांचा वापर करता येवु शकतो. योग्य प्रकारे वापरल्यास साबण आणि डिटर्जंट देखील प्रभावी आहेत. साबणने व्हायरसच्या फॅटी प्रोटेक्टिव्ह लेयरची विटंबना होते त्यामुळे विषाणू निष्क्रिय होतात. बेंझलकोनिअम क्लोराईड आणि क्लोरहेक्साइडिन ग्लुकोनेट यासारखी सर्जिकल जंतुनाशके ही कमी प्रभावी आहेत.

या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील नियम व संकेतांचे पालन करा

सर्वात महत्वाचे,Prevention is better than cure.अर्थात फिजिकल डिस्टनस पाळा.
तोच सर्वात प्रभावी मार्ग आहे हे आतातरी समजून घ्या.
प्रत्येक वेळी हात sanitiser ने किंवा साबणाने स्वच्छ धुवा.खूप अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा.
बाहेरुन आल्यावर अवश्य आंघोळ करा.
शक्यतो बाहेरचे पदार्थ आणु नका.
भाजीपाला आणला तर तो मिठ टाकुन किमान 2-3 वेळा धुऊन वापरा.
जिल्ह्याच्या सर्व सीमा कडकपणे सील करा.
कुणी त्यात अडथळा आणत असेल तर प्रशासनाला कळवा.प्रशासनाने परवानगी घेऊनही कुणी सिमेच्या आत येत असेल किंवा बाहेर जात असेल तर त्याची सर्वप्रथम कोरोना टेस्ट करुनच पुढे जाऊ द्यावे.त्यासाठी जमल्यास सिमेवरच तपासणी करता येईल का? त्यासाठी प्रयत्न करावेत.
प्रशासन रुग्णांची माहिती देते.त्यामुळे वृत्तपत्रे,वाहिन्या ,त्यांचे प्रतिनिधी वगळता इतरांनी माहिती देऊ नका.त्यामुळे वातावरण अजून तंग होते.
आपल्या घरात ह्या विषयावर अजिबात चर्चा करु नका.अशी संकटे खूप येतात आणि नक्किच जातात अशीच चर्चा ठेवा.
शक्य असेल तर किराणा,गरजेचीऔषधी जास्त प्रमाणात आणुन ठेवा.पेट्रोल एकदाच भरा.
आपले घर आणि परिसरात रोज सफाई करा.कचरा रोज जाळा.
आपल्या नगरात नियमीत फवारणी करण्याचा आग्रह धरा.
प्रशासनाने योग्य नियोजन करुन आणि विक्रेत्यांना सम्पर्क करुन प्रमाणित विक्री प्रतिनिधिमार्फत प्रत्येक नगरात किराणा,भाजीपाला ,औषधी ,बेकरी सामान ,दुध आदी अत्यावश्यक सेवा पैसे घेउन पुरवले तर बाहेरची मोठी गर्दी टळेल.
असंख्य नागरिक सर्व नियम पाळत असताना अनेक हौसे रोडवर हुल्लडबाजी करित आहेत.दोनपेक्षा अधिकजण दुचाकीवर असले की त्वरित कारवाई करा.संध्याकाळ झाली की असंख्य व्यक्ती एकत्र येऊन डिस्टंस न पाळता जमाव करुन गप्पा मारीत आहेत.तसे करु नका.
सर्वात महत्वाचे: आरोग्य विभागाला पूर्ण संरक्षण देऊन आता तरी घरोघर तपासणी करा.
हे खूप गरजेचे आहे.त्यातून रुग्ण सर्वे होइल आणि असल्यास रुग्ण सापडतील.
नियम पाळा आणि संकट टाळा!
कोरोना* रोग लवकर नष्ट होईल असे वाटत नाही ,तथापी आपल्याला काम हे *करावेच* लागणार आहे .
दैनंदिन जीवनामध्ये आपला रोज अनेक लोकांशी संपर्क येतो त्यामुळे यापुढे किमान १ वर्ष खालीलप्रमाणे *काळजी* घेणे अत्यंत आवश्यक झालेले आहे .
जितका वेळ शक्य असेल तितका वेळ सार्वजनिक शौचालये वापरु नयेत.
आपल्याकडे येणाऱ्या सर्व लोकांना त्यांच्या चपला बूट बाहेर काढण्यास सांगावे .
ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सॅनिटायझर ने हात स्वच्छ करण्यास सांगावे .
चलनी नोटा न हाताळता आपल्याला येणे असलेली रक्कम चेकने अथवा ई पेमेंटने स्वीकारावी .
आपले मित्र तसेच नातरवाईक व सहकारी यांचे दरम्यान 4 फूट अंतर कायमस्वरूपी राखावे .
काम संपल्यानंतर लवकरात लवकर आपल्या घरी जावे व हातपाय धुवावे कपडे धुण्यास टाकावे वा स्वत: धुवावेत.
कोणाशीही भेट घेऊ नका व कोणालाही भेटु नका.
अगदी जवळच्या कुटुंबाचीही भेट घेऊ नका.
अगदी बाजूच्या शेजाऱ्याचीही भेट घेऊ नका.
बिल्डिंग च्या कॉमन ग्यालरीत मध्ये सहज देखील जमा होऊ नका.
बिना मास्क कॉमन ग्यालरीत येऊ नका.
बिल्डिंग ची कॉमन मीटिंग आयोजित करू नका.
कागदपत्रे हाताळताना, वाचताना, पान पलटताना थुंकी लावू नये .
अगदी गरजेच्या वेळेस ऑफिसमध्ये अथवा पार्किंग मध्ये उपस्थित राहून भेटावे
अनेक क्लायंट वा मित्र यांना फोन जोडून देऊन या फोनवर बोला असे म्हणायची सवय असते शक्यतो असा प्रकार अजिबात करू नये फक्त *स्वतःचाच* मोबाईल फोन वापरावा .
आपल्याला भेट देणाऱ्या व्यक्तीने *मास्क* घातला नसेल तर त्याच्याशी संभाषण करण्यास *स्पष्ट* नकार द्यावा .
अनेक वेळा गडबडीत आपण थुंकी लावून नोटा मोजतो ते पूर्णपणे टाळावे, रस्त्यावर थुंकु अगर पिंचकारी मारू नका .
अगदी बिल्डिंग मधील ग्यालरी व जिने पाण्याने धुण्यासाठीही एकत्र येऊ नका, ( सध्या बिल्डिंगची ग्यालरी व जिने पाण्याने धुण्याचे फ्याड कित्येकदा जनजागृती करूनही काही बिल्डिंग मध्ये अजूनही पाहायला मिळतंय, आपल्या कुटुंबियांना विशेषतः महिला वर्गाला सतर्क करा की पाण्याने ग्यालरी व जिने धुवून कोरोना जाणार नाही उलट तो तुमच्या घरात तुमच्या ओल्या पायाने, ओल्या हाताने, वापरलेल्या झाडुतून, बिल्डिंग मध्ये जिने धुत असताना जो लोकसंपर्क आला त्यातून तो तुमच्या घरात प्रवेश करतो ) कारण आपला शेजारीच जर उद्या कोरोना पेशंट निघाला तर त्याच्या संपर्कात आल्याने आपण आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव देखील धोक्यात घालत असतो.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ,कापलेली फळे खाणे कायमस्वरूपी टाळावेत. घरातील भाजीपाला,फळे मीठाच्या पाण्यात १/२ तास भिजत ठेवावा
जुनी कागदपत्रे हाताळताना हॅण्डग्लोव्हज वापरा जास्तीत जास्त काळजी घ्यावी.
परगांवा वरून येणाऱ्या लोकांची मित्रांची सहकार्याची नातेवाईक यांची संपूर्ण माहिती फोनवरून घ्यावी व तो आला असेल अंतर ठेवावे .
शासनाकडून गेले २महिना ज्या सूचना सुरू आहेत जसे साबणाने हात धुणे या सूचनांचा अंमल कायमपणे सुरू ठेवावा .
*शेकहॅण्ड* पूर्णपणे टाळावेत व आपली परंपरागत नमस्काराची पद्धत अवलंब करावी
उत्तर लिहिले · 11/10/2020
कर्म · 6750
5
दादा तसं पाहायला गेलं तर गरम पाणी पिऊन कोरोना नष्ट होतो ही गोष्ट पण 100 टक्के खरी नाहीये. कारण सर्व प्रकारची काळजी घेऊन पण आज हजारो लोकांना या विषाणूने आपल्या विळख्यात घेतलंय...

या आजारावर सध्या तरी नक्की अस कुठलंही औषध नाहीये किंवा एकच अस कुठलंही पथ्य पण नाहीये.

त्यामुळे मी अस सांगेल की आजच्या घडीला डॉक्टर आणि वैद्यकीय सल्लागार ज्या कुठल्या गोष्टी करायला सांगत असतील त्यातल्या जेवढ्या जास्त गोष्टी आपल्याला करता येतील तेवढ्या आपण कराव्यात आणि आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घ्यावी...

शक्यतो घरीच राहणे अन बाहेर जायची वेळ आलीच तर कुठेही जाताना मास्क लावणे, सॅनिटायझर चा योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने वापर करणे, बाहेरून आल्यावर व्यवस्थित हात पाय धुवून  स्वतःला स्वछ करणे, आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला विविध माध्यमातून डॉक्टर लोक आणि आपले सरकार करायला सांगत आहे. त्या सगळ्या गोष्टींच आपण जेवढं होईल तेवढं पालन करून स्वतःचा अन आपल्या परिवाराचा या संकटातून बचाव करू शकतो.

धन्यवाद..☺️
उत्तर लिहिले · 9/7/2020
कर्म · 7815
1
काय काळजी घ्याल ?
शक्यतो चेहऱ्याला लावणं टाळा. हात धुवून मगच चेहऱ्याला स्पर्श करा.


गरोदर स्त्रियांनी काय काळजी घ्यावी ?
गर्दीत जाणं टाळा, बाहेर पडताना मास्क लावा. थोडी जरी सर्दी झाली, तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या.


लहान मुलांबाबत काय काळजी घ्यायची ?
आजारी मुलांना शाळेत पाठवू नका. मुलांना स्वच्छतेचं योग्य प्रशिक्षण द्या.


कोरोनावर आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषध आहे का ?
आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीमध्ये कोरोनावर औषध नाही.
उत्तर लिहिले · 17/5/2020
कर्म · 11990
0

क्वारंटाईन (Quarantine) म्हणजे निरोगी लोकांना, जे संसर्गजन्य रोगाच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे, त्यांना इतरांपासून वेगळे ठेवणे, जेणेकरून रोगाचा प्रसार रोखला जाईल.

क्वारंटाईनचा उद्देश:

  • संसर्गजन्य रोगाचा प्रसार रोखणे.
  • ज्या व्यक्तींना रोगाची लागण झाली आहे, त्यांची ओळख पटवणे आणि त्यांना योग्य उपचार देणे.

क्वारंटाईनमध्ये व्यक्तीला एका विशिष्ट ठिकाणी वेगळे ठेवले जाते आणि त्यांची नियमित तपासणी केली जाते. क्वारंटाईनचा कालावधी रोगाच्या प्रकारानुसार बदलतो.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1620
2
*🔰📶महा डिजी । विशेष माहिती*

*🤔 सेल्फ आयोसेलेशन म्हणजे नेमकं काय, यावेळी कोणती काळजी घ्यावी? Qurantine आणि विलगीकरणात 'हा' आहे फरक*

💁‍♂️ सेल्फ आयसोलेशन आणि क्वारंटाईन याचा मूळ अर्थ हा विलगीकरण असाच आहे. मात्र ज्या अर्थाने हे शब्द वापरले जातात त्याचा संदर्भ वेगळा आहे. 

👉 या दोन्ही शब्दांचे अर्थ आणि त्यांच्यातील फरक सविस्तर जाणून घ्या:

*🧐 सेल्फ आयसोलेशन म्हणजे काय?*

कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांपासून लांब राहण्यासाठी हा निर्णय व्यक्तिगत स्तरावर घेतला जातो. यावेळी संबंधित व्यक्ती कोणाच्याच प्रत्यक्ष संपर्कात राहू शकत नाही. परदेशातून आलेल्या व्यक्तींना शक्यतो स्वतःला विलगीकरणात ठेवण्यास सांगितले जाते.

*🧐 Qurantine म्हणजे काय?*

कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने खबरदारीचा पर्याय म्ह्णून 14-दिवसाच्या कालावधीसाठी विलगीकरणात राहण्यास सांगितले जाते त्याला क्वारंटाईन असे म्हंटले जाते. यावेळी अगदी गंभीर परिस्थिती नसल्यास आपण आपल्या कुटुंबासह किंवा एका खोलीत अन्य व्यक्तीसोबत राहू शकता. यावेळी आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी वेगळा बेड आणि स्वतंत्र बाथरूम वापरण्यास सांगितले जाते. मास्क वापरा, हात धुवा अशा नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. क्वारंटाईन मध्ये सुद्धा होम क्वारंटाईन आणि हॉस्पिटल क्वारंटाईन असे दोन पर्याय आहेत. नावानुसारच या शब्दांचे अर्थ आहेत.

*💁‍♀️ सेल्फ आयसोलेशन आणि Qurantine मधील फरक*

या दोन्ही मध्ये असताना लोकांच्या संपर्कात यायचे नसते. सेल्फ आयसोलेशन मध्ये असताना मात्र अगदी एकट्याने राहणे आवश्यक असते. तर क्वारंटाईन मध्ये आपण अगदी मोजक्या लोकांमध्ये राहू शकता. सार्वजनिक ठिकाणी फिरणे मात्र दोन्ही मध्ये निषिद्ध आहे.
____________________________________
*🌐💁‍♂️आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_

https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 27/4/2020
कर्म · 569245