औषधे आणि आरोग्य फरक कोरोना रोगप्रतिबंधक उपाय आरोग्य

आयसोलेशन म्हणजे काय? क्वारंटाईन व विलगीकरण मधील फरक काय आहे?

2 उत्तरे
2 answers

आयसोलेशन म्हणजे काय? क्वारंटाईन व विलगीकरण मधील फरक काय आहे?

2
*🔰📶महा डिजी । विशेष माहिती*

*🤔 सेल्फ आयोसेलेशन म्हणजे नेमकं काय, यावेळी कोणती काळजी घ्यावी? Qurantine आणि विलगीकरणात 'हा' आहे फरक*

💁‍♂️ सेल्फ आयसोलेशन आणि क्वारंटाईन याचा मूळ अर्थ हा विलगीकरण असाच आहे. मात्र ज्या अर्थाने हे शब्द वापरले जातात त्याचा संदर्भ वेगळा आहे. 

👉 या दोन्ही शब्दांचे अर्थ आणि त्यांच्यातील फरक सविस्तर जाणून घ्या:

*🧐 सेल्फ आयसोलेशन म्हणजे काय?*

कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांपासून लांब राहण्यासाठी हा निर्णय व्यक्तिगत स्तरावर घेतला जातो. यावेळी संबंधित व्यक्ती कोणाच्याच प्रत्यक्ष संपर्कात राहू शकत नाही. परदेशातून आलेल्या व्यक्तींना शक्यतो स्वतःला विलगीकरणात ठेवण्यास सांगितले जाते.

*🧐 Qurantine म्हणजे काय?*

कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने खबरदारीचा पर्याय म्ह्णून 14-दिवसाच्या कालावधीसाठी विलगीकरणात राहण्यास सांगितले जाते त्याला क्वारंटाईन असे म्हंटले जाते. यावेळी अगदी गंभीर परिस्थिती नसल्यास आपण आपल्या कुटुंबासह किंवा एका खोलीत अन्य व्यक्तीसोबत राहू शकता. यावेळी आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी वेगळा बेड आणि स्वतंत्र बाथरूम वापरण्यास सांगितले जाते. मास्क वापरा, हात धुवा अशा नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. क्वारंटाईन मध्ये सुद्धा होम क्वारंटाईन आणि हॉस्पिटल क्वारंटाईन असे दोन पर्याय आहेत. नावानुसारच या शब्दांचे अर्थ आहेत.

*💁‍♀️ सेल्फ आयसोलेशन आणि Qurantine मधील फरक*

या दोन्ही मध्ये असताना लोकांच्या संपर्कात यायचे नसते. सेल्फ आयसोलेशन मध्ये असताना मात्र अगदी एकट्याने राहणे आवश्यक असते. तर क्वारंटाईन मध्ये आपण अगदी मोजक्या लोकांमध्ये राहू शकता. सार्वजनिक ठिकाणी फिरणे मात्र दोन्ही मध्ये निषिद्ध आहे.
____________________________________
*🌐💁‍♂️आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_

https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 27/4/2020
कर्म · 569245
0

आयसोलेशन (Isolation):

आयसोलेशन म्हणजे संसर्गजन्य रोग झालेल्या व्यक्तीला इतरांपासून वेगळे ठेवणे, जेणेकरून त्या व्यक्तीमुळे इतरांना संसर्ग होऊ नये.

उद्देश: रोग फैलावणे थांबवणे.

क्वारंटाईन (Quarantine):

क्वारंटाईन म्हणजे ज्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता आहे, पण अजून लक्षणे दिसलेली नाहीत, अशा व्यक्तीला इतरांपासून वेगळे ठेवणे.

उद्देश: लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार सुरू करणे आणि प्रसार रोखणे.

विलगीकरण (Isolation) आणि क्वारंटाईन (Quarantine) मधील फरक:

  • आयसोलेशन: जे लोक आजारी आहेत आणि ज्यांना संसर्ग झाला आहे, त्यांच्यासाठी आहे.
  • क्वारंटाईन: जे लोक निरोगी आहेत, पण संसर्ग होण्याची शक्यता आहे, त्यांच्यासाठी आहे.

अधिक माहितीसाठी उपयुक्त स्रोत:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1620

Related Questions

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तुम्ही काय उपाय कराल?
कोरोनावर लॉकडाऊन हाच उपाय आहे?
कोरोना होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी?
गरम पाणी न पिता गळ्यातून कोरोना व्हायरस नष्ट होऊन जाईल असा कोणता उपाय आहे? कारण एक दिवसापर्यंत कोरोना गळ्यात राहतो, नंतर छातीत जातो?
कोरोनाबद्दल घ्यायची काळजी?
क्वारंटाईन म्हणजे काय?
होमक्वारंटाइन म्हणजे काय?