2 उत्तरे
2
answers
बोलाचा भात व बोलाची कढी या मराठी म्हणीचा अर्थ काय होतो?
2
Answer link
म्हणजे नुसत्या थापा. उदाहरणादाखल काही वाक्यांचा उल्लेख करतो जेणेकरून या म्हणीचा मतितार्थ लक्षात येईल
१) मी उद्यापासून व्यायामाला जाणार आहे, त्यामुळे आज हवं ते खाऊन पिऊन घेतो.
२) मतदार हा राजा आहे, पुढील पाच वर्षात आम्ही या राजाची सेवा करू.
३) मी साहेबांशी बोललोय तुझ्याबद्दल, बघू आता काय होतंय ते.
४) कालच तुझी आठवण काढली होती आणि आजच तुला फोन करणार होतो.
५) मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. एकदा का आपलं डोकं फिरलं तर मग काय खरं नाही.
0
Answer link
अर्थ:
- केवळ बोलघेवडेपणा करणे, कृती न करणे.
- नुसत्या गप्पा मारणे, प्रत्यक्षात काहीही न करणे.
स्पष्टीकरण:
ज्याप्रमाणे 'बोलाचा भात' आणि 'बोलाची कढी' हे केवळ बोलून तयार केलेले पदार्थ आहेत, ते खाण्यासाठी उपयोगी नसतात, त्याचप्रमाणे काही लोक फक्त बोलण्यातच मोठे असतात, पण प्रत्यक्षात कोणतेही काम करत नाहीत. अशा लोकांबद्दल ही म्हण वापरली जाते.