2 उत्तरे
2 answers

अर्थव्यवस्था म्हणजे काय?

4
🤔 *अर्थव्यवस्था म्हणजे काय ? आणि अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार कोणते ?*

*🔰📶Maha Digi | G Knowledge*

🎲 भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आला. तर चीन वगळता इतर बऱ्याच देशांचा GDP दर हा शून्याखाली आला आहे. GDP उणे झाला म्हणजेच अर्थव्यवस्था धोक्यात आली. आता अर्थव्यवस्था म्हणजे नक्की काय तेही आपण समजून घेतले पाहिजे.

💸 *अर्थव्यवस्था म्हणजे काय ?*

🔖 अर्थव्यवस्थेची सर्वात लोकप्रिय व्याख्या ही रशियन अर्थतज्ज्ञ प्राध्यापक ग्रेगरी ग्रॉसमन यांनी दिली आहे.

🔖 "देशातील व्यक्ती, कुटुंबे, उद्योगसंस्था, व्यवसाय संस्था यांच्या मार्फत उत्पादन, विभाजन, विनिमय व उपयोग या आर्थिक क्रिया पार पाडल्या जातात.

🔖 देशातील विविध घटक आणि संस्थांना वळण लावण्यासाठी ज्या यंत्रणेचा वापर केला जातो तिला अर्थव्यवस्था असं म्हणतात" अशी व्याख्या ग्रेगरी यांनी केली आहे.

🔖 तर अमेरिकन अर्थतज्ज्ञ प्रोफेसर रॉबर्ट लाऊकस यांच्या सांगण्यानुसार, "मानवी गरजा भवविताना उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करण्यासाठी केलेले समग्र आर्थिक व्यवहार म्हणजे अर्थव्यवस्था होय."

🧐 *अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणकोणते असतात ?*

*1)* उत्पादक साधनसंपत्तीच्या मालकीनुसार
अ) भांडवलशाही अर्थव्यवस्था
ब) समाजवादी अर्थव्यवस्था
क) मिश्र अर्थव्यवस्था
*2)* विकासाच्या अवस्थेनुसार

💰 *अ) भांडवलशाही अर्थव्यवस्था* : (Capitalistic Economy) – ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनांची साधने खासगी मालकीची असतात.

👍 *वैशिष्टये* –
*१)* उत्पादक उपभोगाच्या मागणीनुसार वस्तूचा पुरवठा करतात.
*२)* ग्राहक सार्वभौम असतात, त्यांच्या पसंतीनुसारच उत्पादन केले जाते. थोडक्यात, उपभोक्ता बाजारपेठेत राजा असतो.
*३)* किंमत ठरविण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते म्हणजे ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्तअसते. म्हणून या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था असेदेखील म्हणतात. (Laisser faire).
*४)* उत्पादन हे नफा मिळविण्याच्या हेतूने केले जाते.

👎 *दोष* -
आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण झाल्याने गरिबी व श्रीमंतांची दरी वाढत असते. त्याप्रमाणे गरिबी, बेरोजगारी, पर्यावरण आदींचा विचार केला जात नाही.

💰 *ब) समाजवादी अर्थव्यवस्था* (Socialist Economy) – ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारच्या म्हणजे सार्वजनिक मालकीची असतात, त्यांना समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात.

👍 *वैशिष्टये* –
*१)* उत्पादनांची साधने सरकारी मालकीची असतात.
*२)* वस्तू आणि सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. सर्व आर्थिक निर्णय सरकार घेते.
*३)* या व्यवस्थेत ग्राहक सार्वभौम ठरत नाही.

👎 *दोष*-
यात व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप होतो. कधीकधी सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होतो. कार्यक्षमता, उत्पादकता कमी होते.

💰 *क) मिश्र अर्थव्यवस्था* : (Mixed Economy)- ज्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खासगी अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी अस्तित्वात असतात, त्या अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात.

👍 *वैशिष्टये* –
*१)* खासगी मालमत्तेचा मर्यादित हक्क असतो.
*२)* काही उद्योगांची उभारणी सरकारी व खासगी स्तरावर केली जाते.
*३)* भांडवली आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचा दोष टाकून चांगल्या गुणांचा समन्वय या अर्थव्यवस्थेत करण्यात आला आहे.

🥇 *विकसित अर्थव्यवस्था* - ज्या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण मोठे असते. मोठय़ा प्रमाणावर औद्योगीकरण, शहरीकरण झालेले असते. त्याचप्रमाणे साक्षरतेचे प्रमाण जास्त असते. जन्मदर व मृत्युदराचे प्रमाण कमी असते. उदा. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इ.

🥈 *विकसनशील अर्थव्यवस्था* - ज्या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण तुलनेने कमी असते. साक्षरतेचे प्रमाण कमी असते. मात्र जी अर्थव्यवस्था आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, त्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था असे म्हणतात. उदा., भारत, श्रीलंका, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील काही देश.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 8/9/2020
कर्म · 569245
0

अर्थव्यवस्था: अर्थव्यवस्था म्हणजे एक असे संघटन, जे वस्तू व सेवांचे उत्पादन, वितरण आणि उपभोग सुनिश्चित करते. हे एक सामाजिक व्यवस्था आहे जी लोकांच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी संसाधनांचे व्यवस्थापन करते.

अर्थव्यवस्थेची काही मूलभूत कार्ये:

  • वस्तू व सेवांचे उत्पादन करणे.
  • उत्पादित वस्तू व सेवांचे वितरण करणे.
  • वस्तू व सेवांचा उपभोग घेणे.
  • उत्पादन घटकांचे व्यवस्थापन करणे (जसे की जमीन, श्रम, भांडवल आणि उद्यम).

अर्थव्यवस्थेचे प्रकार:

  1. बाजार अर्थव्यवस्था: या प्रकारात, वस्तू व सेवांची किंमत मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. सरकारचा हस्तक्षेप कमी असतो.
  2. नियोजित अर्थव्यवस्था: या प्रकारात, सरकार वस्तू व सेवांचे उत्पादन आणि वितरण नियंत्रित करते.
  3. मिश्र अर्थव्यवस्था: ही अर्थव्यवस्था बाजार आणि नियोजित अर्थव्यवस्थांचे मिश्रण आहे. काही क्षेत्रात सरकारचे नियंत्रण असते, तर काही क्षेत्रात खाजगी उद्योगांना मुभा असते.

भारतीय अर्थव्यवस्था: भारत एक मिश्र अर्थव्यवस्था आहे. येथे सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांचे अस्तित्व आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील दुवे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040

Related Questions

गरज म्हणजे नक्की काय?
मूळ वस्तू किंमत?
वस्तू विनमय म्हणजे काय?
अर्थशास्त्राची मूलभूत समस्या काय आहे?
अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्राचे उद्दिष्ट कसे स्पष्ट कराल?
पैशाचे प्राथमिक कार्य कोणते आहे?
पैशाची प्राथमिक कार्ये कोणती आहेत?