2 उत्तरे
2
answers
पैशाचे प्राथमिक कार्य कोणते आहे?
2
Answer link
पैशाची प्राथमिक कार्य
पैसा विनिमयाचे माध्यम म्हणून स्वीकारण्यात येणारी सर्वमान्य वस्तू म्हणजे पैसा. आधुनिक अर्थव्यवस्था श्रमविभागणी व देवघेव ह्यांवर आधारलेली आहे. उप्तादक घटकांचा मोबदला देण्याकरिता, कर्जाचे व्यवहार पुरे करण्याकरिता पैशाचा उपयोग केला जातो. वस्तू किंवा सेवा यांची देवघेव सर्वमान्य विनिमय माध्यमाद्वारे होण्यापूर्वी वस्तूंची किंवा सेवांची प्रत्यक्षपणे देवघेव होत असे. मीठ देऊन कापड घेणे, गवंडीकामाचा मोबदला धान्याच्या रूपात देणे अशा पद्धतीचे वस्तुविनिमयावर “आधारलेले व्यवहार प्रगत मानवजातीस गैरसोयीचे वाटूअस माठ दऊन कापड चण, गवडीकामाचा मोबदला धान्याच्या रूपात देणे अशा पद्धतीचे वस्तुविनिमयावर आधारलेले व्यवहार प्रगत मानवजातीस गैरसोयीचे वाटू लागले. त्यानंतरचा टप्पा म्हणजे विनिमयाचे माध्यम म्हणून एखादी वस्तू वापरणे पिसे, हाडे, धान्य, हत्तीचे दात, वाघाचे कातडे, मेढी, घोडे, हत्ती आदी वस्तूंचा आणि जनावरांचा जगाच्या विविध भागांत विनिमय माध्यम म्हणून उपयोग करण्यात येत असे. पैशाच्या उत्क्रांतीमधील पुढील टप्पे म्हणजे नाणी, कागदी चलन आणि पतपैसा हे होत. नाणी व कागदी चलन सरकारमान्य पैसा होय. बँकनिर्मित पतपैशाचा देवघेवीचे साधन म्हणून उपयोग होत असला, तरी त्यास सरकारी पाठबळ नसते. त्यामुळे तो स्वीकारलाच पाहिजे असे कायदेशीर बंधन नसते.
पैशाची कार्ये
विनिमयाचे माध्यम म्हणून पैशाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. पैसा सर्वग्राह्य असल्याने वस्तूंची आणि सेवांची खरेदीविक्री पैशाच्या माध्यमाद्वारे सुलभपणएसेवांची खरेदीविक्री पैशाच्या माध्यमाद्वारे सुलभपणे होते. मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे दुसरे महत्त्वाचे कार्य होय. दैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो. पैसा विलंबित देणी देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. रोखीचे व्यवहारच नव्हे, तर पूर्वी केलेले व्यवहार पुरे करण्यासाठी किंवा वर्तमानकाळात केलेले व्यवहार भविष्यकाळात पुरे करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो. पैशाच्या या गुणामुळे दीर्घमुदतीचे व्यवहार करणे शक्य आणि सुलभ होते. संपत्तीचा साठा करण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो. पैशामध्ये खरेदीशक्ती असते. तीमुळे वस्तू व सेवा पैशाच्या साहाय्याने खरेदी करून त्यांचा साठा करण्यापेक्षा पैशाच्या स्वरूपातच संपत्ती ठेवली, तर त्या शक्तीचा केव्हाही उपयोग करता येतो. संपत्तीचे हस्तांतर करणे पैशामुळे सोपे होते.
0
Answer link
पैशाचे प्राथमिक कार्य विनिमयाचे माध्यम (Medium of exchange) म्हणून काम करणे हे आहे.
स्पष्टीकरण:
- वस्तू व सेवांच्या खरेदी-विक्रीसाठी पैसाStandard of value) हे माध्यम म्हणून वापरले जाते.
- पैशामुळे वस्तू आणि सेवांचे मूल्यमापन करणे सोपे होते.
- पैसाstanderd of deferred payment)deferred payment सोपे करते, म्हणजेच भविष्यात देयके देण्यासाठी याचा उपयोग होतो.
याव्यतिरिक्त, पैसा मूल्य साठवण्याचे (Store of value) आणि हिशोबाचे एकक (Unit of account) म्हणूनही कार्य करतो.
अधिक माहितीसाठी: