4 उत्तरे
4
answers
शिक्षक दिनाविषयी माहिती मिळेल का?
4
Answer link
*शिक्षक दिन...*
*शिक्षक दीन...*
आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस... हाच दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन यांच्या मते “शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकं मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो, चांगला शिक्षक तोच असतो ज्याच्यामधला विद्यार्थी सदैव जीवंत असतो.”
विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्वावर शिक्षकांकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती तसेच आदर असे अनेक पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
युनेस्कोचे घोषवाक्य आहे - ‘शिक्षकांबाबत निश्चित भूमिका घ्या’ (Take a stand for Teachers!) निश्चित भूमिका म्हणजे नेमके काय करावे? तर शिक्षकांना योग्य प्रशिक्षण द्यावे, व्यावसायिक विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि शिक्षकांच्या हक्कांच्या संरक्षणाची हमी द्यावी!
सद्या ‘समाजातील उच्च गुणवत्ताधारक तसेच बुद्धिमान विद्यार्थ्यांनी शिक्षकी पेशाकडे वळणे ही काळाची गरज आहे. सक्षम आणि ध्येयनिष्ठ बुद्धिमान शिक्षकांशिवाय गुणवत्तायुक्त शिक्षण शक्य होणार नाही.
पु. ल. देशपांडे यांची ‘एका मोर्चाची गोष्ट’ नावाची कथा आहे. त्यात पु. लं. लिहितात, “... आमची एकच विनंती. उपाशी ठेवून ‘गुरुजी’ वगैरे नका म्हणू...”
म्हणून शेवटी वाटते,
शिक्षक दिन... की शिक्षक दीन...
*संपादक मधुकर घायदार, नाशिक यांचा रोखठोक लेख वाचा उद्याच्या अंकात...*
_संकेतस्थळ_
https://www.shikshakdhyey.com/
_टेलीग्राम_
https://t.me/shikshak_dhyey
_फेसबुक_
https://tinyurl.com/ycsa774s
_व्हाट्सअॅप_
https://chat.whatsapp.com/JVBWifFuc3MCfBtCSRppBk

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. ते उत्तम शिक्षक होते. म्हणून त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. भारत सरकार आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने १९६२ मध्ये हा दिवस प्रथम साजरा केला गेला.
भारतीय राष्ट्रीय शिक्षक दिन : ५ सप्टेंबर
जागतिक शिक्षक दिन : ५ ऑक्टोबर
0
Answer link
शिक्षक दिन हा भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी, भारताचे माजी राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ, तत्वज्ञ आणि भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिवसाचा उद्देश:
- शिक्षकांच्या योगदानाला आदराने गौरवणे.
- विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व वाढवणे.
- शिक्षकांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहन देणे.
कसा साजरा करतात?
- विद्यार्थी शिक्षकांचा आदर करतात आणि त्यांना भेटवस्तू देतात.
- शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
- शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि शिक्षणाचे महत्त्व सांगतात.
शिक्षक हे समाजाचे शिल्पकार असतात. ते विद्यार्थ्यांना ज्ञान देतात आणि त्यांना योग्य मार्ग दाखवतात. त्यामुळे, शिक्षक दिनाचे महत्त्व अनमोल आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: