Topic icon

शिक्षक दिन

0
📖📚⚜
*GK जनरल नॉलेज ग्रुप*
⚜📚📖
     _*9168390345*_
    ★_*रसुल खडकाळे*_★
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*JOIN GROUPS*
*1)🌹THE GREAT ISLAM🌹*
*2)📖GK जनरल नॉलेज📚*
*3)📰NEWS&UPDATES*
📚📖📚📖📚📖📚

■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆

📚📖 *शिक्षक दिवस के प्रेरणा स्त्रोत के कुछ शब्द जो आपके बहुत काम आयेंगे*📖📚
➖➖➖➖➖➖➖➖
5 सितम्बर को पूरे देश में डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन के जन्मदिवस पर शिक्षक दिवस मनाया जाता है. माता-पिता के बाद एक शिक्षक ही होता है जो किसी के चरित्र निर्माण में सबसे बड़ा योगदान निभाते हैं.
डॉ. सर्वपल्ली राधा कृष्णन देश के दूसरे राष्ट्रपति और एक बहुत ही महान स्कॉलर थे. उनका जन्म 5 सितंबर साल 1888 में हुआ था. साल 1962 से राधा कृष्णनन को श्रद्धांजलि देने के लिए उनके जन्म दिवस पर शिक्षक दिवस मनाया जाता है.

राधाकृष्णनन को देश का प्रतिष्ठित पुरस्कार भारत रत्न से भी नवाजा जा चुका है. आज हम आपके लिए लेकर आए हैं 
🌹_*डॉ. सर्वपल्ली राधा कृष्णन द्वारा कहे गए कुछ अनमोल कोट्स-*_

🔸1. किताब पढ़ना हमें एकांत में विचार करने की और सच्ची खुशी देता है.

🔹2. पुस्तकें वो साधन हैं जिनके माध्यम से हम विभिन्न संस्कृतियों के बीच पुल का निर्माण कर सकते हैं.

🔸3. केवल निर्मल मन वाला व्यक्ति ही जीवन के आध्यात्मिक अर्थ को समझ सकता है. स्वयं के साथ ईमानदारी आध्यात्मिक अखंडता की अनिवार्यता है.

🔹4. धर्म भय पर विजय है; असफलता और मौत का मारक है.

🔸5. भगवान की पूजा नहीं होती बल्कि उन लोगों की पूजा होती है जो उनके के नाम पर बोलने का दावा करते हैं. पाप पवित्रता का उल्लंघन नहीं ऐसे लोगों की आज्ञा का उल्लंघन बन जाता है.

🔹6. धन, शक्ति और दक्षता केवल जीवन के साधन हैं, खुद जीवन नहीं.

🔸7. ज्ञान हमें शक्ति देता है, प्रेम हमें परिपूर्णता देता है.

🔹8. शिक्षा का परिणाम एक मुक्त रचनात्मक व्यक्ति होना चाहिए जो ऐतिहासिक परिस्थितियों और प्राकृतिक आपदाओं के विरुद्ध लड़ सके.

🔸9. कहते हैं कि धर्म के बिना इंसान लगाम के बिना घोड़े की तरह है.
◆◆◆◆◆●●●●◆◆◆◆◆◆

👉📚📖 _*शिक्षक दिन; सन्मान आणि खंत*_ 📖📚
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा ’शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्यातही सुरूच राहिल. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते. 

’शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र आज शिक्षकांना पूर्वीसारखा सन्मान मिळत नाही, अनेक गोष्टींची खदखद त्यांच्या मनात कायमच सलत असते, अशाच काही बाबींवर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न…

👉★ _*शिक्षकांना वाटणारी खंत…*_

1) _*पूर्वीसारखा आज गुरूंना सन्मान नाही*_ : शाळेसाठी विद्यार्थ्यांनी आटापिटा करायचे दिवस गेले. आता मुलांसाठी कष्ट घेण्याचे दिवस शिक्षकांवर आले आहेत. पूर्वीच्या काळी गुरुगृही राहून शिक्षण घेतले जात होते. आताही गुरुकुल योजनेखाली चालणार्‍या अनेक संस्था आहेतच. पण खंत एकाच गोष्टीची वाटते ती म्हणजे पूर्वी इतका सन्मान गुरूंना मिळत नाही. 

★2) _*इतर कामांचा बोजा*_ : अध्यापनाचं काम हे प्रथम कर्तव्य असताना शिक्षकांना अनेकवेळा वर्ग रिकामे सोडून निवडणुका, जनगणना, शालाबाह्य विद्यार्थी शोध, दर्जाहीन प्रशिक्षणं आणि सरल ऑनलाईन नोंदणीसारखी अध्यापनबाह्य कामं करावी लागतात. अशावेळी शिक्षकामधला ‘गुरू’ संपून उरतो तो केवळ एक मजूर.

★3) _*शिक्षकांच्या गुणांकडे होणारी डोळेझाक*_ : बर्‍याच वेळा असं होतं, शिक्षकांमध्ये हजारातील एकाकडून एखादी चूक घडली की, सार्‍याच शिक्षकांकडे त्याच नजरेने पाहणे चुकीचे आहे. अनेक आदर्श शिक्षक म्हणणपेक्षा सारेच आदर्श शिक्षक असतात. त्यांच्यातील गुणांकडे डोळेझाक करून चालणार नाही. 

★4) _*शिक्षकांना म्हणावे असे प्रोत्साहन नाही*_ : शिक्षक म्हणजेच शि-शीलवान, क्ष-क्षमाशील, क-कर्तृत्ववान. ज्यामध्ये हे सर्व गुण असतात तो खरा आदर्श शिक्षक. अगदीच शोधलं तर कुठेतरी एखादा गुण कमी जास्त असतो, म्हणून सर्वच शिक्षकांना एका मापात तोलणे चुकीचे आहे. शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाची नोंद वेळोवेळी झाली पाहिजे. शिक्षकांमधील आदर्श गुणांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.

★5) _*शिस्त अडसर वाटते*_ : शिक्षकांची शिस्त ही गोष्ट विद्यार्थ्यांना अडसर वाटते. शिस्त ही तंबोऱ्याच्या तारांसारखी असते. तारा सैल ठेवल्या तर त्यातून बेसूर निघतात अन् जास्त आवळल्या तर तुटतात. हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घ्यायला हवे.

👉⚜🙏🏻👏🏻 _*शिक्षकांना हवाय सन्मान, तो कसा मिळेल? यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या…*_ ⚜🙏🏻👏🏻

❇1) _*शिक्षकांची भूमिका लक्षात घ्या*_ : ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.

🌹2) _*बदल होतोय, थोडा वेळ द्या*_ : तंत्रज्ञान झपाटयाने बदलत आहे. आधीचे साधे वर्ग आज ई-लर्निग रूम झालेले आहेत. काळ्या फळ्यावर पांढर्‍या खडूने लिहिलेल्या शिक्षकांच्या वळणदार अक्षरांऐवजी टेबलावरील संगणकावर किंवा भिंतीवरील स्क्रीनवर वेगवेगळ्या फाँटमधील वेगवेगळ्या स्टाईलची रंगीत डिजिटल अक्षरे चमकताना दिसतात. हा काळ संक्रमणाचा आहे. त्यामुळे शैक्षणिक पद्धतीत झालेले बदल, वाढणारा कामाचा व्याप शिक्षकांना त्रासदायक वाटत असला तरी हा बदल ते स्वीकारत आहेत फक्त गरज आहे त्यांना थोडा वेळ देण्याची!

🔰3) _*प्रोत्साहनासाठी हवा पुरस्कार*_ : ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाल्यामुळे शिक्षकांमधील गुणांना प्रोत्साहन मिळेल. आज ही कोणत्याही पुरस्काराची किंवा बक्षिसाची अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीने काम करणारेही अगणित शिक्षक आहेत. तरीही प्रोत्साहन मिळाल्यावर ज्याप्रमाणे विद्यार्थी खूप आनंदाने जास्त प्रेरित होऊन कृती करतो त्याचप्रमाणेच शिक्षकांनाही हे प्रोत्साहन ठरेल. आपण केलेल्या कार्याची पोच कोणीतरी घेतो, आपल्या कार्याकडे कोणाचे तरी लक्ष आहे ही भावनाही सुखावून जात असते. पुरस्कार मिळणे हेच काही सर्वस्व नसते.

🙏🏻👏🏻4) _*शिक्षकांच्या जिद्दीला हवा सलाम*_ : विद्यार्थी जेव्हा मोठे होतात, ते एखाद्या मोठ्या पदावर आसनस्थ होतात, चांगले पद भूषवतात त्यापेक्षाही महत्त्वाचे ते ‘आदर्श नागरिक’ बनतात. तीच खरी शिक्षकांसाठी पावती असते. शिक्षकाच्या कार्यासाठी हाच खरा पुरस्कार असतो. मोठ्यामोठ्या संस्थांमधील जागृत पालकांकडून विद्यार्थी निम्मा घरीच घडविला जातो. पुढील काम शिक्षक करतात. शिक्षक ‘माणूस’ घडवितात, एक आदर्श नागरिक घडविण्याचा प्रयत्न करतात. खरंच त्यांच्या या जिद्दीला, चिकाटीला मानलेच पाहिजे.

🙏🏻👏🏻🙏🏻👏🏻🙏🏻👏🏻🙏🏻👏🏻
शिक्षणाचा वसा घेणाऱ्या सार्‍या शिक्षकांना आज शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
🌹🙏🏻👏🏻🌹🙏🏻👏🏻🌹🙏🏻👏🏻
*_रसुल खडकाळे_*
♀♂♀♂♀♂♀♂♀♂♀♂♀♂
_*इस पोस्ट को ज्यादा से ज्यादा शेअर करें ताकी ज्यादा से ज्यादा लोग इसका फायदा उठा सकें*_
⚜🔰⚜🔰⚜🔰⚜🔰⚜
_*GK जनरल नॉलेज ग्रुप*_
📚📖📚📖📚📖📚📖
 ♂ _रसुल खडकाळे_ ♂ *★+91916839035★* 
🎊🎊🎊🎊🎊🎊
ग्रुप में शामिल होने के लिये अपना नाम और पत्ता ★+919168390345★
इस नंबर पर भेजें।जो अपने बारे में पुरी जानकारी भेजेगा सिर्फ उसी को ग्रुप में ऍड किया जायेगा
★★★★★★★★
सब लोग hiii, या ज्यादा चॅट करने में time जाया कर रहे हैं।एक मेसेज में आपकी पुरी detail भेजो
🔹🔹⭐🔹🔹⭐🔹🔹
🔹🔹⭐🔹🔹⭐🔹🔹
उत्तर लिहिले · 5/9/2023
कर्म · 569225
4
*शिक्षक दिन...*
*शिक्षक दीन...*

आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस... हाच दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन यांच्या मते “शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकं मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो, चांगला शिक्षक तोच असतो ज्याच्यामधला विद्यार्थी सदैव जीवंत असतो.” 
विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्वावर शिक्षकांकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती तसेच आदर असे अनेक पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी‍ आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
युनेस्कोचे घोषवाक्य आहे - ‘शिक्षकांबाबत निश्चित भूमिका घ्या’ (Take a stand for Teachers!) निश्चित भूमिका म्हणजे नेमके काय करावे? तर शिक्षकांना योग्य प्रशिक्षण द्यावे, व्यावसायिक विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि शिक्षकांच्या हक्कांच्या संरक्षणाची हमी द्यावी!
सद्या ‘समाजातील उच्च गुणवत्ताधारक तसेच बुद्धिमान विद्यार्थ्यांनी शिक्षकी पेशाकडे वळणे ही काळाची गरज आहे. सक्षम आणि ध्येयनिष्ठ बुद्धिमान शिक्षकांशिवाय गुणवत्तायुक्त शिक्षण शक्य होणार नाही.
पु. ल. देशपांडे यांची ‘एका मोर्चाची गोष्ट’ नावाची कथा आहे. त्यात पु. लं. लिहितात, “... आमची एकच विनंती. उपाशी ठेवून ‘गुरुजी’ वगैरे नका म्हणू...” 
म्हणून शेवटी वाटते,
शिक्षक दिन... की शिक्षक दीन...
     
*संपादक मधुकर घायदार, नाशिक यांचा रोखठोक लेख वाचा उद्याच्या अंकात...*

_संकेतस्थळ_
https://www.shikshakdhyey.com/

_टेलीग्राम_
https://t.me/shikshak_dhyey

_फेसबुक_
https://tinyurl.com/ycsa774s

_व्हाट्सअॅप_
https://chat.whatsapp.com/JVBWifFuc3MCfBtCSRppBk
उत्तर लिहिले · 5/9/2020
कर्म · 16010
3
दीपक सा जलता है गुरु
फैलाने ज्ञान का प्रकाश
न भूख उसे किसी दौलत की
न कोई लालच न आस

उसे चाहिए, हमारी उपलब्ध‍ियां
उंचाईयां,
जहां हम जब खड़े होकर
उनकी तरफ देखें पलटकर
तो गौरव से उठ जाए सर उनका
हो जाए सीना चौड़ा

हर वक्त साथ चलता है गुरु
करता हममें गुणों की तलाश
फिर तराशता है शिद्दत से
और बना देता है सबसे खास

उसे नहीं चाहिए कोई वाहवाही
बस रोकता है वह गुणों की तबाही
आणि सहेजतो हममें
एक नेक आणि काबिल इंसान को
3
शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण आपली आवडती कादंबरी किंवा एखादे चांगले पुस्तक आपल्या शिक्षकांना सादर करू शकता. या व्यतिरिक्त आपण एक डायरी आणि एक पेन देखील देऊ शकता. शिक्षकांना शिक्षणाशी संबंधित अधिक गोष्टी आवडतात. आपण आपल्या घरगुती वस्तू जसे की कॉफी सेट्स, टी-सेट्स, डिनर सेट इत्यादी आपल्या शिक्षकांना भेट देऊ शकता. परंतु कोणतीही भेट देताना, इतके लक्षात ठेवा की आदराने दिलेली कोणतीही भेट आपल्या शिक्षकाला आवडेल आणि तो हा दिवस नेहमी लक्षात ठेवेल. तुमच्या शिक्षणापेक्षा तुम्हाला मिळालेल्या सन्मानाने कोणताही शिक्षक जास्त खूश असतो, म्हणून प्रथम आपल्या शिक्षकाला आदर आणि श्रद्धेची भेट द्या.
0
शिक्षक दिन कॉलेजमध्ये साजरा करण्यासाठी काही उपयोगी सूचना:

सुरुवात:

  • स्वागत समारंभ: शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा.

  • प्रस्तावना: शिक्षक दिनाचे महत्त्व सांगा.

कार्यक्रम:

  • शिक्षकांचे भाषण: शिक्षकांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी द्या.

  • विद्यार्थ्यांचे भाषण: विद्यार्थी शिक्षकांबद्दल आपले विचार व्यक्त करू शकतात.

  • सांस्कृतिक कार्यक्रम:

    • गायन: शिक्षकांसाठी गाणी सादर करा.

    • नृत्य: पारंपरिक किंवा आधुनिक नृत्य सादर करा.

    • नाटिका: शिक्षकांच्या जीवनावर आधारित लघुनाटिका सादर करा.

    • एकांकिका: सामाजिक संदेश देणारी एकांकिका सादर करा.

  • खेळ: शिक्षकांसाठी मनोरंजक खेळ आयोजित करा.

विशेष कार्यक्रम:

  • गुरु वंदना: शिक्षकांची पूजा करून त्यांचा सन्मान करा.

  • पुरस्कार वितरण: उत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित करा.

शेवट:

  • आभार प्रदर्शन: कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार माना.

  • राष्ट्रगीत: राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करा.

इतर गोष्टी:

  • Decoration: कॉलेजला सजवा.

  • निमंत्रण: शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना निमंत्रण पत्रिका पाठवा.

  • फोटो आणि व्हिडिओ: कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ काढा.

  • Social Media: सोशल मीडियावर कार्यक्रमाची माहिती शेअर करा.

  • जलपान: कार्यक्रमाच्या शेवटी जलपान ठेवा.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980
5
गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`

आज ५ सप्टेंबर... शिक्षक दिन... शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते... त्याचमुळे या दिवसाला फार महत्त्व आहे.

आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस... हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती.... शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.

शिक्षक दिन हा केवळ भारतातच साजरा केला जातो असं नाही... जगभरात वेगवेगळ्या दिवशी का होईना पण हा दिवस साजरा करतात. युनेस्कोनं ५ ऑक्टोबर हा आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केलाय. पण, भारतात मात्र राधाकृष्ण यांच्या सन्मानार्थ ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९६२ साली ते राष्ट्रपतीपदावर विराजन झाले होते. तेव्हा काही शिष्य आणि प्रशंसकांनी त्यांना त्यांचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली. ‘माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणं माझ्यासाठी गौरवास्पद आहे’ असं त्यावेळी राधाकृष्ण यांनी सांगितलं. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकं मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो, असं त्यांचं म्हणणं होतं...

जगभरातील शिक्षक दिन...
चीनमध्ये १९३१ मध्ये ‘नॅशनल सेन्ट्रल यूनिव्हर्सिटी’मध्ये शिक्षक दिनाची सुरूवात करण्यात आली. चीनी सरकारकडून मात्र १९३२ मध्ये या दिवसाला स्वीकृती मिळाली.

त्यानंतर १९३९ मध्ये कन्फ्यूशिअसचा जन्मदिवस, २७ ऑगस्ट हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला... पण त्यानंतर पुन्हा १९५१मध्ये हा निर्णय रद्द करण्यात आला. त्यानंतर १९८५ मध्ये १० सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला.

आता मात्र पुन्हा एकदा अनेक लोकं कन्फ्युशिअसचाच वाढदिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्याची मागणी करत आहेत. रशियामध्ये १९६५ ते १९९४ पर्यंत ऑक्टोबर महिन्यातील पहिला रविवार शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात होता. १९९४ सालापासून युनेस्कोच्या निर्णयानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून स्वीकारला.
उत्तर लिहिले · 3/9/2018
कर्म · 13485
17

   *क्रांतिसूर्य राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या नावाने शिक्षक दिवस साजरा करण्यात यावा.

            डॉ. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतो पण हा दिवस लोकउत्सवाच्या रुपाने साजरा होत नाही तर शासकीय पातळीवर साजरा होतो. ज्या महापुरुषांनी परिवर्तनाचे प्रामाणिक कार्य केले आहे त्यांचेच उत्सव लोकउत्सवाच्या रुपाने साजरे होतात डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षकदिन म्हणून साजरा करतो.परंतु बहुजनांच्या शिक्षणाचे कैवाली राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या नावाने शिक्षक दिवस साजरा करावा
           राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली झाला. तर डॉ.राधाकृष्णन यांचा जन्म २० सप्टेंबर १८८७ रोजी झाला ५ सप्टेंबर १८८८ हा दिवस चुकीचा आहे.असे डॉ. राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल यांनी नमूद केला आहे.म्हणजे जोतीराव फुले यांच्यापेक्षा डॉ. राधाकृष्णन हे ६० वर्षांनी लहान होते जोतीराव फुले यांनी १८४८ साली देशातील पहिली मुलींसाठी शाळा सुरु केलि  १८५२ साली बहुजन मुलांसाठी शाळा सुरु केली म्हणजे डॉ.राधाकृष्णन यांच्या जन्माच्या अगोदर ४० वर्षापूर्वी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी देशातील पहिली शाळा सुरु केलि. म्हणजे जोतीराव फुले हेच भारतीय शिक्षणाचे आद्याजनक आहेत हे निर्विवाद सत्य होते जोतीराव फुले यांनी शाळा सुरु करण्यापूर्वी या देशात बहुजनांसाठी कोणीही शाळा सुरु केलि नाही राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्यामुलेच भारतीयांना शिक्षणाची संधि मिळाली शिक्षणाचा महत्व सांगणारे अत्यंत हृदयस्पर्शी विचार भारतात प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले म्हणून राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या नावाने शिक्षक दिवस मनुन साजरा करावा.
      शिक्षणाअभावी देशातील बहुजनांची कशी वाईट अवस्था झालेली आहे याचे विदारक चित्र प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले आणि एका वर्षातच २० शाळा सुरु केल्या यावेळी डॉ. राधाकृष्णन यांचा तिर्थारुपांचा ही जन्म झाला नव्हता तेंव्हाच जोतीराव फुले यांनी देशात शाळा सुरु केल्या होत्या  डॉ. राधाकृष्णन यांनी जन्मानंतर देखिल देशात बहुजनांसाठी एकही शाळा सुरु केलि नाही म्हणजे बहुजनांच्या शिक्षणाशी डॉ. राधाकृष्णन यांचा अजिबात संबंध नाही बहुजनाना शिक्षणापासून वंचीत ठेवाण्यासाठी सनातनी लोकांनी अनेक कपटकारस्थाने केली अनेक ग्रंथाद्वारे बहुजनांच्या व स्त्रियांच्या शिक्षणावर सनातनी लोकांनी बंदी घातली हजारो वर्षांची ही बंदी मोडून जोतीराव फुले यांनी बहुजनंना शिक्षणाची दालने खुली केलीत.
  राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी सामाजिक परिवर्तानासाठी शाळा सुरु केली पण शाळा सुरु करण्यास मनुवादी समर्थक लोकांचा कड़क विरोध होता  त्यामुळे शिक्षक मिळने देखील शक्य नव्हते तेंव्हा त्यांनी स्वतः हातात खडू घेउन मुलांना शिकविले अत्यंत तळमळीने शिकविनार्या फुले यांना कोणीही वेतन दिले नाही  गोर-गरीब, अस्पृश्य, अनाथ, भुकेलेल्या मुलांना स्वतः गोळा करून त्यांनी मोफत शिकविले यासाठी त्या काळात त्यांना कोणीही अनुदान, सादिलखर्च, वेतनवाढ इ. दिली नाही त्यांनी गोर-गरिबांना मोफत पण आनंदाने शिकविले
       राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाला प्राथमिक शिक्षक सक्तीचे आणि मोफत करण्यासाठी धारेवर धरले -
भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने १८८२ साली सर विल्यम हंटर यांचे अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात .सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांना बहुजनंना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांनी सांगितले , तेंव्हा १९ ओक्टोबर १८८२ रोजी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर यांची भेट घेतली व एक निवेदन दिले त्यामध्ये जोतीराव फुले म्हणतात की बहुजनांच्या मुलांना वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत द्यावे. सरकारला मिळणांरा महसूल बहुजनांचा आहे या महसुलावर बमनुवादी शिक्षण घेतात पण बहुजनांना शिक्षण घेण्यास विरोध करतात हे कटुसत्य जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. गोर-गरीब, कष्टकारी, कामकारी,शेतकरी,यांच्या मुलांना शिक्षण मिलावे यासाठी इंग्रज सरकारला जोतीराव फुले यांनी धारेवर धरले , राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी स्वतःची मिळकत शिक्षणांसाठी खर्च केली
मनुन त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा न करणे हा  देशाचा, शिक्षण क्षेत्राचा अपमान आहे.
जोतीराव फुले यांनी रात्रं दिन अखंड श्रम करून पैसा उभा केला ते नामवंत बांधकाम तद्न्य होते खडकवासला धरण, कात्रज घाट, पुण्यातील, अनेक पुल, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल(मुंबई)इ. बांधकामे केलि त्यातून मिळालेल्या पैश्यातुन बहुजनांसाठी शाळा काढल्या. त्यांनी स्वतःचा विचार केला असता तर खूप श्रीमंत झाले असते. पण त्यांनी गरीब बहुजनंना श्रीमंत करण्यासाठी आयुष्य व पैसा मुला मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला. व्यक्तिगत हित, हौस, सुख दूर सारून जोतीराव फुले आणि त्यांच्या सौभाग्यवती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरु केल्या बहुजनांना शिक्षण मिळाल्याशिवाय हजारो वर्षांची गुलामगिरी संपणार नाही यासाठी जोतीराव फुले यांनी स्वखार्चाने शाळा सुरु केल्या म्हणजे निस्वार्थपणे जोतीराव तथा तात्यांनी शाळा सुरु केल्या.  म्हणून ज्योतिबा फुले यांच्या नावाने शिक्षक दिवस साजरा करावा

उत्तर लिहिले · 5/9/2017
कर्म · 2690