शिक्षण देव भाषण शिक्षक दिन

शिक्षक दिवस या विषयावर भाषण, माहिती आणि निबंध मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

शिक्षक दिवस या विषयावर भाषण, माहिती आणि निबंध मिळेल का?

5
गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`

आज ५ सप्टेंबर... शिक्षक दिन... शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते... त्याचमुळे या दिवसाला फार महत्त्व आहे.

आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस... हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती.... शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.

शिक्षक दिन हा केवळ भारतातच साजरा केला जातो असं नाही... जगभरात वेगवेगळ्या दिवशी का होईना पण हा दिवस साजरा करतात. युनेस्कोनं ५ ऑक्टोबर हा आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केलाय. पण, भारतात मात्र राधाकृष्ण यांच्या सन्मानार्थ ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९६२ साली ते राष्ट्रपतीपदावर विराजन झाले होते. तेव्हा काही शिष्य आणि प्रशंसकांनी त्यांना त्यांचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली. ‘माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणं माझ्यासाठी गौरवास्पद आहे’ असं त्यावेळी राधाकृष्ण यांनी सांगितलं. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकं मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो, असं त्यांचं म्हणणं होतं...

जगभरातील शिक्षक दिन...
चीनमध्ये १९३१ मध्ये ‘नॅशनल सेन्ट्रल यूनिव्हर्सिटी’मध्ये शिक्षक दिनाची सुरूवात करण्यात आली. चीनी सरकारकडून मात्र १९३२ मध्ये या दिवसाला स्वीकृती मिळाली.

त्यानंतर १९३९ मध्ये कन्फ्यूशिअसचा जन्मदिवस, २७ ऑगस्ट हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला... पण त्यानंतर पुन्हा १९५१मध्ये हा निर्णय रद्द करण्यात आला. त्यानंतर १९८५ मध्ये १० सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला.

आता मात्र पुन्हा एकदा अनेक लोकं कन्फ्युशिअसचाच वाढदिवस शिक्षक दिन म्हणून घोषित करण्याची मागणी करत आहेत. रशियामध्ये १९६५ ते १९९४ पर्यंत ऑक्टोबर महिन्यातील पहिला रविवार शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात होता. १९९४ सालापासून युनेस्कोच्या निर्णयानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून स्वीकारला.
उत्तर लिहिले · 3/9/2018
कर्म · 13485
4
शिक्षक विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देणारा मूर्तिकार असतो. आपला विद्यार्थी पुढे समाजात आदर्श म्हणून वागला पाहिजे असेच संस्कार शिक्षक विद्यार्थ्यांवर घडवतात. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी देवासमान असतात. विद्यार्थ्यांना योग्य ते संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. अजून वाचा...https://bit.ly/3Q7qsF9
उत्तर लिहिले · 1/9/2022
कर्म · 790
0
शिक्षक दिवस

शिक्षक दिवस हा भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी, विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करतात. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान आणि मार्गदर्शन देतात, त्यामुळे ते आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहेत.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला होता. ते एक महान शिक्षक, तत्वज्ञानी आणि विद्वान होते. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि आपल्या जीवनातील मोठा भाग शिक्षण क्षेत्रात समर्पित केला. त्यांच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी, त्यांच्या जन्मदिवसाला शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.

शिक्षक दिनाचे महत्त्व:

  • शिक्षकांचा सन्मान करणे.
  • शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या योगदानाला समजून घेण्यास मदत करणे.

शिक्षक दिनाची माहिती:

  • सुरुवात: १९६२
  • कोणामुळे: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
  • कधी: ५ सप्टेंबर

शिक्षक दिनाचे भाषण:

आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो,

आज आपण शिक्षक दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत. हा दिवस आपल्या जीवनातील शिक्षकांच्या योगदानाला आदराने स्मरण करण्याचा दिवस आहे. शिक्षक हे आपल्या जीवनातील मार्गदर्शक असतात. ते आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञानच देत नाहीत, तर चांगले नागरिक बनण्यास मदत करतात.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हटले होते, "शिक्षण हे जीवनाचे सार आहे आणि शिक्षक हे त्या जीवनाचे शिल्पकार आहेत."

शिक्षकांनी आपल्याला ज्ञान, नैतिकता आणि संस्कृतीचे महत्त्व शिकवले. त्यामुळे आज आपण जे काही आहोत, ते त्यांच्यामुळेच आहोत.

मी माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

धन्यवाद!

टीप: ही माहिती केवळ संदर्भासाठी आहे. तुम्ही आपल्या गरजेनुसार यात बदल करू शकता.

अधिक माहितीसाठी आपण Wikipedia (https://mr.wikipedia.org/wiki/शिक्षक_दिवस) किंवा इतर विश्वसनीय शैक्षणिक संकेतस्थळांना भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

5 सप्टेंबर: शिक्षक दिनानिमित्त विशेष माहिती?
शिक्षक दिनाविषयी माहिती मिळेल का?
शिक्षक दिनावर कविता?
शिक्षक दिनाच्या दिवशी हजार रुपयांपर्यंत सर्व शिक्षकांना एकत्रितपणे कोणता गिफ्ट घ्यावा?
कॉलेजमध्ये शिक्षक दिन साजरा करायचा आहे, तर कशा प्रकारे करावा? सहकार्य करा.
खरा शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करायला पाहिजे? ५ सप्टेंबर की २८ नोव्हेंबर? सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापेक्षा ज्योतिराव फुले यांचे कार्य महान आहे?