शिक्षण उच्च शिक्षण दिनदर्शिका सर्वप्रथम शिक्षक दिन

खरा शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करायला पाहिजे? ५ सप्टेंबर की २८ नोव्हेंबर? सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापेक्षा ज्योतिराव फुले यांचे कार्य महान आहे?

3 उत्तरे
3 answers

खरा शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करायला पाहिजे? ५ सप्टेंबर की २८ नोव्हेंबर? सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापेक्षा ज्योतिराव फुले यांचे कार्य महान आहे?

17

   *क्रांतिसूर्य राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या नावाने शिक्षक दिवस साजरा करण्यात यावा.

            डॉ. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतो पण हा दिवस लोकउत्सवाच्या रुपाने साजरा होत नाही तर शासकीय पातळीवर साजरा होतो. ज्या महापुरुषांनी परिवर्तनाचे प्रामाणिक कार्य केले आहे त्यांचेच उत्सव लोकउत्सवाच्या रुपाने साजरे होतात डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षकदिन म्हणून साजरा करतो.परंतु बहुजनांच्या शिक्षणाचे कैवाली राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या नावाने शिक्षक दिवस साजरा करावा
           राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली झाला. तर डॉ.राधाकृष्णन यांचा जन्म २० सप्टेंबर १८८७ रोजी झाला ५ सप्टेंबर १८८८ हा दिवस चुकीचा आहे.असे डॉ. राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल यांनी नमूद केला आहे.म्हणजे जोतीराव फुले यांच्यापेक्षा डॉ. राधाकृष्णन हे ६० वर्षांनी लहान होते जोतीराव फुले यांनी १८४८ साली देशातील पहिली मुलींसाठी शाळा सुरु केलि  १८५२ साली बहुजन मुलांसाठी शाळा सुरु केली म्हणजे डॉ.राधाकृष्णन यांच्या जन्माच्या अगोदर ४० वर्षापूर्वी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी देशातील पहिली शाळा सुरु केलि. म्हणजे जोतीराव फुले हेच भारतीय शिक्षणाचे आद्याजनक आहेत हे निर्विवाद सत्य होते जोतीराव फुले यांनी शाळा सुरु करण्यापूर्वी या देशात बहुजनांसाठी कोणीही शाळा सुरु केलि नाही राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्यामुलेच भारतीयांना शिक्षणाची संधि मिळाली शिक्षणाचा महत्व सांगणारे अत्यंत हृदयस्पर्शी विचार भारतात प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले म्हणून राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या नावाने शिक्षक दिवस मनुन साजरा करावा.
      शिक्षणाअभावी देशातील बहुजनांची कशी वाईट अवस्था झालेली आहे याचे विदारक चित्र प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले आणि एका वर्षातच २० शाळा सुरु केल्या यावेळी डॉ. राधाकृष्णन यांचा तिर्थारुपांचा ही जन्म झाला नव्हता तेंव्हाच जोतीराव फुले यांनी देशात शाळा सुरु केल्या होत्या  डॉ. राधाकृष्णन यांनी जन्मानंतर देखिल देशात बहुजनांसाठी एकही शाळा सुरु केलि नाही म्हणजे बहुजनांच्या शिक्षणाशी डॉ. राधाकृष्णन यांचा अजिबात संबंध नाही बहुजनाना शिक्षणापासून वंचीत ठेवाण्यासाठी सनातनी लोकांनी अनेक कपटकारस्थाने केली अनेक ग्रंथाद्वारे बहुजनांच्या व स्त्रियांच्या शिक्षणावर सनातनी लोकांनी बंदी घातली हजारो वर्षांची ही बंदी मोडून जोतीराव फुले यांनी बहुजनंना शिक्षणाची दालने खुली केलीत.
  राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी सामाजिक परिवर्तानासाठी शाळा सुरु केली पण शाळा सुरु करण्यास मनुवादी समर्थक लोकांचा कड़क विरोध होता  त्यामुळे शिक्षक मिळने देखील शक्य नव्हते तेंव्हा त्यांनी स्वतः हातात खडू घेउन मुलांना शिकविले अत्यंत तळमळीने शिकविनार्या फुले यांना कोणीही वेतन दिले नाही  गोर-गरीब, अस्पृश्य, अनाथ, भुकेलेल्या मुलांना स्वतः गोळा करून त्यांनी मोफत शिकविले यासाठी त्या काळात त्यांना कोणीही अनुदान, सादिलखर्च, वेतनवाढ इ. दिली नाही त्यांनी गोर-गरिबांना मोफत पण आनंदाने शिकविले
       राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाला प्राथमिक शिक्षक सक्तीचे आणि मोफत करण्यासाठी धारेवर धरले -
भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने १८८२ साली सर विल्यम हंटर यांचे अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात .सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांना बहुजनंना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांनी सांगितले , तेंव्हा १९ ओक्टोबर १८८२ रोजी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर यांची भेट घेतली व एक निवेदन दिले त्यामध्ये जोतीराव फुले म्हणतात की बहुजनांच्या मुलांना वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत द्यावे. सरकारला मिळणांरा महसूल बहुजनांचा आहे या महसुलावर बमनुवादी शिक्षण घेतात पण बहुजनांना शिक्षण घेण्यास विरोध करतात हे कटुसत्य जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. गोर-गरीब, कष्टकारी, कामकारी,शेतकरी,यांच्या मुलांना शिक्षण मिलावे यासाठी इंग्रज सरकारला जोतीराव फुले यांनी धारेवर धरले , राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी स्वतःची मिळकत शिक्षणांसाठी खर्च केली
मनुन त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा न करणे हा  देशाचा, शिक्षण क्षेत्राचा अपमान आहे.
जोतीराव फुले यांनी रात्रं दिन अखंड श्रम करून पैसा उभा केला ते नामवंत बांधकाम तद्न्य होते खडकवासला धरण, कात्रज घाट, पुण्यातील, अनेक पुल, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल(मुंबई)इ. बांधकामे केलि त्यातून मिळालेल्या पैश्यातुन बहुजनांसाठी शाळा काढल्या. त्यांनी स्वतःचा विचार केला असता तर खूप श्रीमंत झाले असते. पण त्यांनी गरीब बहुजनंना श्रीमंत करण्यासाठी आयुष्य व पैसा मुला मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला. व्यक्तिगत हित, हौस, सुख दूर सारून जोतीराव फुले आणि त्यांच्या सौभाग्यवती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरु केल्या बहुजनांना शिक्षण मिळाल्याशिवाय हजारो वर्षांची गुलामगिरी संपणार नाही यासाठी जोतीराव फुले यांनी स्वखार्चाने शाळा सुरु केल्या म्हणजे निस्वार्थपणे जोतीराव तथा तात्यांनी शाळा सुरु केल्या.  म्हणून ज्योतिबा फुले यांच्या नावाने शिक्षक दिवस साजरा करावा

उत्तर लिहिले · 5/9/2017
कर्म · 2690
5
भारत देशात निम्न कुलातील महान व्यक्तीला पाहिजे तेवढ न्याय मिळालच नाही।
सर्वांना माहिती आहे की महात्मा जोतीराव फुले यांचे कार्य सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्यापेक्षा कितीतरी मोठे आहे।
जोतीराव फुले यांचे शैक्षणिक कार्य खाली दिले आहे।

महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.

“विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।”

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्‌र्‍य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती दिली.जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. महात्मा फुले हे थोर नेते होऊन गेले आहे. त्यांनी मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली.

उत्तर लिहिले · 5/9/2017
कर्म · 7045
0

शिक्षक दिन कधी साजरा करायला पाहिजे याबद्दल तुमचे मत debatable असू शकते, तरीही या दोन्ही दिवसांचे महत्त्व आणि त्या संबंधित व्यक्तींचे योगदान खालीलप्रमाणे:

५ सप्टेंबर:
  • हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
  • डॉ. राधाकृष्णन एक थोर तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. (अधिक माहितीसाठी येथे पहा)
  • त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाला आदराने गौरवण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे.
२८ नोव्हेंबर:
  • महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी काही लोक या दिवशी शिक्षक दिन साजरा करण्याच्या बाजूने आहेत.
  • ज्योतिराव फुले यांनी समाजातील दुर्बळ घटकांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले. (अधिक माहितीसाठी येथे पहा)
  • त्यांच्या कार्यामुळे शिक्षणाचे महत्त्व समाजाला नव्याने समजले.

कोण महान?

सर्वपल्ली राधाकृष्णन आणि ज्योतिराव फुले दोघांचेही आपापल्या क्षेत्रात मोठे योगदान आहे. दोघांनीही शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यामुळे कोणाला महान ठरवावे हा एक व्यक्तिनिष्ठ प्रश्न आहे.

अखेरीस, शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करायचा हे ज्याच्या त्याच्या मतावर अवलंबून आहे.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

5 सप्टेंबर: शिक्षक दिनानिमित्त विशेष माहिती?
शिक्षक दिनाविषयी माहिती मिळेल का?
शिक्षक दिनावर कविता?
शिक्षक दिनाच्या दिवशी हजार रुपयांपर्यंत सर्व शिक्षकांना एकत्रितपणे कोणता गिफ्ट घ्यावा?
कॉलेजमध्ये शिक्षक दिन साजरा करायचा आहे, तर कशा प्रकारे करावा? सहकार्य करा.
शिक्षक दिवस या विषयावर भाषण, माहिती आणि निबंध मिळेल का?