भारत पुरस्कार भारतरत्न

भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला कोणत्या सुविधा मिळतात?

3 उत्तरे
3 answers

भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला कोणत्या सुविधा मिळतात?

3
🏅 *भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला मिळतात 'या' सुविधा*

*🔰📶महा डिजी । भारतरत्न*

💁‍♂️ भारतामध्ये एखाद्या क्षेत्रात भरीव आणि अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला भारतातील सर्वांत मानाचा आणि सर्वोच्च असा 'भारतरत्न' हा सन्मान दिला जातो. पुरस्कार मिळाल्यानंतर सदरील व्यक्तीला खाली नमूद केलेल्या सुविधा मिळतात.

▪️ *VVIP समकक्ष :* भारतरत्नप्राप्त व्यक्तीला Very Very Important Person (VVIP) अर्थात ‘अति अति महत्वाची व्यक्ती’ असा दर्जा असलेल्या समकक्ष दर्जा दिला जातो.

▪️ *संसदेच्या बैठका/चर्चासत्रात सहभाग :* भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला संसद याठिकाणी होणाऱ्या बैठकांमध्ये तसेच चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत मिळते

▪️ *मोफत रेल्वे/विमानप्रवास :* भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला देशभरात कुठेही रेल्वे आणि एयर इंडिया विमानाच्या प्रथम श्रेणीतून मोफत प्रवास करता येतो.

▪️ *Z सुरक्षा (आवश्यकता असल्यास) :* सरकारकडून भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला आवश्यकता असल्यास Z सुरक्षा पुरवली जाते.

▪️ *विदेश तसेच देशान्तर्गत दौरा :* भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्ती विदेशात गेल्यास तेथील भारतीय दूतावासातर्फे शक्य तितक्या सुविधा पुरवल्या जातात. तसेच भारतातही कुठल्याही राज्यात सदरील पुरस्कारप्राप्त व्यक्ती गेल्यास त्या राज्यातील अतिथिगृहाची मोफत सुविधा सदरील व्यक्तींसाठी ते राज्य सरकार देते.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 26/8/2020
कर्म · 569245
2
भारतरत्न विजेत्यांच्या सुविधा
‘भारतरत्न’ विजेत्याला खालील सुविधा मिळतात :

‘व्हीव्हीआयपी’च्या समकक्ष श्रेणी
संसदेच्या बैठका व सत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत.
भारतीय प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन समारंभात सन्माननीय अतिथी.
भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचे मोफत विमान व रेल्वे प्रवास तिकिट.
पंतप्रधानांच्या वेतनाएवढे किंवा त्याच्या ५०% एवढे निवृत्ती वेतन.
आवश्यकेनुसार ‘झेड’ श्रेणीची सुविधा.
माजी पंतप्रधान, केंद्र सरकारमधील कॅबिनेट स्तराचे मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता, भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेअरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नंतरच्या सातव्या स्थानाच्या दर्जाचा सन्मान ‘भारतरत्न’ विजेत्या व्यक्तीला दिलेला आहे.
उत्तर लिहिले · 11/10/2020
कर्म · 6750
0
भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला मिळणाऱ्या सुविधा खालीलप्रमाणे:
  • सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभाग: भारतरत्न पुरस्कार विजेत्यांना सरकारी कार्यक्रमांमध्ये विशेष निमंत्रण आणि मानाचे स्थान दिले जाते.
  • संसदेच्या बैठकांमध्ये उपस्थिती: त्यांना संसदेच्या बैठकांमध्ये सहभागी होण्याची परवानगी असते.
  • Cabinet Rank: भारतरत्न पुरस्कार विजेत्या व्यक्तीला Cabinet मंत्री पदाचा दर्जा दिला जातो.
  • प्रवास सुविधा:
    • भारतात कुठेही प्रवास करताना त्यांना First Class AC मध्ये मोफत प्रवासाची सुविधा मिळते.
  • इतर सुविधा: राज्य सरकारे आपापल्या स्तरावर त्यांना विविध सुविधा देऊ शकतात.

अधिक माहितीसाठी, आपण गृह मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: गृह मंत्रालय, भारत सरकार

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 3000

Related Questions

भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण?
आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे?
आपल्या देशाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे?
भारत देशाबाहेरील व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार देता येईल काय?
भारतरत्न पुरस्कारांविषयी सविस्तर माहिती सांगा.
भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी अगोदर पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला असणे आवश्यक आहे का?
भारतरत्न पुरस्कार लेटेस्ट कोणाला मिळाला आहे?