पर्यटन
महाभारत
ऐतिहासिक ठिकाणे
इतिहास
महाराष्ट्राचा इतिहास
नाशिक येथील पांडव लेणीबद्दल माहिती द्या? तिथे पांडव वास्तव्य करत होते का?
2 उत्तरे
2
answers
नाशिक येथील पांडव लेणीबद्दल माहिती द्या? तिथे पांडव वास्तव्य करत होते का?
6
Answer link
पांडव लेणी या नाशिकमध्ये ‘पांडवलेणी’ या नावानेच ओळखल्या जाणार्या डोंगरावर आहेत. याच लेणींमध्ये प्रथम ‘लेण’ हा शब्द आला व त्यापासून पुढे ‘लेणी’ हा शब्द तयार झाला. यामध्ये एकूण २४ लेण्या असून त्या सर्व हीनयान पंथीय (बौद्ध धर्मीय) आहेत. १२०० वर्षांपूर्वी या लेण्यांची निर्मिती झाली. या लेणी पूर्व दिशेला तोंड करून असल्यामुळे तेथून सूर्योदयाचे सुंदर दर्शन होते. या लेणींमधील ‘चैत्य’ ही लेणी खूप सुंदर आहे. या लेण्यांमध्ये असणार्या बोधिसत्व, गौतम बुद्ध यांच्या मूर्तींना स्थानिक जनता पाच पांडवांच्या मूर्ती समजते. त्यामुळे कदाचित या लेण्यांना पांडव लेणी म्हणत असावेत, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात.

पांडव लेण्यात सुमारे ३० दगडात कोरलेल्या प्राचीन गुहा बघायला मिळतात.

प्रत्येक गुहा ही स्वर्गीय निवासस्थानासारखी वाटते. साधारण २० मिनिटांचे ट्रेकिंग करून गेल्यांनतर नजरेस पडणारे सौंदर्य हे असीम शांतता देऊन जाते. जरी याला ट्रेकिंग म्हटले आहे तरी येथे बांधीव जिने असल्याने चढून जाणे अगदीच सोपे होते. पांडव लेणी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये दक्षिणेस स्थित आहे. या गुहांना “विहार” म्हटले जाते.

या गुहा जितक्या सुंदर आणि सुबक डिझाईन केलेल्या आहेत तितकेच त्या काळचे स्थापत्यशास्त्रसुद्धा किती विकसित होते याचा नमुना या लेण्यांची पाणीपुरवठा योजना बघून सहज येतो. यामध्ये पाण्याच्या टाक्यासुद्धा कुशलतेने कोरलेल्या आहेत. या गूढ वाटणाऱ्या गुहा, सुंदर कोरीवकाम केलेले हे स्तूप बघून, हे काम करतांना कारागिरांच्या भावनासुद्धा नक्कीच सुंदर असतील.

या लेण्या म्हणजे भारतातील प्राचीन स्थापत्यशात्र आणि संस्कृतीच्या इतिहासातील दागिनाच!!



0
Answer link
नाशिक येथील पांडव लेणी
नाशिक शहराच्या त्र्यंबक मार्गावर पांडवलेणी (Pandavleni Caves) नावाचा लेणीसमूह आहे. ह्या लेण्या अंदाजे 2000 वर्षांपूर्वी कोरलेल्या आहेत. ही लेणी बौद्ध धर्माच्या हीनयान पंथाच्या कलाशैलीचा उत्कृष्ट नमुना आहेत.
लेण्यांची माहिती:
- लेण्यांमध्ये चैत्यगृह, विहार आणि काही स्तूपांचा समावेश आहे.
- लेण्यांमध्ये गौतम बुद्ध आणि बोधिसत्वांच्या मुर्त्या आहेत.
- लेण्यांमधील शिलालेख ब्राह्मी लिपीत आहेत.
पांडवांचा संबंध:
या लेण्यांना पांडव लेणी हे नाव असले तरी त्यांचा संबंध महाभारतातील पांडवांशी नाही. ह्या लेण्या बौद्ध भिक्खूंनी (Buddhist monks) कोरलेल्या आहेत.
भेटीची वेळ:
सकाळी 8:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत लेणी पाहण्यासाठी खुली असतात.
पत्ता:
पांडवलेणी, बुद्ध विहार, नाशिक, महाराष्ट्र ४२२००१
गुगल नकाशा: Pandavleni Caves