Topic icon

ऐतिहासिक ठिकाणे

1
      कुतुबमिनार भारताच्या दक्षिण दिल्ली शहरातील मेहरौली भागात आहे. हा मिनार पाहायला परदेशातून लोक येत असतात. ही वास्तू युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे.
 ‌     

उत्तर लिहिले · 16/9/2022
कर्म · 2530
0

मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) असल्यामुळे, माझा कोणताही गाव किंवा शहर नाही. त्यामुळे, मी तुम्हाला माझ्या गावातल्या ऐतिहासिक साधनांची माहिती देऊ शकत नाही. तरीही, ऐतिहासिक साधनांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

  • स्थानिक इतिहासकारांशी संपर्क साधा: तुमच्या এলাকার इतिहासकारांना तुमच्या परिसरातील ऐतिहासिक साधनांबद्दल अधिक माहिती असू शकते.
  • स्थानिक संग्रहालयाला भेट द्या: अनेक शहरांमध्ये स्थानिक इतिहास आणि संस्कृती जतन करणारी संग्रहालये असतात. तिथे तुम्हाला तुमच्या शहराच्या इतिहासाबद्दल माहिती मिळू शकेल.
  • सरकारी गॅझेटियर (Gazetteer) आणि ऐतिहासिक नोंदी तपासा: सरकारद्वारे प्रकाशित गॅझेटियरमध्ये त्या शहराचा किंवा गावाबद्दलची ऐतिहासिक माहिती दिलेली असते.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2880
1
मला माफ करा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. कारण माझ्याकडे तुमच्या गावाबद्दल कोणतीही माहिती नाही.
उत्तर लिहिले · 10/7/2021
कर्म · 45
0
अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. येथे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. त्यापैकी काही प्रमुख स्थळांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
  • कुलाबा किल्ला:
    हा किल्ला अलिबागच्या समुद्रात असून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. हा किल्ला मराठा आरमारासाठी एक महत्त्वाचा तळ होता. विकिपीडिया
  • कर्णिकची वाडी:
    येथे पुरातन अवशेष आणि मंदिरे आहेत.
  • वृंदावन:
    येथे असलेले वृंदावन हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
  • कन्होजी आंग्रे समाधी:
    कन्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे प्रमुख होते. त्यांची समाधी अलिबागमध्ये आहे. महाराष्ट्र पर्यटन विभाग
  • विक्रम विनायक मंदिर:
    येथे असलेले हे मंदिर एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे.
या व्यतिरिक्त, अलिबागमध्ये अनेक जुन्या वास्तू, मंदिरे आणि ऐतिहासिक अवशेष आहेत, जे या शहराच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतात.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2880
3

http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/08/blog-post_77.html
    सन १९१४ ला सांगलीत महापुर आला त्यावेळची गोष्ट आहे.कृष्णेचा महापुरामुळे सांगलीचा संपर्क तुटला होता. कोल्हापुर व तळ कोकणाशी होणारा व्यापार उदीम थंडावला होता. त्यावेळी  सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन दुसरे यांनी निर्णय घेतला महापुराच्या या कटकटीतुन कायमचा मार्ग काढायचा.
कृष्णेचा या महापुरामुळे जनजिवन विस्कळीत होत होतं. त्यांनी आपल्या दरबारातल्या इंग्रज अधिकाऱ्याशी चर्चा केली आणि सांगलीच्या स्टेट असेंब्लीत एका पुलाचा प्रस्ताव मांडण्यात आला.त्यांच्या मनात होतं प्रचंड असा पुल बांधायचा.
पण इंग्रजाचे राज्य असल्याने त्यांनीही हो ना करत अनेक वर्ष घेतली खर्चाचा प्रश्न होताच.पुलास अंदाजे साडेसहा लाख खर्च अपेक्षित होता.  संस्थानचा इतर खर्च पाहता पैसा अपुरा पडत होता. अन्य कामे यामुळे थांबवावी लागणार होती. राजेसाहेबानी तर फारच मनावर घेतले होते.दिल्ली पर्यन्त पत्रव्यवहार झाला. शेवटी १९२७ साली पुलाला मंजुरी मिळाली.व पुलाचे काम पुण्यातील त्यावेळची प्रसिध्द रानडे कंपनिस हे काम देण्याचे ठरले.
👁- - - - - - - - - - - -●
*_𖣘Mahiti seva group, pethvadgaon𖣘_*
________________________
पायाखुदाई चिंतामणराव पटवर्धनांच्या हस्ते १७ फेब्रुवारी १९२७ रोजी करण्यात आली, व १६ एप्रिलला चिंतामणराव आणि राणीसाहेब यांच्या हस्ते बांधकामाचा पहिला दगड ठेवण्यात आला. पुढे २ वर्षे ९ महिन्यात हा भव्य आणि सुंदर पूल बांधून तयार करण्यात आला.पुलाला त्यावेळच्या  गाॅथिक शैलीचा प्रभाव जाणवतो. नदीच्या तळापासून याची उंची जवळपास ७० फुट आहे. एकूण तेरा मजबूत खांबावर हा पूल उभा आहे. यातीलच एका खांबावर नदीच्या पातळीचे वेगवेगळे माप लिहून ठेवली आहेत.हा पूल बांधताना पटवर्धन राजांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या मदतीने पूररेषेचा अभ्यास केला होता. जर अख्खी सांगली बुडली तरचं हा आयर्विन पूल बुडेल यावरून पाण्याची पातळी समजुन येते. आजही आयर्विन पुलावर पाणी किती आहे त्यावरून महापुराचा अंदाज लावला जातो.  या पुलाला तत्कालीन व्हॉइसरॉय आयर्विन यांचे नाव देण्याचे ठरले.
१८ नोव्हेंबर १९२९ रोजी भारताचे व्हाईसंरॉय एडवर्ड लिंडलेवुड उर्फ  बॅरन आयर्विन ऑफ कर्बी अंडरडेल आणि त्यांची पत्नी उद्घाटनासाठी सांगलीला आले.उदघाटनला सांगलीच्या पंचक्रोशीतुन जनसागर लोटला होता.  भव्य समारंभांनंतर हा आयर्विन पूल सामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला.
९० वर्षानंतरअजुनही हा पुल ताठपणे उभा आहे. वयाची पुटंही दिसतात खरचं तो आता थकतं चाललाय.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/08/blog-post_77.html


6


पांडव लेणी या नाशिकमध्ये ‘पांडवलेणी’ या नावानेच ओळखल्या जाणार्‍या डोंगरावर आहेत. याच लेणींमध्ये प्रथम ‘लेण’ हा शब्द आला व त्यापासून पुढे ‘लेणी’ हा शब्द तयार झाला. यामध्ये एकूण २४ लेण्या असून त्या सर्व हीनयान पंथीय (बौद्ध धर्मीय) आहेत. १२०० वर्षांपूर्वी या लेण्यांची निर्मिती झाली. या लेणी पूर्व दिशेला तोंड करून असल्यामुळे तेथून सूर्योदयाचे सुंदर दर्शन होते. या लेणींमधील ‘चैत्य’ ही लेणी खूप सुंदर आहे. या लेण्यांमध्ये असणार्‍या बोधिसत्व, गौतम बुद्ध यांच्या मूर्तींना स्थानिक जनता पाच पांडवांच्या मूर्ती समजते. त्यामुळे कदाचित या लेण्यांना पांडव लेणी म्हणत असावेत, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात.



पांडव लेण्यात सुमारे ३० दगडात कोरलेल्या प्राचीन गुहा बघायला मिळतात.



​प्रत्येक गुहा ही स्वर्गीय निवासस्थानासारखी वाटते. साधारण २० मिनिटांचे ट्रेकिंग करून गेल्यांनतर नजरेस पडणारे सौंदर्य हे असीम शांतता देऊन जाते. जरी याला ट्रेकिंग म्हटले आहे तरी येथे बांधीव जिने असल्याने चढून जाणे अगदीच सोपे होते. पांडव लेणी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये दक्षिणेस स्थित आहे. या गुहांना “विहार” म्हटले जाते.



​या गुहा जितक्या सुंदर आणि सुबक डिझाईन केलेल्या आहेत तितकेच त्या काळचे स्थापत्यशास्त्रसुद्धा किती विकसित होते याचा नमुना या लेण्यांची पाणीपुरवठा योजना बघून सहज येतो. यामध्ये पाण्याच्या टाक्यासुद्धा कुशलतेने कोरलेल्या आहेत. या गूढ वाटणाऱ्या गुहा, सुंदर कोरीवकाम केलेले हे स्तूप बघून, हे काम करतांना कारागिरांच्या भावनासुद्धा नक्कीच सुंदर असतील.



​या लेण्या म्हणजे भारतातील प्राचीन स्थापत्यशात्र आणि संस्कृतीच्या इतिहासातील दागिनाच!!








उत्तर लिहिले · 13/8/2020
कर्म · 7815
0
 किल्ले नारायणगड 

http://bit.ly/3usIrf7


 _____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_____________________________
आपण या अगोदर महादेवगडाची माहिती घेतली.तर या महादेवगडाचा साथीदार म्हणजेच नारायणगड होय.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना सूपरीचित आहे. या आंबोलीतील "कावळेसाद" पॉंईंट्च्या विरुध्द बाजूस नारायणगड हा किल्ला आहे. पूर्वीच्या काळी कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाट माथ्यांवरील बाजारपेठात जात असे.यापैकी पारपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी नारायणगड हा किल्ला बांधण्यात आला.या गावाजवळच गेळे हे लहानसे गाव आहे.गेळे गावातील काही जून्या जाणत्या माणसांना सोडून नविन पिढीला या किल्ल्या बद्दल काहीही माहिती नाही. तसेच किल्ल्याला जाण्याचा रस्ताही माहित नाही.अशी अवस्था आहे.नारायणगड हा एका खिंडीमुळे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळा झालेले आहे.गेळे गावातून गडावर जातांना फारसा चढ नाही.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,तर ही पायवाट चक्क सरळ व काही ठिकाणी उतार असलेली आहे. माणसांचा या भागात वावर नसल्यामुळे वाटेत व आजूबाजूला घनदाट अरण्य आहे.
*किल्लयाचा इतिहास*
नारायणगड हा सावंतवाडी संस्थानाच्या अनासाहेव फोंड(दुसरे) सावंतांनी बांधला.पारपोली घाटाचे संरक्षण व जकात वसूली केंद्र या किल्ल्यावर होते.नारायणगडाबरोबरच महादेव गडाची बांधणी झालेली आहे.नारायणगड किल्ल्यावर फारसे अवशेष शिल्लक नाहीत. किल्ल्यावर सातेरी देवीचे स्थान आहे. तिथे एका झाडाखाली काही घडीव दगड आहेत पण या जागी मुर्ती मात्र नाही.गावातील लोंकाची हि देवता असावी. तसेच गडावर घराच्या जोत्यांचे काही अवशेष पहायला मिळतात. गडावरून पश्चिमेला मनोहर-मनसंतोष गड , पूर्वेला कावळेसाद पॉंईंट दिसतो. नारायण गडाच्या बाजूला ३ सुळके असलेला डोंगर दिसतो. याला स्थानिक लोक गंगोत्री लगिनवाडा म्हणतात. या सुळक्यांमधील मोठ्या दंडगोलाकार सुळक्याला म्हातारीचा गुंडा (मोठा दगड) म्हणतात. त्याहून लहान सुळक्यांना नवरा व नवरी म्हणतात.ही एक दंतकथा आहे ती गावकरी लोक सांगतात.परत आलेल्या पायवाटेने न जाता पुढील टेकडीवजा डोंगरावर चढल्यास दाट जंगलात दोन देवस्थान आहेत. एकाला स्थानिक लोक लिंगी म्हणतात. येथे शिवलिंग व नंदी आहे. दुसरे देवस्थान म्हार्ताळ या नावाने ओळखले जाते. येथे उघड्यावर काही मुर्त्या आहेत. स्थानिक वाटाड्या असल्या शिवाय या जागा सापडत नाहीत.एक वेगळेपण अनुभवयाला येथे खास जावे.
बरेच पर्यटक आंबोली बरोबर महादेवगड व नारायणगडाची सफर करतात.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव