पर्यटन गडदुर्ग ऐतिहासिक ठिकाणे

नारायणगड बद्दल माहिती द्या?

2 उत्तरे
2 answers

नारायणगड बद्दल माहिती द्या?

0
 किल्ले नारायणगड 

http://bit.ly/3usIrf7


 _____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_____________________________
आपण या अगोदर महादेवगडाची माहिती घेतली.तर या महादेवगडाचा साथीदार म्हणजेच नारायणगड होय.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना सूपरीचित आहे. या आंबोलीतील "कावळेसाद" पॉंईंट्च्या विरुध्द बाजूस नारायणगड हा किल्ला आहे. पूर्वीच्या काळी कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाट माथ्यांवरील बाजारपेठात जात असे.यापैकी पारपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी नारायणगड हा किल्ला बांधण्यात आला.या गावाजवळच गेळे हे लहानसे गाव आहे.गेळे गावातील काही जून्या जाणत्या माणसांना सोडून नविन पिढीला या किल्ल्या बद्दल काहीही माहिती नाही. तसेच किल्ल्याला जाण्याचा रस्ताही माहित नाही.अशी अवस्था आहे.नारायणगड हा एका खिंडीमुळे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळा झालेले आहे.गेळे गावातून गडावर जातांना फारसा चढ नाही.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,तर ही पायवाट चक्क सरळ व काही ठिकाणी उतार असलेली आहे. माणसांचा या भागात वावर नसल्यामुळे वाटेत व आजूबाजूला घनदाट अरण्य आहे.
*किल्लयाचा इतिहास*
नारायणगड हा सावंतवाडी संस्थानाच्या अनासाहेव फोंड(दुसरे) सावंतांनी बांधला.पारपोली घाटाचे संरक्षण व जकात वसूली केंद्र या किल्ल्यावर होते.नारायणगडाबरोबरच महादेव गडाची बांधणी झालेली आहे.नारायणगड किल्ल्यावर फारसे अवशेष शिल्लक नाहीत. किल्ल्यावर सातेरी देवीचे स्थान आहे. तिथे एका झाडाखाली काही घडीव दगड आहेत पण या जागी मुर्ती मात्र नाही.गावातील लोंकाची हि देवता असावी. तसेच गडावर घराच्या जोत्यांचे काही अवशेष पहायला मिळतात. गडावरून पश्चिमेला मनोहर-मनसंतोष गड , पूर्वेला कावळेसाद पॉंईंट दिसतो. नारायण गडाच्या बाजूला ३ सुळके असलेला डोंगर दिसतो. याला स्थानिक लोक गंगोत्री लगिनवाडा म्हणतात. या सुळक्यांमधील मोठ्या दंडगोलाकार सुळक्याला म्हातारीचा गुंडा (मोठा दगड) म्हणतात. त्याहून लहान सुळक्यांना नवरा व नवरी म्हणतात.ही एक दंतकथा आहे ती गावकरी लोक सांगतात.परत आलेल्या पायवाटेने न जाता पुढील टेकडीवजा डोंगरावर चढल्यास दाट जंगलात दोन देवस्थान आहेत. एकाला स्थानिक लोक लिंगी म्हणतात. येथे शिवलिंग व नंदी आहे. दुसरे देवस्थान म्हार्ताळ या नावाने ओळखले जाते. येथे उघड्यावर काही मुर्त्या आहेत. स्थानिक वाटाड्या असल्या शिवाय या जागा सापडत नाहीत.एक वेगळेपण अनुभवयाला येथे खास जावे.
बरेच पर्यटक आंबोली बरोबर महादेवगड व नारायणगडाची सफर करतात.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
0

नारायणगड किल्ला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे. या किल्ल्याविषयी काही माहिती खालीलप्रमाणे:

स्थान:

नारायणगड किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात आहे. हा किल्ला पारनेर शहराच्या पूर्वेला साधारणपणे ८ किलोमीटर अंतरावर आहे.

इतिहास:

नारायणगडाचा इतिहास १६ व्या शतकातील आहे. हा किल्ला निजामशाही आणि मराठा साम्राज्याच्या काळात महत्त्वाचा होता. मराठा साम्राज्यात या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी आणि संरक्षणासाठी केला जात असे.

भौगोलिक वैशिष्ट्ये:

  • नारायणगड एका उंच डोंगरावर वसलेला आहे, ज्यामुळे तो सभोवतालच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी मोक्याचा आहे.
  • किल्ल्याच्या डोंगरावर नैसर्गिकरित्या तयार झालेले खडक आणि गुहा आहेत.

किल्ल्यावरील ठिकाणे:

  • हनुमानाचे मंदिर: किल्ल्यावर हनुमानाचे एक प्राचीन मंदिर आहे.
  • पाण्याचे टाके: किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे, ज्यामुळे दीर्घकाळपर्यंत किल्ल्यात राहणे शक्य होते.
  • टेहळणी बुरूज: टेहळणीसाठी असलेले बुरूज हे किल्ल्याचे महत्त्वाचे भाग आहेत.

नारायणगडावर कसे जावे:

  • जवळचे शहर: अहमदनगर
  • जवळचे रेल्वे स्टेशन: अहमदनगर रेल्वे स्टेशन
  • जवळचे विमानतळ: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ

संदर्भ:

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2920

Related Questions

कुतुबमिनार कुठे आहे?
तुमच्या गावात/शहरातील विविध ऐतिहासिक साधनांची माहिती घ्या?
तुमच्या गावातील शहरातील विविध ऐतिहासिक साधनांची माहिती द्या?
अलिबाग मधील ऐतिहासिक साधनांची नावे काय आहेत?
सांगलीच्या आयर्विन पुला बद्दल माहिती द्या?
नाशिक येथील पांडव लेणीबद्दल माहिती द्या? तिथे पांडव वास्तव्य करत होते का?
वरळी किल्ल्याबद्दल माहिती मिळेल का?