पर्यटन
गडदुर्ग
शिवाजी महाराज
ऐतिहासिक ठिकाणे
इतिहास
महाराष्ट्राचा इतिहास
वरळी किल्ल्याबद्दल माहिती मिळेल का?
2 उत्तरे
2
answers
वरळी किल्ल्याबद्दल माहिती मिळेल का?
0
Answer link
. ‼️वरळीचा किल्ला :‼️
ब्रिटिशांनी १६७५ साली टेहळणीसाठी हा किल्ला बांधला. त्यावर स्थानिक व्यायामशाळेचे अतिक्रमण झाले असून किल्ल्यापर्यंत पोहोचण्याच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. आजूबाजूला कचरा व मलब्याचे ढिगारे साठले असून केवळ पुरातत्त्व खात्याचा फलक तेवढा शाबूत आहे.
२. माहीमचा किल्ला :
राजा भीमदेवने १३व्या शतकात-टेहळणी व संरक्षणासाठी हा किल्ला बांधला. तो आम्ही फक्त बाहेरूनच बघू शकलो.माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,अतिक्रमणामुळे आत जाणे अशक्य होते. आजूबाजूला कचरा व मलब्याचे ढिगारे साठले आहेत. किल्ल्याची समुद्राची बाजू प्रातर्विधीसाठी वापरण्यात येत असल्यामुळे त्या बाजूने आत प्रवेश अशक्य होतो. पुरातत्त्व खात्याचा फलक तेवढा शाबूत आहे.
३. वांद्रे किल्ला :
पोर्तुगीजांनी १६४० साली टेहळणी व गोडय़ा पाण्याच्या साठय़ासाठी हा किल्ला बांधला. या किल्ल्यावर खासगी नियंत्रण आहे. सुरक्षारक्षकांकडे ओळखपत्र नाही, या गोष्टीची आम्ही पोलिसांकडे तक्रार केली. किल्ल्याच्या परिसरात प्रेमी युगुलं बसली असल्यामुळे सर्वसाधारण लोकांना कुटुंबासह फिरणे अशक्यप्राय आहे. पुरातत्त्व खात्याचा फलक शाबूत आहे.
४. धारावी किल्ला :
ब्रिटिशांनी १७७३ साली टेहळणीसाठी हा किल्ला बांधला. किल्ल्यावर जाण्यासाठी लाकडी पायऱ्यांशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. किल्ल्यावर पूर्णपणे कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य आहे. आजूबाजूचा व किल्ल्याचा परिसर झोपडपट्टीने व्यापलेला, त्यामुळे किल्ल्याचे निरीक्षण करणे अशक्य होते. किल्ल्याच्या तळघराकडे जाणारा मार्ग गटाराने व्यापलेला आहे. आजूबाजूला कचरा व मलब्याचे ढिगारे साठले असून पुरातत्त्व खात्याचा फलक जागेवर नाही.
५. सायन किल्ला :
१६३९ साली टेहळणीसाठी ब्रिटिशांनी बांधला. किल्ला व बाजूच्या बागेमध्ये कोणतेही विभाजन नाही. पुरातत्त्व खात्याचा फलक फक्त एकाच बाजूला शाबूत. बाग व किल्ल्याच्या मधील जागेत फलक नाही.
६. शिवडी किल्ला :
१६८० साली टेहळणीसाठी ब्रिटिशांनी बांधला. किल्ला बराचसा सुस्थितीत, परंतु याच स्थितीत राहील याची शाश्वती नाही. किल्ल्याच्या आतमध्ये क्रिकेटचे सामने सुरू होते. किल्ल्याच्या आत बसून लोक दारू पीत होते. पुरातत्त्व खात्याचा फलक शाबूत आहे.
मुंबईसारख्या शहरात असलेले हे किल्ले अतिशय वाईट परिस्थितीत असून त्यांची पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे.
अनिल

`
`
वरळी किल्ला: इतिहास आणि माहिती
वरळी किल्ला मुंबईच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा किल्ला १७ व्या शतकात ब्रिटिशांनी बांधला होता. या किल्ल्याचा उद्देश होता ब्रिटिशांच्या जहाजांचे आणि मालाचे समुद्री मार्गाने होणारे हल्ल्यांपासून संरक्षण करणे.
किल्ल्याची रचना:
- वरळी किल्ला डोंगरीवर वसलेला आहे, ज्यामुळे तो आसपासच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी मोक्याचा ठरतो.
- किल्ल्यात मजबूत तटबंदी आहे, जी शत्रूंना रोखण्यासाठी बांधली गेली होती.
- किल्ल्याच्या आत तोफा व इतर शस्त्रे ठेवण्यासाठी जागा आहे.
आजची स्थिती:
आज वरळी किल्ला एक ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखला जातो. पर्यटक या किल्ल्याला भेट देतात आणि त्या वेळच्या इतिहासाची माहिती घेतात. किल्ल्यावरून दिसणारे समुद्राचे दृश्य खूप सुंदर असते.
स्थळ: वरळी सी फेस, मुंबई.
वरळी किल्ला मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार आहे आणि आजही तो आपल्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे.