घशात खूप दुखते, खवखव होते उपाय सांगा?
घसा दुखण्याचे एक नेहमीचे कारण म्हणजे अॅलर्जिक ऱ्हायनायटिस.
ऋतू बदलल्यावर किंवा विशिष्ट ऋतुमानात किंवा वर्षभरही त्रास होऊ शकतो.
> जे धूम्रपान करीत नाहीत, त्यांनाही त्रास होऊ शकतो.
> डोळे, नाक व घशात खाज सुटू शकते, डोळे लाल होतात, पापण्यादेखील सुजतात.
> सर्दीवरील गोळीमध्ये स्यूडो इफिड्रिन नावाचा एक घटक असतो. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, मधुमेह वाढू शकतो, हृदयविकाराला आमंत्रण होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.
> योगशास्त्रामध्ये प्राणायाम, भास्त्रिका, काही ठराविक योगासने व जलनेती हे अत्यंत प्रभावी उपचार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच ते करावेत.
> काही पेशंटना घशात गाठ असण्यासारखे वाटते. त्यांचा आवाज बसतो.
> गरम पाण्याची वाफ घेणे, ज्येष्ठमधाची काडी चघळणे, कोमट पाणी पिणे, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे असे प्राथमिक उपचार करता येतील.
> विश्रांती, सकस आहार व योग्य औषधोपचार घेतल्यास आजाराची लक्षणे कमी होऊन पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.
> मानेत गाठी येणे, ताप न जाणे, गिळताना किंवा जांभई देताना त्रास होणे, अति लाळ गळणे असे त्रास होत असल्यास डॅाक्टरांचा सल्ला घ्यावा.
लक्षणे
> सर्दी, सायनसमुळे
> तोंडाच्या कॅन्सरमुळे
> घसा कोरडा पडल्याने
काही पेशंटमध्ये घसा दुखण्याची तक्रार वारंवार आढळते. ही सामान्य तक्रार आहे, असे समजू नये. वारंवार घसा दुखत असेल तर त्यामुळे स्वरयंत्रावर ताण येऊन आवाज जाण्याचा धोकाही असतो. घसा नेमका कोणत्या कारणांमुळे दुखतो, त्यावर उपाय कोणते हे जाणून घेऊया…
घसा दुखण्याचे एक नेहमीचे कारण म्हणजे अॅलर्जिक ऱ्हायनायटिस.
ऋतू बदलल्यावर किंवा विशिष्ट ऋतुमानात किंवा वर्षभरही त्रास होऊ शकतो.
> जे धूम्रपान करीत नाहीत, त्यांनाही त्रास होऊ शकतो.
> डोळे, नाक व घशात खाज सुटू शकते, डोळे लाल होतात, पापण्यादेखील सुजतात.
> सर्दीवरील गोळीमध्ये स्यूडो इफिड्रिन नावाचा एक घटक असतो. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, मधुमेह वाढू शकतो, हृदयविकाराला आमंत्रण होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.
> योगशास्त्रामध्ये प्राणायाम, भास्त्रिका, काही ठराविक योगासने व जलनेती हे अत्यंत प्रभावी उपचार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच ते करावेत.
> काही पेशंटना घशात गाठ असण्यासारखे वाटते. त्यांचा आवाज बसतो.
> गरम पाण्याची वाफ घेणे, ज्येष्ठमधाची काडी चघळणे, कोमट पाणी पिणे, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे असे प्राथमिक उपचार करता येतील.
> विश्रांती, सकस आहार व योग्य औषधोपचार घेतल्यास आजाराची लक्षणे कमी होऊन पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.
> मानेत गाठी येणे, ताप न जाणे, गिळताना किंवा जांभई देताना त्रास होणे, अति लाळ गळणे असे त्रास होत असल्यास डॅाक्टरांचा सल्ला घ्यावा.
लक्षणे
> सर्दी, सायनसमुळे
> तोंडाच्या कॅन्सरमुळे
> घसा कोरडा पडल्याने
> तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असल्यास
> अॅलर्जी, प्रदूषण किंवा धूळ असलेल्या ठिकाणी राहिल्यास
> मोठ्याने बोलल्याची सवय असल्याने
> दारू पिणे, धूम्रपान, उष्ण ठिकाणी काम करणे
रोगनिदान
घसा सुजला तर घशाची पाठभिंत लालसर दिसते. टॉन्सिलच्या गाठी सुजल्या असतील तर त्या नेहमीपेक्षा मोठ्या दिसतात. गाठींचा पृष्ठभाग लालसर दिसतो.
> कधीकधी टॉन्सिलवर पांढरट (पू) ठिपके दिसतात.
> घसासूज असो की टॉन्सिलसूज, गळ्याचील रसग्रंथी सुजणे, दुखणे ही बहुतेक वेळा आढळणारी खूण आहे.
> कधीकधी एका बाजूच्या टॉन्सिलच्या मागे पू जमून त्या बाजूची सूज मोठी दिसते. अशा आजारात मात्र पेशंटला तज्ज्ञाकडे पाठवणेच योग्य ठरेल.
>घशाची तपासणी करण्यासाठी जीभ खाली दाबून धरण्यासाठी साधा स्वच्छ चमचा वापरावा. नीट दिसण्यासाठी बॅटरीचा उजेड किंवा सूर्यप्रकाश लागतो.
प्राथमिक उपचार
> गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. गरम दूध-हळद प्यायला द्यावी. या उपायांनी घशाला शेक मिळून लवकर आराम पडतो. बऱ्याच वेळा केवळ इतक्या उपायानेच घसासूज कमी होते. गुळण्या दिवसातून चार-पाच वेळा कराव्यात.
> लाळ सुटण्यासाठी खडीसाखर, हळद-गूळ गोळी अधूनमधून तोंडात ठेवावी.
> जंतूदोष आटोक्यात आणण्यासाठी एमॉक्सी गोळ्या उपयुक्त आहेत. लहान मुलांना पातळ औषध देणे सोपे पडते. तयार औषध न मिळाल्यास वरील गोळीचे चूर्ण साखरपाणी किंवा मधातून देता येते.
राजे
- मिठाच्या पाण्याने गुळण्या करा:
½ चमचा मीठ गरम पाण्यात मिसळून दिवसातून 2-3 वेळा गुळण्या करा.
उदाहरण: गरम पाण्यात मीठ टाकून गुळणी केल्याने घशाला आराम मिळतो. - मध:
मधामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. गरम पाण्यात मध मिसळून प्या किंवा दिवसातून 1-2 चमचे मध खा.
उदाहरण: मधामुळे घसा शांत होतो आणि खवखव कमी होते. - आल्याचा चहा:
आल्यामध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. आल्याचा चहा प्यायल्याने घशाला आराम मिळतो.
उदाहरण: आल्याचा चहा घशातील खवखव कमी करतो. - लिंबू आणि मध:
गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्या. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
उदाहरण: लिंबू आणि मध घशाला आराम देतात. - पुरेशी विश्रांती घ्या:
शरीराला आराम देणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे लवकर बरे वाटेल.
- गरम वाफ घ्या:
गरम पाण्याची वाफ घेतल्याने घशातील खवखव कमी होते आणि श्वास घेणे सोपे होते.
उदाहरण: वाफ घेतल्याने घसा मोकळा होतो. - डॉक्टरांचा सल्ला घ्या:
जर तुमचा घसा जास्त दुखत असेल आणि आराम मिळत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.