सर्दी आणि खोकला
1
Answer link

गोठलेला कफ दूर करण्यासाठी घरगुती उपचार
बदलत्या हंगामात लोकांच्या छातीत आणि घशात अनेकदा कफ होतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि छातीत सतत घट्टपणा जाणवतो. यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही अनेक औषधे वापरता. यामुळे काही काळ आराम मिळतो पण समस्या पूर्णपणे संपत नाही. हा गोठलेला कफ दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत चला जाणून घेऊ या -
1 निलगिरी तेल -
निलगिरीच्या तेलाने घसा आणि छातीला मसाज करा आणि या तेलाचे काही थेंब नाकात टाका. हा उपाय फार लवकर प्रभाव दाखवतो. त्याचे काही थेंब पाण्यात टाकून सकाळी आणि संध्याकाळी सेवन करा.
2 मध आणि गरम पाणी -
एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून त्याचे सेवन करा. यामुळे गोठलेला कफ सहज निघून जाईल. छाती मोकळी करण्यासाठी मध उपयुक्त आहे. पाणी गरम करताना आल्याचा एक तुकडा टाकल्यास त्याचा परिणाम लवकर होतो.
3 काळी मिरी आणि मध -
काळी मिरी सर्व प्रकारचे संक्रमण दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. गोठलेल्या कफपासून सुटका मिळवण्यासाठी चिमूटभर काळी मिरी पावडर एक चमचा मधात मिसळून घ्या. हा उपाय आठवडाभर सतत करा, आराम मिळेल.
4 कच्ची हळद खाणे -
कच्ची हळद सर्व प्रकारचे बॅक्टेरियाचे संक्रमण दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. कच्ची हळद पाण्यात उकळून त्याचे सेवन करा. त्यामुळे गोठलेला कफ आरामात निघून जाईल. यासोबतच कफामुळे होणाऱ्या खोकल्याची समस्याही दूर होईल कारण हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
5 तुळस आणि आले -
तुळशी आणि आले सर्व प्रकारचे संक्रमण दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. अद्रक आणि तुळस यांचा काढा करून त्याचे सेवन करू शकता. यामुळे तुमच्या कफाची समस्या दूर होण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.
6 लिंबू आणि मध -
लिंबू आणि मधाचे सेवन केल्याने गोठलेल्या कफच्या समस्येपासून आराम मिळतो. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि थोडे लिंबू मिसळून सेवन करा, आराम मिळेल.
7 वाफ घेणे -
तुम्ही सकाळ संध्याकाळ वाफ घेणे सुरू करा. गोठलेल्या कफच्या समस्येपासून मुक्त होण्याचा हा सर्वात खात्रीचा उपाय आहे. हा उपाय करून तुम्ही दोन ते तीन दिवसात या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
8 गरम पाणी पिणे -
छाती आणि घशात जमा झालेला कफ काढून टाकण्यासाठी थंड पाण्याऐवजी गरम पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. गरम पाणी साचलेला कफ सहज विरघळण्यास आणि बाहेर काढण्यास मदत करते.
0
Answer link
कफावर कायमस्वरूपी परिणामकारक उपाय सांगणे कठीण आहे, कारण कफ होण्याची अनेक कारणे असू शकतात आणि प्रत्येक व्यक्तीसाठी उपाय वेगळा असू शकतो. तरीही, काही सामान्य उपाय खालीलप्रमाणे आहेत जे कफ कमी करण्यास मदत करू शकतात:
घरगुती उपाय:
- आले (Ginger): आल्यामध्ये असलेले गुणधर्म कफ कमी करण्यास मदत करतात. आल्याचा चहा प्या किंवा आल्याचा छोटा तुकडा चघळा. हेल्थलाइननुसार, आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म (anti-inflammatory properties) असतात. Healthline - Ginger Benefits
- मध (Honey): मधामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म कफ आणि घसा खवखवणे यावर आराम देतात. गरम पाण्यात मध मिसळून प्या. मेयो क्लिनिक (Mayo Clinic) नुसार, मध घसा खवखवण्यावर गुणकारी आहे. Mayo Clinic - Honey for cough
- हळद (Turmeric): हळदीमध्ये कर्क्युमिन (curcumin) नावाचे तत्व असते, ज्यामुळे कफ कमी होतो. हळदीचे दूध प्या किंवा हळदीचा चहा घ्या. WebMD नुसार, हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि एंटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. WebMD - Turmeric Benefits
- मीठ आणि गरम पाणी (Salt and Warm Water): गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने कफ कमी होतो आणि घशाला आराम मिळतो. NCBI च्या अभ्यासानुसार, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या घशाच्या दुखण्यावर आणि कफावर आराम देतात. NCBI - Salt Water Gargle
- steam (वाफ घेणे): वाफ घेतल्याने श्वास नलिका मोकळी होते आणि कफ पातळ होऊन बाहेर पडायला मदत होते. अमेरिकन Lung Association वाफ घेण्याचा सल्ला देते. American Lung Association - Nebulizer Treatments
आयुर्वेदिक उपाय:
- कफ सिरप (Cough Syrup): आयुर्वेदिक कफ सिरपमध्ये तुळस, वासाका, आणि मध यांचा समावेश असतो, ज्यामुळे कफ कमी होतो.
- त्रिफळा चूर्ण (Triphala Powder): त्रिफळा चूर्ण गरम पाण्यातून घेतल्यास कफ कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा:
- जर कफ तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांना भेटा.
- ताप येत असेल किंवा इतर गंभीर लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
इतर महत्वाचे मुद्दे:
- धूम्रपान टाळा.
- पुरेसा आराम करा.
- गरम पेय प्या.
- आहार व्यवस्थित ठेवा.
Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
7
Answer link
सितोपलादी चूर्ण मेडिकल स्टोअरमधून घेऊन यावे. एक चमचा मधासोबत अर्धा चमचा ही पूड मिक्स करून सेवन करावे. हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीयेत. कधीही केव्हाही दिवसातून दोन वेळेस घेऊ शकता. घरातील ५ वर्षांच्या लहानांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही हे चूर्णाचे सेवन करू शकतं.
रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटे आधी कोमट पाण्यात पाव चमचा हळद घालून पाणी प्यावे. कोमट पाण्यामुळे माऊथ वॉश सहज होतो, तर हळदीमुळे तोंडातील आणि घशाखालील बॅक्टेरिया कमी होण्यासाठी मदत करते.

विक्स वेपोरबचे हे १० अनोखे फायदे
विक्स वेपोरबचे हे १० अनोखे फायदे
डोकेदुखी, सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास आपण विक्स वेपोरबचा वापर करतात. मात्र विक्स वेपोरबचा केवळ सर्दी, खोकल्यासाठीच वापर होत नाही तर याचे अनेक फायदेही आहेत जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील.
मुंबई : डोकेदुखी, सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास आपण विक्स वेपोरबचा वापर करतात. मात्र विक्स वेपोरबचा केवळ सर्दी, खोकल्यासाठीच वापर होत नाही तर याचे अनेक फायदेही आहेत जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील.
विक्स वेपोरबचे हे १० फायदे
आपले कपडे तसेच त्वचेवर विक्स वेपोरब लावल्यास मच्छर दूर होतील.
विक्स वेपोरबच्या वापराने सायनसमुळे होणारी डोकेदुखी बरी होण्यास मदत होते.
ऐकायला कदाचित हे विचित्र वाटेल मात्र विक्स वेपोरब पिंपल्सवर लावल्यास पिंपल्स बरे होतात.
अनेकदा नाटक, सिरीयल्सच्या चित्रिकरणादरम्यान कलाकारांना खोटे अश्रू काढावे लागतात. तर थोडासा वेपोरब डोळ्यांच्या खाली लावा.
कीटक, पतंगांनाही दूर राखण्याचे काम विक्स वेपोरब करते. खाण्याच्या टेबलावरुन माशा दूर करायच्या असल्यास टेबलावर विक्स वेपोरबची डबी उघडून ठेवावी.
खरचटल्यास विक्स वेपोरबमध्ये थोडेसे मीठ मिसळून खरचटलेल्या जागी लावा. जखम लवकर बरी होईल.
स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठीही विक्स वेपोरबचा वापर होतो. नियमितपणे स्ट्रेच मार्कवर विक्स वेपोरब लावल्यास दोन आठवड्यांत तुम्हाला परिणाम दिसू लागतील.
ड्राय स्किनसाठी विक्स वेपोरब एक मॉश्चरायझर म्हणून काम करते.
टेनिस एल्बोचा त्रास असल्यास विक्स वेपोरब तुम्हाला नक्की फायदा होईल. यातील मेंथॉल आणि कापूरमुळे दुखणे बरे होते.
तळपायाला भेगा पडल्यास त्यावर विक्स वेपोरब गुणकारी आहे. रात्री झोपताना विक्स वेपोरब लावल्यानंतर पायात सुती मोजे घालून झोपा.
क्षमस्व = विक्स वेपोरब (मलम) बद्दल माहिती
2
Answer link
काही पेशंटमध्ये घसा दुखण्याची तक्रार वारंवार आढळते. ही सामान्य तक्रार आहे, असे समजू नये. वारंवार घसा दुखत असेल तर त्यामुळे स्वरयंत्रावर ताण येऊन आवाज जाण्याचा धोकाही असतो. घसा नेमका कोणत्या कारणांमुळे दुखतो, त्यावर उपाय कोणते हे जाणून घेऊया…
घसा दुखण्याचे एक नेहमीचे कारण म्हणजे अॅलर्जिक ऱ्हायनायटिस.
ऋतू बदलल्यावर किंवा विशिष्ट ऋतुमानात किंवा वर्षभरही त्रास होऊ शकतो.
> जे धूम्रपान करीत नाहीत, त्यांनाही त्रास होऊ शकतो.
> डोळे, नाक व घशात खाज सुटू शकते, डोळे लाल होतात, पापण्यादेखील सुजतात.
> सर्दीवरील गोळीमध्ये स्यूडो इफिड्रिन नावाचा एक घटक असतो. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, मधुमेह वाढू शकतो, हृदयविकाराला आमंत्रण होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.
> योगशास्त्रामध्ये प्राणायाम, भास्त्रिका, काही ठराविक योगासने व जलनेती हे अत्यंत प्रभावी उपचार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच ते करावेत.
> काही पेशंटना घशात गाठ असण्यासारखे वाटते. त्यांचा आवाज बसतो.
> गरम पाण्याची वाफ घेणे, ज्येष्ठमधाची काडी चघळणे, कोमट पाणी पिणे, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे असे प्राथमिक उपचार करता येतील.
> विश्रांती, सकस आहार व योग्य औषधोपचार घेतल्यास आजाराची लक्षणे कमी होऊन पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.
> मानेत गाठी येणे, ताप न जाणे, गिळताना किंवा जांभई देताना त्रास होणे, अति लाळ गळणे असे त्रास होत असल्यास डॅाक्टरांचा सल्ला घ्यावा.
लक्षणे
> सर्दी, सायनसमुळे
> तोंडाच्या कॅन्सरमुळे
> घसा कोरडा पडल्याने

> तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असल्यास
> अॅलर्जी, प्रदूषण किंवा धूळ असलेल्या ठिकाणी राहिल्यास
> मोठ्याने बोलल्याची सवय असल्याने
> दारू पिणे, धूम्रपान, उष्ण ठिकाणी काम करणे
रोगनिदान
घसा सुजला तर घशाची पाठभिंत लालसर दिसते. टॉन्सिलच्या गाठी सुजल्या असतील तर त्या नेहमीपेक्षा मोठ्या दिसतात. गाठींचा पृष्ठभाग लालसर दिसतो.
> कधीकधी टॉन्सिलवर पांढरट (पू) ठिपके दिसतात.
> घसासूज असो की टॉन्सिलसूज, गळ्याचील रसग्रंथी सुजणे, दुखणे ही बहुतेक वेळा आढळणारी खूण आहे.
> कधीकधी एका बाजूच्या टॉन्सिलच्या मागे पू जमून त्या बाजूची सूज मोठी दिसते. अशा आजारात मात्र पेशंटला तज्ज्ञाकडे पाठवणेच योग्य ठरेल.
>घशाची तपासणी करण्यासाठी जीभ खाली दाबून धरण्यासाठी साधा स्वच्छ चमचा वापरावा. नीट दिसण्यासाठी बॅटरीचा उजेड किंवा सूर्यप्रकाश लागतो.
प्राथमिक उपचार
> गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. गरम दूध-हळद प्यायला द्यावी. या उपायांनी घशाला शेक मिळून लवकर आराम पडतो. बऱ्याच वेळा केवळ इतक्या उपायानेच घसासूज कमी होते. गुळण्या दिवसातून चार-पाच वेळा कराव्यात.
> लाळ सुटण्यासाठी खडीसाखर, हळद-गूळ गोळी अधूनमधून तोंडात ठेवावी.
> जंतूदोष आटोक्यात आणण्यासाठी एमॉक्सी गोळ्या उपयुक्त आहेत. लहान मुलांना पातळ औषध देणे सोपे पडते. तयार औषध न मिळाल्यास वरील गोळीचे चूर्ण साखरपाणी किंवा मधातून देता येते.
राजे

कांदा खाल्ल्याने सर्दी होते हा समज आहे. कांद्यामध्ये 'क' जीवनसत्व आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.
तरीही, काही लोकांना कांदा खाल्यावर सर्दी किंवा ॲलर्जीसारखी लक्षणे दिसू शकतात. याचे कारण खालीलप्रमाणे असू शकतात:
- ॲलर्जी: काही लोकांना कांद्याची ॲलर्जी असू शकते.
- अतिसंवेदनशीलता: काही लोकांची रोगप्रतिकारशक्ती काही पदार्थांना जास्त प्रतिक्रिया देते.
- ऍसिड रिफ्लक्स: कांदा खाल्याने ऍसिडिटी वाढू शकते, ज्यामुळे छातीत जळजळ आणि सर्दीसारखी लक्षणे दिसू शकतात.
जर तुम्हाला कांदा खाल्यावर सर्दी होत असेल, तर खालील उपाय करून बघा:
- कांद्याचे प्रमाण कमी करा: कमी प्रमाणात कांदा खाऊन बघा.
- शिजवलेला कांदा खा: कच्च्या कांद्याऐवजी शिजवलेला कांदा खा.
- डॉक्टरांचा सल्ला घ्या: ॲलर्जी टेस्ट करून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीपर आहे. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2
Answer link
*⭕ घसेदुखीने 🗣हैराण आहात?- हे करून पहा ⭕*
❏ 🗣घसा हा आपल्या अन्नमार्गातील तसेच श्वसनमार्गातील एक महत्त्वाचा अवयव आहेच पण सर्वातमहत्त्वाचे म्हणजे आपण ज्यामुळे आवाज काढू शकतो ते स्वरयंत्र या घशातच असते. त्यामुळे घशाची काळजी घेणे जसे गरजेचे असते तसेच घशाच्या किरकोळ तक्रारींवरही उपचार त्वरीत करणे आवश्यकच असते. खोकला, सर्दी झाली असल्यास आपला आवाज बदलतो. अनेकवेळा घसा बसतो आणि बोलणे अवघड होते याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेला असतोच. त्यामुळे या महत्त्वाच्या अवयवासाठी घरच्या घरी कोणते उपचार करता येतात त्याची माहितीखाली दिली आहे.
🗣१) घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते.
२)घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.३)खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे. कफ झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट
४) तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंडयेणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे. तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस,दूध, ताक, सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ कमी होण्यासही मदत मिळते.
५) घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे. बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.