2 उत्तरे
2
answers
घसादुखीवर उपाय काय?
2
Answer link
*⭕ घसेदुखीने 🗣हैराण आहात?- हे करून पहा ⭕*
❏ 🗣घसा हा आपल्या अन्नमार्गातील तसेच श्वसनमार्गातील एक महत्त्वाचा अवयव आहेच पण सर्वातमहत्त्वाचे म्हणजे आपण ज्यामुळे आवाज काढू शकतो ते स्वरयंत्र या घशातच असते. त्यामुळे घशाची काळजी घेणे जसे गरजेचे असते तसेच घशाच्या किरकोळ तक्रारींवरही उपचार त्वरीत करणे आवश्यकच असते. खोकला, सर्दी झाली असल्यास आपला आवाज बदलतो. अनेकवेळा घसा बसतो आणि बोलणे अवघड होते याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेला असतोच. त्यामुळे या महत्त्वाच्या अवयवासाठी घरच्या घरी कोणते उपचार करता येतात त्याची माहितीखाली दिली आहे.
🗣१) घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते.
२)घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.३)खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे. कफ झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट
४) तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंडयेणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे. तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस,दूध, ताक, सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ कमी होण्यासही मदत मिळते.
५) घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे. बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.

0
Answer link
घसादुखीवर आराम मिळवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
घसादुखीवर उपाय:
- गरम पाणी आणि मीठ: गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. मिठाच्या पाण्याने घसा स्वच्छ होतो आणि आराम मिळतो.
- मध: मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे घसादुखी कमी होण्यास मदत होते. गरम पाण्यात मध मिसळून प्या किंवा थेट चमच्याने खा.
- आले: आल्यामध्ये दाहक-विरोधी (anti-inflammatory) गुणधर्म असतात. आल्याचा चहा प्यायल्याने घसादुखी कमी होते.
- लसूण: लसणामध्ये ऍलिसिन नावाचे तत्व असते, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि वायरसशी लढण्यास मदत होते. लसणाची एक पाकळी चावून खावी.
- लिंबू: लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि घसादुखी कमी होते. गरम पाण्यात लिंबू पिळून प्या.
- पुरेशी विश्रांती: घसादुखी झाल्यास शरीराला पुरेशी विश्रांती देणे आवश्यक आहे.
- द्रवपदार्थ: भरपूर पाणी प्या आणि घशाला ओलावा द्या.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
जर घसादुखी गंभीर असेल किंवा काही दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.