2 उत्तरे
2
answers
बेंदूर सण: माहिती व महत्त्व?
2
Answer link
*💫महाराष्ट्रातील बेंदूर सण माहिती, महत्व, साजरा करण्याची पद्धत*
*🔰📶महा डिजी। विशेष*

🔅साधारण आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेदरम्यान, बेंदूर हा सण साजरा होतो. इंग्रजी महिन्यात सांगायचे तर जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा सण साजरा होतो.
😊शेतकऱ्यांचा खरा जोडीदार अशी ओळख असलेल्या बैलांचा हा सण. या जोडीदाप्रती असलेली कृतज्ञता म्हणून बेंदूर सण साजरा होतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा नव्हे तर शेतकऱ्याकडे असलेल्या बैलांचा आणि एकूणच पशुधनाचा सण आहे. प्रामुख्याने बेंदूर हा मराठी सण आहे. पूर्णणे मराठमोळा.
⚡ज्या दिवशी बेंदूर हा प्रमुख सण असतो त्याच्या आधल्या दिवशी बैलांना आंघोळ घातली जाते. काही लोक बंदूर सणादिवशीही घालातात. त्याच संध्याकाळी खांदेमळणी असते. खांदेमळणी ही सुद्धा एक खास विशेष. खांदेमळणी करताना गरम पाण्याने बैलांचे खांदे धुतले / शेकले जातात. बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते. अनेकांना बैलांचा खांदा हा प्रकार काय माहिती नसेल. बैलाच्या वशींडापासूनचा पुढचा भाग आणि मानेचा वरचा भाग म्हणजे खांदा. खांदा शेखल्यानंतर त्याला हळद लावली जाते. दरम्यान, या वेळी गोठ्यात असलेल्या सर्वच जनावरांना गाई, म्हैस इत्यादींना चांगली वागणूक दिली जाते.
😍बेंदूर सणाच्या दिवशी सकाळपासूनच शेतकरी उत्साहात असतो. या दिवशी औताला आणि शेतीच्या सर्व कामांना सुट्टी असते. या दिवशी प्रामुख्याने बैलांना आणि इतर जनावरांना हिरवा चारा दिला जातो. साधारण दुपारनंतर बैलाला सजवायला घेतले जाते. त्याच्या शिंगाणा हिंगूळ (लाल/केशरी रंग) लावला जातो. त्यावर बेगड्या चिटकवल्या जातात. त्यात कणकीचे कंगण घातले जातात. त्यानंतर शिंगांना शेंब्या घातल्या जातात. पाठीवर झूल, डोक्याला बाशिंग आणि गळ्यात चाळ घालतात. या दिवशी त्याला नवी वेसण, म्होरकी, कंडा घातला जातो. अगदी कासराही नवा असतो. त्याच्या अंगावर रंगांचे ठसे उमठवले जातात. त्यानंतर त्याची पूजा करुन त्याला गावदेवासाठी नेले जाते. हा सर्व लवाजमा गावच्या वेशीत पोहोचतो तेव्हा गावकरी बैलांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करतात.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy

0
Answer link
उत्तर:
बेंदूर हा महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमधील शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण बैलांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो.
बेंदूर सणाची माहिती:
- हा सण साधारणतः मे किंवा जून महिन्यात असतो.
- या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना सकाळी लवकर उठवून अंघोळ घालतात.
- बैलांना रंगीबेरंगी रंगांनी रंगवले जाते आणि त्यांची पूजा केली जाते.
- बैलांना पुरणपोळी आणि इतर गोड पदार्थ खाऊ घालतात.
- गावात बैलांची मिरवणूक काढली जाते.
बेंदूर सणाचे महत्त्व:
- बेंदूर हा सण शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे.
- बैल हे शेतकऱ्यांचे मित्र आणि शेतीतील कामासाठी खूप महत्त्वाचे असतात.
- या दिवशी शेतकरी बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात.
- हा सण ग्रामीण भागातील लोकांमध्ये एकजूट आणि समरसता वाढवतो.