शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय काय आहे?
ताप नसतांनी शरीराच्या आतील उष्णतेचा त्रास अनेकांना जाणवत असतो. याचे परिणाम शरीरावर मुख्यकरून चेहऱ्यावर दिसून येतात. त्यावरील काही उपचार खालीलप्रमाणे….
१) धणे पाण्यात टाकून ते पाणी गाळून सेवन केल्यासशरीरातील उष्णता कमी होते.
२) उन्हाळ्यात नाकातून रक्तस्त्राव होत असल्यास नाकावरबर्फ फिरवावा.
३) कडुनिंबाच्या पानांना नॅचरल हिलर म्हणतात. त्याचारस चेहर्यावर लावल्यास मुरुमे लवकर बरी होतात, तसेच काळे डाग कमी होतात.
४) तेलकट त्वचा असल्यास नेहमी तेलविरहितसाधनांचा वापर करावा.
५) उन्हाळ्यात चेहरा जास्तीत जास्त वेळा थंडपाण्याने धुवावा.
सर्वसाधारणपणे माणसाच्या शरीराचे तापमान हे 37 अंश सेल्सिअस असते. थोड्या फार प्रमाणात बदल होतो. पण शरीराच्या तापमानात अगदी 1 अंश सेल्सिअसने सुद्धा चढ-उतार झाला तर विविध आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यासाठी शरीराचे तापमान स्थिर ठेवणे गरजेचे असते.पाणी आणि रस प्यायल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकून थंडपणा मिळतो. अर्थात पाणी आणि रसांचे सेवनकरण्याबरोबरच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही थंड प्रकृतीचे पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
त्यासाठी आहारामध्ये दही, कांदा, मुळा, नारळपाणी, तीळ, मेथी दाणे, दूध, डाळिंब यांचे सेवन प्रमाण वाढवावे, किराणा दुकानातून सब्जा आणून रात्री भिजून सकाळी काहीही खाण्यापूर्वी खावे, कोरफड असल्यास त्याचे गराचे सेवन करा,
धूम्रपान, मद्यपान, गरम मसाला, मासे, चहा, कॉपी याचें सेवन टाळा
आहारातील द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवावे लागते. या साठी फळांचे सरबत,नारळपाणी,भाज्यांचे सूप याचे आहारातील प्रमाण वाढवावे तसेच दररोज ३ ते ५ लिटर. पाणी प्यावे.
तसेच उन्हाळ्यात भूक व पचन क्षमता दोन्ही मंदावलेल्या असतात त्यामुळे पचण्यास जड असे पदार्थांचे उदाहरणार्थ मासाहार ,उडीद .
तेलकट ,मसालेदार पदार्थांचे सेवन करू नयेत.तसेच कोकम,लिंबू सरबत ,डाळिंबाचा रस,फळामध्ये संत्री,मोसंबी यांचा वापर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी व पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी करावा.
लग्नामध्ये नवरीच्या हातावर सजलेली लाल गडद मेंदी पाहण्याची तरुणी, महिलांना अधिक उत्सुकता असते. हवीहवीशी वाटणारी भावनिक बंध जुळलेली ही मेंदी फक्त सजण्यासाठीच आहे असे नव्हे तर मेंदीचे अनेक उपयोग आहेत.
शरीरासाठी अत्यंत उपयोगी औषधाप्रमाणे तिचा वापर केला जातो.
उन्हाळ्यात उष्णता कमी होण्यासाठी मेंदीचा वापर करणे अत्यंत उपयुक्त ठरते.
शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून शरीरात उष्णतेचे प्रमाणदेखील वाढते आहे.
शारीरिक तापमान वाढल्याने आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो. म्हणूनच शरीरातील उष्णता नाहीशी करण्यासाठी मेंदीचा उपयोग होतो. शरीरातील उष्णता बाहेर काढण्याचे काम ही मेंदी करीत असते.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय खालीलप्रमाणे आहेत:
-
भरपूर पाणी प्या:
शरीराला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्या.
-
नारळ पाणी:
नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत होते आणि शरीर थंड राहते.
-
ताक:
दुपारच्या जेवणानंतर ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील उष्णता कमी होते.
-
कलिंगड:
कलिंगडात पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते शरीराला थंड ठेवण्यास मदत करते.
-
पुदिना:
पुदिन्याची पाने पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.
-
आवळा:
आवळ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरातील उष्णता कमी होते.
-
धण्याचे पाणी:
धणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.
-
शितली प्राणायाम:
हे प्राणायाम केल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि मन शांत राहते.
-
चंदन:
चंदनाचा लेप लावल्याने शरीराला थंडावा मिळतो.
-
कोरफड:
कोरफडीचा रस प्यायल्याने पोटातील उष्णता कमी होते आणि त्वचाही चांगली राहते.
हे काही साधे आणि प्रभावी उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीरातील उष्णता कमी करू शकता.
टीप: जर तुमची समस्या गंभीर असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: