भारताचा इतिहास
जागतिक इतिहास
शिवाजी महाराज
ऐतिहासिक कलाकृती
इतिहास
छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार लंडनमध्ये आहे, त्याबद्दल माहिती द्या?
2 उत्तरे
2
answers
छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार लंडनमध्ये आहे, त्याबद्दल माहिती द्या?
1
Answer link
रॉयल कलेक्शन लंडन येथे संपर्क साधून या संबंधीची माहिती मिळवली आणि अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर या तलवारीची हि सुस्पष्ट आणि detailed छायाचित्रे प्रथमच प्राप्त झाली. आज शिवजयंतीच्या निमित्त हि छायाचित्रे शिवभक्त मित्रांना उपलब्ध करून देताना आनंद होत आहे.⚔️
या तलवारीचे रॉयल कलेक्शन मधील वर्णन असे आहे -
Sabre - "Mahratta" , straight one edged European blade,with two groves on each side,in one of which I.H.S. stamped 3 times.Hilt encrusted with heavy open work floral decoration of gold, thickly set with large diamonds and rubies.Presented by HH Maharaja of Kolapore
⚔️तलवारी संबंधीची करवीर संस्थानातील पुढील नोंद सांगते कि हि जगदंबा तलवार आहे -⚔️
पंतप्रधान सरकार कदीम करवीर, शस्त्रागार तर्फे रावबहाद्दूर दादासो सुर्वे
नोंदणी जीनस - जगदंबा तलवार
⚔️जिनसाचे नाव | डाग आकार सहित | तपशील दास्तान | चालूकडे
⚔️तलवार सडक | १९७-११ | १९७-११ | हल्ली नाही
जगदंबा मेणावर

⚔️तपशील - नाकीत्यास हिरे ६,माणके ४४ ,पाचा १०
एकूण पराज हिरे १३,पाचा १८ , माणके ४६७
मिळून सबंध तलवार.
⚔️तलवारीचा उगम - इ.स.१५१० साली आल्फोन्सो आल्बुकर्क याने गोवा जिंकला .त्याचा सेनापती डियागो फर्नांडीस याने लगेचच सावंतवाडीवर हल्ला केला,पण हल्ला सपशेल फसला आणि पोर्तुगिजांचा दारूण पराभव खेमसावंत भोसल्यांनी केला.त्यावेळी हि पोर्तुगीज राजघराण्यातील (Imperial) तलवार खेमसावंत यांच्याकडे आली. (तलवारीच्या पात्यावर I.H.S. हि अक्षरे कोरली आहेत)
छत्रपतींना हि तलवार १६५९ साली भेट म्हणून देण्यात आली किंवा त्यांनी ती वाडीकर सावंतापैकी कायसावंत (गोवलेकर) यांचेकडून 300 होनास विकत घेतली.
--------------------------
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
------------------------
चौथे शिवाजी - प्रतापसिंहराजे भोसले यांनी हि तलवार प्रिन्स ऑफ वेल्स याला 1875 मध्ये भेट दिल्याचे सांगण्यात येते.
या संदर्भात ब्रिटीशांची नोंद अशी "The Genoa blade presented to prince of wales in 1875 during his visit to India by Raja of Kolapore, sword now in Indian Museum (London)"
रॉयल कलेक्शन्स च्या अगाता रुतुस्कोवा यांनी तलवारीची हि छायाचित्रे मिळवून देण्यास मदत केली त्यांचे आभार मानायला हवेत. सध्या हि तलवार लंडन मधील Marlborough House मध्यल्या इंडिया हॉल मधील Case of Arms मध्ये असल्याचे समजते.
⚔️१. संपूर्ण जगदंबा तलवार (१२१ सेमी लांबी- ४ फुट)
⚔️२. जगदंबा तलवारीची रत्नजडीत मुठ
⚔️३. छत्रपती शिवरायांचे लंडन येथील चित्र आणि हातातील तलवार
⚔️चित्र ४. Case of Arms मधील शिवरायांची तलवार (मध्यभागी असलेली)
📖 संदर्भ -
1. Royal Collection, London
2. Prince of Wales Catalogue
3. Sidhharth Soshte
4. Indrajeet Sawant
- मालोजीराव जगदाळे♍

0
Answer link
छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार लंडनमध्ये असण्याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:
- तलवारीची माहिती: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरात असलेल्या तीन तलवारी होत्या, त्यापैकी एक तलवार सध्या लंडनच्या संग्रहालयात आहे. ह्या तलवारीचे नाव 'वाघनखं' आहे.
- लंडनमध्ये कधी गेली: ही तलवार ईस्ट इंडिया कंपनीने 1824 मध्ये महाराष्ट्रातून लंडनला नेली.
-
परत आणण्याचे प्रयत्न:
- भारत सरकारने अनेकदा ही तलवार परत आणण्याचे प्रयत्न केले आहेत.
- 2023 मध्ये, महाराष्ट्र सरकारने ही तलवार परत आणण्यासाठी अधिकृतपणे पत्रव्यवहार सुरू केला आहे.
- सध्याची स्थिती: सध्या ही तलवार लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये (Victoria and Albert Museum) प्रदर्शनासाठी ठेवलेली आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: