शिवाजी महाराज ऐतिहासिक कलाकृती इतिहास

इंग्रजांनी शिवाजी महाराजांची तलवार इंग्लंडला का नेली?

2 उत्तरे
2 answers

इंग्रजांनी शिवाजी महाराजांची तलवार इंग्लंडला का नेली?

9
काय आहे शिवरायांच्या भवानी तलवारीमागचे रहस्य

भारत हा प्राचीन संस्कृती जपणारा देश आहे. भारतात अनेक संस्कृत्या उदयास आल्या आणि लोप पावल्या पण हिंदू धर्म खूप प्राचीन आहे असे मानले जाते. असे असले तरी अनेकांनी भारतावर राज्य केले आणि त्यांनी त्यांच्या परंपरा भारतावर लादण्याचा प्रयत्न केला. भारत हि सोन्याच अंड देणारी कोंबडी होती हे खरंच आहे कारण मुघलांच्या पूर्वी जेव्हा महंमद गझनी ने भारतावर १७ स्वाऱ्या केल्या आणि भारताला लुटून नेले त्यामध्ये सोने, हिरे, माणिक मोती अश्या अनेक मौल्यवान रत्नांचा समावेश होता त्यांनी जी आपली अफाट संपत्ती आपल्या भारतातून लुटून नेली त्याचा इतिहास पाहूनच तुम्ही म्हणाल किती होते भारताकडे असे असले तरी त्याने जितके आपले वैभव १७ स्वाऱ्या करून लुटून नेले तितकी संपत्ती इंग्रजांनी १ वर्षात भारताकडून लुटली त्यांनी १५० वर्षे राज्य भारतावर केले मग पहा किती भारताला इंग्रजांनी लुटले. स्वातंत्र्याच्या काळातच पाहायचे झाले तर भारताच्या १ रुपयाची किंमत अमेरिकेच्या १ डॉलर पेक्षा जास्त होती म्हणजे इतका आपला देश श्रीमंत होता. आपण आपल्या मूळ विषयाकडे वळू कि शिवरायांकडे भवानी, जगदंबा आणि तुळजा या तीन तलवारी होत्या. त्या स्वतः भवानी आईने दिल्या नसून तलवारीचे नाव “भवानी” आहे.





शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकले मुघलांना हैराण केले आणि स्वराज्य मोठे केले संपूर्ण भारतभर स्वराज्याची सत्ता स्थापन केली ती त्यांच्या तलवारी मुळे देखील शक्य झाले. अश्याच भवानी तलवारीचे आज रहस्य बनले आहे. शिवरायांची एक तलवार जगदंबा हि आज इंग्लंड मधील रॉयल कलेक्शन मध्ये असल्याचे ‘शोध भवानी’ या पुस्तकात लिहले आहे. लालकृष्ण अडवाणी २००१ साली स्पेनच्या दौऱ्यावर गेलेले असताना काही संशोधकांनी त्यांना सांगितले कि भवानी तलवार हि स्पेनमधील तोलेदो या गावात बनवली आहे. ९० वर्ष्यापुर्वी कॅप्टन बहादुर मोदी यांनी भवानी तलवार त्यांच्याकडे असल्याचे सांगितले होते तसेच या तलवारीवर छत्रपती शिवाजी हे नाव कोरले गेलेले होते. पण नंतर उघडकीस आले कि ते नाव कॅप्टन बहादुर मोदी यांनीच कोरले. काही वर्षांपूर्वी इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांनी दावा केला होता की इंदूर-महू येथे शिवरायांची भवानी तलवार आहे. पण त्या तलवारीवर देखील राजा छत्रसालाच्या सेनापतीचे नाव दिसले.





शेवटी एक अफवा पसरली कि महाराजांनी सावंतांना तलवार दिलेली आणि ती तलवार जी त्यांच्याकडे आहे तीच भवानी तलवार आहे. पण त्यावर देखील रोमन अक्षरे असल्याने ती भवानी तलवार आहे असे म्हणता येणार नाही. १८५७ साली इंग्लंडचे प्रिन्स ऑफ वेल्स सातवे एडवर्ड हे भारतात आले होते त्यांना छत्रपती शाहू महाराजांनी “जगदंबा” व “तुळजा” या दोन तलवारी भेट म्हणून दिल्या. आज त्या दोन्ही तलवारी इंग्लंडमध्ये आहेत आणि त्या दोन्ही तलवारी मध्ये भवानी तलवार नसून त्या “जगदंबा” व “तुळजा” या तलवारी आहेत हे दादासाहेब पुरंदरे यांनी सांगितले. भवानी तलवार कशी होती हे कोणालाच माहिती नाही. तिची मूठ कशी होती, ती किती रुंद होती, किती लांब होती, त्याची धार, पोलाद, वजन हे सर्वच आज एक रहस्य बनून राहिले आहे. म्हणूनच कि काय हि तलवार स्वतः भवानीने शिवरायांना स्वराज्य उभे करून धर्म रक्षणासाठी दिली आणि ती गायब झाली असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 27/2/2019
कर्म · 55350
0

इंग्रजांनी शिवाजी महाराजांची तलवार इंग्लंडला का नेली

या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे देणे कठीण आहे, कारण याबाबत अनेक दावे आणि शक्यता आहेत. काही संभाव्य कारणे खालीलप्रमाणे दिली आहेत:

  • शिवाजी महाराजांचे प्रतीक म्हणून: शिवाजी महाराज हे भारतातील एक महान योद्धा आणि शासक होते. त्यांची तलवार एक महत्त्वाचे प्रतीक मानली जात होती. त्यामुळे, ती तलवार इंग्लंडला नेऊन इंग्रजांनी एक प्रकारे त्यांच्या विजयाचे प्रदर्शन केले.
  • ऐतिहासिक महत्त्व: शिवाजी महाराजांच्या तलवारीला ऐतिहासिक महत्त्व होते. त्यामुळे, ती इंग्लंडमधील संग्रहालयात जतन करून ठेवल्यास लोकांना त्यांच्याबद्दल माहिती मिळेल, असा विचार असू शकतो.
  • राजकीय कारण: इंग्रजांनी भारतावर राज्य करत असताना भारतीयांना दबवण्यासाठी किंवा त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे कृत्य केले असण्याची शक्यता आहे.

या संदर्भात अधिक माहिती उपलब्ध नाही, परंतु काही इतिहासकारांच्या मते, ही तलवार भेट म्हणून देण्यात आली होती किंवा युद्धात जिंकून घेण्यात आली होती. नक्की काय घडले, हे सांगणे कठीण आहे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5240

Related Questions

स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील इ.स. १८३२ ते १९४७ पर्यंतची वृत्तपत्रसृष्टीची वाटचाल धावत्या स्वरूपात स्पष्ट करा?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे तोंड उत्तर दिशेलाच का असते?
शीतयुद्ध नंतरच्या कालखंडातील परिमाणाचा अभ्यास स्पष्ट करा?
अण्णाभाऊ साठे रशियालाच का गेले होते?
कार्ल आणि भाजे लेण्यांमध्ये लेण्यांच्या संबंधीची माहिती विशद करा?
वेरुळ (एलोरा) येथील ब्राह्मणी (हिंदू) लेण्यांचे वर्णन करा.?
प्राचीन भारतीय इतिहासामध्ये नाणे शास्त्राचे योगदान स्पष्ट करा?