2 उत्तरे
2 answers

गजकर्णाचे परिणाम काय?

0
गजकर्ण (Ringworm)

विशिष्ट सूक्ष्मकवकांच्या संसर्गामुळे होणारा त्वचारोग.ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरमकॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या कवकांमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा, हाताचे तळवे, मनगटे, काखा, जांघा, मांड्या, हातापायांच्या बोटांमधील जागा इ. शरीराच्या वेगवेगळ्या भागांत हा रोग होऊ शकतो. या रोगात त्वचेवर वर्तुळाकार किंवा अंगठीप्रमाणे लालसर चट्टे उठतात. हळूहळू त्यावर पांढरे कोंड्यासारखे पापुद्रे तयार होतात. बहुधा त्या भागाला खूप खाज सुटते. शरीराच्या भागानुसार गजकर्णाचे प्रकार ओळखले जातात. उदा. डोक्याच्या गजकर्णाला खवड्या, तर पायाच्या बोटांमधील गजकर्णाला चिखल्या म्हणतात.

लहान मुलांमध्ये गजकर्ण होण्याचे प्रमाण अधिक असते. गजकर्णाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे कपडे, कंगवा व ब्रश वापरल्यास हा रोग होऊ शकतो. स्नानगृह, तरणतलाव, केशकर्तनालय इ. सार्वजनिक माध्यमांतून त्याचा प्रसार होण्याची शक्यता असते. प्राण्यांमध्येदेखील गजकर्ण आढळतो. कोंबड्या, ससे, गायी, मांजरे, कुत्रे, घोडे इ. प्राण्यांत हा रोग दिसून येतो. मात्र या प्राण्यांच्या पिल्लांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. या प्राण्यांच्या संपर्कामुळेही हा रोग लहान मुलांमध्ये पसरू शकतो.

संसर्ग झालेल्या कवकाच्या प्रकारानुसार गजकर्णावर इलाज केले जातात. कोणत्या प्रकारचा कवक आहे हे सूक्ष्मदर्शकाने ठरविता येते. यासाठी गजकर्ण झालेल्या त्वचेचा लहान तुकडा सूक्ष्मदर्शकाखाली पाहतात. आवश्यकता भासल्यास कवक संवर्धन करतात आणि त्याचा प्रकार ठरवितात.

सॅलिसिलिक आम्ल, बेंझॉइक आम्ल, रिसॉर्सिन, अ‍ॅमिडॅझॉल, टेरबिनाफाईन ही मलमे, तसेच काही शॅम्पूंमध्ये असणारे पायरिथिऑन झिंक हे रसायन गजकर्णावर गुणकारी आहेत. संसर्ग आणि लक्षणे यांची तीव्रता जास्त असेल, तर प्रतिजैविक औषधे पोटात घ्यावी लागतात.

         गजकर्ण

गजकर्ण या त्वचाविकाराचं कारण ----- ओले कपडे घालणं आणि जाड जाड कपड्यांमुळे अंगावर घाम बराच वेळ राहिल्यानं या बुरशीजन्य त्वचाविकाराला आमंत्रण दिलं गेलं.
त्वचाविकारांमध्ये बुरशीमुळे होणार्‍या त्वचेच्या आजाराचं प्रमाण बरंच जास्त आढळतं. बुरशीजन्य त्वचाविकारांमध्ये नायटा, गजकर्ण आणि सुरमा हे आजार सरसकटपणे आजूबाजूस दिसतात. या त्वचा आजारांचा शरीरप्रणालीवर थेट परिणाम दिसत नसला तरी बाह्यसौंदर्यावर मानसिक आणि सार्वजनिक स्वास्थ्यावर याचा निश्‍चित परिणाम होतो.

(रिंगवर्म). त्वचा आणि तिची उपांगे (केस, नखे वगैरे) या ठिकाणी विशिष्ट कवकांचा (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींचा) संसर्ग झाल्यामुळे होणाऱ्या रोगाला ‘गजकर्ण’ म्हणतात.

ट्रायकोफायटॉन (केशकवक), एपिडर्मोफायटॉन (अधिचर्मकवक) व मायक्रोस्पोरम (सूक्ष्मबीजुककवक) या तीन जातींच्या कवकांचा संसर्ग झाल्यामुळे त्वचेवर वर्तुळाकार अथवा नागमोडी आकाराचे चट्टे उठतात. शरीराच्या विविध प्रकारांच्या कवकांचा संसर्ग होऊ शकतो. स्थानपरत्वे त्या विकारांना निरनिराळी नावे देण्यात आली आहेत. उदा., डोक्यातील गजकर्णाच्या एका प्रकाराला खवडा, चेहऱ्यावरील गजकर्णाला श्मश्रुकवक वगैरे [→कवकसंसर्ग रोग]. कोणत्या जातीचा कवकसंसंर्ग आहे ते सूक्ष्मदर्शकाने ठरविता येते व नंतर त्यावरून चिकित्सा ठरविता येते.

ओली त्वचा आणि गजकर्ण

ओली राहणारी त्वचा हा महत्त्वाचा घटक या बुरशीजन्य त्वचाविकारांसाठी कारणीभूत ठरतो. पावसाळ्यामध्ये, कुंद हवामानात आपण भिंतीवर बुरशीचे आवरण नेहमी पाहतो. अगदी तसंच आपल्या त्वचेच्या बाबतीतदेखील होत असतं. जास्त काळ त्वचा ओली राहिली, दमट हवामानामध्ये पुरेशी खेळती हवा त्वचेला मिळाली नाही तर त्वचेवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ लागतो. पावसात भिजल्यानंतर पूर्ण अंग कोरडं न करणं, आंघोळीनंतर सर्व अंग नीट न पुसता घाई घाईनं अंगावर कपडे चढवणं,  ओले कपडे घालणं किंवा ओले कपडे बर्‍याच वेळ अंगावर ठेवणं आणि घाम अंगावर बराच काळ राहणं ही बुरशीजन्य त्वचाविकाराची महत्त्वाची कारणं आहेत.
हत्तीच्या कानाच्या आकाराच्या चट्टय़ांना जे मांड्यांच्या आतील बाजूस, जांघेमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात त्यांना गजकर्ण असं पूर्वीपासून संबोधलं जातं.

झाकलेले भाग आणि नायटा

सर्वसाधारणपणे नायट्याचे चट्टे गोलसर आकारात दिसतात. नायटा डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीरावर कुठेही आढळून येतो. मात्र सतत ओल्या राहणार्‍या आणि झाकल्या गेलेल्या शरीराच्या भागात म्हणजेच काखा, जांघा, कंबर आणि अंर्तवस्त्राचा आतला भाग याठिकाणी त्याचं प्रमाण जास्त आढळतं. दिवसभर पाण्यात काम करणार्‍या व्यक्तींना, चिखलात, शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांना आणि दिवसभर पायमोजे व बंद बुटात तळपाय बंदिस्त असणार्‍या व्यक्तींना या नायट्याचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो. सतत आणि जास्त प्रमाणात घाम येणार्‍या व्यक्तींना शरीराच्या ज्या भागात घडी पडते (गळा, मान, हाताच्या कोपराची घडी, गुडघ्यांच्या मागील त्वचा, काखा, जांघा) अशा ठिकाणी नायट्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला दिसतो.
घाम येणं- घाम जिरणं
उष्ण कटिबंधातल्या हवामानामध्ये विशेषत: उन्हाळ्यात घाम येणं नैसर्गिक आहे. काहींना जास्त घाम येण्याची प्रवृत्ती असते. हा घाम शरीराच्या वळकट्यांमध्ये साचून राहतो. तसेच घट्ट इलॅस्टिकच्या अंतर्वस्त्रामुळे व घट्ट आणि जाड कापडाच्या जीन्समुळे अंगावर घाम तसाच राहून त्वचा ओली राहते आणि या ओल्या त्वचेमुळे बुरशीच्या वाढीला पोषक वातावरण तयार होते.

डोक्यातला त्वचाविकार
हवेतील प्रदूषण, मोकळ्या हवेचा अभाव, शांपूनं वारंवार केस धुतल्यानं डोक्याच्या त्वचेची शुष्कता यामुळेदेखील डोक्यामध्ये बुरशीजन्य त्वचाविकार दिसून येतात. डोक्याचे केस गळणं, केस पातळ होणं, डोकं खाजवणं, जाड घट्ट ओल्या अथवा कोरड्या खपल्या डोक्याच्या त्वचेवर तयार होणं ही लक्षणं डोक्याच्या बुरशीजन्य त्वचाविकारामध्ये दिसून येतात.

सुरमा आणि चिखल्या
छाती, पाठ, मान अथवा काखेमध्ये फिकट पांढरे अथवा तपकिरी रंगाचे चट्टे बर्‍याच वेळा पाहिले जातात. त्यांना सुरमा अथवा शिबं असं म्हणतात.  कँडिडा नावाच्या बुरशीमुळे पायाच्या बोटांच्या बेचक्यात चिखल्या होतात.  स्त्रियांमध्ये योनीमार्गात जळजळ दाह, खाज निर्माण होणं, अंगावरून श्‍वेतपदर जाणं ही लक्षणं कँडिडा बुरशीच्या प्रादुर्भावानं दिसून येतात.

आहार - विहार - उपचार

लाजेखातर अथवा भीतीमुळे नायटा, सुरमा, गजकर्णसारख्या त्वचाविकारांकडे दुर्लक्ष केलं जातं अथवा प्रसारमाध्यमातून सुचविलेली औषधं वरवर लावली जातात. कधी कधी त्यातून तात्पुरता आराम पडत असला तरी त्वचाविकार पूर्ण बरे होण्यासाठी डॉक्टरांचे  उपचार हवेतचं.
अर्थात हवामानानुसार सुती-सैलसर कपडे घालणं, शरीराची त्वचा कोरडी ठेवणं, स्वच्छता पाळणं, ओली अंतर्वस्त्रं कटाक्षानं टाळणं आणि पौष्टिक आहार घेणं यासारख्या गोष्टी आचरणात आणल्या तर बुरशीजन्य त्वचाविकार आपण टाळू शकतो.

नायटे निरनिराळ्या प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर, जांघेत, कमरेवर दगडफुलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यांत त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते.

•  गजकर्णाची कारणे –

हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे, इत्यादी.

अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपड्याखाली नीट स्वच्छता राहत नाही. या ठिकाणी खरुज, नायटा, गजकर्ण वाढतात.

मांजरे, घोडी व गुरे मनुष्यामध्ये रोगप्रसार करतात, इतर प्राण्यांच्या प्रकारांपासूनही रोगप्रसार संभवतो. अशा प्रकारचा रोगसंसर्ग अतिशय किचकट असून कधीकधी रोगावर उपचार होऊ शकत नाही.

• लक्षणे –

हे दोन्ही आजार कंबर, पोट, मांड्या, जांघा इत्यादी भागांत जास्त करून होतात. यामुळे खूप खाज सुटते. गजकर्ण व नायट्याची वाढ वेगाने होते, पण कातडीवर बधिरता मात्र नसते. यावरून कृष्ठारोगापासून हे आजार वेगळे ओळखता येतात.

• उपचार –

स्वच्छता ही प्रथम महत्वाची आहे. (रोज आंघोळ कारणे, नखे कापणे.)

चिकित्सा : कपडे, फण्या, ब्रश वगैरे पदार्थ स्वच्छ न धुता वापरले, तर कवकसंसर्ग दुसऱ्या व्यक्तीत पसरतो ; म्हणून हे पदार्थ वापरण्यापूर्वी निर्जंतुक करून घेणे आवश्यक आहे. कवकांची बीजुकावस्था (जननक्षम सूक्ष्म पेशींची अवस्था) पुष्कळ काळपर्यंत राहत असल्यामुळे संसर्गित कपडे उकळूनच वापरावे. जे जिन्नस उकळता येत नसतील त्यांचा नाश करावा.

सॅलिसिलिक अम्ल, बेंझॉइक अम्ल आणि रिसॉर्सिन या औषधींची मलमे गजकर्णावर गुणकारी आहेत. ग्रिझिओफलव्हीन, हॅमायसीन या पोटात घ्यावयाच्या प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा उपयोगही चांगला होतो.    

गजकर्ण, नायट्याचा, भाग गरम पाणी व साबणाने धुऊन नायटा मलम (व्हीटफिल्ड) रोज चोळून लावावे. व्हीटफिल्ड मालामाने सुरवातीला थोडीशी आग होते, पण दोन तीन आठवड्यात आराम पडतो व चट्टा जातो. नंतर आठवडाभर तरी मलम लावत राहावे. नाही तर नायटा परत उमटतो. व्हीटफिल्ड मलमापेक्षा माय्कोल मलम जास्त चांगले आहे. याचा परिणाम लवकर (१० दिवसांत) होतो.

• आयुर्वेद –

पपइ चा चिक गजकर्ण ,खरुज ,नायटा ह्या त्वचा रोगावर लावल्यास उपुक्त ठरतो .

गजकर्णासाठी उपाय करताना त्वचा कोरडी राहील याची काळजी घेणे. १. गजकर्णाच्या भागावर करंजतेलाचा बोला घासावा. २. या बाह्य उपचाराबरोबर कोठा स्वच्छ राहण्यासाठी त्रिफळा चूर्ण (चमचाभर) कोमात पाण्याबरोबर रोज रात्री याप्रमाणे १० दिवस घ्यावे. 

गोपियुष उपचाराने गजकर्ण ,नायटा पुर्ण बरा होतो.
उत्तर लिहिले · 21/4/2020
कर्म · 55350
0
गजकर्णाचे (Ringworm) परिणाम खालीलप्रमाणे असू शकतात:
  • त्वचेवर पुरळ: गजकर्णामुळे त्वचेवर लाल रंगाचे, गोल पुरळ उठते.
  • खाज:affected झालेल्या जागेवर खूप खाज येते.
  • त्वचा लाल होणे: पुरळ असलेल्या भागातील त्वचा लाल होते.
  • त्वचेवर भेगा: काही वेळा त्वचा कोरडी होऊन भेगा पडू शकतात.
  • केसांचे गळणे: जर गजकर्ण डोक्यावर झाला असेल, तर त्या भागातील केस गळू शकतात.
  • नखांवर परिणाम: नखांवर गजकर्ण झाल्यास नखे जाड आणि रंगहीन होऊ शकतात.
  • संसर्गजन्य: गजकर्ण हा संसर्गजन्य आहे आणि तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरू शकतो.
गजकर्णाचे निदान आणि उपचार त्वरीत करणे आवश्यक आहे, अन्यथा ते अधिक गंभीर रूप धारण करू शकते.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5220

Related Questions

खाज येणेवर काही आयुर्वेदिक इलाज?
त्वचेला रोग होण्याची कारणे काय आहेत?
गजकर्ण जातच नाही, खूप उपाय केलेत?
सोरायसिस कोणता आजार आहे?
गजकर्णावर स्किन स्पेशलिस्टकडून कोर्स पूर्ण केल्यावर गजकर्ण कायमचे बरे होईल का?
गजकर्ण वर काही उपाय आहे का ?
नागीण त्वचा रोगबद्दल माहिती मिळेल का?