2 उत्तरे
2
answers
खडा तलवार बद्दल माहिती द्या?
1
Answer link
🗡 जेजुरीची खंड़ा तलवार 🗡
http://bit.ly/3srZ4FW
_____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
_____________________________
🗡🗡खंडेरायाची "खंडा तलवार....४२ किलो वजन असणारी ही खंडा तलवार🗡महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या खंडेरायाची जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपारीक पद्धतीने "मर्दानी दसऱ्याचे" आयोजन करण्यात येते. तब्बल १६ तासापेक्षाही जास्त काळ हा सगळा सोहळा चालू असतो . राज्याच्या शस्त्र साहित्यातील हा खंडा सध्या उपेक्षित असून त्याला आता भाविक पर्यटकांना दर्शनाकरिता खुले ... असाच जेजुरीचा आगळा वेगळा खंडा बेचाळीस किलो वजनदार असून या तलवारीला साडे तीनशे वर्षांचा इतिहास लाभला आहे.🗡

खंडा तलवारीचे मर्दानी खेळ झाल्यावर या सोहळ्याचा समारोप होतो .शेकडो वर्षापासून इथे चालू असलेल्या ४२ किलोच्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून सारेच थक्क व्हायेला लागतात.
मल्हारी मार्तंड ! जय मल्हार ! जल्लोषाने ओथंबलेले स्वर आणि भंडार्याच्या मुक्त उधळणीने आसमंताला आलेले पिवळेपण! मार्तंड भैरवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उस्तव मूर्तींना आणून त्या ठिकाणी देवभेटीचा विलोभनीय सोहळा पार पडतो .त्या नंतर हा पालखी सोहळा जेजुरी गडावर आल्यावर रंगतात ते म्हणजे मर्दानी खेळांची स्पर्धा, १२ वर्षपासून ते ६० वर्षापर्यंत भक्त या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात.
तब्बल ४२ किलोंची तलवार एका हातात जास्तीत जास्त वेळ पेलून धरण्याची आणि दाताने उचलून मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धाच या ठिकाणी रंगते. ४२ किलो वजन असणारी ही खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी अडीचशे वर्षपूर्वी अर्पण केली. तेव्हापासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा गडावर आला की ती उचलली जाते. अशाप्रकारे मर्दानी खेळातून खंडोबाचे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करत असतात.🗡
येळकोट येळकोटचा गजर... पिवळ्या धमक भंडा-याची उधळण... सनई चौघडे, भक्तीगीत आणि अंगात सळसळता उत्साह आणणारी तलवारबाजी.भंडा-याची उधळण आणि मिरवणुकीनंतर रंगतात ते मर्दानी खेळांची स्पर्धा.कित्येक वर्षापासून भक्त या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात... तब्बल ४२ किलोची खंडा तलवार दातानं उचलत मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धा रंगते.🗡
http://bit.ly/3srZ4FW
कुलस्वामी खंडेरायास साधारणपणे सुमारे २५० वर्षांपूर्वी एक मण वजन असलेली तलवार (खंडा) व कासवाच्या पाठीची ढाल अर्पण केली होती. हि तलवार युद्धात वापरायची नव्हती तर मानकरी पद्धतीची तलवार होती.त्यापैकी ढाल वीस पंचवीस वर्षापूर्वी गहाळ झाली, मात्र खंडा अजूनही मंदिरामध्ये पहावयास मिळतो. तलवारीचे वजन ४२ किलो तर उंची ४ फूट व रुंदी चार इंच आहे. तलवारीवर मुठीच्या वरील बाजूस पात्यावर कोरीव लेख दिसतो त्यामध्ये महिपतराव लक्ष्मण व रामराव लक्ष्मण पानसे अशी नावे दिसतात.मंदिरात मल्हारराव होळकर आणि चिमाजी आप्पा या शाहू छत्रपतींच्या सरदारांनी दिलेल्या भव्य घंटा हि आहेत.🗡♏
0
Answer link
खडा तलवार ही एक प्रकारची तलवार आहे. याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:
- स्वरूप: खडा तलवार ही सरळ पात्याची आणि जाडजूड मूठ असलेली तलवार आहे.
- उपयोग: खडा तलवारीचा उपयोग पूर्वी युद्धात आणि शस्त्र म्हणून केला जात असे.
- ऐतिहासिक महत्त्व: भारतीय इतिहासात खडा तलवारीला विशेष महत्त्व आहे. अनेक शूरवीरांनी आणि योद्ध्यांनी या तलवारीचा वापर केला आहे.
- संवर्धन: आजही अनेक ऐतिहासिक संग्रहालयांमध्ये खडा तलवारी जतन करून ठेवल्या आहेत.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: