नेहमी घसा दुखत असेल तर काय करावे? घरगुती उपाय सांगा?
तसे पाहिले तर घसा दुखणे हा आजार सगळ्याच ऋतूमध्ये आपल्याला होत असतो. काही लोकांना तर थोडा जरी हवामान मध्ये बदल झाला तर लगेच घसा दुखतो, कधी कधी कुठे बाहेर गेल्यावर तेथील पाणी प्यायले असताही काही जणांचा घसा पकडतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे साधे पाणी पिणे नकोसे होते. सर्वांना फ्रीज मधले थंड पाणी प्यायला हवे. त्यामुळे काही जणांच्या गळ्यावर त्याचा परिणाम होतो आणि घसा दुखू लागतो.घसा दुखायला लागल्यावर तो तिथेच थांबत नाही तर त्याचबरोबर सर्दी आणि पुढे जाऊन खोकला, अंगदुखी, ताप इत्यादी आजार आपल्या अंगावर पडतात त्यामुळे घसा दुखायला लागल्यावर लगेच हे उपाय करा. हे घरगुती उपाय आहेत यातून तुम्हाला नक्की आराम मिळेल. शिवाय या वस्तू आपल्याला घरातच मिळतील त्यामुळे बाहेर जायची ही गरज नाही.
पहिली गोष्ट म्हणजे घसा दुखायला लागल्यावर आपण सतत गोळ्या औषध घेतो. पण लगेच हे सर्व करण्याची गरज नाही. आगोदर घरगुती उपाय करा त्यातून तुम्हाला आराम मिळतोच पण जर आजार जास्त असेल तर डॉक्टर कडे जा. पण अगोदर घरगुती उपाय करा. त्यासाठी एका भांड्यात गरम पाणी करा. त्या गरम पाण्यात थोडे मीठ आणि हळद मिसळा आणि हे पाणी घेऊन गुळण्या करा. या गुळण्या दिवसातून तीन वेळा करा तुम्हाला नक्की आराम मिळेल.आता आपल्या घरात आळा ही असतोच हा आळा घ्या त्याचा बारीक तुकडा तोंडात ठेवा आणि तो चघळत रहा. यामुळे ही तुमच्या घशाला आराम मिळतो. आता आपण एक काढा बनवू या. यासाठी आपल्या घरात असणारे पदार्थ याचा उपयोग करा. एक ग्लास पाणी घ्या त्यात थोड आलं किसून टाका. थोडी हळद आणि थोडा गूळ टाकून हा काढा उकळा चहा प्रमाणे आणि दिवसातून दोन ते तीन वेळा घ्या तुमच्या घशाला आराम मिळेल.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत घसा दुखत आहे तोपर्यंत शक्यतो कोमट पाणी पीत रहा.
1. मध (Honey): मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे घसा दुखत असल्यास मध चाटल्याने आराम मिळतो.
2. गरम पाणी आणि मीठ (Salt and Warm Water): गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने घसा खवखवणे कमी होते आणि आराम मिळतो.
3. आले (Ginger): आल्यामध्ये दाहक-विरोधी (anti-inflammatory) गुणधर्म असतात. आल्याचा चहा प्यायल्याने घशाला आराम मिळतो.
4. लसूण (Garlic): लसणामध्ये ऍलिसिन (allicin) नावाचे तत्व असते, ज्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. लसणाची एक पाकळी चावून खाल्ल्याने घसादुखी कमी होते.
5. लिंबू आणि मध (Lemon and Honey): लिंबू आणि मध गरम पाण्यात मिसळून प्यायल्याने घशाला आराम मिळतो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
6. वाफ घेणे (Steam Inhalation): गरम पाण्याची वाफ घेतल्याने श्वासोच्छ्वास नलिकेतील अडथळा दूर होतो आणि घशाला आराम मिळतो.
7. मसालेदार चहा (Spiced Tea): तुळस, आले, लवंग, आणि काळी मिरी टाकून चहा प्यायल्याने घसादुखी कमी होते.
8. पुरेसा आराम (Rest): घसा दुखत असल्यास, शरीराला पुरेसा आराम देणे आवश्यक आहे.
9. द्रवपदार्थ (Fluids): भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेटेड (hydrated) ठेवा.
10. डॉक्टरांचा सल्ला (Doctor's advice): वारंवार घसा दुखत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.