Topic icon

घसा खवखवणे

5
तसे पाहिले तर घसा दुखणे हा आजार सगळ्याच ऋतूमध्ये आपल्याला होत असतो. काही लोकांना तर थोडा जरी हवामान मध्ये बदल झाला तर लगेच घसा दुखतो, कधी कधी कुठे बाहेर गेल्यावर तेथील पाणी प्यायले असताही काही जणांचा घसा पकडतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे साधे पाणी पिणे नकोसे होते. सर्वांना फ्रीज मधले थंड पाणी प्यायला हवे. त्यामुळे काही जणांच्या गळ्यावर त्याचा परिणाम होतो आणि घसा दुखू लागतो.
घसा दुखायला लागल्यावर तो तिथेच थांबत नाही तर त्याचबरोबर सर्दी आणि पुढे जाऊन खोकला, अंगदुखी, ताप इत्यादी आजार आपल्या अंगावर पडतात त्यामुळे घसा दुखायला लागल्यावर लगेच हे उपाय करा. हे घरगुती उपाय आहेत यातून तुम्हाला नक्की आराम मिळेल. शिवाय या वस्तू आपल्याला घरातच मिळतील त्यामुळे बाहेर जायची ही गरज नाही.

पहिली गोष्ट म्हणजे घसा दुखायला लागल्यावर आपण सतत गोळ्या औषध घेतो. पण लगेच हे सर्व करण्याची गरज नाही. आगोदर घरगुती उपाय करा त्यातून तुम्हाला आराम मिळतोच पण जर आजार जास्त असेल तर डॉक्टर कडे जा. पण अगोदर घरगुती उपाय करा. त्यासाठी एका भांड्यात गरम पाणी करा. त्या गरम पाण्यात थोडे मीठ आणि हळद मिसळा आणि हे पाणी घेऊन गुळण्या करा. या गुळण्या दिवसातून तीन वेळा करा तुम्हाला नक्की आराम मिळेल.
आता आपल्या घरात आळा ही असतोच हा आळा घ्या त्याचा बारीक तुकडा तोंडात ठेवा आणि तो चघळत रहा. यामुळे ही तुमच्या घशाला आराम मिळतो. आता आपण एक काढा बनवू या. यासाठी आपल्या घरात असणारे पदार्थ याचा उपयोग करा. एक ग्लास पाणी घ्या त्यात थोड आलं किसून टाका. थोडी हळद आणि थोडा गूळ टाकून हा काढा उकळा चहा प्रमाणे आणि दिवसातून दोन ते तीन वेळा घ्या तुमच्या घशाला आराम मिळेल.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत घसा दुखत आहे तोपर्यंत शक्यतो कोमट पाणी पीत रहा.
उत्तर लिहिले · 1/4/2020
कर्म · 35170
24

*💁🏻‍♀ घशातील खवखव हमखास दूर करेल ज्येष्ठमधाचा तुकडा !*

_वातावरणातील बदलामुळे अनेकांना घशात खवखव जाणवते. घशातील या खवखवीचा त्रास औषधगोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक उपायांनी आटोक्यात आणणं शक्य आहे. याकरिता ज्येष्ठमध फायदेशीर ठरते..._

*याकरिता नियमित लहानसा ज्येष्ठमधाचा तुकडा चघळत रहा.*

*ज्येष्ठमधाचे फायदे ?* 
*मेंदूला चालना-* 
▪ज्येष्ठमधामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते.
▫यामधील अ‍ॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूंच्या पेशींना बळकटी देतात. 

*हृदयाचे आरोग्य-*
▪कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.

*रोगप्रतिकारशक्ती-*
▪शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक घटक लिम्फोसाइट्स आणि मैक्रोफेज ज्येष्ठमधामध्ये असतात.

*हार्मोनल संतुलन-*
▪ज्येष्ठमधातील फाइटोस्ट्रोजेनिक घटक महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन नियमित ठेवण्यासाठी मदत करते.
▫मेनोपॉजचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.

*अ‍ॅन्टी बॅक्टेरियल-*
▪शरीरात घातक मायक्रोबायल्सची वाढ रोखण्याची क्षमता ज्येष्ठमधामध्ये आहे.
▫यामुळे शरीरात व्हायरसचा धोका कमी होतो.

*अ‍ॅन्टी अल्सर-*
▪ज्येष्ठमधामध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असल्याने पोटातील, आतड्यामधील, तोंडातील अल्सरचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
-----------
उत्तर लिहिले · 3/7/2018
कर्म · 569245
0
कोमट पाण्यात हळद आणि मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या करा(दिवसातुन तीन वेळा)
घसा मोकळा होतो आणि वेदना कमी होतात
उत्तर लिहिले · 15/3/2018
कर्म · 7355
3
वातावरण बदलले की ही समस्या होते , रोज सकाळी कोमट पाण्यत मीठ टाकून त्याने गुळनी करा तसच रात्रि झोपन्या आधी पण करा

6 azee 250 tab घ्या
2 वेळा (दुपारी - रात्रि) जेवना नंतर , 3 दिवस

या tab घेताना विसर पडू देऊ नका , 3 दिवस बरोबर आठवानीने घ्या

हा 3 days चा course झाल्यावर
Himalaya Septilin tab घ्या या मुळे तुमची immunity power वाढेल मग पुढे कधीच हा त्रास होणार नाही

Septiln tab चा एक छोटा पैक येतो Rs.120 ला असेल 
रोज 2-2 tab घ्या जेवना नंतर
उत्तर लिहिले · 18/11/2017
कर्म · 0
4
⚀1. 6-7  मिरीचे दाणे खलबत्यात जाडसर कुटावेत.
2.एक ग्लास दूध मंद आचेवर 5-10 मिनिटे उकळावे.
3.दूध उकळायला लागल्यावर त्यात अर्धा टिस्पून हळद, कुटलेली मिरपूड आणि 1 टिस्पून साखर मिसळावी.
4.मिश्रण उकळल्यावर गॅस बंद करावा.
5.हे दूध थोडे कोमट झाल्यावर प्यावे.  सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना असे मिश्रण प्यायल्यास खवखवीपासून  सुटका होते.