औषधे आणि आरोग्य
घरगुती उपाय
घसा खवखवणे
आरोग्य
जोरात बोलताना घसा खवखवतो, घसा दुखतो त्यावर काही उपाय सांगा?
4 उत्तरे
4
answers
जोरात बोलताना घसा खवखवतो, घसा दुखतो त्यावर काही उपाय सांगा?
24
Answer link
*💁🏻♀ घशातील खवखव हमखास दूर करेल ज्येष्ठमधाचा तुकडा !*
_वातावरणातील बदलामुळे अनेकांना घशात खवखव जाणवते. घशातील या खवखवीचा त्रास औषधगोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक उपायांनी आटोक्यात आणणं शक्य आहे. याकरिता ज्येष्ठमध फायदेशीर ठरते..._
*याकरिता नियमित लहानसा ज्येष्ठमधाचा तुकडा चघळत रहा.*
*ज्येष्ठमधाचे फायदे ?*
*मेंदूला चालना-*
▪ज्येष्ठमधामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते.
▫यामधील अॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूंच्या पेशींना बळकटी देतात.
*हृदयाचे आरोग्य-*
▪कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.
*रोगप्रतिकारशक्ती-*
▪शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक घटक लिम्फोसाइट्स आणि मैक्रोफेज ज्येष्ठमधामध्ये असतात.
*हार्मोनल संतुलन-*
▪ज्येष्ठमधातील फाइटोस्ट्रोजेनिक घटक महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन नियमित ठेवण्यासाठी मदत करते.
▫मेनोपॉजचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.
*अॅन्टी बॅक्टेरियल-*
▪शरीरात घातक मायक्रोबायल्सची वाढ रोखण्याची क्षमता ज्येष्ठमधामध्ये आहे.
▫यामुळे शरीरात व्हायरसचा धोका कमी होतो.
*अॅन्टी अल्सर-*
▪ज्येष्ठमधामध्ये अॅन्टिऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असल्याने पोटातील, आतड्यामधील, तोंडातील अल्सरचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
-----------
7
Answer link
गोखले साहेबानी सांगितल्याप्रमाणे दिवसातून ३ ते ४ वेळा
कोमट पाण्याने गुळण्या। करा
व त्या सोबत च मेडिकल मध्ये स्ट्रेप्सील नावाची गोळी भेटते
ती दिवसातून ३ वेला खा
तुम्हाला ३ त४ दिवसात नक्की फरक जनवेल
व थोडे दिवस जरा कमी आवाजात बोलत जा
ह्याचा तुम्हाला लवकर फायदा होईल
काळजी घ्या
धन्यवाद
कोमट पाण्याने गुळण्या। करा
व त्या सोबत च मेडिकल मध्ये स्ट्रेप्सील नावाची गोळी भेटते
ती दिवसातून ३ वेला खा
तुम्हाला ३ त४ दिवसात नक्की फरक जनवेल
व थोडे दिवस जरा कमी आवाजात बोलत जा
ह्याचा तुम्हाला लवकर फायदा होईल
काळजी घ्या
धन्यवाद
0
Answer link
जोऱ्यात बोलताना घसा खवखवणे आणि दुखणे यावर काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्हाला घसा खवखवणे आणि दुखण्यापासून आराम मिळू शकेल.
- आराम: घशाला आराम देणे खूप महत्त्वाचे आहे. जास्त बोलणे टाळा.
- गरम पाणी: गरम पाणी प्यायल्याने घशाला आराम मिळतो.
- मिठाचे पाणी: गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा.
कसे करावे:
- एक ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ टाका.
- या पाण्याने दिवसातून २-३ वेळा गुळण्या करा.
- मध: मध घशासाठी खूप উপকারী आहे. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
- आद्र हवा: हवा कोरडी असल्यास घसा आणखी खवखवू शकतो. त्यामुळे हवा humidify करण्यासाठी humidifier चा वापर करा.
- गरम पेय: चहा, सूप असे गरम पेय प्यायल्याने घशाला आराम मिळतो.
- डॉक्टरांचा सल्ला: आराम मिळवल्यानंतर सुद्धा आराम न मिळाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.