औषधे आणि आरोग्य मूत्ररोग आरोग्य

लघवीला दुर्गंधी का येते?

3 उत्तरे
3 answers

लघवीला दुर्गंधी का येते?

2
लघवी केल्यानंतर नेहमीच घाणेरडा वास येत असतो. त्यापासून वाचण्यासाठी नेहमीच जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण पाण्याचे सेवन जास्त केल्यामुळे लघवी केल्यानंतर दुर्गंध येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही आजारांबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला कळेल की लघवीचा वास जास्त येत असेल तर तुम्हाला  वेगवेगळ्या प्रकारचे आजार असण्याची शक्यता असते. आपल्या शरीरातील विषारी पदार्थ मुत्र आणि घामाद्वारे बाहेर पडत असतात. तर मग जाणून घ्या लघवीच्या दुर्गंधीमुळे कोणते आजार होतात.

युटीआईमुळे


युरिनरी ट्रॅक इन्फेक्शिन एक असा आजार आहे. ज्यामुळे महिलांच्या लघवीतून वास येत असतो. युटीआई हे असं इन्फेक्शन आहे. ज्यात महिलांची गर्भपिशवी खराब होत असते. तसंच आग सुद्धा होत असते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास महागात पडू शकतं. म्हणून त्वरित डॉक्टरांशी संपर्क करणं गरजेचं आहे.

शरीरात  डिहाइड्रेशन  झाल्यामुळे




शरीराच्या हाडांसह सगळ्याच भागांना पाण्याची खूप गरज असते. आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवणं  फार गरजेचं असतं. त्यासाठी १० ते १२ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. गरजेपेक्षा कमी पाण्याचे सेवन केल्यानंतर आरोग्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे लघवीचा घाणेरडा वास येण्याबरोबरचं रंग सुद्धा पिवळा होत असतो. पोट साफ होण्यास सुद्धा समस्या निर्माण होत असतात.

आहारातील चुकीच्या पदार्थाचा समावेश




आपल्या आहारात काही पदार्थ असे असतात. ज्यामुळे लघवीतून वास येत असतो.  जास्त मसालेदार पदार्थ लसूण आणि कांदा खाल्यामुळे लघवीचा वास येतो. मद्याचे अतिसेवन आणि धुम्रपान केल्यामुळे लघवीचा वास येत असतो.

डायबिटीज



​मुत्राचा जास्त वास येत असेल तर डायबिटीस सुद्धा असू  शकतो. डायबिटीस हा असा आजार आहे. जो मरेपर्यंत   सोबत राहत असतो. रक्तात साखरेचे प्रमाण अधिक झाल्यामुळे हा आजार होतो.  या आजारात लघवीचा घाणेरडा वास येतो.  गरोदरपणात सुरूवातीच्या काही दिवसात मुत्राचा  खूपच घाणेरडा वास येत असतो.
उत्तर लिहिले · 27/3/2020
कर्म · 55350
1
लघवीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. जेव्हा किडनीमधून शरीरातील पाणी आणि इतर वेस्ट (food, medicine) फिल्टर होऊन बाहेर टाकले जाते, त्यातून मोठ्या प्रमाणात अमोनियाचा वास येतो. त्यात पाणी कमी आणि वेस्ट जास्त असल्यास वास जास्त येतो, याउलट पाणी जास्त आणि वेस्ट कमी असल्यास वास कमी येतो.
उत्तर लिहिले · 27/3/2020
कर्म · 100
0

लघवीला दुर्गंधी येण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

  • डिहायड्रेशन (Dehydration): जेव्हा तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असते, तेव्हा लघवी अधिकConcentrated होते, ज्यामुळे तीला तीव्र वास येऊ शकतो.
  • मूत्रमार्गात संक्रमण (Urinary Tract Infection - UTI): UTI मुळे लघवीमध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि दुर्गंधी येऊ शकते.
  • आहार: काही विशिष्ट पदार्थ जसे की शतावरी (Asparagus), लसूण किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने लघवीला वास येऊ शकतो.
  • औषधे: काही औषधांमुळे देखील लघवीला वास येऊ शकतो.
  • मधुमेह (Diabetes): अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या लघवीला गोडसर वास येऊ शकतो.
  • यकृत समस्या (Liver Problems): यकृताच्या समस्यांमुळे लघवीला तीव्र वास येऊ शकतो.
  • किडनी समस्या (Kidney Problems): किडनीच्या समस्यांमुळे देखील लघवीला वास येऊ शकतो.

जर लघवीला येणारी दुर्गंधी तीव्र असेल आणि काही दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे आणि वैद्यकीय सल्ला म्हणून याचा वापर करू नये.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

लघवीला फेस येतो का?
लघवी करताना जळजळ होत असल्यास काय उपाय करावा?
लघवी मळकट लाल होत आहे... नेमके काय झाले समजत नाही आहे... कृपया त्याबद्दल काही माहिती कळवा...
लघवी करताना कळ मारत आहे, उपाय सांगा?
लघवी करताना आग होते उपाय सांगा?
थेंब थेंब लघवी होत असेल तर उपाय काय?
वारंवार लघवीला जावे लागते?