Topic icon

मूत्ररोग

0
लघवीला फेस येण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
  • प्रोटिनuria (Proteinuria):

    लघवीमध्ये प्रोटीन (protein) जास्त प्रमाणात असल्यास फेस येऊ शकतो. किडनी (kidney) व्यवस्थित काम करत नसल्यास प्रोटीन लघवीतून बाहेर टाकले जाते.

  • डिहायड्रेशन (Dehydration):

    शरीरात पाण्याची कमतरता असल्यास लघवी जास्त केंद्रित (concentrated) होते आणि त्यामुळे फेस येऊ शकतो.

  • मधुमेह (Diabetes):

    ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांच्या लघवीमध्ये ग्लुकोजचे (glucose) प्रमाण वाढल्यामुळे फेस येऊ शकतो.

  • उच्च रक्तदाब (High Blood Pressure):

    उच्च रक्तदाबामुळे किडनीवर परिणाम होतो आणि लघवीत फेस येऊ शकतो.

  • किडनीचे आजार (Kidney Disease):

    किडनीच्या विविध आजारांमुळे लघवीत प्रोटीन जास्त प्रमाणात येऊ शकते, ज्यामुळे फेस येतो.

  • गर्भावस्था (Pregnancy):

    गर्भावस्थेमध्ये काहीवेळा लघवीत प्रोटीनचे प्रमाण वाढल्यामुळे फेस येऊ शकतो.

जर तुम्हाला तुमच्या लघवीत सतत फेस दिसत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ते तुमच्या लघवीची तपासणी करून योग्य निदान करू शकतील.

Disclaimer: या माहितीचा उद्देश केवळ ज्ञान देणे आहे. वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0

लघवी करताना जळजळ होत असल्यास सर्वात आधी भरपूर पाणी प्या, थंड दुध घ्या,अक्के धने रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी उठून प्यावे  धणे शरीरासाठी थंडावा देतो.
तुम्हालाही लघवीला वारंवार जावे लागते व गेल्यावर जळजळ होते का किंवा त्रास होतो का? यामागील सर्वात मोठं कारण आहे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI). ही समस्या साधारणतः 18-60 या वयोगटातील महिला आणि पुरूषांमध्ये आढळते. पण ही समस्या जास्तकरून महिलांमध्ये जास्त आढळते. कारण बॅक्टेरियांच्या संसर्गामुळे UTI ची समस्या निर्माण होते. ज्यामुळे लघवी करताना जळजळ होणं आणि दुखणं यासारखा त्रास जाणवतो. तर पुरूषांमध्ये ही समस्या प्रोस्टेट संबंधी समस्यांमुळे निर्माण होते. कोणत्याही प्रकारच्या युरिनरी इंफेक्शनमुळे लघवी करताना जळजळ, वेदना किंवा बैचेनी जाणवत असल्यास लगेच डॉक्टरांना संपर्क करावा आणि त्वरित उपचार घ्यावा. हा त्रास फक्त औषधं घेऊनही बरा होऊ शकतो. पण यावर काही घरगुती उपचारही उपयोग पडतात. जे कोणत्याही साईड ईफेक्ट्सशिवाय तुम्हाला लघवी करताना होणारी जळजळ आणि वेदनेपासून आराम देतात. चला तर जाणून घेऊया युरिनरी इन्फेक्शनबाबत सर्व माहिती.
 


युरिन इन्फेक्शन होण्याची मुख्य कारणं
मॉर्डन लाईफस्टाईलमुळे आजकाल युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) हा त्रास कॉमन झाला आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे अस्वच्छ पब्लिक टॉयलेटचा वापर करणं. कारण आजही भारतात तुम्ही प्रवासाला किंवा रोज अगदी नोकरी करायला बाहेर पडल्यासही नाईलाजास्तव तुम्हाला अस्वच्छता असलेल्या पब्लिक टॉयलेटचा वापर करावाच लागतो. पण तरीही या समस्येकडे गंभीरतेने पाहिलं जात नाही. त्यामुळे अनेकदा महिला या इन्फेक्शनच्या बळी पडतात. तसं पाहता हे तेवढं गंभीर इन्फेक्शन नाही पण जर वेळेवर इलाज न केल्यास याचा किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. तर दुसरीकडे घरातील टॉयलेटची नियमित रूपाने सफाई न केल्यासही तुम्हाला हे इन्फेक्शन होऊ शकतं.  

असं होतं इन्फेक्शन
युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन हे इतकं कॉमन आहे की, प्रत्येक महिलेला आपल्या आयुष्यात एकदा तरी या इन्फेक्शनचा उपचार करून घ्यावा लागतोच. युटीआई तेव्हा होतं जेव्हा बॅक्टेरिया किंवा फंगस आपल्या पचन तंत्रातून निघून किंवा इतर माध्यमातून लघवीच्या मार्गावर चिकटतात आणि वेगाने वाढत जातात. जर या इन्फेक्शनकडे वेळीच लक्ष न दिल्यास बॅक्टेरिया तुमच्या ब्लॅडर आणि किडनीपर्यंत पोहचू शकतात आणि तुम्हाला इजा होऊ शकते.  

युरिन इन्फेक्शन मुख्य लक्षणं
युरिन इन्फेक्शनची काही मुख्य लक्षणं वेळीच पाहिल्यास पुढील त्रास टळू शकतो. पाहा कोणती आहेत ही लक्षणं. 


– लघवी करताना दुखणं किंवा जळजळ होणं.

-ओटीपोट किंवा पाठीच्या खालच्या भागात दुखणं.

-हुडहुडी भरणं

-शरीराचं तापमान वाढणं

-कधी खूप गरम किंवा खूप थंडी वाजणं

– उलटीसारखं वाटणं

– वारंवार लघवीला जावं लागणं

– रात्रीसुद्धा लघवीला जाणं

-लघवीला दुर्गंधी येणं

-लघवीचा रंग फिकट किंवा हलका लाल होणं

युरिन इन्फेक्शनवरील घरगुती उपाय 
काही लघवीच्या जागी जळजळ होणे उपाय टाळू शकता. पाहा काय आहेत लघवी इन्फेक्शन उपाय हे सोपे घरगुती उपाय.


नारळाचं पाणी
लघवी करताना होणारी जळजळ ही खूपच त्रासदायक असते. यावरील रामबाण घरगुती उपाय म्हणजे नारळाच पाणी. आपल्या सगळ्यांनाच नारळाचं पाणी प्यायला आवडतं. मग जर तुम्हालाही लघवीला गेल्यावर जळजळ किंवा दुखत असेल तर नारळाच पाणी हा उत्तम आणि सोपा उपाय आहे. नारळामध्ये खूप गुणकारी तत्त्व आहेत जी लघवीमुळे होणारी जळजळ, वेदना आणि बैचेनी यांसारख्या समस्या दूर करतात. आपल्या शरीरात ही समस्याही तेव्हाही निर्माण होते जेव्हा आपलं शरीर डीहायड्रेट होतं आणि त्यातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात नारळाचं पाणी प्यायल्याने लघवीच्या वेळी होणारी जळजळ आणि वेदनेपासून सुटका मिळू शकेल.



काकडी
काकडीची कोशिंबीर किंवा चटणी हा सुरूवातीपासून भारतीय आहारातील महत्त्वपूर्ण भाग राहिला आहे. भारतीय जेवणातील डावी बाजू ही कोशिंबीरीसाठीच राखीव असते. याचं मुख्य कारण म्हणजे काकडीतील थंडावा. लघवीच्या वेळी होणाऱ्या जळजळ आणि वेदनेवरील अजून एक उपाय म्हणजे काकडीचं सेवन. कारण यातील अल्कलाईन तत्त्व आपल्याला शरीराला आतून थंडावा देतं आणि पचन क्रियाही सुधारतं. यामध्ये अनेक प्रकारची अँटीऑक्सीडंट्सही आढळतं. त्यामुळे काकडी आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक आहे. मग आजपासूनच सलाड, कोंशिबीर आणि चटणीच्या रूपात काकडीचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश करा.

                                                                       

व्हिटॅमीन सी

व्हिटॅमीन सी चं आपल्या निरोगी आरोग्यात खूप महत्त्वाचं योगदान आहे. लघवीच्या वेळी होणारी जळजळ आणि वेदना थांबवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून तुम्ही व्हिटॅमीन सी युक्त पदार्थाचं सेवन करू शकता. व्हिटॅमीन सीमुळे आपल्या लघवीतील अॅसिडची मात्रा वाढते आणि त्यामुळे बॅक्टेरियाचा नायनाट होतो. परिणामी इन्फेक्शनचा धोका कमी होतो. फळ आणि भाज्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन सी आढळतं. लिंबाचा रस, संत्र्याचा रस, किवी फ्रूट, द्राक्ष आणि आवळा हे व्हिटॅमीन सी चे खूप चांगले स्त्रोत आहे. ज्याचं सेवन केल्यास तुमचं युरिन इन्फेक्शन नक्कीच कमी होईल.

अॅपल सायडर व्हिनेगर 

तुम्हाला हा घरगुती उपाय ऐकून थोड आश्चर्य वाटेल पण हाही एक रामबाण उपाय आहे. कारण अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये एन्झाईम, पॉटेशिअम आणि खूप प्रमाणात खनिज आढळतात. तसंच यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणही असतात. जे शरीरातील बॅक्टेरिया आणि फंगची वाढ होऊ देत नाही. तसंच लघवीला होणारी जळजळ आणि वेदनाही दूर करतात.



बेकिंग सोडा 

बेकिंग सोडा हा खूपच उपयोगी पडणार घरगुती पदार्थ आहे. याचा उपयोगही तुम्ही युरिन इन्फेक्शनमध्ये करू शकता. बेकिंग सोड्यातील अल्कलाईन तत्व लघवीतील अॅसिडचं प्रमाण वाढू देत नाहीत आणि शरीराचा pH स्तरही योग्य ठेवतात. बेकिंग सोड्याच्या सेवनाने तुम्हाला वारंवार लघवीला जाण्याच्या त्रासापासूही सुटका मिळते. तसंच वेदना आणि जळजळही दूर होते.

आलं

प्रत्येक घरातील किचनमध्ये आलं तर हमखास असतंच असतं. आल्यामधील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल तत्वांमुळे लघवीतील बॅक्टेरिया आणि अन्य प्रकारचे व्हायरस यांना आळा बसतो. ज्यामुळे युरिन इन्फेक्शन दूर होतं. तुम्ही आल्याचा रस कोमट दूधातून किंवा आल्याचा चहा घेऊनही करू शकता.

दही 

दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. प्रत्येकीकडे रोज ताजं दही लावलं जातं. हेच दही तुम्हाला युरिन इन्फेक्शनमुळे होणारा त्रासही दूर करू शकतं. याचं मुख्य कारण म्हणजे दह्यात आहे वाईट बॅक्टेरियाचा नाश करण्याची ताकद आणि चांगला बॅक्टेरिया वाढवण्याची क्षमता. जर तुम्च्या योनीमध्ये बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झाल्यास दह्यामुळे नक्कीच आराम मिळेल आणि pH स्तरही सामान्य राहील.

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे हे युरिन इन्फेक्शनवरील अजून एक सोपा घरगुती उपाय आहे. मेथीचे दाणे शरीरातील विषारी पदार्थांना शरीराबाहेर टाकतं आणि pH स्तर कायम ठेवतात. मेथीच्या दाणांच्या सेवनाने तुम्हाला युरिन इन्फेक्शनमध्ये नक्कीच आराम मिळेल.

धने

लघवीला होणारी जळजळ आणि वेदना दूर करण्यासाठी तुम्ही धन्याचा वापर करू शकता. कारण धने हे शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देतात. तसंच धन्याच्या दाण्यांमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणही असतात. जे आपल्याला युरिनरी इन्फेक्शनपासून वाचवतात आणि आपल्या शरीराचं तापमान स्थिर ठेवतात. त्यामुळे धन्याच्या दाण्यांचा वापर हा खूपच गुणकारी आहे.

थंड 

सायविरहीत थंड दूध प्यायल्याने शरीराचं तापमान स्थिर राहतं आणि लघवीला होणारी जळजळ कमी होते. तुम्ही थंड दूधात वेलची पावडर घालूनही ते पिऊ शकता.

हे सर्व घरगुती उपाय वापरून तुम्ही युरिन इन्फेक्शन टाळू शकता. कारण हे सर्वच घरगुती उपाय सोपे आणि गुणकारी आहेत.



लघवी थांबवल्यास होणारे दुष्परिणाम
बरेचदा आपण लघवीला जाण्याचा कंटाळा करतो. पण नंतर मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. त्यामुळे शक्यतो असं करणं टाळा. 

वेदना
जास्त वेळ लघवी कंट्रोल केल्यास तुमच्या मूत्राशय आणि किडनीमध्ये वेदना होऊ शकतात. त्यामुळे लघवीला गेल्यावर तुम्हाला वेदना होतात. तसंच तुम्हाला पेल्व्हीक क्रॅम्पसचा त्रासही होऊ शकतो.

युटीआय 
जे लोक आवश्यक प्रमाणात पाणी पित नाहीत, त्यांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा त्रास होतो. यामध्ये बॅक्टेरिया मूत्र मार्गात फैलावतात. यामुळे इन्फेक्शनचा धोका असतो.

मूत्राशय आकुंचन पावणे
खूपवेळ लघवी थांबवल्याने तुमचं मूत्राशय आकुंचन पावू शकतं. यामुळे मूत्राशयााला सामान्यपणे लघवी करणं अशक्य होतं. कोणाचं मूत्राशय निकामी झाल्यास कॅथ्रेटरसारखा अतिरिक्त उपाय आवश्यक होतो.

पेल्व्हीक स्नायूंचं नुकसान
वारंवार लघवी केल्यामुळे पेल्व्हीकच्या स्नायूंच नुकसान होतं. पेल्व्हिक फ्लोर एक्सरसाईज जसं केगल्स केल्याने स्नायूंना मजबूती मिळते आणि लघवीला होणारा त्रासही थांबतो.

किडनी स्टोनचा धोका
लघवी कंट्रोल केल्याने किडनी स्टोनचा त्रास होण्याची शक्यता असते. हा त्रास शक्यतो त्या व्यक्तींना होण्याचा धोका असतो ज्यांच्या लघवीत खनिजची मात्रा जास्त असते. ज्यामुळे अजूनही गंभीर परिणाम होऊ शकतात. यासाठी जाणून घ्या मुतखड्यावर घरगुती उपाय.

लघवी कंट्रोल करण्याचे इतर परिणाम 
तुमचं मूत्राशय हे तुमच्या मूत्र प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे मूत्रमार्गाच्या माध्यमाने आपल्या किडनीशी जोडलेलं असतं. काही वेळा लघवी किडनीमध्ये किंवा वारंवार लघवी गेल्यास इन्फेक्शन होऊन किडनीचं नुकसान होऊ शकतं.

युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी हे करा

– भरपूर पाणी प्या
युटीआय टाळण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे जास्तीत पाणी प्या आणि बॅक्टेरिया बाहेर टाका. जर तुम्ही व्यवस्थित पाणी प्यायलात तर तुम्ही व्यवस्थित हायड्रेट राहाल आणि त्यामुळे लघवीही वेळेवर होईल.

– व्यवस्थित स्वच्छता
जेव्हा जेव्हा तुम्ही लघवीला जाल तेव्हा ती जागा व्यवस्थित पाण्याने किंवा टीश्यूजने नक्की वाईप करा. त्यामुळे बॅक्टेरियाचा फैलाव होणार नाही. खासकरून महिलांनी सेक्स केल्यानंतर या गोष्टींटी काळजी घ्यावी.

– 

– 

जर तुम्हाला लघवी लगेच करणं शक्य नसल्यास हे करा
काहीवेळा प्रवासात असताना किंवा एखाद्या ठिकाणी शौचालय उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला लगेच लघवीला जाणं शक्य नसतं. अशावेळी तुम्ही लक्ष दुसरीकडे केंद्रित करून लघवी थांबवू शकता. पण जर तुम्हाला लघवीला जाणं शक्य असल्यास कधीच जाणं टाळू नका.

लघवी कंट्राोल करण्यासाठी उपाय 
जेव्हा तुम्हाला लघवीला जाण्याची तीव्र इच्छा होते पण शक्य नसतं. तेव्हा तुम्ही तुमचं मन गाण ऐकण्यात किंवा वाचनात गुंतवा. मोबाईल वापरा किंवा सोशल मीडियावर वेळ घालवा. शरीराला उष्ण ठेवण्याचा प्रयत्न करा.कारण थंडाव्याने तुम्हाला लघवीला जाण्याची तीव्रतेने इच्छा होईल.  

युरिन इन्फेक्शनबाबत विचारले जाणारे प्रश्न 
1. घरच्या घरी युरिन इन्फेक्शन कसं तपासावं?
युरिन इन्फेक्शन घरच्या घरी तपासण्यासाठी तुम्ही मेडिकलमध्ये मिळणाऱ्या युरिन टेस्ट स्ट्रीप्सचा वापर करू शकता. ज्या तुम्ही तुमच्या युरिन सँपलमध्ये बुडवून इन्फेक्शन आहे की नाही हे पाहू शकता. पण कोणत्याही स्ट्रीप्सचा वापर करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

2. महिलांमधील ब्लॅडर इन्फेक्शनची लक्षणं कोणती?
– लघवी करताना जळजळ किंवा दुखणं

-सारखं लघवीला जावं लागणं

-लघवीला वास येणे

– लघवीला वारंवार जाण्याची घाई होणे

– लघवीला गेल्यावर किंवा जाऊन आल्यावर कळ येणे

3. दर अर्ध्या तासाने लघवीला जाणं नॉर्मल आहे का?
युरिनरी फ्रिक्वेन्सी म्हणजे 24 तासात तब्बल 7 पेक्षा जास्त वेळा लघवीला जावं लागणं. जर तुम्ही दिवसभरात 2 लीटर पाणी पित असाल तर हे साहजिक आहे. पण काही व्यक्तींमध्ये हे जास्त वेळा घडतं. तेव्हा ते डॉक्टरकडे जाणं पसंत करतात.

4. युरिन इन्फेक्शन टाळल्यास काय परिणाम होतील? 
वर सांगितल्याप्रमाणे युरिन इन्फेक्शनचे गंभीर परिणाम दिसून येतात. असं झाल्यास तुम्हाला हेवी अँटीबायोटीक्सचा डोस घ्यावा लागू शकतो किंवा इतरही ट्रीटमेंट घ्याव्या लागू शकतात. 

































































































उत्तर लिहिले · 10/6/2022
कर्म · 53720
4
सर, तुम्हाला मुतखडा असण्याची शक्यता आहे, तुम्ही लॅबला जाऊन 'युरिन रुटीन' नावाची टेस्ट करा आणि रिपोर्ट घेऊन युरोलॉजिस्ट सर्जनकडे दाखवा. धन्यवाद.
उत्तर आवडल्यास लाईक करा.
उत्तर लिहिले · 28/9/2020
कर्म · 2535
0
तुम्ही पाणी कमी प्रमाणात पित आहात, पाण्याबरोबर गुळ घ्या, रात्री पाय, तोंड धुऊन झोपा. दिवसातून दोन वेळा अंघोळ करा. नॉर्मल होईल. धन्यवाद
उत्तर लिहिले · 11/7/2020
कर्म · 0
2
लघवी करताना दाह व वेदना होणे ही डिसूरिया(dysuria) या समस्येची लक्षणे गंभीर असू शकतात.लघवी करताना होणारी समस्या यूटीआय(मूत्रमार्गातील इनफेक्शन)याचे एक देखील लक्षण असू शकते.वारंवार लघवीला होणे,लघवी थांबवता न येणे व लघवी करताना त्रास होणे ही डिसूरिया ची लक्षणे असू शकतात.ही लक्षणे पुरुषांपेक्षा तरुण महिलांमध्ये अधिक आढळतात.कारण तरुण स्त्रीया सेक्शुली जास्त अॅक्टीव्ह असतात.वयस्कर लोकांमध्ये प्रोस्टेडच्या समस्येमुळे लघवीला दाह व जंतुसंसर्ग होऊ शकतो. म्हणूनच जाणून घ्या  लघवी करताना होणारा त्रास नेमका कोणत्या कारणांमुळे वाढतो ?

डिसूरिया व यूटीआय(मूत्रमार्गातील इनफेक्शन)या दोन समस्या समान नसतात.

डिसूरियाची लक्षणे पेल्विक भागात व मूत्रमार्गात आढळतात. डिसूरियामुळे मूत्रमार्गातील अवयवांना जंतूससंर्ग होतो.दुर्मिळ परिस्थितीत काही जिवाणूंमुळे देखील डिसूरिया होतो.वारंवार होणा-या अडथळ्यामुळे मूत्रमार्गात व त्याजवळील अवयवांमध्ये विकृती येते व या विकृतीमुळे त्या अवयवांच्या कार्यात बिघाड होतो.यूटीआय(मूत्रमार्गातील इनफेक्शन) हे देखील डिसूरिया ही समस्या होण्याचे एक प्रमुख कारण असू शकते.त्याचप्रमाणे लघवीला त्रास होण्याची आणखी अनेक कारणे देखील असू शकतात. जाणून घ्या मूत्रपरिक्षणावरून ओळखा कसे आहे तुमचे आरोग्य !

डिसूरिया समस्या निर्माण होण्याची कारणे-

पाणी कमी प्रमाणात पिणे-

डिसूरियाचे प्रमुख कारण पुरेशा प्रमाणात पाणी व द्रवपदार्थ न घेणे हे असू शकते.प्रौढाच्या शरीरात ५५ टक्के व अर्भकाच्या शरीरात ७५ टक्के पाणी असते.शरीरात पुरेसे पाणी नसेल तर शरीराच्या विविध कार्यावर त्याचा दुष्पपरिणाम होतो.तुमच्या शरीराला किती पाण्याची गरज आहे हे तुमचे वय,लिंग आणि उर्जेच्या गरजेनुसार ठरते.

उदा.दोन ते तीन वर्षांच्या मुलाला १००० ते १४०० कॅलरीजची गरज असते. त्यामुळे त्याने दररोज १३०० मिली पाणी पिणे आवश्यक असते.त्याचप्रमाणे प्रौढ महीलेला दररोज २.७ ली. व प्रौढ पुरुषांना ३.७ ली.पाण्याची गरज असते.

तुम्हाला जर लघवी करताना समस्या असेल तर भरपूर प्रमाणात पाणी प्या.

पिनवर्म-

कधीकधी पिनवर्ममुळे देखील मूत्रमार्गात बिघाड होऊ शकतो. ग्रीसमधील इलपाईस हॉस्पिटलमध्ये एका ६५ वर्षाच्या वृद्ध माणसाच्या प्रोस्टेड ग्रंथीमध्ये ४ मीमी चा जिंवत पिनवर्म मिळाला आहे.त्या माणसामध्ये लघवीला वारंवार होणे,लघवीला वेदना,सौम्य पाठदुखी व मूत्रमार्गात अस्वस्थता ही लक्षणे आढळली.तर तुर्कीमधल्या एका संशोधनात डिसूरिया मध्ये झालेल्या पिनवर्मसोबत अशी लक्षणे आढळली नाहीत.उलट या संशोधनात शाळेत जाणा-या मुलींनी पिनवर्म इनफेक्शन झाले असताना रात्री झोपेत अंथरुणात लघवी केल्याची उदाहरणे सापडली. जाणून घ्या पुरूषांमध्ये युरीन इंफेक्शनचा त्रास वाढण्यामागील ’6′ कारणं !

औषध-उपचार-

काही औषध-उपचारांमुळे देखील लघवीच्या समस्या निर्माण होतात.

युरेट्रल सिंड्रोम-

हा विकार मूत्रमार्गातील एक संकर्मण आहे.यामध्ये मूत्रमार्गातील रोगजनकांच्या कमी पातळीमुळे,मूत्रमार्गातील बिघाडामुळे किंवा सॅनिटरी नॅपकिन,टेम्पोन अथवा सेक्स दरम्यान मूत्रमार्गात झालेल्या जखमेमुळे मूत्रमार्गात समस्या निर्माण होतात.

डिसूरियाची इतर काही कारणे-

मॅनोपॉजनंतर स्त्रीयांमध्ये इस्टोजनची पातळी कमी झाल्यामुळे मूत्रमार्गा्च्या समस्या होतात.मूत्रमार्ग कोरडा होणे,कधीकधी दाह होणे या समस्या सोबत डिसूरिया होण्याची शक्यता असते.
सेक्स दरम्यान त्या भागात झालेली जखम.
एखादा स्प्रे,क्रीम,साबण,टॉयलेट पेपर सहन न होणे.
युरेट्रल सर्जरी
घोड्यावर सवारी अथवा सायकलींग करणे
मनोविकार अथवा मानसिक व लैगिंक अत्याचार झालेली माणसे
सेक्शूली ट्रान्समिटेड इनफेक्शन
व्हर्जायनल यीस्ट इनफेक्शन
मूत्राशय व किडनीचे इनफेक्शन
किडनी स्टोन
डिसूरियावर काय उपाय करावेत-

मूत्रमार्गात कधीतरी होणा-या समस्येबाबत घाबरण्याचे काहीच कारण नाही.मात्र डिसूरियाची लक्षणे आढळल्यास किंवा दीर्घ काळ गंभीर वेदना होत असतील तर तुमच्या डॉक्टरचा सल्ला जरुर  घ्या.

प्राथमिक चाचणी दरम्यान डॉक्टर या गोष्टी तपासतील-

लक्षणे
तुमच्या सेक्शूल अॅक्टिव्हीटीज
मूत्रमार्गातील इनफेक्शन
लघवीमध्ये रक्त असणे,वारंवार लघवी होणे
पोटदुखी व वजानल डिस्चार्ज
तुम्ही घेत असलेल्या अॅन्टीबायोटीक्स
घरात किडनीस्टोनचा त्रास अनेकांना असणं
या टेस्ट करण्यात येतात-

कॉस्टोव्हर्टेबल अॅगंल टेंडरनेस
मूत्रमार्गातील परिक्षण
पेल्विक परिक्षण
डॉक्टरांना संशय आल्यास करण्यासाठी इतर काही टेस्ट-

युरीन अॅनालिसिस व कल्चर
सेक्शूली टान्समिटेड इनफेक्शन स्क्रिनींग
लघवीमधील कॅल्शियम व क्रिएटीन
लघवीत रक्त सापडल्यास रिनल अल्ट्रा साउंड
पेल्विक अल्ट्रा साउंड
किडनी स्टोनसाठी सीटी स्कॅन
डिसूरियावर करण्यात येणारे उपचार-

तुमच्या स्थितीनूसार डिसूरियावर अॅन्टीबायोटीक्स देण्यात येतात.यीस्ट इनफेक्शन असल्यास अॅन्टी फंगल औषधे किंवा योनीमार्गासाठी क्रीम देण्यात येतात.पेल्विक भागात गंभीर दाह होत असल्यास तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते.
उत्तर लिहिले · 30/6/2020
कर्म · 8110
2
लघवी केल्यानंतर नेहमीच घाणेरडा वास येत असतो. त्यापासून वाचण्यासाठी नेहमीच जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण पाण्याचे सेवन जास्त केल्यामुळे लघवी केल्यानंतर दुर्गंध येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही आजारांबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला कळेल की लघवीचा वास जास्त येत असेल तर तुम्हाला  वेगवेगळ्या प्रकारचे आजार असण्याची शक्यता असते. आपल्या शरीरातील विषारी पदार्थ मुत्र आणि घामाद्वारे बाहेर पडत असतात. तर मग जाणून घ्या लघवीच्या दुर्गंधीमुळे कोणते आजार होतात.

युटीआईमुळे


युरिनरी ट्रॅक इन्फेक्शिन एक असा आजार आहे. ज्यामुळे महिलांच्या लघवीतून वास येत असतो. युटीआई हे असं इन्फेक्शन आहे. ज्यात महिलांची गर्भपिशवी खराब होत असते. तसंच आग सुद्धा होत असते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास महागात पडू शकतं. म्हणून त्वरित डॉक्टरांशी संपर्क करणं गरजेचं आहे.

शरीरात  डिहाइड्रेशन  झाल्यामुळे




शरीराच्या हाडांसह सगळ्याच भागांना पाण्याची खूप गरज असते. आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवणं  फार गरजेचं असतं. त्यासाठी १० ते १२ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. गरजेपेक्षा कमी पाण्याचे सेवन केल्यानंतर आरोग्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे लघवीचा घाणेरडा वास येण्याबरोबरचं रंग सुद्धा पिवळा होत असतो. पोट साफ होण्यास सुद्धा समस्या निर्माण होत असतात.

आहारातील चुकीच्या पदार्थाचा समावेश




आपल्या आहारात काही पदार्थ असे असतात. ज्यामुळे लघवीतून वास येत असतो.  जास्त मसालेदार पदार्थ लसूण आणि कांदा खाल्यामुळे लघवीचा वास येतो. मद्याचे अतिसेवन आणि धुम्रपान केल्यामुळे लघवीचा वास येत असतो.

डायबिटीज



​मुत्राचा जास्त वास येत असेल तर डायबिटीस सुद्धा असू  शकतो. डायबिटीस हा असा आजार आहे. जो मरेपर्यंत   सोबत राहत असतो. रक्तात साखरेचे प्रमाण अधिक झाल्यामुळे हा आजार होतो.  या आजारात लघवीचा घाणेरडा वास येतो.  गरोदरपणात सुरूवातीच्या काही दिवसात मुत्राचा  खूपच घाणेरडा वास येत असतो.
उत्तर लिहिले · 27/3/2020
कर्म · 55350
6
लघवी केल्यानंतरही थेंब थेंब  गळत असेल तर हे वाचा  

             *_☬ लघवी हि एक शारीरिक क्रिया आहे. आणि हि क्रिया प्रत्तेक माणूस प्राणी कोणताही जीव असो त्याच्यामध्ये असते आणि ते करत असतात. लघवी विषयी काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण दुर्लक्ष केल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो._*

*आपण लघवी केल्यानंतर सुद्धा आपल्या प्रायवेट पार्ट मधून थेंब टपकत असेल तर वेळीच व्हा सावध, कारण हे एका मोठ्या आजाराचे लक्षण आहे. कधी कधी लघवी नंतर थेंब टपकन हि एक सामान्य बाब असू शकते परंतु जर हे वारंवार होत असेल. तर हा आहे एक गंभीर आजार. हा एक प्रकारे प्रोटेस्ट चे लक्षण आहे. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी किव्हा ऑफिस मध्ये अचानक लघवीची इच्छा होत असेल आणि लघवीला गेल्यानंतर लघवी येत नाही असे जर कधी तुमच्यासोबत झाले असेल तर हे प्रोटेस्ट कॅन्सर चे एक मोठे लक्षण आहे. कधी उन्हांत जास्त चालल्याने किव्हा उष्णतेने आपल्याला उन्हाळी लागू शकते तेव्हाही असे होते. परंतु हे नियमित ओत असेल तर तुम्हाला याची डॉक्टरांकडे जाऊन खात्री करून घायवी लागेल. आणि ज्या वेळेला अस काही आपल्यासोबत घडते तेव्हा प्रोटेस्ट चा आकार हळुवार पणे वाढत जातो. डॉक्टरांच्या मते हि व्याधी लट्ठ लोकांना जास्त प्रमाणात होते.