4 उत्तरे
4
answers
सर्वनाम म्हणजे काय ?
2
Answer link
नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. म्हणजेच तू, ती, ते, त्याला, तिने इत्यादी सर्वनामे असतात.
1
Answer link
सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. नाम वाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरे वाटत नाही. नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्याऐवजी ‘मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय’ यांसारखे शब्द आपण वापरतो. या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ते ज्या नामांबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो. वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते. ‘तो’ हा शब्द राम, वाडा, कळप, थवा, आळस अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्दल वापरता येतो. अशा शब्दाचा उपयोग सर्व (प्रकारच्या) नामांसाठी होतो, म्हणून त्यास सर्वनाम असे म्हणतात.
0
Answer link
उत्तर:
सर्वनाम:
वाक्यात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. नामाचा वारंवार होणारा उल्लेख टाळण्यासाठी सर्वनामाचा उपयोग होतो.
उदाहरणार्थ:
- मी, तू, तो, ती, ते, आम्ही, तुम्ही, हा, ही, हे, कोण, काय, आपण, स्वतः इत्यादी.
सर्वनामाची उदाहरणे:
- मी शाळेला जातो.
- तू काय करतो आहेस?
- तो चांगला मुलगा आहे.
- ती सुंदर आहे.
- आपण जेवण केले का?