भारताचा इतिहास इतिहास

१८५७ च्या उठावाची कारणे स्पष्ट करा?

3 उत्तरे
3 answers

१८५७ च्या उठावाची कारणे स्पष्ट करा?

14
👉1857 च्या उठावाची कारणे :-

■राजकीय कारणे :-
●कंपनीचे साम्राज्यवादी धोरण :-
सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. व्यापार करणे हा कंपनीचा मुख्य हेतु होता.
परंतु भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन कंपनीने सत्ताविस्तारास सुरुवात केली. र्लॉड वेलस्ली, र्लॉड हेस्टिंग्ज र्लॉड डलहौसी या गव्हर्नर जनरलची प्रचंड सत्ताविस्तार करुन सर्व देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले.
कंपनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थानिकांच्या सत्ता नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट झाले.

■र्लॉड वेलस्लीची तैनाती फौज :-
इ.स. 1798 मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.
त्याने तैनाती फौजेच्या पध्दतीचा अवलंब करून साम्राज्य विस्तारावर भर दिला.
तैनाती फौज दुर्बल संस्थानिकांच्या अंतर्गत व बाहय संरक्षणासाठी देण्यात आली. याच्या मोबदल्यात संस्थानिकास कंपनीस रोख रकमेऐवजी आपल्या राज्याचा काही प्रदेश तोडून द्यावा लागे.
त्याचबरोबर या फौजेचा खर्च संस्थानिकास करावा लागे. कंपनीच्या परवानगीशिवाय इतरांशी युध्द किंवा करार करता येणार नाहीत. तसेच इंग्रजांचा वकिल दरबारी राहिल.
त्याच्या मार्गदर्शनानुसार राज्यकारभार करावा, इ. तैनाती फौजेच्या अटी होत्या.
वेलस्लीने निजाम मराठयांचे शिंदे, होळकर, भोसले, इ. सरदार अयोध्येचा नवाब पेशवा दुसरा आवळला व अनेक संस्थाने बरखास्त केली.
ब्रिटिशांची मुत्सद्देगीरी भेदनीती साम्राज्यवाद भारतीय संस्थानिकांना ओळखला आला नाही.
परिणाम त्यांना आपल्या सत्ता गमवाव्या लागल्या.
संस्थानांचे विलनीकरण आणि खालसा पध्दती :-

■इ.स. 1848 मध्ये र्लॉड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला तो अतिशय महत्वाकांक्षी व साम्राज्यावादी वृत्तीवरचा होता.
डलहौसी देशी राज्यांना ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यासाछी, खालसा पध्दतीचा अवलंब केला. याबाबत त्याचे दोन मार्ग होते.
एक तर ते राज्य जिंकून घेणे किंवा विविध कारणे दाखवून ते ब्रिटिश साम्राज्यात विलीन करणे डलहौसीने आपल्या अंकित असणार्‍या संस्थानिकांवर त्यांनी आपल्या उत्तरधिकार्‍यास कंपनी सरकारची मान्यता घेणे आवश्यक केले व जी संस्थाने तत्वानुसारच नि:संतान संस्थानिकाला डलहौसीने दत्ताक घेण्यास परवानगी दिली नाही.
दत्ताक वारस नामंजूर या धोरणानुसार सातारा, झाशी, संबळपूर, जेतपूर, उदयपूर, नागपूर, इ. संस्थाने खालसा करुन कंपनीच्या राज्यात सामाविष्ट केली.
तर गैरकारभार व अव्यवस्था या त्वाखाली अयोध्येचे संस्थान खालसा केले.
डलहौसीच्या या आक्रमक धोरणामुळे अनेक संस्थानिक दुखावले गेले, तर शिल्लक असणारे संस्थानिक भयभीत झाले.

■पदव्या आणि पेन्शन रद्द :-
र्लॉड डलहौसीने अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द करण्याचा सपाटा चालविला.
मोगल सम्राट बहादूरशहा याचा बादशहा हा किताब व त्यास मिळणारी पेन्शन रद्द करण्याचा प्रयत्न केला.
पेशवा दुसरा बाजीराव याचा दत्ताक पुत्र नानासाहेब मिळणारी पेन्शन डलहौसीने बंद केली वर्‍हाड (विदर्भ) प्रांत आपल्या ताब्यात घेतला.
इंग्रजांनी अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द केल्यामुळे त्यांची मने दुखावली गेली.

■वेतने, इनाम व जहागिरीची जप्ती :-
ईस्ट इंडिया कंपनीच्या भरभराटीसाठी र्लॉड विल्यम बेंटिकने अनेक योजना आखल्या भारतातील अनेक संस्थानिकांनी लोकंाना इनाम म्हणून जमिनी दिल्या होत्या बेंटिकने अशा जमिनीची चौकशी करून ज्यांच्याकडे पुरावे नव्हते.
त्यांच्या जमीनी काढून घेतल्या. अनेक जहागिरींची जप्ती केली.
र्लॉड डलहौसीने पुरावे न्व्हते.
जमिनींच्या चौकशीसाठी एक कमिशन नेमले.या कमिशनने पंचवीस हजार इनामी जमिनींची चौकशी करुन एकवीस हजार जप्त केले यामूळे लक्षावधी लोक नाराज झाले.

■आर्थिक कारणे :-
●देशी उद्योगधंद्याचा र्‍हास –
ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता.
18 व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली.
सुरुवातीस इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती झाली.
येथील कारखान्यांना लागणारा कच्चा माल हिंदुस्थानातून नेण्यात येऊ लागला व तयार झालेला पक्का माल भारतीय बाजारपेठेत आणून विकला जाऊ लागला कारखान्यात तयार झालेला माल अत्यंत सुबक सुंदर व टिकाऊ होता.
परिणामत भारतीय लघुद्योगातून यार झालेलया मालास उठाव राहिला नाही. इंग्रजांच्या व्यापारी धोरणामुळे येथील उद्योगधंदे बुडाले लक्षावधी कारागीरांवर बेकारीची वेळ आली.

●शेतीसंबंधी उदासीन धोरण –
शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता व त्यावरच लोकांची उपजीविका अवलंबून होती. शेतर्‍यांना उत्पन्नाच्या 2/3 हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता.
दुष्काळाच्या परिस्थितीतही शेतसार्‍यामध्ये कसल्याही प्रकारची सूट देण्यात येत नसे याउलट जो शेतकरी वेळेवर कर भरत नसत त्यांच्या जमिनींचे जाहीर लिलाव केले जात. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक शोषण होऊ लागले.
ब्रिटिशांनी सर्व देशभर एकच अशी शेतसार्‍याची पध्दत ठेवलेली नव्हती प्रत्येक प्रांतामध्ये यात वेगळेपणा होता.
र्लॉड कॉर्नवालिसने पंजाब प्रांतात कायमधारा पध्दती सुरु केली. तर र्लॉड हेस्ंिटग्जने यात सुधाराण करुन पंजाब व आग्रा प्रांतात थॉमस मन्रो याने रयतवारी पध्दती सुरु केंली.
ब्रिटिशांनी शेती सुधारण्यापेक्षा कर वसुलीकडे अधिक लक्ष दिले. कराच्या ओझ्याखाली शेतकरी दबला गेला व असा शेतकरी ब्रिटिशांच्या विरोधात उभा राहिला .

■धार्मिक कारणे :-
●धार्मिक संकट-
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे आर्थिक साम्राज्यावादाबरोबरच धार्मिक साम्राज्यवादाचाही पुरस्कार केला.
इ.स. 1813 च्या चार्टर अ‍ॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली.
अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले.
कंपनीने धर्म प्रसारासाठी खालील मार्गाचा अवलंब केला.
(अ) ख्रिश्चन धर्म स्वीकारणार्‍यांना वडिलोपार्जित संपत्ती त त्यांचा हक्क मिळे.

(ब) अनाथ बालकांना सेवा सुविधा देऊन ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली जाई.

(क) ख्रिश्चन धर्म स्वीकाराणार्‍यांना नोकरीत सामावून घेतले जाई व जे नोकरीत असतील त्यांना बढती दिली जाई.

(ड) ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या शाळांतून ख्रिश्चन धर्माची शिकवण व तत्वज्ञान दिले जाई.

(ई) तुरुंगवास भोगणार्‍या भारतीयाने ख्रिश्चन धर्म स्वीकारलयास त्याची मुक्तता होई

कंपनीच्या या धर्मप्रसारामुळे भारतीयांना असे वाटू लागले की इंग्रजानी आपला व्यापार उद्योग बुडविला आता इंग्रज आपला धर्मही बुडविणार.

●धर्म व सामाजिक सुधारणाविरुध्द प्रतिक्रिया –
कंपनी सरकारच्या कालखंडामध्ये धर्म व समाज सुधारणेबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
विशेषता बेंटिकने इ.स. 1929 मध्ये सती बंदीचा कायदा केला बेंटिकने समाज सुधारण्यासाठी अनेक सामाजिक सुधारणा केल्या खर्‍या परंतु तत्कालीन रुढीप्रिय समाजाला या सुधारणा आवडल्या नाहीत.
उत्तर लिहिले · 25/1/2020
कर्म · 16430
1
सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन 1856 पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. सन 1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा ‘राष्ट्रीय उठाव’ म्हणून प्रसिध्द आहे. इसवी सन 1857 मध्ये जे बंड झाले तेच भारताचे पहिले स्वातंत्र्ययुध्द म्हणून ओळखले जाते.
राजकीय कारणे :- कंपनीचे साम्राज्यवादी धोरण :- सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. व्यापार करणे हा कंपनीचा मुख्य हेतु होता. परंतु भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन कंपनीने सत्ताविस्तारास सुरुवात केली. र्लॉड वेलस्ली, र्लॉड हेस्टिंग्ज र्लॉड डलहौसी या गव्हर्नर जनरलची प्रचंड सत्ताविस्तार करुन सर्व देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले. कंपनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थानिकांच्या सत्ता नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट झाले. र्लॉड वेलस्लीची तैनाती फौज :- इ.स. 1798 मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. त्याने तैनाती फौजेच्या पध्दतीचा अवलंब करून साम्राज्य विस्तारावर भर दिला. तैनाती फौज दुर्बल संस्थानिकांच्या अंतर्गत व बाहय संरक्षणासाठी देण्यात आली. याच्या मोबदल्यात संस्थानिकास कंपनीस रोख रकमेऐवजी आपल्या राज्याचा काही प्रदेश तोडून द्यावा लागे. त्याचबरोबर या फौजेचा खर्च संस्थानिकास करावा लागे. कंपनीच्या परवानगीशिवाय इतरांशी युध्द किंवा करार करता येणार नाहीत. तसेच इंग्रजांचा वकिल दरबारी राहिल. त्याच्या मार्गदर्शनानुसार राज्यकारभार करावा, इ. तैनाती फौजेच्या अटी होत्या.
संस्थानांचे विलनीकरण आणि खालसा पध्दती :- इ.स. 1848 मध्ये र्लॉड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला तो अतिशय महत्वाकांक्षी व साम्राज्यावादी वृत्तीवरचा होता. डलहौसी देशी राज्यांना ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यासाछी, खालसा पध्दतीचा अवलंब केला. याबाबत त्याचे दोन मार्ग होते. एक तर ते राज्य जिंकून घेणे किंवा विविध कारणे दाखवून ते ब्रिटिश साम्राज्यात विलीन करणे डलहौसीने आपल्या अंकित असणार्‍या संस्थानिकांवर त्यांनी आपल्या उत्तरधिकार्‍यास कंपनी सरकारची मान्यता घेणे आवश्यक केले व जी संस्थाने तत्वानुसारच नि:संतान संस्थानिकाला डलहौसीने दत्ताक घेण्यास परवानगी दिली नाही.
पदव्या आणि पेन्शन रद्द :- र्लॉड डलहौसीने अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द करण्याचा सपाटा चालविला. मोगल सम्राट बहादूरशहा याचा बादशहा हा किताब व त्यास मिळणारी पेन्शन रद्द करण्याचा प्रयत्न केला. पेशवा दुसरा बाजीराव याचा दत्ताक पुत्र नानासाहेब मिळणारी पेन्शन डलहौसीने बंद केली वर्‍हाड (विदर्भ) प्रांत आपल्या ताब्यात घेतला. इंग्रजांनी अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द केल्यामुळे त्यांची मने दुखावली गेली.
आर्थिक कारणे :- देशी उद्योगधंद्याचा र्‍हास – ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता. 18 व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली. सुरुवातीस इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती झाली. येथील कारखान्यांना लागणारा कच्चा माल हिंदुस्थानातून नेण्यात येऊ लागला व तयार झालेला पक्का माल भारतीय बाजारपेठेत आणून विकला जाऊ लागला कारखान्यात तयार झालेला माल अत्यंत सुबक सुंदर व टिकाऊ होता. परिणामत भारतीय लघुद्योगातून यार झालेलया मालास उठाव राहिला नाही. इंग्रजांच्या व्यापारी धोरणामुळे येथील उद्योगधंदे बुडाले लक्षावधी कारागीरांवर बेकारीची वेळ आली
शेतीसंबंधी उदासीन धोरण – शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता व त्यावरच लोकांची उपजीविका अवलंबून होती. शेतर्‍यांना उत्पन्नाच्या 2/3 हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता. दुष्काळाच्या परिस्थितीतही शेतसार्‍यामध्ये कसल्याही प्रकारची सूट देण्यात येत नसे याउलट जो शेतकरी वेळेवर कर भरत नसत त्यांच्या जमिनींचे जाहीर लिलाव केले जात. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक शोषण होऊ लागले.
हिंदी जनतेची आर्थिक पिळवणूक – भारत हा एक सधन व संपन्न देश होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताची आर्थिक लूट केली. या देशातील प्रत्यके प्रांत कोणत्या ना कोणत्या उत्पनासाठी प्रसिध्द होता. आसाम चहासाठी, महाराष्ट्र्र, गुजरात, कापसासाठी तर पंजाब, व बंगाल धनधान्यासाठी प्रसिध्द होता.
शेतसार्‍यासाठी शेतकर्‍यांवर अन्याय, अत्याचार – सरकारी अधिकार्‍यांनी जमीन महसूल कृषी उत्पनाच्या स्वरूपात घेण्याऐवजी रोखा रकमेच्या स्वरुपात घेण्याचा आग्रह धरला शेतकर्‍यांकडे रोख रक्कम नसल्याने शेतकर्‍यांवर अन्याय अत्याचार करण्यात आले. मद्रासमधील सरंकारी निवेदनात म्हटले आहे, त्यानुसार ठरावीक शेतसरा प्राप्त करण्यासाठी उन्हात उभे करणे, जेवण न देणे फटके मारणे अशा शिक्षा दिला जात होत्या.
सामाजिक – सांस्कृतिक कारणे :- हिंदूविषयी तुच्छतेची भावना – काळया लोकांपेक्षा गौरवणीर्य लोक जन्मत श्रेष्ठ आहेत. अशी भावना 19 व्या शतकात युरोपभर पसरली होती. इंग्लंडही त्यास अपवाद कसा असेल हिंदी लोक मागास आहेत. त्यांची संस्कृती रानटी आहे हे भारतीयांच्या मनावर ब्ंिाबविण्याचा ब्रिटिश प्रयत्न करु लागले. एखादया साधा इंग्रज रस्त्याने जात असेल तर घोडागाडीमधून जाणार्‍या भारतीयालाही खाली उतरून त्या इंग्रजास सलाम ठोकावा लागे. रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून भारतीयांना प्रवेश करण्यास मज्जाव होता. युरोपियनांच्या हॉटेलमध्ये व क्लबमध्ये भारतीयांना प्रवेश नसे, हिदी माणसाप्रती असणारी ब्रिटिशांची तुच्छतेची भावना भारतीयांचा असंतोष वाढविण्यास कारणीभूत ठरली.
धार्मिक कारणे :- धार्मिक संकट- ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे आर्थिक साम्राज्यावादाबरोबरच धार्मिक साम्राज्यवादाचाही पुरस्कार केला. इ.स. 1813 च्या चार्टर अ‍ॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली. अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले. कंपनीने धर्म प्रसारासाठी खालील मार्गाचा अवलंब केला.
धर्म व सामाजिक सुधारणाविरुध्द प्रतिक्रिया – कंपनी सरकारच्या कालखंडामध्ये धर्म व समाज सुधारणेबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेषता बेंटिकने इ.स. 1929 मध्ये सती बंदीचा कायदा केला बेंटिकने समाज सुधारण्यासाठी अनेक सामाजिक सुधारणा केल्या खर्‍या परंतु तत्कालीन रुढीप्रिय समाजाला या सुधारणा आवडल्या नाहीत.
लष्करी कारणे :- राजकीय आर्थिक सामाजिक धार्मिक कारणामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असला. तरी जोपर्यत शिपाई बंडास तयार होत नाही, तोपर्यत उठाव घडून येणे शक्य नव्हते. शिपायांनी हाती बंदूक घेतली आणि उठावास सुरुवात झाली. त्यामुळे शिपायांनी हाती शस्त्र घेण्यासाठी मागची कारणे महत्वाची आहेत.
हिंदी शिपायावरील निर्बंध – ब्रिटिशांनी अनेक लष्करी कायदे मंजूर करुन हिंदी शिपायांवर निर्बध लादले. इ.स. 1806 मध्ये कायदा पास करुन हिंदी शिपायांवर गंध लावण्याची व दाढी करण्याची सक्ती केली. भारतीय सैन्यात समुद्र पर्यटन केल्यास आपला धर्म बुडेल अशी समजूत होती. र्लॉड कॅन्ंिागने सामान्य सेवा भरती अधिनियम पास केला, या कायद्यानुसार भारतीय सैन्याला समुद्र पार करुन विदेशात पाठविले जाणार होते.
(अ) लष्करातील उच्च अधिकार पदे भारतीय सैनिकांनी दिली जात नसत. (ब) एकाच पदावर काम करणार्‍या हिंदी व ब्रिटिश शिपायांच्या वेतन व भत्यांत फार मोठी तफावत केली जात होती. (क) हिंदी शिपायांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जाई. परेड ग्राऊंडवर त्यांचा अवमान कला जाई. वेळप्रसंगी लाथासुध्दा घातल्या जात.
त्कालिक कारण :- इनफिल्ड बंदुका व चरबीयूक्त काडतूसे काडतूस प्रकरणामुळे हिंदी सैन्यामधील असंतोष पराकोटीस पोहोचला. इ. स. 1857 मध्ये इनफिल्ड नावाच्या नवीन बंदुका वापरात आणल्या. या बंदुकांना लागणार्‍या काडतुसांचे सील गाई व डुकराच्याचरबीने बंद केले. या काडतुसांचा वापर करते वेळी त्यावरील सील सैनिकांना दाताने तोडावे लागे गाय ही हिंदूना पवित्र तर डुक्कर हे मुस्लिमांना निषिध्द काडतूस प्रकरणामुळे हिंदू मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या. या प्रकरणाची माहिती वार्‍यासारखी सर्व भारतीय सैनिकांना मिळाली . त्यांनी काडतूसे वापरण्यास नकार दिला. नकार देणार्‍या शिपायांवर खटले भरण्यात आले. 10 वर्षापर्यत त्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्या या सैनिकंाना नोकरीतून काढून टाकणयत आले. त्यामुळे लष्करी छावण्यांमध्यील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनत गेली आणि यामधून 1857 च्या उठावाचा भडका उडाला.
उत्तर लिहिले · 17/11/2020
कर्म · 415
0
१८५७ च्या उठावाची कारणे खालीलप्रमाणे आहेत:

राजकीय कारणे:

  • लॉर्ड डलहौसीचे तैनातीचे धोरण आणि खालसा धोरण.
  • मोगल बादशाह आणि पेशव्यांसारख्या शासकांना नाममात्र सत्ता ठेवण्यास भाग पाडणे.
  • भारतीय शासकांचा अपमान.

आर्थिक कारणे:

  • ब्रिटिशांनी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे नष्ट केले.
  • जमिनदारी पद्धतीमुळे शेतकरी गरीब झाले.
  • उच्च कर आणि अन्यायकारक महसूल धोरणे.

सामाजिक आणि धार्मिक कारणे:

  • भारतीय समाजातील रूढी आणि परंपरांमध्ये हस्तक्षेप.
  • मिशनऱ्यांकडून धर्मांतरण.
  • जातीय भेदभाव.

लष्करी कारणे:

  • भारतीय सैनिकांना कमी पगार आणि बढतीमध्ये संधी नसणे.
  • नवीन एनफिल्ड रायफलमध्ये वापरल्या जाणाऱ्या काडतुसांमध्ये गायीची चरबी वापरली जाते अशी अफवा.

१८५७ च्या उठावामुळे भारतातील ब्रिटीश राजवटीला मोठा धक्का बसला. या उठावामुळे भारतीयांना संघटित होऊन ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 940

Related Questions

वसाहत वाद म्हणजे काय?
क्रांतिकारक सेनापती बापट यांनी कोणती चळवळी व आंदोलने केली?
पोर्तुगीजांना नाविक परवाना कुणी दिला?
पेट्रोल इंजिनचा शोध कोणी लावला?
भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार कोण आहेत?
गांधी व जिना यांना किती पत्नी होत्या?
प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने काय आहेत?