१८५७ चा उठाव इतिहास

1857 चा उठावा कारण लिह?

2 उत्तरे
2 answers

1857 चा उठावा कारण लिह?

2
1757–1857 या शंभर वर्षाच्या कालखंडात कंपनी सरकारने आपला प्रचंड साम्राज्यविस्तार केला. कंपनीच्या धोरणामुळे प्रजा संस्थानिक जहांगीरदार जमीनदार असंतुष्ट झाले. राजकीय आर्थिक सामाजिक धार्मिक व लष्करी क्षेत्रातील असंतोषामधून 1857 चा उठाव घडून आला.


1857 च्या उठावाची कारणे 


1) 1857 च्या उठावाची राजकीय कारणे :- 
i) कंपनीचे साम्राज्यवादी धोरण :-
ब्रिटिश केवळ व्यापारासाठी भारतात आले होते. व्यापाराच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवणे हा त्यांचा मूळ उद्देश होता.

भारतात राजकीय अस्थिरता व आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेऊन कंपनीने भारतीय राज्याच्या राज्यकारभारात हस्तक्षेप सुरू करुन सत्ता विस्तारला प्रारंभ केला.

ब्रिटिशांनी लॉर्ड वेलस्वी, लॉर्ड हेस्टिंग्ज व लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरल यांच्या कारकिर्दीत विस्तार केला.



ii) तैनाती फौजेचे दुष्परिणाम :-
लॉर्ड वेलस्वीने लष्करीदृष्ट्या कमकुवत असलेल्या संस्थानांना तैनाती फौजेची पध्दत लागू करून त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणले.



iii) डलहौसी चे संस्थाने खालसा धोरण:-
लॉर्ड डलहौसीने साम्राज्यवादी आक्रमक धोरण अवलंबून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव भारतातील स्थानिक राज्ये खालसा करून ब्रिटिश साम्राज्यास जोडून टाकली.



iv) दत्तक वारसा नामंजूर :- 
नि:संतान राजाला आपला उत्तराधिकारी म्हणून घेण्याची आज्ञा दिली नाही.

निपुत्रिक राजाला दत्तक पुत्र घेण्याची कंपनी सरकारने मंजुरीची अट 1844 मध्येच घातली होती. परंतु त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नव्हती.

डलहौसी ने याचाच फायदा घेऊन सातारा, जैतपुर-संभलपूर, बहागत, उदयपूर, झाशी इत्यादी संस्थाने खालसा केली.



v) पदव्या, तनखे बंद केले :- 
राजेरजवाड्यांना पदव्या व तनखे इंग्रज सरकारने दिले होते ते वंश परंपरागत नसल्याच्या कारणावरून डलहौसीने बंद केले.

पदव्या काढून घेतल्या यामध्ये दत्तकपुत्र नानासाहेब पेशवाही होता.

डलहौसीच्या या धोरणामुळे संस्थानिक, जहागिरदार, वतनदार संतप्त झाले.



2) 1857 च्या उठावाची सामाजिक कारणे :-
ब्रिटिश लोक हे स्वतःला भारतीयापेक्षा उच्च समजत होते.

केवळ आपलीच संस्कृती श्रेष्ठ माणून भारतीय संस्कृतीला व भारतीय लोकांना रानटी असे संबोधले.

सतीबंदी कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा हे कायदे परंपरागत भारतीय समजला आपल्या संस्कृतीवरील आक्रमण वाटले.



3) 1857 च्या उठावाची धार्मिक कारणे :-
1806 मध्ये लष्कराच्या मद्रास छावणीतील शिपायांना गंध लावण्यास व दाढी वाढवण्यास बंदी घातली.

1813 च्या कायद्याने इंग्लंडमधील कोणत्याही व्यक्तीला धर्मप्रसारसाठी भारतात येण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले.

सती प्रतिबंधक कायदा, विधवा पुनर्विवाह, बालविवाह प्रतिबंधक कायदा यासारख्या सामाजिक सुधारणा म्हणजेच भारतीय संस्कृती व धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न आहे अशी भावना भारतीयांमध्ये निर्माण झाली.

1842 साली ब्रम्हदेशाच्या युद्धात हिंदू शिपायांना सक्तीने पाठविण्यात आले.



4) 1857 च्या उठावाची आर्थिक कारणे :-
कंपनीने भारतात राज्य स्थापन केल्यानंतर आर्थिक शोषण करण्यावरच आपले लक्ष केंद्रीत केले होते.

भारतातून कच्चा माल इंग्लडला घेऊन जाणे व त्यावर आधारित पक्का माल तयार करून भारतात आणून विकणे. त्यामुळे भारतातील उद्योगधंदे नष्ट झाले.

हस्त व्यवसायांचा ऱ्हास झाला.

शेतकरी वर्गात रयतवारी, महालवरी, कायमधारा इ. सदोष महसुल पद्धतीमुळे असंतोष पसरला.



5) 1857 च्या उठावाची लष्करी कारणे:-
ब्रिटिश लष्करातील हिंदी शिपायांचे वेतन युरोपियन शिपायांच्या तुलनेत फार कमी होते. तसेच युरोपियन शिपायांना लवकर बढती मिळत होती.

भारतीय शिपायांना गंध लावण्यास व दाढी वाढविण्यास बंदी घातली.

भारतीय सैन्य हे नेहमी युद्धात समोर असायचे.



6) 1857 च्या उठावाची तात्कालीन कारणे :-
i) - काडतुस प्रकरण 
ब्रिटिश लष्करात असलेल्या रॉयल एन्फिल्ड रायफली च्या काडतुसांना गाईची व डुकराची चरबीचे आवरण असत. काडतुसाचा वरचा भाग तोंडाने कापून काढावा लागत होता.

गाय हिंदूना पवित्र व डुक्कर मुस्लिमांना निषिद्ध असल्याने भारतीय शिपायांनी ही कडतुसे वापरण्यास नकार दिला.



1857 चा उठाव :-


31 मे 1857 ही उठावाची पूर्वनियोजित तारीख होती.

1857 च्या उठावात क्रांतीचे प्रतिक 'लाल कमळाचे फुल' व 'चपाती' होते.

1857 च्या उठावाचा प्रसिध्द नारा 'चलो दिल्ली' होता.

29 मार्च 1857 रोजी बराकपूर छावणीत मंगल पांडे या भारतीय शिपायांने मेजर ह्युसन या ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळी झाडली व नियोजित तारखेपूर्वीस उठावाला सुरुवात केली. परिणामी 34 वी. एन. आय. रेजिमेंट भंग करण्यात आली.

चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर करण्यास नकार देणाऱ्या सैनिकांवर शिस्तभंगाचा आरोप ठेवुन शिक्षा देण्यात आली. 

8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडेस फाशी देण्यात आली.

1858 च्या उठावातील मंगल पांडे हा पहिला हुतात्मा ठरला.











:

उत्तर लिहिले · 3/12/2021
कर्म · 121765
0
१८५७ च्या उठावाची कारणे खालीलप्रमाणे आहेत:

राजकीय कारणे:

  • साम्राज्यवादी धोरणे: लॉर्ड डलहौसीने 'साम्राज्यवादी' धोरणे अवलंबली आणि अनेक राज्ये खालसा केली, ज्यामुळे भारतीय शासकांमध्ये असंतोष निर्माण झाला.

  • तैनाती फौज: तैनाती फौजेच्या धोरणामुळे अनेक राज्ये कंपनीच्या आधिपत्याखाली आली आणि त्यांचे स्वातंत्र्य संपुष्टात आले.

  • दत्तक वारसा नामंजूर: ज्या राजांना नैसर्गिक वारस नसे, त्यांचे दत्तक वारस नामंजूर करून त्यांची राज्ये खालसा करण्यात आली, ज्यामुळे अनेक राजघराणी असंतुष्ट झाली.

आर्थिक कारणे:

  • शेतीवरील अन्याय: ब्रिटीश धोरणांमुळे शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थाmode कोलमडली. शेतसारा वाढवला गेला आणि शेतकऱ्यांचे शोषण झाले.

  • हस्तकला आणि उद्योगांचा ऱ्हास: ब्रिटीश औद्योगिक धोरणांमुळे भारतातील पारंपरिक हस्तकला आणि उद्योगधंदे बंद पडले, ज्यामुळे बेरोजगारी वाढली.

  • जमीनदारी पद्धत: जमीनदारी पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे शोषण झाले आणि ते कर्जबाजारी झाले.

सामाजिक आणि धार्मिक कारणे:

  • जातीभेद: ब्रिटीश प्रशासनात भारतीयांना दुय्यम स्थान दिले गेले आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.

  • धर्मांतर: ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण सुरू केले, ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.

  • सती प्रथा आणि बालविवाह बंदी: सती प्रथा आणि बालविवाह यांसारख्या सामाजिक प्रथांवर बंदी घातल्याने काही लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला, कारण त्यांनी याला त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप मानला.

लष्करी कारणे:

  • सैन्यात दुजाभाव: भारतीय सैनिकांना ब्रिटीश सैनिकांपेक्षा कमी वेतन आणि कमी सुविधा मिळत होत्या.

  • 'Enfield' बंदूक: नवीन 'Enfield' बंदुकीच्या cartridges ना लावलेले grease coating मध्ये गाईची चरबी वापरली जाते ह्या बातमीने हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

सन १८५७ च्या उठावाचे महत्त्व थोडक्यात लिहा?
१८५७ च्या युद्धातील इंग्रजांच्या विजयाची कारणे स्पष्ट करा?
1857 च्या उठावाचे तुम्हाला झालेले आकलन तुम्ही कसे मांडाल?
१८५७ च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी कोणी नेपाळमध्ये आश्रय घेतला?
१८५७ च्या उठावाचे परिणाम कोणते झाले?
1857 च्या उठावाची सविस्तर कारणे पष्ट करा?
1857 च्या उठावाची कारणे काय होती?